Rashi Bhavishya 2013 - Marathi Horoscope 2013 - Marathi Astrology 2013
मराठी राशीफळ 2013- मराठी राशिभविष्य 2013- मराठी ज्योतिष 2013
ग्रहकुंडलीला मराठीत राशिभविष्य म्हणतात. आमचे मराठी राशीफळ हे चंद्र राशीवर आधारित असून त्याला मराठीत रास म्हणतात. जन्माच्यावेळी चंद्र ज्या राशीवर असतो त्यावरून रास ठरत असते. चंद्राच्या स्थितीवरून वर्ष कसे जाणार याची उकल काढता येते, उदा. वर्ष 2013. या वार्षिक राशिभविष्यात तुम्हाला २०१३च्या प्रत्येक महिन्याचे सविस्तर राशीफळ मिळू शकेल. उदा. जानेवारी राशीफळ, फेब्रुवारी राशीफळ, मार्च राशीफळ, एप्रिल राशीफळ, मे राशीफळ, जून राशीफळ, जुलै राशीफळ, ऑगस्ट राशीफळ, सप्टेंबर राशीफळ, ऑक्टोबर राशीफळ, नोव्हेंबर राशीफळ, डिसेंबर राशीफळ. जाणून घ्या चंद्र राशीवर आधारित २०१३चे मोफत राशिभविष्य आता मराठीत!!
मराठीतले राशिभविष्य 2013 हे चंद्र राशीवर आधारित आहे आणि भारतीय वेदिक राशी भविष्याच्या प्राचीन तत्त्वांनुसार बनवण्यात आली आहेत. जर तुम्हाला तुमची चंद्र रास माहित नसेल, तर कृपया क्लिक करून तुमची चंद्र रास मोफत जाणून घ्या. हे मोफत आहे.
मेष | वृषभ | मिथुन | कर्क |
सिंह | कन्या | तुला | वृश्चिक |
धनु | मकर | कुम्भ | मीन |
मेष राशिभविष्य 2013
तुम्हाला वर्ष २०१३ दरम्यान अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागणार आहे. तुम्ही काही
आनंदी क्षणांचा अनुभव घ्याल पण तरीही तुम्हाला तुमच्या आयुष्यापासून समाधान लाभणार
नाही. २०१३ हे साल तुम्हाला सांगते आहे की, प्रेम, आरोग्य, कुटुंब, व्यवसाय, पैसे आणि
शिक्षण यासंबंधीचे निर्णय सावधपणे घ्या, अन्यथा कालांतराने तुम्हाला दोषांना तोंड द्यावे
लागेल. तुम्ही कुटुंब आणि धार्मिक कार्यक्रमात पैसे गुंतवाल. तुम्हाला पैशासंबंधीची
चिंता करावी लागणार नाही. कारण तुमची मिळकत वाढेल आणि त्यामुळे तुम्ही अधिक बचत करू
शकता. तुम्ही २०१३ मध्ये खूप खंबीर बनणार आहात आणि प्रेम तसेच कुटुंबासंबंधी गंभीर
परिस्थितीशी मुकाबला करता येईल पण त्यातून बराच फायदा होणार नाही. त्यामुळे शक्य होईल
तितके स्वत:ला शांत ठेवा. तुमच्या आरोग्याला अपायकारक असणा-या सगळ्या गोष्टी टाळा.
जर विद्यार्थ्यांनी निवडलेल्या संस्था आणि विषयात प्रामाणिकपणे एकाग्रता साधली तर २०१३
हे वर्ष त्यांच्यासाठी चांगले ठरणार आहे.
