सूर्याचे कर्क राशीमध्ये गोचर, 16 जुलै 2023 च्या सकाळी 4:59 वाजता होईल. कर्क राशीचा स्वामी चंद्र महाराज आहे जो की, सूर्य देवाचा मित्र आहे. सूर्य देव बुधाची राशी मिथुन पासून निघून कर्क राशीमध्ये 16 जुलै ला गोचर करेल आणि येथे 17 ऑगस्ट 2023 च्या दुपारी 13:27 वाजेपर्यंत राहून त्या नंतर आपल्याच स्वराशी सिंह मध्ये प्रवेश करेल. या प्रकारे सूर्याचे एक महिन्याचे हे गोचर विभिन्न जातकांच्या जीवनात ववेगवेगळे प्रभाव टाकेल. सूर्य एक अग्नी प्रधान ग्रह आहे तर, कर्क राशी जल तत्व प्रदान आहे. कर्क राशीमध्ये होणारे सूर्याचे हे गोचर विभिन्न राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी महत्वपूर्ण प्रभाव टाकणारे सिद्ध होईल.
सूर्य गोचर आपल्या जीवनावर प्रभाव जाणून घेण्यासाठी अॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!
सूर्याला धर्तीवर प्रकाश देणारे आणि जीवन ऊर्जा प्रदान करणारे एकमात्र प्रत्यक्ष देवता मानले गेले आहे. जरा कल्पना करा की, जर सूर्य नसेल तर, धर्तीवर आपे काहीच अस्तित्व राहणार नाही. वैदिक ज्योतिष मध्ये सूर्याला सर्वाधिक महत्व दिले गेले आहे आणि यामध्ये ग्रहांचा राजा मानले गेले आहे. सूर्याच्या प्रकाशाने अन्य ग्रहांना ही प्रकाश मिळतो आणि सर्व ग्रह सूर्याला चक्कर लावतात. याला आत्मा आणि जगत चे कारक मानले गेले आहे. सूर्याच्या कृपेने व्यक्तीला राज कृपा मिळते, सरकारी नोकरी मिळते आणि सरकारी क्षेत्रात काम करण्याची संधी ही मिलते. सूर्य सरकार, प्रधानमंत्री आणि मंत्री परिषद सारख्या महत्वपूर्ण पदांचे कारक ग्रह आहे.
वैदिक ज्योतिष अनुसार सूर्याचे गोचर प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या राशीत होण्याने वेगवेगळे वातावरण प्रदान करते. कुंडली मध्ये जर सूर्य प्रबळ असेल तर, व्यक्तीची रोग प्रतिकारक क्षमता मजबूत असते. ते आजारी लवकर पडत नाही. वडिलांसोबत त्यांचे संबंध अनुकूल राहतात. सरकार आणि पिता पासून लाभ मिळतो. त्यांना खूप मान आणि यश मिळते आणि ते सरकारी नोकरी ही प्राप्त करू शकतात तर, कुंडली मध्ये दुर्बल सूर्य स्वास्थ्यला नकारात्मक रूपात प्रभावित करणारे मानले जाते आणि जातकाला ही काही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत नाही. सूर्य आपल्या मित्र चंद्राच्या राशीमध्ये गोचर करत आहे तर, चला जाणून घेऊया याचा तुमच्या राशीवर काय प्रभाव पडेल.
हे राशिभविष्य तुमच्या चंद्र राशीवर आधारित आहे. तुमची वैयक्तिक चंद्र राशी जाणून घेण्यासाठी चंद्र राशी कॅल्क्युलेटर वापरा.
Read in English: The Sun Transit In Cancer (16 July 2023)
मेष राशीतील जातकांसाठी सूर्य पंचम भावाचा स्वामी आहे. सूर्याचे कर्क राशीमध्ये गोचर तुमच्या करिअर साठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे. जर तुम्ही सरकारी क्षेत्रात काम करत आहे तर, तुम्हाला अधिक उन्नती प्राप्त होऊ शकते. तर निजी क्षेत्रात काम करणाऱ्या जातकांच्या अधिकारात ही वाढ होऊ शकते आणि तुम्हाला मोठ्या पदांची प्राप्ती होऊ शकते. तुम्हाला आपल्या प्रयत्नात यश मिळू शकते. मनासारखी नोकरी प्राप्त करण्यात तुम्ही यश प्राप्त करू शकतात. व्यवसाय करणाऱ्या जातकांना ही हा काळ अनुकूल राहील आणि तुम्ही आपले नाव बनवू शकाल. कौटुंबिक जीवनात थोड्या समस्या राहतील. परस्पर विवाद आणि उग्र स्वभाव एकमेकांवर ताण वाढवू शकतात. तुम्ही आपल्या आनंदासाठी काही नवीन वस्तू खरेदी करू शकतात. कुठले नवीन वाहन खरेदी करण्याची इच्छा ठेवतात तर, आता काही काळासाठी थांबून जा. तुम्हाला हाय कोलेस्टेरॉल, ऍसिडिटी सारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याची काळजी घ्या.
