Astrology in Marathi - ज्योतिष शास्त्र
“ज्योतिष शास्त्र” या नावाच्या पाठ्यक्रमात तुम्ही ज्योतिष ज्ञान प्राप्त करू शकतात. ज्योतिष शिका या पाठ्यक्रमात ज्योतिष शास्त्राच्या बाबतीत माहिती दिली जाईल. ज्योतिष शिकण्याच्या या पाठ्यक्रमात तुम्हाला खूप सहज आणि सरळ भाषेत ज्योतिष ज्ञान शिकवले जाईल.
ज्योतिष शास्त्र शिका या आमच्या कोर्स मध्ये ज्योतिषीय बेसिक ज्ञान दिले आहेत तुम्ही कमी वेळात चांगल्या प्रकारे हे ज्ञान प्राप्त करू शकतात. ऍस्ट्रोसेजने तुमच्यासाठी सरळ आणि सोप्या भाषेत ही माहिती उपलब्ध करून दिली आहे. चला तर मग जाणून घेऊन ज्योतिष विद्या शिकण्याची पद्धत:
ज्योतिष विद्येची आवश्यकता का ?
वैदिक काळात आपल्या ऋषी मुनींनी 4 वेदांची (ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद) रचना केली होती. या वेदांना जाणण्यासाठी त्यांनी सहा वेदांगाची रचना केली. यामध्ये शिक्षण, कल्प, व्याकरण, छंद, निरुक्त सोबतच ज्योतिष ही येते. ज्योतिष शास्त्र एक वैदिक कालीन विद्या आहे, ज्यामध्ये ग्रहांची चाल आणि प्रभावाने मनुष्याच्या भविष्यफळाचे अध्ययन केले जाते. वैदिक ज्योतिष मध्ये सुर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि राहू - केतू ला ग्रहांची मान्यता दिली गेली आहे. हे सर्व ग्रह संक्रमण करते वेळी प्रत्येक राशी मध्ये काही वेळेसाठी थांबतात आणि याच्याच प्रभावाच्या विश्लेषणाने राशीफळ तयार होते. ज्योतिष मध्ये जन्म कुंडली किंवा जन्म पत्रिका नेहमीच प्रत्येक व्यक्तीसाठी उत्सुकतेचा विषय राहिला आहे. कारण जन्म कुंडली मध्ये मनुष्याच्या जीवनाचा सार असतो. जन्म कुंडली कशी बनवावी किंवा जन्म कुंडलीची विधी जाणून घेणे कठीण काम नाही.
जर आपल्याला ज्योतिष विद्या शिकायची आहे ज्यात जन्म कुंडली बनवणे, वैवाहिक कुंडली जुळवणी करणे, राशीफळ तयार करणे इत्यादी कार्याच्या बाबतीत जाणून घ्यायची इच्छा असेल तर आमचा ज्योतिष शास्त्र पाठ्यक्रम तुमच्यासाठी खूप फायदेशीर सिद्ध होईल. यामध्ये कुंडली बनवण्याचा विधी, कुंडली कशी बनवावी, फलादेश आणि ग्रह संक्रमण बाबतीत विस्ताराने माहिती दिली आहे.
आज काल इंटरनेट वर बऱ्याच प्रकारचे सॉफ्टवेअर आहेत ज्याच्या मदतीने जन्म कुंडली किंवा जन्म पत्रिका बनवली जाऊ शकते परंतु, कुंडलीमध्ये ग्रहांचे अध्ययन आणि त्याने मिळणारे शुभ आणि अशुभ फळाच्या बाबतीत तुम्ही तेव्हाच जाणून घेऊ शकतात जेव्हा तुम्हाला ज्योतिष शास्त्रचे ज्ञान अवगत असेल. तुम्ही आमच्या या कोर्स मध्ये जन्म कुंडली बनवण्याच्या सहज विधीमध्ये तसेच त्यांच्या ग्रहाचे फळ ही ज्ञात करू शकतात. ज्योतिषच्या माध्यमाने व्यक्तीच्या जीवनातील सार जाणून घेऊ शकतो.
जर ज्योतिष शास्त्राच्या महत्वाची गोष्ट केली तर, या धावपळीच्या दुनियेत प्रत्येक व्यक्ती कुठल्या न कुठल्या समस्ये मधून जात आहे. कुणी व्यक्ती आपल्या कौटुंबिक समस्येला घेऊन चिंतेत आहे तर कुणी व्यक्तीचे प्रेम त्याने नाराज आहे. असेच कुठल्या जातकाला नोकरी मिळत नाही तर, कुणी आपल्या विवाहाच्या विलंबाने चिंतेत आहे. अश्यात लोकांच्या समस्त समस्यांचा उपाय ज्योतिष ज्ञानच्या माध्यमाने केला जाऊ शकतो.