वृषभ राशिभविष्य 2013
२०१३ हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी उत्तम असणार आहे. या वर्षी हे लोक ज्याची सुरुवात
करतील त्यात यश मिळवतील. तुमची वाट पाहणारा आनंद अनुभवायचा असेल तर त्यासाठी संयम बाळगणे
ही एकमेव गुरुकिल्ली ठरेल. यश मिळायला काहीसा उशीर लागेल पण ते नक्कीच मिळेल. कुटुंब,
प्रेम आणि व्यवसायविषयी २०१३ हे वर्ष समाधान देणारे असणार आहे. पण तुम्हाला तुमच्या
आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जोवर तुमच्या आरोग्याचा प्रश्न आहे, तुम्ही जोखीम घेऊन
चालणार नाही. कुटुंब आणि प्रेम या दोन्ही बाजूंनी तुम्ही आनंदी राहणार आहात. अविवाहितांना
जोडीदार मिळतील आणि विवाहित जोडपी संतती नियोजन करतील. तुमच्या कार्यालयीन ठिकाणी काही
समस्यांचा सामना करावा लागेल. पण अशा समस्यांवर तुमची हुशारी आणि प्रामुख्याने तुमची
मेहनत उपाय शोधून काढेल. तुम्ही सर्वांप्रती दयाळू असणार आहात आणि तुमचा हाच स्वभाव
आयुष्यात पुढे जाण्यासाठी उपयोगी ठरेल. विद्यार्थी वर्गाला अपेक्षित निकाल मिळतील आणि
त्यामुळे ते स्पर्धात्मक परीक्षेला प्रवेश घेतील.
मिथुन राशिभविष्य 2013
मिथुन ही अतिशय शांत आणि रचनात्मक स्वरुपाची रास आहे. हेच गुण २०१३ साली मार्गक्रमणा
करण्यासाठी गरजेचे आहेत. या वर्षी परिस्थिती फारशी अनुकूल नाही. तुमचे विचार तुमच्या
जिवलगांना आणि कुटुंबाला नकारात्मक वाटू शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांसाठी
सुरक्षाकवचाची गरज भासेल. ज्या व्यक्तींवर तुमचा संपूर्ण विश्वास आहे, त्याच व्यक्तींना
वेळ द्या. कारण २०१३ या वर्षात पाठीमागून हल्ला होण्याची शक्यता आहे. तुमचा मित्रपरिवार
तुमच्याशी संबंध तोडेल अशा काही घटना घडू शकतात. तुमच्या कार्यालयीन ठिकाणी समस्या
निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि पैशासंबंधी काही व्यवहार करण्याआधी प्रत्येक
गोष्टीचे अवलोकन करून अंदाज घ्यावा. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर आधी संस्थेविषयी
सगळी माहिती तपासा असा सल्ला आहे. २०१३ हे वर्ष फारसे सकारात्मक नाही, कोणत्याही स्वरुपाची
मोठी गुंतवणूक करणे जोखमीचे ठरेल. पण छोट्या व्यवसायातून लाभ होईल. तुम्ही एखाद्या
कायदेशीर वादात अडकाल, सावध रहा.
कर्क राशिभविष्य 2013
कर्क राशी, २०१३ या वर्षी तुम्ही स्वत:वर कार्यालयीन ठिकाणी भरपूर ताण आणि घरात जबाबदारीचे
ओझे घ्याल. तुम्ही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्यासाठी तुम्हाला दोष देण्यात येईल. आणि
मुख्य म्हणजे अगदी तुम्ही स्वत:ला दोष द्याल. उदार असणे चांगले आहे, पण तुम्ही परिस्थितीची
गडद बाजू बघणे योग्य ठरेल. हे वर्ष प्रेम, व्यवसाय आणि आर्थिक पातळीवर सकारात्मक ठरणार
आहे. यापूर्वी जर तुम्हाला प्रेमाने हुलकावणी दिली असेल तर २०१३ ला तुम्हाला प्रेम
मिळेल. छोटी भांडणे आणि वाद टाळा. प्रेमाचा अदभूत प्रवास अनुभवा. कामाच्या ताणामुळे
संपूर्ण वर्ष थकवा जाणवेल. तुम्ही नवा व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला
परदेशी व्यवसायातून फायदा होईल. जोखीम घेणे टाळा. कारण त्यामुळे तोटा होऊ शकतो.