उपाय: तुम्ही नियमित श्री गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे.
मेष पुढील सप्ताहाचे राशि भविष्य
आपल्या कुंडली मध्ये असलेल्या राज योग ची संपूर्ण माहिती मिळवा
वृषभ राशीतील जातकांसाठी सूर्य चतुर्थ भावाचा स्वामी ग्रह असून तुमच्या तिसऱ्या भावात गोचर करेल. सूर्याचे कर्क राशीमध्ये गोचर, नोकरी मध्ये बदल होण्याची शक्यता दर्शवतो. जर तुम्ही आधीपासून नोकरी बदलण्याचा विचार करतात तर ही वेळ सर्वश्रेष्ठ राहील आणि तुम्हाला एक उत्तम नोकरी मिळू शकते. जर तुमच्या नोकरीमध्ये स्थानांतरण योग्य आहे तर तुमचे स्थानांतरण ही जपू शकते. व्यवसायाच्या दृष्टिकोनाने हे गोचर अनुकूल राहणार आहे तुम्ही नवीन रणनीती लागू करू शकतात. यामुळे तुमची मार्केटिंग आणि तुमचा विक्रय दोन्ही मजबूत होतील आणि बाजारात तुमच्या नावाची चर्चा होईल. व्यक्तिगत जीवनात तुम्ही काही कठीण निर्णय ही घेऊ शकतात. तुम्ही आपल्या निर्णयाला घेऊन दृढ असाल. आपल्या कुटुंबातील लोकांवर तुम्ही आपला धाक ठेवलं. असे ही असू शकते की, तुमच्या वाणी मध्ये थोडी कर्कशता वाढली जाईल यामुळे परिजनांसोबत कमी बोला अथवा समस्या होऊ शकतात. त्यांना भावनात्मक रूपात वाईट वाटू देऊ नका. तुम्ही कुटुंबातील लोकांसोबत कुठल्या यात्रेवर ही जाऊ शकतात. जर तुम्ही खेळाडू आहे तर, तुम्ही उत्तम नाव कमावू शकतात आणि खेळण्याच्या व्यवसायाने जोडलेले असाल तर, उत्तम लाभ अर्जित करू शकतात. संपत्तीच्या क्रय-विक्रय ने लाभ मिळू शकतो.
उपाय: आपल्या वडिलांचा सन्मान करा आणि नियमित त्यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्या.
सूर्याचे कर्क राशीमध्ये गोचर, मिथुन राशीतील जातकांसाठी दुसऱ्या भावात असण्याच्या कारणाने भाऊ बहिणींचे सहयोग मिळेल. ते प्रत्येक कामात तुमची मदत करतांना दिसतील. जर तुम्हाला आर्थिक मदतीची आवश्यकता असेल तर, तुम्हाला मदत करतील. फक्त भाऊ बहीणच नाही तर मित्रांचा व्यवहार ही खूप मदतगार असेल. ते ही तुमच्या प्रत्येक कामात पुढे जाण्यास मदत करतांना दिसतील. यामुळे तुमचा त्यांच्यावर विश्वास वाढेल. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सरकारी क्षेत्रातून धन लाभ प्रबळ चे योग बनतील. जर तुम्ही नोकरी करतात तर, हा काळ तुम्हाला नोकरी मध्ये वेतन वृद्धी प्रदान करू शकतो आणि जर तुम्ही व्यापार करतात तरी ही हे गोचर तुम्हाला अनुकूल परिणाम प्रदान करतील आणि तुम्ही आपल्या प्रयत्नांच्या बळावर अनुकूल परिणाम मिळवाल. तुमचे अटकलेले धन ही तुम्हाला परत मिळू शकते. आर्थिक रूपात हे गोचर खूप अधिक फायदेशीर सिद्ध होईल. व्यक्तिगत जीवनात काही तणाव वाढू शकतो. कुटुंबातील लोकांमध्ये परस्पर तणाव वाढेल. तुम्ही आपल्या गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न कराल जे काही लोकांना सहन होणार नाही म्हणून वाद स्थिती बनू शकते. प्रयत्न करा की, या स्थितीपासून सावध राहू शकाल. तुम्हाला डोळ्यांचे आजार होऊ शकतात किंवा तोंडाला छाले, दातदुखीची समस्या ही होऊ शकते म्हणून, आपल्या स्वास्थ्य समस्यांवर ही लक्ष द्या.
