राशी भविष्य 2016: Rashi Bhavishya 2016 in Marathi
पडदा दूर करा आणि आमच्या राशी भविष्य 2016 द्वारे आपल्या भविष्यावर एक नजर टाका. अर्थ पुरवठ्यामुळे तुमची बँकेतील शिल्लक वाढेल का? तुमच्या जीवनात प्रेमाचा बहर येईल का? तुमच्या कौटुंबिक जीवनात एकोपा नांदेल का? या मोफत वाचनातून प्रत्येक गोष्टीची उत्तरं आताच शोधा.
सूचना - हे भविष्य तुमच्या चंद्र राशीवर आधारित आहे. तुमच्या चंद्रराशीबाबत तुम्हाला खात्री नसेल तर खालील संकेतस्थळाला भेट द्या - अॅस्ट्रोसेज मूनसाइन कॅल्क्युलेटर.
मेष
या राशीच्या व्यक्तिंवर वर्ष 2016 संमिश्र फळांचा वर्षाव करणार आहे. घरगुती जीवनात तणाव येणे शक्य आहे; परंतु, व्यवसायिक आयुष्यात मात्र तुम्हाला यशाची भरपूर फळं चाखायला मिळणार असं दिसतं आहे. इतक्यात भरारी घेऊ नका मेषहो, कारण हे यश थोड्या विलंबाने तुमच्या पदरात पडणार आहे. व्यवसायिकांसाठी, त्यांनी मोठी गुंतवणूक न करणे हे उत्तम. यावर्षी अनावश्यक खर्च करण्याची सवय नियंत्रणात ठेवणे महत्वाचे आहे. आपल्या प्रेम जीवनात काहीही मजेशीर संभवत नाही. काम जीवनात देखील आतुरता आणि आनंद असणार नाही. अनावश्यक वादांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही नेहमीच लहान-सहान गोष्टींवर भडकून उठता, परंतु त्यातून सकारात्मक काही निष्पन्न होत नाही. शेअर बाजारापासून दूर राहा. ऑगस्टनंतर आपल्या जीवनात चांगलं वातावरण राहील, परंतु संपूर्ण वर्षभर दक्ष राहण्याची गरज आहे.
वृषभ
वृषभ राशीच्या मंडळींना या वर्षभरात बहार राहील. जोडीदारासोबत नातं शुद्ध आणि प्रेमळ राहिलं तर सर्वकाही सुरळीत राहील. यंदाचं वर्ष आपलं वैवाहिक जीवन सौख्यपूर्ण राहील आणि आपल्या जोडीदारासोबत तुम्ही आनंदाचे क्षण जपून ठेवाल. नोकरवर्गाला कदाचित काही समस्या भेडसावतील. व्यवसायिकांना नफा होईल, तत्काळ नाही परंतु हळूहळू. प्रेम जीवन बहरेल, त्यातून तुम्हाला सर्व प्रकारचा आनंद मिळेल. आतून सुखद भावना असेपर्यंत कोणतीही गोष्ट सहजप्राप्य राहील. परंतु, तुमच्या लैंगिक आकांक्षांमुळं आपलं लक्ष विचलित होऊ शकतं. यातून बेकायदेशीर प्रकरणं उद्भवू शकतात. अशा गोष्टींचे परिणाम काय होतात हे कळण्याइतके आपण हुशार आहातच; म्हणून, त्यांच्यापासून दूर राहा. शेवटी, यावर्षी आर्थिक स्थिती उत्तम राहील. तुम्ही भरपूर पैसे कमवाल. 2016 मध्ये तुम्हाला आर्थिक दृष्टिने बरेच लाभ मिळणार आहेत.
मिथुन
यावर्षाचा बराच कालावधी तुमच्या बाजूनं आहे असं दिसतं. प्रेम आणि काळजी यामुळं तुम्ही आणि तुमचा जोडीदार निकट राहाल; परिणामी सर्वकाही एकोप्याचं राहील. दुसरीकडे तुमच्या जोडीदाराचे तुमच्या नातेवाईकांसोबतचे संबंध आंबट-गोड राहतील. तुमचं शरीर तुमचं मंदीर आहे; त्यामुळं, त्याबाबत आपण अतिशय गंभीर राहा. आपल्या दैनंदिनीत आरोग्यदायक आहार आणि व्यायाम अवश्य असू द्या. तुमचे खर्च नियंत्रणात ठेवा, कारण येणारा पैसा थोडा आखडू शकतो. प्रत्येक आर्थिक संकटापासून मुक्त राहण्यासाठी, कर्ज घेणे टाळा. वेदीक ज्योतिष्यानुसार, 2016 वर्ष व्यवसायिकांना लाभदायक ठरणार आहे. पैसे कमविण्यासाठी, ते बेकायदेशीर मार्गाची मदत घेण्याची शक्यता आहे. परंतु, हे टाळलं पाहिजे. प्रेमाच्या गोष्टी आश्वासक आहे, कारण प्रणयामुळे तुमचं जीवन सुखानं भरून जाईल. नेहमीच्या विषयांखेरीज, बाकी काही आपल्याला त्रासदायक संभवत नाही.