सिंह राशिभविष्य 2013
सिंह राशी, २०१३ साल तुमच्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे. तुम्ही ज्या गोष्टीला हात लावलं
त्याचे सोने होईल आणि जरी हात लावला नाही तरी नक्कीच अन्य मार्गाने तुम्हाला फायदा
संभवतो. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्याची संधी आहे आणि हा विस्तार तुमच्या मिळकतीत
भर टाकणारा आहे तसेच सरते शेवटी तुमची भरपूर बचत होईल. तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा
आणि अतिरिक्त आत्मविश्वास बाळगू नका. २०१३ हे वर्ष गुंतवणुकीच्या बाबतीत उत्तम आहे.
या राशीच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आणि उच्च शिक्षणाचे ध्येय ठेवले पाहिजे.
त्यांना नक्कीच फलदायी परिणाम मिळतील. यावर्षी तुमचे नातेसंबंध अधिक गहिरे होण्याची
शक्यता आहे. तुमचे कुटुंबासोबतचे नाते अधिक दृढ होतील आणि घरात आनंद तसेच समाधानाचे
वातावरण असेल. सर्वात उत्तम भाग म्हणजे २०१३ हे वर्ष तुम्हाला मानसिक शांती देणारे
असेल.
कन्या राशिभविष्य 2013
तुम्ही २०१३ या वर्षात कुटुंब, प्रेम आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी वेळ काढाल असे दिसते.
कदाचित तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एका दीर्घ सहलीचे आयोजन कराल, यामुळे तुमचे घरातल्यासोबत
दृढ नातेसंबंध आणि प्रेम-जिव्हाळा निर्माण होईल. यावर्षी तुमचे आरोग्य उत्तम राहील
असे संकेत आहेत. तुमचे कुटुंब तुम्हाला आंतरिक शक्ती शोधायला मदत करेल. पैसा, करिअर
आणि शिक्षणात संमिश्र फळे मिळतील. एखादी वेळ अशी येईल जेव्हा तुम्हाला हरल्यासारखे
वाटेल, पण अशीही वेळ येईल जेव्हा तुम्हाला सर्वश्रेष्ठ पटली गाठल्यासारखे वाटेल. तुम्ही
उत्तम व्यवहार करण्यासाठी कार्यक्षम आहात आणि २०१३ या वर्षी तुम्हाला कार्यालयीन ठिकाणी
केल्येल्या कामाबद्दल आदर आणि सन्मान मिळेल. तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जात आहेत,
याबाबत तुम्ही खूप सावध असणे गरजेचे आहे. तुमच्या व्यवसायानिमित्त त्वरित प्रवास करावा
लागेल.
तूळ राशिभविष्य 2013
तूळ राशी, २०१३ या वर्षाचा तुमच्यावर मोठा परिणाम दिसून येईल. तुम्हाला सर्वात समाधानी
रास मानतात. पण २०१३ मध्ये परिस्थितीमुळे तुम्हाला काही प्रमाणात निराशा येईल. हे वर्ष
काही असमाधानकारक परिस्थितींमुळे हताश करेल. पण तुम्ही विश्वास गमावणे आणि आरोग्याकडे
दुर्लक्ष करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही. घरगुती तसेच प्रेमप्रकरणे हाताळताना
तुम्हाला मोठी कसरत करावी लागेल. तुमच्या करिअरविषयी काही नवीन सुरू करण्याआधी प्रत्येक
मुद्दा नीट तपासणे आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घेणे हितावह ठरेल. असमाधानामुळे
जुन्या व्यवसायातील भागीदारी तुटण्याची शक्यता आहे. तुमचा पैसा हात राखून खर्च करा,
अन्यथा त्यामुळे समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. जोखीम घेण्याच्या दृष्टीने ही
वेळ नक्कीच चांगली किंवा योग्य नाही. तुमचा पैसा कुठेही गुंतवण्याआधी त्यातील बारीक
तपशील तपासा. विद्यार्थी वर्गाने बरीच मेहनत घेणे आवश्यक आहे, तरच त्यांना अपेक्षित
निकाल मिळू शकतील.
