रेवती नक्षत्राची भविष्यवाणी
तुम्ही मधुरभाषी, मैत्रीपूर्ण आणि मोकळ्या स्वभावाचे आहात. कारणाशिवाय तुम्हाला कोणाच्या कामात व्यत्यय आणणे आवडत नाही आणि तसेच इतरांनी करावे असे तुम्हाला वाटते. तुमच्या तत्वांपासून विचलित करण्याचा जे प्रयत्न करतात त्यांच्यावर तुम्ही खूप रागवता. परिस्थितीप्रमाणे तुम्ही लोकांशी वागणे बदलता. तुम्ही मनाने प्रामाणिक आणि निर्मळ असता. खूप काळ एखादे गुपित जपणे तुम्हाला अवघड जाते. तुम्ही कोणावरही आंधळा विश्वास टाकत नाही, जर टाकलाच तो योग्य पध्दतीने टाकता. काहीही झाले तरी तुम्ही तुमच्या अंत:प्रेरणेप्रमाणे वागता. तुमचे वागणे धार्मिक असते आणि कधीकधी त्यामुळे तुम्ही पारंपरिक वाटता.प्राचीन संस्कृती आणि इतिहासाची तुम्हाला आवड असते. खगोलशास्त्र आणि ज्योतिष हे तुमचे प्रावीण्याचे विषय असतात. तुमच्यात काव्यप्रतिभाही असते आणि संकुचित असूनही तुम्ही संशोधन करता आणि वैज्ञानिक उत्तरे शोधत राहात. इतर काय म्हणतात हे तुमच्यासाठी महत्वाचे नसते. तुमच्या श्रध्दा ठाम असल्या तरी तुम्ही विचारात लवचिक असता. आपले काम करून घेताना तुम्ही नम्र असता.या गुणामुळे तुम्ही यशस्वी होता. तुम्ही स्मार्ट आणि हुशार असता आणि कुशाग्र बुध्दीचे असता. तुमचे शिक्षण उच्च असते. तुमच्या विद्वत्तेमुळे तुम्ही सर्वकाही भराभर करता. तुम्ही कमालीचे निर्णयक्षम असता. तुम्ही नेहमी गोड बोलणारे विद्वान असता. इतरांशी तुमचे वागणे चांगले असते आणि तुम्ही चांगले मित्र असता. जीवनातल्या अडचणींवर मात करत तुम्ही नेहमी पुढे राहायचा प्रयत्न करता. तुम्ही समाजात मान्यवर असता आणि लोकांचे प्रेम राखण्यात हुशार असता. प्रभावी व्यक्तिमत्त्वांमध्ये तुमची गणना होते. अध्यात्मावर तुमची गाढ श्रध्दा आणि खूप आवड तुम्हाला असते. समाधानाची इच्छा असल्यानं तुमचं आयुष्य ऐषारामात आणि आनंदात जातं. आर्थिकदृष्ट्याही तुम्ही आनंदी राहता आणि प्रगती करता.
शिक्षण आणि उत्पन्न
नोकरीकडे तुमचा जास्त कल असतो. कष्टाळू स्वभाव, हुशारी आणि दृढता यामुळे तुम्ही कामामध्ये उच्चपद मिळवता.तुम्ही व्यवसायातही यशस्वी होता. तुमच्यासाठी योग्य क्षेत्रं, कलाकार, चित्रकार, संमोहनतज्ञ, अभिनेता, संगीतकार, जादूकार, घड्याळासंबंधित कामे, इमारत बांधकामसंबंधित कामे, कॅलेंडर किंवा पंचांगकर्ते, ज्योतिषी, हवाईसुंदरी, रत्नं व्यापारी, जलवाह्तूकीसंबंधित कामे, अनाथाश्रमासंबंधित कामे, धर्मादाय संस्थाचालक, वाह्तूक नियंत्रण आणि पोलीस विभाग, वीजखातेसंबंधित कामे, रस्ता सुरक्षा कर्मचारी, इ.
कौटुंबिक आयुष्य
तुमचं वैवाहिक आयुष्य साधारणत:आनंदाचे असते.जोडीदाराशी चांगला समन्वय अपेक्षित आहे. मुलांकडून समाधान मिळेल, पण वडीलांकडून खूप सहकार्य न मिळण्याची शक्यता आहे. जोडीदार जिद्दी स्वभावाचा असेल, पण तो/ती देवभक्त असेल आणि रीती,परंपरांचे नीट पालन करेल.
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
AstroSage TVSubscribe
- Horoscope 2026
- राशिफल 2026
- Calendar 2026
- Holidays 2026
- Shubh Muhurat 2026
- Saturn Transit 2026
- Ketu Transit 2026
- Jupiter Transit In Cancer
- Education Horoscope 2026
- Rahu Transit 2026
- ராசி பலன் 2026
- राशि भविष्य 2026
- રાશિફળ 2026
- রাশিফল 2026 (Rashifol 2026)
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2026
- రాశిఫలాలు 2026
- രാശിഫലം 2026
- Astrology 2026