उपाय: नियमित सूर्यदेवाला तांब्याच्या लोट्यातून अर्घ्य द्या.
कर्क राशीतील लोकांसाठी सूर्य द्वितीय भावाचा स्वामी ग्रह आहे आणि सूर्याचे कर्क राशीमध्ये गोचर होण्याने तुमची राशी सर्वाधिक प्रभावित होईल कारण, हे तुमच्या राशीमध्ये गोचर करत आहे. हे गोचर एकीकडे अनुकूलता देईल. तुम्ही आपल्या बाबतीत ही विचार कराल. आपल्या आरोग्याला उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही काही नवीन दिनचर्या बनवा. तुम्ही व्यायाम करण्यास सुरवात करू शकतात. तुम्ही मॉर्निंग वॉक करू शकता, पण दुसरीकडे तुमच्या स्वभावात काही महत्त्वाची भावना वाढू शकते. तुमचा स्वभाव ही उग्र असू शकतो. तुम्ही या गोष्टी टाळल्या पाहिजेत कारण, ते नाते बिघडू शकतात. वैवाहिक जीवनात जीवनसाथी सोबत तणाव वाढणार नाही याची काळजी घ्यावी. व्यवसायाच्या दृष्टीने हे गोचर चांगले राहील. तुमचा व्यवसाय रात्रीतून उन्नती करेल. यामुळे लोकांशी आणि तुमच्या व्यवसायाशी तुमचा संवाद आणखी वाढेल. तुम्ही नोकरी करणार असाल तर, तुमची सक्रियता वाढेल. कामात व्यस्तता वाढेल आणि तुम्ही स्वतःच्या मनाप्रमाणे काम करताना दिसतील. वडिलोपार्जित व्यवसायासाठी हे गोचर सर्वात योग्य ठरणार आहे. तुम्ही अधीरता टाळली पाहिजे आणि सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घ्या. अनावश्यक अस्वस्थता तुम्हाला रक्तदाबाचे रुग्ण बनवू शकते, काळजी घ्या.
उपाय: तुम्ही नियमित सूर्याष्टक चा पाठ केला पाहिजे.
सिंह राशीमध्ये जन्म घेणाऱ्या जातकांसाठी सूर्य देव राशी स्वामी आहे आणि सूर्याचे कर्क राशीमध्ये गोचर होण्याने हे तुमच्या द्वादश भावात जातील. हे गोचर तुमचे परदेश प्रवासाचे स्वप्न पूर्ण करेल. तुम्ही व्यवसायाच्या संदर्भात परदेशात देखील जाऊ शकता आणि जर तुम्ही आंतराष्ट्रीय कंपनी असलेल्या कंपनीत काम करत असाल तर, त्याद्वारे तुम्हाला परदेशात जाण्याची संधी देखील मिळू शकते म्हणजेच, हा कालावधी तुम्हाला कामाच्या संदर्भात परदेशात नेऊ शकतो. आंतराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करून किंवा त्यांच्या सोबत व्यवसाय करून तुम्हाला चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. जर तुम्ही आधीच परदेशात राहत असाल तर, तुमचा नफा आणखी जास्त असेल. जरी दुसरीकडे तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. या काळात तुमचे खर्च खूप वाढतील आणि जर तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकला नाही तर, ही मोठी समस्या बनू शकते.या काळात तुम्हाला काही प्रकारचे पुरस्कार देखील मिळू शकतात परंतु, तुम्हाला तुमच्या विरोधकांशी सावधगिरी बाळगावी लागेल, ते तुमचे नुकसान करू शकत नसले तरी ते तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतात. आयात-निर्यातीत वाढ होऊ शकते. वैयक्तिक जीवनासाठी, हे गोचर तुम्हाला कुटुंबासह प्रवास करण्यास प्रवृत्त करेल. तुम्हाला खूप थकवा जाणवेल. तुमची शारीरिक उर्जा कमी होईल, त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि स्वतःला हायड्रेट ठेवावे लागेल. आरोग्याच्या दृष्टीने हे गोचर फारसे अनुकूल नाही, त्यामुळे तुमची उर्जा ही संतुलित राहावी म्हणून स्वत:ला संतुलित ठेवा.