वृश्चिक राशिभविष्य 2013
वृश्चिक राशीला 2013 हे वर्ष संमिश्र स्वरुपाचे असणार आहे. तुम्हाला हे वर्ष एखाद्या
रोलर कोस्टर राईडप्रमाणे वाटेल, पण ही राईड सकारात्मक असेल. तुम्ही एखाद्या लहान मुलांप्रमाणे
या वर्षी आनंदी क्षण उपभोगणार आहात. तुमच्या घरात तसे आनंदी वातावरण राहील. पण काही
वाद तुम्हाला निराश करतील. कदाचित घरातल्या सदस्याचे अनारोग्य तुम्हाला व्यथित करणारे
ठरेल. परंतु तुम्ही मात्र यावर्षी तंदुरुस्त राहणार आहात. अपवाद बारीक संसर्ग किंवा
ताप. तुम्ही ज्या माणसावर प्रेम करता त्याच्यासोबत बराच वेळ घालवता येईल. पण तुम्हाला
वर्षच्या उत्तरार्धात सावध पवित्रा बाळगला पाहिजे. हे वर्ष करिअर,पैसा आणि शिक्षणाच्या
दृष्टीने फार अनुकूल असणार आहे. फक्त गरज आहे ती शक्य तितके प्रयत्न करण्याची आणि त्यानंतर
तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येतील. २०१३ मध्ये तुम्ही फार आर्थिक बचत करू शकणार
नाही.
धनु राशिभविष्य 2013
२०१३ हे वर्ष काही स्वरुपात मोहिनी टाकणारे असेल. तुमचा खुशालचेंडू स्वभाव मागे पडेल,
तुम्ही प्रगल्भ व्हायला शिकाल आणि परिस्थिती हुशारीने हाताळाल. वर्षाच्या सुरुवातीला
तुम्हाला कुटुंबाकडून तणावाचा सामना करावा लागेल. पण जसा वेळ जाईल तशा समस्या कमी होतील.
यावर्षी तुम्हाला तुमच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागेल असा सल्ला आहे. अगदी छोटे
दुर्लक्ष मोठे कष्ट देणारे ठरतील. तुमच्या हट्टी स्वभावामुळे कदाचित जिवलग दुरावण्याची
शक्यता आहे. पण जर तुम्ही शहाणपणाने वागलात तर तुम्हाला २०१३ साली जोडीदार मिळेल. प्रेमात
लाभलेल्या क्षणांमुळे विवाहित सुखावतील. करिअरच्या दृष्टीने हे वर्ष खूप चांगले नाही.
तुम्ही मेहनती आहात आणि तुम्ही सगळ्या प्रकल्पासाठी भरपूर मेहनत घेतात. पण त्यामानाने
फार कमी प्रतिसाद मिळतो. त्यामुळे तुम्ही मानसिकरीत्या हताश होता. २०१३ हे वर्ष आर्थिक
स्थैर्य सूचित करते आहे.