कर्क
कर्क राशीच्या व्यक्तिंना वैयक्तिक जीवनात हे एक अद्भुत आनंदाचं वर्ष राहील. परंतु, कुटुंबातील सदस्यांसोबत तुमची घनिष्टता तितकीशी चांगली राहणार नाही. तुमच्या तब्येतीबद्दल तुम्ही काळजी घेतली पाहिजे, अन्यथा कोणताही मोठा आजार तुम्हाला उद्भवू शकतो. तुमच्या आर्थिक व्यवहारांबाबत काळजी घ्या. कोणावरही अंध विश्वास ठेवल्यास आर्थिक तोटा होऊ शकतो. तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवणं उत्तम, कारण कोणी तुमच्याविरुद्ध कट करु शकतो. यंदाचं वर्ष नोकरीतील बदलासाठी सर्वोत्कृष्ट आहे; म्हणून, हा बदल करण्याच्या तुमच्या नियोजनाचे प्रयत्न वाढवा. काही जणांवरील कामाचा भार वाढेल, त्यामुळं त्यांचा पगार देखील वाढेल. या राशीचे काहीजण अन्य जातीच्या जोडीदाराच्या प्रेमात पडतील. परंतु, हा जोड भक्कम दिसतो. यावर्षी तुमच्या लैंगिक आकांक्षांना आवर घाला. तुमचं लैंगिक जीवन समरस ठेवण्यासाठी, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
सिंह
2016 मध्ये सिंह राशीच्या व्यक्तिंना बहारदार फळे आहेत. तुमच्या जीवनातील प्रत्येक बाजू योग्य मार्गावर राहील. तुमचा जोडीदार आणि तुमच्या निकटच्या इतरांसोबत तुमचं नातं उत्तम राहील. तुमच्या तब्येतीच्या अनुशंगानं, वजन वाढत असल्याचं दिसत आहे. ते नियंत्रणात ठेवून तुमचं शरीर रोगमुक्त राखण्यासाठी, अवजड आहार घेणं थांबवा. मद्यपानापासून दूर राहण्याने तुमच्या तब्येतीला मोठा फायदा होईल. तुमच्या आर्थिक जीवनाबाबत बोलायचं तर, हे वर्ष त्यासाठी देखील उत्तम दिसत आहे. तुमची संपत्ती वाढेल आणि त्याचसोबत तुमच्या बँक बॅलन्सही. तुमचा स्वतःचा व्यवसाय असो किंवा एखाद्या फर्ममध्ये नोकरी असो, नफा हमखास होणार. तुमच्या व्यवसायिक जीवनात नाव, पत आणि प्रशंसा वाढेल. 2016 च्या भविष्यानुसार, प्रेम जीवनाचा आलेख वर चढत असल्याचं दिसतं. अविवाहितांचे यावर्षी विवाह यावर्षी जुळून येतील. तुमच्या लैंगिक जीवनाबाबत सांगायचं तर तुमच्या शारीरिक आकांक्षांची पूर्तता होईल. तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही उत्कट प्रसंगांचा आनंद घ्याल.
कन्या
दुर्दैवाने, तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला अपेक्षित अशा निकट नात्याचा आनंद आपल्याला मिळणार नाही. कुटुंबातील सदस्यांसोबत देखील खटके उडण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूचा तुम्हाला त्रास होईल असं दिसतं, कारण तब्येत देखील बिघडण्याचे संकेत आहेत. तुमचे आरोग्य तुमच्या हाती आहे; तुम्ही ते जितक्या गंभीरपणे घ्याल, तितकं ते चांगलं राहील. पैशांच्या बाबतीत तोटा होणे शक्य आहे. गुरू बाराव्या स्थानात राहण्याने तुम्हाला समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. ऑगस्टपर्यंत, तुमच्या अपेक्षा खूप अधिक ठेवू नका. या महिन्यानंतरच तुम्हाला चांगले अनुभव येतील. परंतु, तुम्ही नोकरीत असाल तर, तुम्हाला मोठ्या समस्या भेडसावणार नाहीत. तुमच्या प्रेम जीवनातील शक्यतांचा विचार करता ते जबरदस्त आणि सुरळित राहील असे दिसते. तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकलात तर त्याहून उत्तम गोष्ट नसेल.
