शुक्र ग्रहाचे विभिन्न भावात फळ लाल किताब अनुसार
वाचा लाल किताबच्या अनुसार शुक्र ग्रहाच्या संबंधित प्रभाव आणि उपाय. ज्योतिषमध्ये शुक्र ग्रहाला एक शुभ ग्रह मानले गेले आहे. लाल किताब जी पूर्णपणे उपाय आधारित ज्योतिष पद्धती आहे. यामध्ये शुक्र ग्रहाच्या विभिन्न भावांमध्ये फळ आणि त्याचे प्रभाव या बाबतीत विस्तारात व्याख्या केली गेली आहे.
लाल किताब मध्ये शुक्र ग्रह
शुक्र एक चमकदार आणि नैसर्गिक रूपात सुंदर ग्रह आहे. शुक्राच्या प्रभावाने व्यक्तीला भौतिक आणि समस्त सांसारिक सुखांची प्राप्ती होते. लाल किताबच्या अनुसार शुक्र ग्रह प्रेम, वासना, विवाह, जीवनसाथी, गृहस्थी सुख आणि जमिनीचे कारक असते. मनुष्यामध्ये प्रेमाच्या भावनेचे नाव शुक्र आहे. यासाठी व्यक्ती रुपया, पैसा, भूमी, संपत्ती आणि धन - दौलत सर्व काही न्योच्छावर करण्यास तयार होऊन जातो. शुक्र ग्रहाला लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे. कुंडली मध्ये शुक्रची शुभ स्थिती जीवनाला सुखमय आणि प्रेममय बनवते आणि अशुभ स्थिती चारित्रिक दोष व पीडा उत्पन्न करते.
लाल किताब मध्ये शुक्र ग्रहाचे महत्व
काल पुरुषाच्या कुंडलीमध्ये शुक्राचे स्थान द्वितीय आणि सप्तम आहे. जिथे द्वितीय भाव संपत्ती, कुटुंब आणि मुख चे कारक आहे तथापि सप्तम भावाने जीवनसाथी, व्यवसाय भागीदार आणि यात्रेच्या वेळी सहयात्रीला पाहिले जाते. शुक्र ग्रहाला वृषभ आणि तूळ राशीचे स्वामित्व प्राप्त आहे. शुक्र मीन राशीमध्ये उच्च मानला गेला आहे आणि कन्या राशी मध्ये हा नीचचा असतो. लाल किताब मध्ये शुक्र ग्रह गाय, पती - पत्नी , धन, लक्ष्मी, दुसऱ्या आणि सातव्या घराचा मालक आहे म्हणून, दुसरे घर पती - पत्नी किंवा सासरचा भाव मानला गेला आहे आणि सप्तम भावात गृहस्थ जीवनाचा भाव होतो. शनी, बुध आणि केतू शुक्रचे मित्र ग्रह असतात. तसेच सुर्य, चंद्र आणि राहू याचे शत्रू मानले गेले आहे. बुध, केतू आणि शनीच्या घरामध्ये शुक्र बलवान आणि उत्तम फळ देणारा असतो. तसेच शुक्र ग्रह बृहस्पतीला शत्रुतेचा भाव ठेवतो. तसेच सुर्य आणि शनीची दृष्टी शुक्राला प्रभावित करते. सुर्य आणि शनीच्या टकराव मध्ये शुक्र नेहमी निर्बल होतो. शुक्रला पुरुषाच्या कुंडलीमध्ये स्त्री आणि स्त्री च्या कुंडलीमध्ये पुरुष मानले जाते. टेवा मध्ये दुसरा, तिसरा, चौथा, सातवा आणि बाराव्या भावात शुक्र श्रेष्ठ मानला जातो आणि प्रथम, षष्ठम आणि नवम भावात हा मंद असतो. सप्तम भावात शुक्र ज्या ग्रहासोबत संबंध बनवतो त्याला आपला प्रभाव प्रदान करतो. शुक्र चंद्र देवासोबत मिळून नैसर्गिक लक्ष्मी योग बनवतो. ज्या जातकाच्या कुंडलीमध्ये शुक्र आणि चंद्र देवाची युती असेल तो व्यक्ती काम भावनेत प्रबळ आणि विलासितेचे साधन जोडण्यात पुढे असतो.
लाल किताब अनुसार शुक्र ग्रहाचे कारकत्व
लाल किताब मध्ये शुक्र ग्रह बऱ्याच विषयांचा कारक आणि प्रतीक मानले गेले आहे. यामध्ये देवी लक्ष्मी, धन, भूमी, संपत्ती, किसान, गाय, बैल, कुंभार, मणियार, पशु पालन, शुक्र ग्रहाचे प्रतीक आहे. याच्या व्यतिरिक्त दही, दह्यासारखा रंग, कापूस, तूप, पती - पत्नी, वीर्य, लिंग, कामदेव, फुल, अन्न, लोणी, चामडी, स्थान, भूमी, शृंगारचे सामान, माती व मातीच्या संबंधित कार्य, हिरा, जस्त, धातू, गोबर आणि गाय मूत्र सर्व वस्तू शुक्र संबंधित आहे. शरीरात जननांग, वीर्य व नेत्र वर शुक्राचा प्रभाव राहतो. शुक्र प्रेम, विवाह, ऐश्वर्य, गायन आणि नृत्यचा अधिपती असतो.