उपाय: तुम्ही सूर्य देव बीज मंत्राचा जप केला पाहिजे.
सिंहपुढील सप्ताहाचे राशि भविष्य
काही समस्यांनी आहे चिंतीत, समाधान मिळवण्यासाठी ज्योतिषांना प्रश्न विचारा
कन्या राशीसाठी सूर्य देव द्वादश भाव चा स्वामी आहे आणि हे तुमच्या राशीच्या दशम भावात गोचर करतील. सूर्याचे कर्क राशीमध्ये गोचर, तुम्हाला उत्तम परिणाम प्राप्त करण्यात सक्षम बनवेल. तुमची आर्थिक आव्हाने दूर होतील आणि तुम्हाला आर्थिक लाभ होताना दिसतील. व्यवसायात ही तुम्ही उंची गाठाल आणि नवीन लोकांसोबत काम करण्याची संधी मिळेल. समाजातील काही मोठे प्रभावशाली लोक आणि प्रशासनात तुमचा प्रवेश मजबूत राहील. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या जातकांसाठी हा काळ आणखी चांगला असणार आहे. सरकारी क्षेत्रातून तुम्हाला काही मोठा फायदा मिळू शकतो. तुम्ही खाजगी क्षेत्रात नोकरी करत असाल तर, तुमची स्थिती वाढू शकते. तुम्हाला बढती मिळू शकते आणि वरिष्ठांची मर्जी ही तुम्हाला मिळेल. या गोचरमुळे प्रेम संबंधांमध्ये काही तणाव वाढू शकतो, त्यामुळे तुम्ही तुमचा अहंकार बाजूला ठेवून तुमच्या प्रेमाला महत्त्व द्यावे. तुमच्या योजनांना वेग येईल. काही नवीन मित्र बनवण्याची संधी मिळेल. तुम्ही सामाजिकदृष्ट्या अधिक सक्रिय व्हाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात उत्तम प्रगतीची संधी मिळेल. अभ्यासात तुम्ही अधिक प्रयत्न करताना दिसतील. आरोग्याच्या दृष्टीने, या गोचर दरम्यान तुम्हाला थोडे लक्ष द्यावे लागेल कारण पचनसंस्था आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुमचा आहार सुधारून तुम्ही या समस्या टाळू शकता.
उपाय: तुम्हाला नियमित रामायणा चा पाठ केला पाहिजे.
तुळ राशीसाठी सूर्य अकराव्या भावाचा स्वामी आहे. सूर्याचे कर्क राशीमध्ये गोचर, तुमच्या दशम भावात होण्याने करिअरसाठी हे गोचर खूप लाभदायक सिद्ध होईल. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात आवश्यकतेपेक्षा चांगली कामगिरी करू शकाल, ज्यामुळे तुम्ही लोकांकडून कौतुकास पात्र व्हाल. तुमचे नाव प्रमोशनसाठी पाठवले जाऊ शकते. तुमच्या पगारात ही वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्ही एका राजाप्रमाणे तुमच्या संघाचे नेतृत्व करताना दिसतील आणि यामुळे तुमची विश्वासार्हता वाढेल पण तुम्ही अतिआत्मविश्वासाचा बळी होण्याचे टाळले पाहिजे. व्यवसायिकांना या गोचर चा विशेष फायदा होईल आणि तुमचा संपर्क काही महत्त्वाच्या लोकांच्या संपर्कात येईल, ज्यांच्या मदतीने तुमचा व्यवसाय विस्तारेल आणि तुमची कीर्ती दूरवर पसरेल. तुम्ही विक्री आणि मार्केटिंगमध्ये अधिक सक्रिय दिसाल आणि तुम्हाला त्यातून बरेच फायदे ही दिसतील. तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, या काळात तुमच्या वडिलांसोबतचे नाते सुधारेल. त्याचा आदर वाढेल. त्यांना समाजात चांगले स्थान ही मिळेल आणि त्यांचा सहवास मिळाल्याचा तुम्हाला अभिमान वाटेल. तुम्ही कुटुंबातील जबाबदाऱ्यांपासून थोडेसे कमी झालेले दिसतील कारण, कामाच्या अतिव्याजीमुळे तुम्ही कुटुंबासाठी पुरेसा वेळ देऊ शकणार नाही. तथापि, आपण नवीन वाहन खरेदी करू शकता. या गोचर दरम्यान तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे ही थोडे लक्ष दिले पाहिजे.