तूळ
संयुक्त कुटुंबात असलेल्या तुळेच्या व्यक्तिंना कुटुंबातील सदस्यांच्या दरम्यान एकोपा नसल्याचा अनुभव येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, लहान कुटुंबातील तुळेच्या व्यक्तिंना सुखद कौटुंबिक जीवनाचा आनंद मिळेल. तुमच्या जोडीदारावरील विश्वास तुम्ही कायम ठेवण्याची गरज आहे. काही जणांसाठी 2016 या वर्षात कौटुंबिक जीवन समाप्त होण्याची शक्यता आहे. तुम्ही आणि तुमची मुलं यांच्या दरम्यानचं नातं पाहता, तुमच्या मुलांकडून काही समस्या उद्भवणं शक्य आहे. नोकरीतील लोकांचं आयुष्य उत्तम दिसून येत आहे; परंतु व्यवसायिकांना आपल्या व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. आपल्या भविष्यावर बारकाईनं नजर टाकली तर ११ ऑगस्टनंतर घडामोडी आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे. अनपेक्षित खर्च उपटू शकतात. हे खर्च खूप मोठे असू शकतात, आधीपासूनच काळजी घ्या पैसे देताना किंवा घेताना दक्ष राहा, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. प्रेम आणि प्रणयात तुमचा वेळ वाया न घालवणं उत्तम राहील. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यामध्ये समजूतदारपणा दाखवा आणखी काही नको. शारीरिक सुखाचा आनंद घेण्यासाठी, तुमचं आरोग्य पणाला लावू नका.
वृश्चिक
या वर्षामध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्तिंनी जीवनाच्या प्रत्येक बाबतीत आपल्या जोडीदाराशी जुळवून घेण्याची गरज आहे. वैयक्तिक जीवनात सतत चढ-उतार येत राहतील. तुमच्या मुलांच्या वर्तनामुळे काहीवेळेस तुमच्यावर ताण येईल. आळसावर नियंत्रण ठेवा आणि स्वतःला कार्यरत ठेवा ही सूचना. निरुत्साही वागणे आणि मौजमजेतच वेळ घालवणे यामुळे तुमच्या प्रयत्नांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुमचे पैसे सुरक्षित ठेवा आणि ऑगस्टपर्यंत शक्य तितकी बचत करण्याचा प्रयत्न करा. प्रेम जीवनाबद्दल बोलायचं तर, शांत राहा आणि तुमच्या प्रेमामध्ये शंका आणि गैरसमज येऊ देऊ नका. ऑगस्टपर्यंत, तुमच्या प्रेम जीवनात खबरदार राहा. वैवाहिक आयुष्याद्वारे प्रत्येक प्रकारचं सुख मिळेल आणि तुम्ही शारीरिक सौख्याचा आनंद लुटाल. परंतु, त्यावर नियंत्रण ठेवणे हेच उत्तम.
धनु
धनु राशीच्या व्यक्तिंना सदैव कुटुंबातील सदस्यांसोबत वाद घालण्याची शक्यता आहे. भावंडांसोबत देखील तंटा उत्पन्न होण्याची शक्यता आहे. यावर्षी जंतू आणि प्रदूषित वस्तुंमुळे रोग उद्भवण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तिंसाठी हे वर्ष लाभदायक राहील. ऑगस्टनंतर पुढे प्रगतीत सुधारणा होईल. ऑगस्टच्या आधी तुमचा राग नियंत्रण ठेवावा ही सूचना. वाद टाळण्यासाठी आणि सर्वांसोबत संबंध सुरळीत ठेवण्याकरिता, हे वर्तन अत्यंत महत्वाचे आहे. तुमच्या आर्थिक जीवनाचा विचार करता, सर्व ठीकठाक दिसतं, परंतु घोटाळे आणि फसवणूक यांच्यापासून तुम्ही स्वतःचं रक्षण करण्याची गरज आहे. व्यवसायिकांसाठी भाग्य कार्ड यावर्षी लाभकारक नाही. तुमची कामं आणि निर्णयांबाबत अत्यंत खबरदारी घ्या, नाहीतर तुम्हाला कदाचित तुरुंग पाहावा लागेल. असे प्रतिकूल प्रसंग टाळण्यासाठी, बेकायदेशीर गोष्टी आणि प्रकरणांपासून दूर राहा. अखेर, यावर्षी तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट प्रयत्नांची जोड द्या.
