नमस्कार। जैसा कि पहले बताया एक ग्रह का अच्छा या बुरा फल कई अन्य बातों पर निर्भर करता है। 6, 8, 12 भावों में ग्रहों के कारकत्व को नुकसान पहुंचता है यह पहले बताया। उसी तरह एक और महत्वपूर्ण बात है ग्रह की राशि में स्थिति। कोई भी ग्रह सामान्यत अपनी उच्च राशि, मित्र राशि, एवं खुद की राशि में अच्छा फल देते हैं। इसके विपरीत ग्रह अपनी नीच राशि और शत्रु राशि में बुरा फल देते हैं।
जसे की, आधी सांगितले एक ग्रहाचे चांगले किंवा वाईट फळ बऱ्याच अन्य गोष्टींवर निर्भर करते. 6, 8, 12 भावात ग्रहांच्या कारकत्वाला नुकसान पोहचवते या विषयी आधी माहिती दिली. त्याच प्रकारे एक अधिक महत्वाची गोष्ट आहे ग्रहाची राशीमध्ये स्थिती. कुठलाही ग्रह सामान्यतः आपली उच्च राशी, मित्र राशी आणि स्वतःच्या राशीमध्ये चांगले फळ देतात. याच्या विपरीत ग्रह आपल्या नीच राशी आणि शत्रू शनीमध्ये वाईट फळ देतात.
ग्रहांची उच्च आणि नीच राशी खालील तक्त्यात पहा.
क्रम | ग्रह | उच्च राशि | नीच राशि |
1 | सुर्य | मेष | तुळ |
2 | चंद्र | वृषभ | वृश्चिक |
3 | मंगळ | मकर | कर्क |
4 | बुध | कन्या | मीन |
5 | गुरू | कर्क | मकर |
6 | शुक्र | मीन | कन्या |
7 | शनि | तुळ | मेष |
8 | राहु | धनु | मिथुन |
9 | केतु | मिथुन | धनु |
तालिकेमध्ये काही लक्ष देण्याची आवशक्यता आहे. पहिले ग्रहाची उच्च राशी आणि नीच राशी एकमेकांपासून सातवी असते. जसे सुर्य मेष मध्ये उच्च चा असतो जो की, राशी चक्राची पहिली राशी आहे आणि तुळ मध्ये नीच असतो जो की राशी चक्राची सातवी राशी आहे.
ग्रह उच्च राशीमध्ये सर्वात बलवान असतात. आपल्या राशीमध्ये दुसऱ्या श्रेणीचे बलवान, मित्र राशीमध्ये तिसऱ्या श्रेणीचा बलवान, सम राशी मध्ये चौथ्या श्रेणीचा, शत्रू राशीमध्ये पाचव्या श्रेणीचा आणि नीच राशीमध्ये सहाव्या श्रेणीचा म्हणजे सर्वात कमजोर असतो.
कुंडली पाहणे सुरु करण्याआधी हे नोट करा की कोण कोणते ग्रह आपल्या उच्च आणि नीच राशींमध्ये स्थित आहे. जे ग्रह उच्च राशीमध्ये असतात ते आपले फळ देऊ शकतात. जर ग्रह नीच किंवा शत्रू राशीमध्ये येऊन कमजोर असेल तर आपले फळ देऊ शकत नाही. आपले फळ म्हणजे आपले कारकत्व आणि त्या भावांचे कारकत्व ज्याचा तो ग्रह स्वामी असेल.
इतर माहिती पुढील पाठ्यक्रमात पाहूया.