उपाय: तुम्ही नियमित सूर्य नमस्कार केला पाहिजे.
सूर्य तुमच्या दशम भावाचा स्वामी ग्रह आहे आणि सूर्याचे कर्क राशीमध्ये गोचर, तुमच्या राशीच्या नवम भावात होईल. हे तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेला वाढवेल आणि समाजात तुम्हाला सन्मान मिळेल.. तुम्ही अध्यात्मिक आणि धार्मिक गोष्टींमध्ये आवडीने हिस्सा घ्याल. यामुळे समाजात एक वेगळ्या वर्गात एक साक्षात्कार होईल आणि त्या क्षेत्रात तुम्ही नाव ही कमवाल आणि लोकांच्या प्रशंसेचे हकदार ही व्हाल परंतु, हे गोचर वडिलांच्या संबंधात बिघाड आणू शकते आणि त्यांच्या आरोग्यासंबंधित समस्या येऊ शकतात म्हणून, त्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल. पेशेवर रूपात हा काळ मध्यम राहील. नोकरीमध्ये स्थानांतरणाचे योग बनतील आणि तुमच्या विभागात अचानक परिवर्तन केले जाऊ शकते. नोकरीमध्ये बदल करण्यासाठी ही वेळ उपयुक्त राहील. तुमचा प्रयत्न तुम्हाला यश देऊ शकतो. व्यापाराच्या क्षेत्रात हे गोचर उत्तम परिणाम प्रदान करेल. रियल इस्टेट, ट्रॅव्हल इंडस्ट्री आणि सरकारी क्षेत्राच्या संबंधित काही काम तुम्हाला अत्यंत लाभ प्रदान करू शकतो. कौटुंबिक जीवनात थोडा तणाव वाढेल परंतु, तुम्ही परिजन आणि विशेषकरून जीवनसाथी सोबत तीर्थाटन करू शकतात. आरोग्यात सुधार राहील.
उपाय: रविवारी गाईला गव्हाचे पीठ खाऊ घातले पाहिजे.
धनु राशीतील जातकांसाठी सूर्य नवम भावाचा स्वामी आहे आणि सूर्याचे कर्क राशीमध्ये गोचर होण्याने हे तुमच्या आठव्या भावात जातील. हे ही अधिक चांगले सांगितले जाऊ शकत नाही म्हणून, तुम्हाला आपल्या आरोग्याची आणि आपल्या आर्थिक स्थितीचे विशेष लक्ष ठेवले पाहिजे. या काळात आरोग्य समस्या त्रास देऊ शकतात. पोट दुखी, ताप आणि रोग प्रतिरोधक क्षमतेत कमी होणे सारख्या समस्या या काळात तुम्हाला होऊ शकतात. शेअर बाजार संबंधित कामात विचारपूर्वक हात टाका कारण, या काळात नुकसान होऊ शकते. या काळात तुमच्या काही जुन्या गोष्टी समाजासमोर येऊ शकतात म्हणून, काळजी घ्या अथवा मानहानी ची शक्यता वर्तवली जात आहे. अचानक कोणते होणारे काम अटकू शकते म्हणून, थोडे धैर्य ठेवा आणि कुठला ही मोठा निर्णय या काळात घेऊ नका. कुठल्या ही खराब राजकारणाचे शिकार तुम्ही होऊ शकतात म्हणून, या गोष्टींपासून सावध राहा. शोध कार्यात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे गोचर अनुकूल परिणाम प्रदान करेल आणि तुम्हाला शिक्षणात उन्नती देईल. ज्योतिष क्षेत्रात ही यश प्रदान करेल. गहन अध्ययन आणि कुठल्या ही वस्तू स्थिती किंवा योग्य आकलन करण्याची संधी तुम्हाला मिळेल. जीवनसाथीच्या आरोग्यात काहीशी कमी येऊ शकते परंतु, तुम्हाला सासरच्या लोकांचे सहयोग मिळेल.
उपाय: तुम्ही नियमित श्री आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ केला पाहिजे.