मकर
वैयक्तिक जीवनात तुम्हाला अपेक्षित इतकी सांती आणि सुख मिळणार नाही. कुटुंबातील सदस्य आणि जोडीदारासोबत संघर्षाची शक्यता अधिक आहे, त्यामुळं कुटुंबातील वातावरण बिघडेल. यावर्षी ग्रहमान तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्यास सांगत आहे. हा सल्ला पाळा अन्यथा परिणामांसाठी तयार व्हा. अपचन, डोकेदुखी, आणि मानसिक ताण तुमच्या आरोग्यावर परिणाम करतील. आर्थिक आघाडीवर, केतुची दशा नसेल तर अत्यंत फायद्याचे सौदे राहतील. तुमच्या नोकरीमार्फत मोठे लाभ तुमच्यापर्यंत येतील; त्याद्वारे तुम्हाला प्रतिष्ठा आणि आदर मिळेल. तुमच्यापैकी काही जणांना नवीन आणि अधिक चांगली नोकरी मिळेल. व्यवसायिकांसाठी देखील असेच फायदे आणि निष्कर्ष मिळण्याचा अंदाज आहे. त्यांच्यासाठी हे वर्ष अत्यंत भाग्यदायक आहे. तुम्हाला सरकारी कंत्राटं किंवा करार देखील मिळतील. 2016 हे वर्ष तुमच्या प्रेम जीवनासाठी देखील अद्भुत आहे. थोडक्यात, हे वर्ष तुमच्यासाठी आजपर्यंतचं एक सर्वोत्कृष्ट वर्ष राहील.
कुंभ
घरगुती बाबी नेहमीसारख्याच राहतील. किरकोळ समस्या होण्याची शक्यता असली तरी, गुरु सातव्या स्थानी राहिल्यानं परिस्थिती हाताबाहेर जाऊ देणार नाही. मेंदूला काही आरोग्यविषयक समस्या होण्याची शक्यता आहे. 2016 हे वर्ष तुमचं आर्थिक जीवन सुंदर ठेवेल. पैशामुळे तुम्हाला आनंद लुटण्याची कारणं तर मिळतीलच, पण मित्र देखील खूप उपयोगाचे ठरतील. अर्थात, यामुळे वाहवत जायचं आणि मैत्री आणि नात्यांच्या परिणामी स्वतःचं नुकसान करुन घेण्याचं कारण नाही. नोकरी करणारे कुंभ व्यक्तींना हे वर्ष नाव, प्रसिद्धी, प्रतिष्ठा आणि प्रगती मिळवून देईल. तुमचे वरिष्ठ किंवा जोडीदार असोत, प्रत्येकाला तुमच्यातील कुशल कर्मचारी दिसेल, आणि तुमच्यावर ते प्रशंसेचा पाऊस पाडतील. तुम्ही व्यवसायिक असाल तर दुःखी होण्याचं कारण नाही, कारण 2016 तुमच्यासाठी देखील लाभदायक ठरणार आहे. अखेरीस; प्रेम जीवन देखील योग्य मार्गावरच राहील.
मीन
मीन राशीच्या व्यक्तिंनो हे वर्ष तुमच्यासाठी गुलाबी बिछायतीचं न राहण्याची शक्यता आहे. कौटुंबिक स्थिती फारशी आशादायक नाही. काळजीपूर्वक वर्तन आणि हुशारीने कृती करणे तुमच्या मार्गीतल समस्या दूर ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहे. तुम्ही केलेली कोणतीही चूक मोठे परिणाम घडवू शकते; त्यामुळे, प्रत्येक गोष्टीबाबत अतिशय काळजीपूर्वक राहा. आतडे, यकृत आणि मूत्रपिंड आपल्या चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबी सामान्य राहतील. नोकरीच्या आरंभिक टप्प्यांमध्ये समस्या उद्भवू शकतात; परंतु, तुम्हाला नंतरच्या काळात प्रचंड यश मिळेल. नोकरीतील प्रगती ही तुमच्या जीवनासाठी नशीब आणि कल्याण होण्याकरिता एक संचालन बलाचं काम करेल. व्यवसायिक नसलेल्या मीन राशीच्या व्यक्तिंना, ऑगस्टनंतर यशाची मोठी फळे चाखायला मिळतील. तुम्ही नव्या व्यवसायिक जोडीदारांसोबत देखील भागिदारी कराल. प्रेम जीवनाला ऑगस्टनंतर योग्य दिशेनं गती मिळेल. त्यापूर्वी प्रेमाचे प्रसंग घडण्याची अपेक्षा ठेवू नका.
आम्हाला आशा आहे की राशी भविष्य 2016 तुमच्यासाठी उपयुक्त सिद्ध होईल, आणि यश आणि सुबत्तेच्या मार्गावर तुम्हाला घेऊन जाईल.