शुक्राचे वृश्चिक राशीमध्ये संक्रमण: (17 नोव्हेंबर, 2022)

Author: योगिता पलोड | Updated Tue, 15 Nov 2022 12:17 PM IST

सूर्याचे वृश्चिक राशीमध्ये संक्रमण (16 नोव्हेंबर 2022) अ‍ॅस्ट्रोसेज च्या या लेखात तुम्हाला याच्याशी संबंधित अचूक अंदाज मिळतील. सूर्य ग्रहाच्या हालचाली आणि स्थितीचे विश्लेषण करून हे भाकीत आपल्या विद्वान ज्योतिषांनी दिले आहेत, जे पूर्णपणे वैदिक ज्योतिषशास्त्रावर आधारित आहेत. या लेखात सर्व 12 राशीच्या जातकांचे व्यावसायिक जीवन, वैयक्तिक जीवन, आर्थिक जीवन, आरोग्य आणि शिक्षण इत्यादींशी संबंधित कुंडलींसह, नकारात्मक प्रभावांपासून दूर राहण्याचे उपाय तुम्हाला सांगण्यात आले आहेत. ज्यातून तुम्ही तुमचे उद्याचे भविष्य घडवू शकता. वृश्चिक राशीतील सूर्याचे भ्रमण आपल्या जीवनात काय बदल घडवून आणणार आहे, हे जाणून घेऊया.

वैदिक ज्योतिषात सूर्याला राशी चक्राचा राजा आणि आत्म्याचा कारक मानला जातो. सूर्य आपली प्रतिष्ठा, स्वाभिमान, अहंकार दर्शवतो आणि आपले समर्पण, तग धरण्याची क्षमता, चैतन्य, इच्छाशक्ती आणि नेतृत्वाची गुणवत्ता इत्यादी नियंत्रित करतो. आपले वडील, सरकार, राजा आणि उच्च अधिकारी यांच्यासाठी हा कारक ग्रह आहे. शरीराच्या अवयवांबद्दल बोलणे, ते आपले हृदय आणि हाडे दर्शवते.

हे संक्रमण आपल्या जीवनावर प्रभाव जाणून घेण्यासाठी अ‍ॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!

सूर्याचे वृश्चिक राशीमध्ये संक्रमण: तिथी व वेळ

16 नोव्हेंबर 2022 रोजी बुधवारी संध्याकाळी 06:58 वाजता सूर्य वृश्चिक राशीत संक्रमण करेल. वृश्चिक हे जल तत्वाची राशी आहे आणि ते राशीमध्ये आठव्या स्थानावर आहे आणि मंगळ ग्रहाच्या मालकीचे आहे. सूर्यासाठी ही स्थिती अनुकूल आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशी सर्व राशींमध्ये सर्वात संवेदनशील आहे आणि ती आपल्या शरीरातील तामसिक ऊर्जा नियंत्रित करते. त्याच वेळी, ते आपल्या जीवनातील चढ-उतार आणि सतत होणारे बदल नियंत्रित करते. याशिवाय, ते आपल्या जीवनातील लपलेले आणि खोल रहस्ये देखील दर्शवते. वृश्चिक राशी चिन्ह हे खनिज आणि जमीन संसाधने जसे की पेट्रोलियम तेल, वायू आणि रत्ने इत्यादींची कारक आहे आणि ते अपघात, जखम आणि शस्त्रक्रिया इ. चे प्रतिनिधित्व करते.

हे राशिभविष्य चंद्र राशीवर आधारित आहे जाणून घ्या आपली चंद्र राशि

सूर्याचे वृश्चिक राशीमध्ये संक्रमण वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एक संक्रमण आहे जे अनिश्चित परिणाम देते. या काळात अनेक चढ-उतार पाहायला मिळतात. जे लोक गूढ शास्त्राचा अभ्यास करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल राहील. तथापि, सर्व 12 राशींसाठी सूर्याचे परिणाम कुंडलीतील त्याचे स्थान तसेच त्याच्या जातकाच्या दशेवर निर्भर करेल.