मकर राशीसाठी सूर्य देव अष्टम भावाचा स्वामी आहे आणि सूर्याचे कर्क राशीमध्ये गोचर तुमच्या राशीच्या सप्तम भावात होईल. यामुळे तुमचे वैवाहिक जीवन आणि व्यवसाय विशेष रूपात प्रभावित होऊ शकते. जर तुम्ही काही असा व्यवसाय करतात ज्यामध्ये तुम्ही भागीदारीत आहे तर तुम्हाला काही अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या व्यावसायिक भागीदारांसोबत तुमचे संबंध बिघडू शकतात ज्याचा प्रभाव तुमच्या व्यापारावर होईल. लक्षात ठेवा, या काळात कुठेला ही निर्णय घाई गर्दीत घेऊ नका कारण, ते तुमच्यासाठी नुकसानकारक असेल. व्यक्तिगत रूपात पाहिले असता वैवाहिक जीवनात काही विवाद होऊ शकतो. जीवनसाथी चा व्यवहार आणि तुमचा व्यवहार परस्पर वाद तयार करेल आणि इतक्या वादात काही ही निष्कर्ष निघणार नाही म्हणून, वाद विवादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही विवाहासाठी प्रयत्न करत असाल तर, थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते.
उपाय: तुम्ही लाल रंगाच्या फुलांच्या झाडाला पाणी घातले पाहिजे.
कुंभ राशीतील जातकांसाठी सूर्य सप्तम भावाचा स्वामी आहे आणि सूर्याचे हे गोचर कर्क राशीमध्ये होण्याने ते तुमच्या षष्ठ भावात येतील आणि शत्रुता बनेल. तुमच्या विरोधींची हार होईल आणि तुम्हाला त्यांच्यावर जीत मिळेल. ते तुमच्या समोर येण्याची हिम्मत करू शकणार नाही परंतु, दांपत्य जीवनात तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो. जीवनसाथी चे आरोग्य बिघडू शकते आणि त्यांच्या व्यवहारात काहीसा बदल ही होऊ शकतो. यामुळे तुमच्या प्रेमात कमी येऊ शकते आणि तुमचे नाते नकारात्मक रूपात प्रभावित होऊ शकते. प्रेम संबंधांसाठी हे गोचर उत्तम राहील आणि तुम्हाला आपल्या प्रियतम च्या जवळ जाण्याची संधी मिळेल. थोडे खर्च तुमचे नक्कीच वाढतील परंतु, तुम्हाला विदेश जाण्याची संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या नोकरीमध्ये उत्तम यश मिळू शकते. तसे, तुम्ही वाद-विवादात निष्णात असाल परंतु, या काळात कोणाशी ही अनावश्यक वाद-विवाद टाळा. व्यवसायासाठी हा काळ मध्यम राहील.
उपाय: तुम्ही रविवारी तांबे दान केले पाहिजे.
सूर्याचे कर्क राशीमध्ये गोचर, मीन राशीतील जातकांच्या पंचम भावात होईल. हा काळ प्रेम संबंधांसाठी निर्णायक सिद्ध होऊ शकतो म्हणून, तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल कि, तुमच्या प्रियतम सोबत कुठल्या ही प्रकारचा वाद विवाद होऊ देऊ नका. अहंकाराच्या संघर्षामुळे ते एकमेकांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतील, ज्यामुळे संबंध बिघडू शकतात. अशा वेळी एकमेकांवर विश्वास ठेवा कारण प्रेम त्याचे नाव आहे. या दरम्यान, कोणत्या ही प्रकारचे कर्ज घेणे टाळण्याचा प्रयत्न करा आणि शक्य तितक्या कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान जुनी नोकरी सोडून नवीन नोकरी मिळण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुमची आर्थिक स्थिती वाढेल आणि तुम्ही धनलाभ करू शकाल. तुमचे उत्पन्न वाढेल. विद्यार्थ्यांसाठी गोचर अनुकूल सिद्ध होईल. तुम्ही आपल्या परीक्षेत उत्तम अंक प्राप्त करू शकाल कारण, आपल्या मेहनतीने ते तुम्हाला लाभ देतील आणि तुम्ही परिवर्तनात ही उत्तम मेहनत करतांना दिसाल. विवाहित जातकांना जीवनसाथीचे पूर्ण सहयोग आणि समर्थन मिळेल. संतान कडून ही उत्तम वार्ता ऐकायला मिळेल आणि तुम्हाला त्यांच्या प्रगतीच्या बाबतीत ऐकून गौरवान्वित वाटेल परंतु, त्यांना सदैव रागावू नका यामुळे तुमचे संबंध तणावपूर्ण होऊ शकतात.
उपाय: तुम्ही रविवारी बैलाला गूळ खाऊ घाला.
मीन पुढील सप्ताहाचे राशि भविष्य
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा: अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!