June, 2025 चे कुम्भ राशि भविष्य - पुढील महिन्याचे कुम्भ राशि भविष्य
June, 2025
जून मासिक राशि भविष्य 2025 च्या अनुसार, कुंभ राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी हा महिना चढ उताराने भरलेला राहील. तुमच्या राशीमध्ये पूर्ण महिना राहू महाराज आणि सप्तम भावात केतू महाराज विराजमान राहतील यामुळे तुमची निर्णय घेण्याची क्षमता पतंभावित होईल. तुम्ही त्वरीत निर्णय घेण्याचा प्रयत्न कराल जे काही वेळा लोकांना समजणार नाहीत परंतु, पंचम भावात पूर्ण महिना बृहस्पतु महाराज विराजमान राहून तुमच्या प्रथम भावावर दृष्टी टाकेल यामुळे या समस्या कमी होतील आणि तुम्हाला अनुभवी व्यक्तींचे सहयोग मिळेल. 9 जून पासून बृहस्पती अस्त होण्याने काही फरक पडेल. हा महिना आर्थिकदृष्ट्या अनुकूल राहण्याची शक्यता आहे. करिअरच्या बाबतीत चढ-उतार असू शकतात तरी ही तुमच्या शहाणपणाने तुम्ही नोकरीत तुमचे स्थान मजबूत करू शकाल. व्यवसायात चढ-उतार होण्याची शक्यता आहे परंतु, पूर्वीच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे. तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात चढ-उतार असून ही तुम्हाला तुमच्या लोकांकडून प्रेम आणि स्नेह मिळत राहतील. प्रेम संबंधांसाठी हा काळ अनुकूल असेल आणि प्रेम संबंधांमध्ये तीव्रता राहील. वैवाहिक संबंधात तणाव वाढण्याची शक्यता आहे. केतू सप्तम भावात असल्यामुळे जोडीदारासोबत समस्या निर्माण होऊ शकतात. मित्र आणि सहकाऱ्यांसोबतच्या छोट्या सहलीमुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. तब्येतीत चढ-उतार असतील, याकडे लक्ष द्यावे लागेल. परदेशात गेलेले लोक परत येण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आनंद होईल. परदेशातून पैसे मिळण्याची शक्यता आहे.
उपाय
मंगळवारी गूळ व हरभऱ्याचा प्रसाद वाटप करा.