सूर्याचे वृश्चिक राशीमध्ये संक्रमण याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होण्याची शक्यता आहे आणि त्याचे नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी कोणते योग्य उपाय केले जाऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी हा विशेष लेख वाचा.

Read in English: Sun Transit In Scorpio (16 November 2022)

मेष

मेष राशीच्या जातकांसाठी सूर्य हा पाचव्या भावाचा स्वामी आहे आणि तो तुमच्या आठव्या भावात म्हणजेच दीर्घायुष्य, अपघाती घटना आणि गूढ स्वभाव मध्ये संक्रमण करेल.

ज्यांना ज्योतिष किंवा इतर कोणते ही गूढ शास्त्र शिकायचे आहे, त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. ते सुरू करू शकतात. जे संशोधन क्षेत्रात आहेत त्यांना देखील या काळात सकारात्मक परिणाम दिसून येतील कारण, तुम्हाला तुमच्या संशोधन कार्यात यश मिळण्याची शक्यता जास्त आहे.

वृश्चिक राशीतील सूर्याच्या संक्रमण दरम्यान, तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत अधिक जागरूक राहावे लागेल कारण, हृदय आणि हाडांशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि स्वतःची विशेष काळजी घ्या. एकूणच मेष राशीच्या जातकांना या काळात संमिश्र परिणाम मिळू शकतात.

उपाय: हनुमानाला लाल रंगाचे पीठ अर्पण करा.

मेष पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

आपल्या कुंडली मध्ये असलेल्या राज योग ची संपूर्ण माहिती मिळवा

वृषभ

वृषभ राशीच्या जातकांसाठी सूर्य चौथ्या भावाचा स्वामी आहे आणि तो तुमच्या सातव्या भावात म्हणजेच वैवाहिक जीवन आणि भागीदारीच्या भावात प्रवेश करेल.

सूर्याचे हे संक्रमण तुमच्या व्यावसायिक भागीदाराशी तुमचे संबंध सुधारेल. अशा प्रकारे तुमचा व्यवसाय भरभराटीला येईल. हे तुमच्या व्यवसायात काही नवीन संधी देखील आणेल.

सूर्य हा उग्रता आणि अहंकाराचा ग्रह असल्यामुळे तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात अहंकारामुळे तुम्हाला चढ-उतार पाहायला मिळू शकतात. तुम्ही त्यांच्याशी वाद घालू शकता इ. त्यामुळे तुम्ही तुमच्या रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवून गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करा.

तुमच्या स्वर्गीय भावावर ही सूर्याची दृष्टी पडत आहे, त्यामुळे या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याकडे आणि फिटनेसकडे लक्ष द्या. संतुलित आहार घ्या आणि चांगली जीवनशैली पाळा.

उपाय : गायत्री मंत्राचा जप करा.

वृषभ पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

मिथुन

मिथुन राशीच्या जातकांसाठी सूर्य तिसऱ्या भावाचा स्वामी आहे आणि तो तुमच्या सहाव्या भावात म्हणजेच रोग, स्पर्धा, शत्रू आणि मामा भाव मध्ये संक्रमण करेल.

या काळात तुम्हाला थोडे सावध राहावे लागेल कारण, तिसर्‍या भावाचा स्वामी सहाव्या भावात प्रवेश करत आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्या ही प्रकारच्या वाद-विवाद किंवा भांडणात पडू शकता. तथापि, या संक्रमण काळात तुमचे शत्रू नष्ट होतील. ते तुमचे कोणत्या ही प्रकारे नुकसान करू शकणार नाहीत.

जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना यश मिळेल आणि त्यांच्या परीक्षेत चांगली कामगिरी होईल. तुम्ही कोणत्या ही प्रशासकीय किंवा सरकारी पदावर काम करत असाल तर, या काळात तुम्हाला मोठे यश मिळू शकते.