ज्योतिष विद्येच्या माध्यमाने तुम्हाला न फक्त भविष्याविषयी माहिती दिली जाते तर, यामध्ये कष्ट निवारण साठी ज्योतिषीय उपाय ही सांगितले जाते. जर तुम्ही या उपायाला विधी पूर्वक आत्मसात केले तर तुमच्या समस्यांचे समाधान होऊ शकते. या सर्व गोष्टींचा गंभीरतेने विचार केला तर आम्हाला ज्योतिष शिकण्याचे वास्तविक महत्व चांगल्या प्रकारे समजतील.
ज्योतिष शास्त्र शिका या कोर्स विषयी :
सांसारिक जीवनात व्यक्ती स्वतःला घेऊन इतका जिज्ञासू नसतो जितका की, तो आपल्या घर कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि अन्य लोकांच्या बाबतीत विचार करतो. तो सदैव दुसऱ्यांच्या महत्वाकांक्षेला पूर्ण करण्याच्या उद्देश्याने मोह मायाच्या चक्रात फसतो परंतु, जेव्हा व्यक्ती आध्यत्मिक ज्ञानाकडे जातो तर तो स्वतःच्या अस्तित्वाचे कारण शोधतो. त्याला उत्सुकता असते की त्याच्या जन्माचे वास्तविक उद्देश्य काय आहे?
वैदिक शास्त्रांच्या अनुसार, ज्योतिष विद्येच्या माध्यमातच हे ज्ञात होते की, व्यक्तीच्या ह्या संसारात येण्याचे मायने काय आहे. कुठल्या कार्यासाठी त्याचा जन्म झाला आहे. ज्योतिष विद्येच्या द्वारे व्यक्तीला त्याच्या प्रश्नांचे उत्तर मिळते. म्हणून आमचे उद्दिष्ट्य आमच्या पाठकांना ज्योतिष ज्ञानाने अवगत करण्याची इच्छा आहे आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा ज्योतिष शास्त्र शिका हा कोर्स गंभीरतेने घ्याल.
ज्योतिष शिका पाठ्यक्रमाला 26 भागात विभाजित केले गेले आहे. तथापि जसे आम्ही वरती सांगितले की यामध्ये जवळपास 2 मिनिटाची ऑडिओ-विडिओ सोबत सराव ही आहे. कोर्सला अधिक रुचकर आणि सरळ बनवण्यासाठी ग्राफिक्सचा प्रयोग केला आहे. याची भाषा खूप सहज आणि सरळ आहे असे कुणीही हिंदी किंवा मराठी भाषिक सहजरित्या समजून घेईल. सर्वात आधी पाठ्यक्रमात भाग एक पासून चार पर्यंत ग्रहाच्या संबंधित गोष्टी सांगितल्या गेल्या आहे. त्या नंतर भाग 8, 9, 10 ग्रहांच्या संबंधित आहे.
तसेच कोर्स भाग 5 मध्ये राशींच्या संबंधित विषयाला सांगतो. तेच भाग 6 आणि 7 मध्ये क्रमशः कुंडली आणि त्यात स्थित भाव संबंधित माहिती आहे. या प्रकारे कोणते भाव कशाच्या संबंधित त्याच्या सन्मुख त्याच्या बाबतीत लिहिले गेले आहे. या कोर्स मध्ये उपयोग केली गेलेली सर्व व्हिडीओला ज्योतिषाचार्य आणि एस्ट्रोसेज चे संस्थापक पुनीत पांडे द्वारे बनवलेली आहे जे, की आधुनिक युगाचे ज्योतिषी आहे.
आम्ही हा दावा तर करू शकत नाही की, आमच्या ज्योतिष शास्त्र पाठ्यक्रमाने एक कुशल ज्योतिषी बनाल परंतु, याच्या माध्यमाने तुम्हाला ज्योतिषीचे आधारभूत ज्ञान अवश्य होईल. जर तुम्ही या कोर्स ला गंभीरतेने शिकले तर तुम्ही कुणाच्याही पत्रिकेमध्ये ग्रहांच्या स्थितीच्या माध्यमाने त्याचे फलादेश सांगू शकतात. वर आणि वधू ची कुंडली पाहून त्यांच्या अनुकूलतेला सांगू शकतात. आम्ही इच्छा व्यक्त करतो की तुम्हाला आमचा हा ज्योतिषीय ज्ञान संबंधित कोर्स नक्की आवडेल.