शुक्र ग्रहाचा संबंध
जर (पैसा), जोरू (स्त्री) आणि जमिनीचे मिश्रण शुक्र म्हणतात म्हणून, या तिघांचे मालक व्यक्ती घरात शुक्र (लक्ष्मी) चा वास मानला जातो. अतः शुक्र ग्रहाला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे.
शुक्र ग्रहाचे अशुभ होण्याचे लक्षण
- शुक्र ग्रहाचे राहू सोबत असणे म्हणजे स्त्री आणि धनाचा प्रभाव संपू लागतो.
- अंगठ्यात दुखणे किंवा विना आजाराचेच अंगठा खराब होतो.
- त्वचा विकार, गुप्त रोग, जीवनसाथी सोबत अनावश्यक कलह सुद्धा शुक्राच्या वाईट लक्षणांना दर्शवते.
- जर शनी मंदा अर्थात नीचचा असेल तर, जेव्हाही शुक्र ग्रहाचा प्रभाव वाईट असतो.
- शुक्राचे अशुभ फळ देण्याने व्यक्ती मध्ये चारित्रिक दोष उत्पन्न होते. मंद शुक्र वैवाहिक जीवनात अशांती आणि कलह निर्माण करतो. त्वचा संबंधित रोग आणि अंगठ्यात दुखणे ही शुक्राची अशुभ निशाणी सांगितली आहे.
लाल किताब मध्ये शुक्र ग्रहाने जोडलेले उपाय व तोडगा
जर कुंडली मध्ये शुक्र योग कारक ग्रह असतांना ही चांगले फळ प्रदान करत नाही तर लाल किताब मधील उपाय अवश्य केले पाहिजे-
- शुक्रवारी किंवा अन्य कुठल्या शुभ मुहूर्तावर चांदीचे आभूषण धारण केले पाहिजे.
- चांदीच्या वाटीमध्ये सफेद चंदन, सफेद दगडाचा तुकडा ठेऊन शयन कक्षात ठेवा.
- हिरा किंवा शुक्र यंत्र धारण करा.
- बदामी रंगाचे वस्त्र धारण करणे आणि घरात बदामी रंगाचे पडदे आणि चादर इत्यादींचा प्रयोग केला पाहिजे.
- घरात तुळशीचे रोपटे लावणे, सफेद पुष्प लावणे आणि सफेद गाय ठेवणे शुभ असेल.
- शुक्रवारच्या दिवशी श्री दुर्गा पूजा, 5 कन्याची पूजा आणि त्यांना खीर व सफेद वस्त्र भेट देणे.
- बटाट्यात हळद टाकून त्याला पिवळे करून गाईला खाऊ घातले पाहिजे.
- पाच शुक्रवार पर्यंत धर्म स्थानवर दूध, खडी साखर, तांदूळ, बर्फी आणि सफेद वस्त्राचे दान केले पाहिजे.
- माता, बहीण आणि महिला इत्यादींना प्रसन्न ठेवणे आणि त्यांना दुःख देऊ नये.
- शुक्रवारी सुरु करून सात दिवसापर्यंत गौ शाळेत गायीला हिरवा चार, साखर टाकली पाहिजे.
- चांदीची गोळी सदैव आपल्या पॉकेट मध्ये ठेवा.
- चतुर्थ भावात शुक्राचे मंदा होण्याने जीवनसाथी सोबत पुनः विवाह केला पाहिजे.
- धन व संतान साठी स्त्री ला केसांमध्ये सोन्याची क्लिप किंवा सुई लावून ठेवली पाहिजे.
- भाव क्रमांक सहा मध्ये शुक्र मंदा झाल्यावर संतानसाठी अंगाला दुधाने धुतले पाहिजे.
लाल किताब मध्ये शुक्र ग्रहाच्या संबंधामध्ये मन आणि इंद्रियांना नियंत्रित ठेवण्याने विशेष बळ देते.
शुक्राला प्रमुखता दोन रूपात पहिले जाते. एक स्त्री किंवा लक्ष्मीच्या रूपात आणि दुसरा दैत्याचे गुरु शुक्राचार्याच्या रूपात. एकीकडे जिथे शुक्र समस्त सांसारिक सुख - साधन प्रदान करते. तेच दुसरीकडे साहस आणि शक्ती ही देते म्हणून कुंडली मध्ये शुक्रची स्थिती प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वपूर्ण असते.
आम्ही अपेक्षा करतो की, लाल किताब मध्ये शुक्र ग्रहावर आधारित ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी सिद्ध होईल.
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
AstroSage TVSubscribe
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025