वृश्चिक राशीतील सूर्याच्या संक्रमण दरम्यान, तुमच्या मामाशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि तुम्हाला त्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि ते तुम्हाला सर्व परिस्थिती आणि लोकांविरुद्ध योग्य निर्णय घेण्यास मदत करतील. तुमच्या बाराव्या भावात ही सूर्याची रास पडत आहे, त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या जातकांना विशेष लाभ होईल.

उपाय: गरजू लोकांना औषध दान करा किंवा पूर्ण उपचार करा.

मिथुन पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

कर्क

कर्क राशीच्या जातकांसाठी, सूर्य हा दुसऱ्या भावाचा स्वामी आहे आणि तो तुमच्या पाचव्या भावात म्हणजेच प्रेम, शिक्षण, संतती आणि भूतकाळातील पुण्य यामध्ये संक्रमण करेल.

विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. त्यामुळे ते या वेळेचा पुरेपूर फायदा घेऊन यश मिळवू शकतात. जे लोक प्रेम संबंधात आहेत त्यांनी या काळात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे कारण, जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे.

सूर्याच्या या संक्रमणात तुम्ही तुमच्या मुलांचा सहवास अनुभवाल. त्यांच्या सोबत दर्जेदार वेळ घालवेल. हा काळ आर्थिकदृष्ट्या ही अनुकूल असेल. उत्पन्नाचा प्रवाह चांगला राहील. तुमच्या अकराव्या भावात सूर्याची स्थिती आहे. याचा परिणाम म्हणून, तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी केलेल्या सर्व मेहनतीचे सकारात्मक परिणाम मिळतील.

उपाय : आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा.

कर्क पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

काही समस्यांनी आहे चिंतीत, समाधान मिळवण्यासाठी ज्योतिषांना प्रश्न विचारा

सिंह

सिंह राशीच्या जातकांसाठी सूर्य हा लग्न भावाचा स्वामी आहे आणि तो तुमच्या चौथ्या भावात म्हणजेच गृहस्थ, माता, जमीन आणि वाहनात संक्रमण करेल.

वृश्चिक राशीतील सूर्याचे संक्रमण तुम्हाला भौतिक सुख आणि आनंद देईल. अभिनेते आणि राजकारण्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. तुमच्या दशम भावात सूर्याची स्थिती असल्यामुळे प्रॉपर्टीशी संबंधित व्यवसायातून लाभ होण्याची शक्यता आहे.

सूर्य तुमच्या चतुर्थ भावाचा म्हणजेच घरगुती जीवनाचा स्वामी असल्यामुळे या काळात तुमच्या घरातील आनंदी वातावरण अनावश्यक अहंकारामुळे प्रभावित होऊ शकते. तुम्हाला सल्ला दिला जातो की, तुम्ही स्वतःला शांत ठेवा आणि परस्पर सौहार्द राखण्याचा प्रयत्न करा. या संक्रमण काळात तुमच्या आईची तब्येत बिघडू शकते म्हणून, तुम्हाला सल्ला दिला जातो की तुम्ही तिच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तिची नियमित तपासणी करा.

उपाय: रोज सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण करावे.

सिंह पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

कन्या

कन्या राशीच्या जातकांसाठी, सूर्य बाराव्या भावाचा स्वामी आहे आणि तो तुमच्या तिसऱ्या भावात म्हणजेच धैर्य, भाऊ-बहीण आणि प्रवासात संक्रमण करेल.

या काळात तुम्ही तुमच्या लहान भावंडांसोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी लांब पल्ल्याच्या सहलीची योजना करू शकता. मार्केटिंग, सोशल मीडिया, कन्सल्टिंग इ. ज्या क्षेत्रांमध्ये दळणवळण खूप महत्त्वाचे आहे अशा क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या जातकाचा लोकांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांचे संवाद कौशल्य सुधारेल.

मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना ही या काळात नफ्याच्या स्वरूपात सकारात्मक परिणाम दिसून येतील. तुमच्या नवव्या भावात ही सूर्याची स्थिती पडत आहे, त्यामुळे वडिलांशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि ते तुमच्या कामाचे कौतुक करतील.