मकर राशिभविष्य 2013
मकर राशी, तुम्हाला २०१३ सालात स्वत:च आयुष्य घडवण्याची संधी मिळणार आहे. तुमच्या हृदयाशी
किंवा प्रेमाशी आणि करिअरसंबंधी प्रकरणे तुमच्यासाठी अतिशय आनंद घेऊन येणार आहे. मात्र
तुमचे कुटुंब फारसे सहकार्य करणार नाही. उत्तरार्धात घरचे वातावरण फारसे सुसह्य राहणार
नाही. तुम्ही करिअरमध्ये पुढे जाल आणि त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित कराल. २०१३ साली
तुमच्या करिअरमध्ये आदर मिळेल आणि नव्या आघाड्यांमुळे प्रसिद्धी मिळेल. तुम्ही समंजस
आहात. त्यामुळे तुमचे नातेसंबंध बहरायला मदत होईल. तुमच्या मिळकतीचे स्त्रोत वाढतील,
याचं अर्थ हे वर्ष आर्थिक फळीवर सकारात्मक आहे. तुम्ही निश्चितपणे खूप उत्तम कमाई करणार
आहात. पण पैशाची गुंतवणूक मात्र करू नये. विद्यार्थी वर्ग अभ्यासाबाबत अधिक गंभीर होईल
आणि कुसंगतीपेक्षा उपयुक्त गोष्टीमध्ये स्वत:चा वेळ गुंतवेल.
कुंभ राशिभविष्य 2013
कुंभ राशी,तुम्हाला २०१३ हे वर्ष उत्तम अनुभव देणारे आहे. तुमच्यासाठी हे वर्ष अतिशय
चांगले असेल. तुमचे प्रेम आणि जिवलग तुम्हाला प्रेम देतील. तुमच्या कार्यालातील लोक
आदर देतील,त्यामुळे आनंदी वाटेल. काही वेळा तुमचा अहंभाव वाढेल. त्यामुळे तशी परिस्थिती
टाळण्याचा प्रयत्न करावा. यावर्षी तुम्हाला खुले विचार मदत करतील. मोसमी आजारामुळे
तब्येत बिघडेल. पण त्याहून अधिक काही होणार नाही. तुम्ही तुमच्या प्रेमीजनांसोबत एखाद्या
पवित्र तीर्थस्थानी जाण्याची शक्यता आहे. ब-याचदा तुम्ही तुमच्या जिवलग माणसामुळे निराश
व्हाल. पण तुमचे प्रेम त्याला / तिला जिंकेल. २०१३ साली काही अनुभवी व्यावसायी व्यक्तींसोबत
काम करू शकाल. त्यामुळे करिअरच्या दृष्टीने हे वर्ष उत्तम असणार आहे. तुमच्या सुयोग्य
कामामुळे २०१३ च्या शेवटी बढतीचे योग आहेत. मिळकतीच्या नियमित पुरवठ्यामुळे हे वर्ष
तुम्हाला आनंद देणारे ठरेल.
मीन राशिभविष्य 2013
मीन रास, २०१३ या वर्षात दुस-यांवर विश्वास ठेवणे हितावह ठरणार नाही. स्वावलंबन आणि
तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवणे तुमच्यासाठी उत्तम ठरेल. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या
उन्नतीसाठी काम कराल. पण त्यांच्याकडून तुमचे कौतुक होण्याची शक्यता दिसत नाही. तुमच्या
आरोग्याची तपासणी करावी. अन्यथा काही गंभीर स्वरुपाचे त्रास होऊ शकतात. प्रामुख्याने
त्वचा आणि रक्तसंबंधी. तुमच्या प्रेमसंबंधांना गृहीत धरू नका. तुमच्या प्रेमसंबंधी
निर्णयांवर ठाम राहण्याची आवश्यकता आहे. २०१३ हे वर्ष तुमच्या करिअरच्या दृष्टीने चांगले
नसेल. तुमचे उच्च अधिकारातील व्यक्तींसोबत गंभीर स्वरूपाचे वाद होतील. त्याचा नकारात्मक
परिणाम तुमच्यावर दिसेल. तुमच्याकडे २०१३ साल स्व-नियंत्रण आणि प्रगल्भतेची मागणी करत
आहे. तुमची आर्थिक स्थिती फार बळकट नसल्याने भरमसाठ पैसा लागणारी गुंतवणूक टाळा.
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
AstroSage TVSubscribe
- Rashifal 2025
- Horoscope 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025