Talk To Astrologers

राशि (भाग-5)

जन्म वेळी जन्म स्थानावर जर आकाशाला पहिले तर त्या वेळेच्या ग्रह स्थितीला कुंडली म्हणतात. पृथ्वीवरून पाहिल्यास ग्रह एका गोळ्यात फिरतांना प्रतीत होतात या गोळ्याला राशीचक्र म्हणतात. या राशि चक्राला जर बारा सारख्या भागात वाटले गेले तर, प्रत्येक एका भागाला राशी म्हणतात. या बारा राशींची नावे : 1 मेष, 2 वृषभ, 3 मिथुन, 4 कर्क, 5 सिंह, 6 कन्‍या, 7 तुळ, 8 वृश्चिक, 9 धनु, 10 मकर, 11 कुंभ आणि 12 मीन. राशींचा क्रम लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे कारण कुंडलीमध्ये किंवा पत्रिकेत राशींचे नंबरच लिहिले जाते.

एका गोळ्याला गणितात 360 अंश म्हणजेच डिग्री मध्ये मोजले जाते. म्हणून एक राशि, जे राशि चक्राचा बारावा भाव आहे 360 भागिले 12 म्हणजे ठीक 30 अंशाचा झाला. सध्या जास्त गणितात जाण्याऐवजी इतके जाणून घेणे उत्तम असेल कि प्रत्येक राशी 30 अंशाची असते.

प्रत्येक राशीचा मालक निश्चित आहे आणि त्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे. राशीचे मलिक किंवा स्वामीला जाणून घेऊया.

पहिली राशी मेष चा स्वामी मंगळ आहे. वृषभ चा शुक्र, मिथुन चा बुध, कर्क चा चंद्र, सिंह चा सुर्य, कन्या चा पुन्हा बुध म्हणजे मिथुन आणि कन्या या दोन राशींचा मालक बुध, तुळ चा शुक्र, वृश्चिक चा परत मंगळ, धनु चा गुरु, मकर आणि कुंभ शनी आणि मीन चा गुरु.

सुर्य आणि चंद्र एक एक राशींचे स्वामी असतात. राहू केतू कुठल्याही राशीचे स्वामी नाहीत. तर बाकीचे ग्रह म्हणजे मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी दोन दोन राशींचे स्वामी असतात.

Call NowTalk to Astrologer Chat NowChat with Astrologer