उपाय: दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करा.

कन्या पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

तुळ

तुळ राशीच्या जातकांसाठी सूर्य अकराव्या भावाचा स्वामी आहे आणि तो तुमच्या दुसऱ्या भावात म्हणजेच पैसा, कुटुंब आणि वाणीत प्रवेश करेल.

वित्ताशी संबंधित दोन्ही भावांवर सूर्याचा प्रभाव पडत आहे, त्यामुळे वृश्चिक राशीतील सूर्याचे संक्रमण तुम्हाला पैसे वाचवण्याच्या अनेक संधी देईल. वित्त क्षेत्रात काम करणाऱ्या जातकांसाठी हा कालावधी फायदेशीर ठरेल कारण, ते काही नाविन्यपूर्ण कल्पनांसह काम करताना दिसतील. या सोबतच त्यांना त्यांच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

दुसऱ्या भावातून सूर्य तुमच्या आठव्या भावावर ही लक्ष ठेवून आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत गुप्तपणे संयुक्त गुंतवणूक करू शकता. तुळ राशीच्या जातकांचा ज्योतिष शास्त्राकडे अधिक कल आहे आणि त्यांना ते शिकायचे आहे, त्यांनी या काळात वेळ अनुकूल असल्याने ते सुरू करू शकतात.

उपाय : रोज गुळाचे सेवन करावे.

तुळ पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सूर्य तुमच्या दहाव्या भावाचा स्वामी आहे आणि तो तुमच्या लग्न भावात प्रवेश करेल.

सूर्याचे हे संक्रमण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी अनुकूल ठरेल. तुम्हाला तुमच्या कामातून आणि व्यवसायातून यश आणि लोकप्रियता मिळेल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमचे नेतृत्व आणि निर्णय घेण्याची क्षमता प्रभावी असेल. लग्न भावातील सूर्याचे संक्रमण तुम्हाला तुमचे आरोग्य सुधारण्यास प्रेरित करेल. म्हणून तुम्हाला या संक्रमण कालावधीचा लाभ घ्या आणि तुमच्या शरीराकडे लक्ष द्या.

यावेळी सूर्य देखील तुमच्या सप्तम भावात असेल, त्यामुळे तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनावर अधिक लक्ष देण्याची सल्ला देण्यात येत आहे कारण, अनावश्यक उद्धटपणा, वाद-विवाद जीवन साथीदाराच्या संबंधात चढ-उतार होऊ शकतात.

उपाय : खिशात लाल रंगाचा रुमाल ठेवा.

वृश्चिक पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

धनु

धनु राशीच्या जातकांसाठी, सूर्य नवव्या भावाचा स्वामी आहे आणि तो तुमच्या बाराव्या भावात म्हणजेच परदेशी भूमी, विलग गृह, रुग्णालय आणि मल्टिनॅशनल कंपन्यांच्या भावात संक्रमण करेल.

नवव्या भावाचा स्वामी म्हणून सूर्य तुमच्या बाराव्या भावात संक्रमण करत आहे, त्यामुळे या काळात तुम्हाला परदेशात किंवा तुमच्या जन्मस्थानापासून दूर असलेल्या ठिकाणी नोकरी आणि लाभ मिळण्याची संधी मिळू शकते. या संक्रमण कालावधीत तुम्ही केलेल्या लांब पल्ल्याच्या प्रवास किंवा परदेशी सहली फायदेशीर ठरतील आणि तुमची जीवनशैली सुधारतील. या सहलींमधून तुम्हाला आर्थिक लाभ ही मिळू शकतो.

वृश्चिक राशीत सूर्याच्या संक्रमण दरम्यान तुमच्या वडिलांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि त्यांची नियमित तपासणी करा.

उपाय : घरातून बाहेर पडण्यापूर्वी वडिलांचा आदर करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या.

धनु पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

मकर

मकर राशीच्या जातकांसाठी, सूर्य आठव्या भावाचा स्वामी आहे आणि तो तुमच्या अकराव्या भावात म्हणजेच उत्पन्न, लाभ, इच्छा, मोठा भाऊ आणि बहीण आणि काका भाव मध्ये संक्रमण करेल.

या दरम्यान तुम्हाला तुमच्या मोठ्या भावंडांचा आणि काकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता ही जास्त आहे. व्यावसायिकदृष्ट्या पाहिल्यास, तुमच्या करिअर आणि व्यवसायासाठी गेल्या वर्षभरात केलेल्या मेहनतीचे फळ आणि लाभ तुम्हाला मिळतील.

तुमच्या पंचम भावात ही सूर्याची स्थिती पडत आहे, त्यामुळे तुम्ही वैवाहिक जीवन जगत असाल तर, हा काळ तुमच्या मुलासाठी अनुकूल असेल. तुमचे मूल अशी कामगिरी करू शकते. ज्याने तुम्हाला तुमच्या मुलाचा खूप अभिमान वाटेल.

उपाय : गाईला गूळ पोळी खायला द्या.

मकर पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

कुंभ

कुंभ राशीच्या जातकांसाठी सूर्य सातव्या भावाचा स्वामी आहे आणि तो तुमच्या दहाव्या भावात म्हणजेच नाव, प्रसिद्धी आणि करिअर मध्ये भावात संक्रमण करेल.

सूर्याचे हे संक्रमण तुमच्यासाठी फलदायी ठरेल. आर्थिकदृष्ट्या, उत्पन्नाचा प्रवाह चांगला राहील आणि पैशाची बचत देखील शक्य होईल. व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही तुमच्या करिअर मध्ये प्रगती आणि बढती पाहू शकता. कामाच्या ठिकाणी तुमच्या यशस्वी नेतृत्वाचे कौतुक होईल. सूर्याच्या या मार्गक्रमणात टीकांकडे सकारात्मकतेने पहा अन्यथा, तुमचा अहंकार तुमच्यावर वर्चस्व गाजवेल आणि भविष्यात काही समस्या निर्माण करू शकेल. तसेच, तुमचा स्वाभिमान अहंकारात बदलू शकतो, त्यामुळे सावध राहा.

दहाव्या भावातून सूर्य तुमच्या चौथ्या भावात म्हणजेच मातेच्या भाव कडे पाहत आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या आईची पूर्ण साथ मिळेल परंतु, अहंकाराशी संबंधित समस्यांमुळे तुमचे घरगुती जीवन प्रभावित होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

उपाय : रोज सकाळी सूर्याला लाल गुलाबाच्या पाकळ्यांसह अर्घ्य अर्पण करावे.

कुंभ पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

मीन

मीन राशीच्या जातकांसाठी, सूर्य सहाव्या भावाचा स्वामी आहे आणि तो तुमच्या नवव्या भावात म्हणजेच धर्म, भाग्य, लांबचा प्रवास, वडील आणि तीर्थयात्रा या भावात संक्रमण करेल.

जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशातील कोणत्या ही संस्थेत प्रवेश घेण्याचा विचार करत आहेत, त्यांचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. तसेच, वृश्चिक राशीतील सूर्याचे संक्रमण सल्लागार, मार्गदर्शक आणि शिक्षकांसाठी अनुकूल सिद्ध होईल आणि ते इतरांवर सहज प्रभाव टाकू शकतील.

मीन राशीच्या जातकांना वडील आणि गुरूंचे पूर्ण सहकार्य मिळेल. वडिलांकडून ही आर्थिक मदत मिळू शकते परंतु, तुम्हाला या काळात त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे कारण, तुमच्या वडिलांच्या तब्येतीत चढ-उतार होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, तुमचा अध्यात्माकडे कल असण्याची शक्यता जास्त आहे.

उपाय : रविवारी कोणत्या ही मंदिरात डाळिंब दान करा.

मीन पुढील सप्ताहाचे राशि भविष्य

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer