मंगळ ग्रहाच्या दहाव्या भावातील फळ - लाल किताब मराठीत

दहाव्या घरात मंगळ ग्रहाची भविष्यवाणी लाल किताब अनुसार

कुंडलीमध्ये ही मंगळ ग्रहाची सर्वात चांगली जागा आहे. इथे मंगळ उच्च आहे. जर तुमचा जन्म गरीब परिवारामध्ये झाला असेल तर तुमच्या जन्मानंतर तुमचे परिवार श्रीमंत होत जाईल. जर तुम्ही आपल्या भावांमध्ये सर्वात मोठे असाल तर, तुम्ही समाजामध्ये एका विशिष्ट व्यक्तीच्या रूपात ओळखले जाल आणि तुम्हाला खूप मान प्रतिष्ठा भेटेल. तुम्ही निर्भय, धैर्यवान, निरोगी आणि समाजातील जातिय परंपरा, नियम ठरवण्यास सक्षम असाल. जर दुसऱ्या घरामध्ये राहू , केतु आणि शनी किंवा शुक्र आणि चंद्र जसे हानिकारक ग्रह असेल तर मिळणाऱ्या लाभाचा प्रभाव कमी होतो. याच्या व्यतिरिक्त जर तिसऱ्या घरामध्ये काही मित्र ग्रह असेल तरीही दहाव्या घरामध्ये असलेल्या मंगळ ग्रहाचे प्रतिकूल प्रभाव पडतात. जर शनी तिसऱ्या घरामध्ये आहे तर तुमच्या जीवनाच्या शेवटी तुम्हाला खूप धन, जमीन मालमत्ता मिळेल. सोबतच तुम्हाला राजसी पद मिळेल. मंगळ दहाव्या मध्ये असला आणि पाचव्या घरामध्ये कोणताही ग्रह नसला तर चारही बाजुंनी समृद्धी आणि आनंद मिळेल.

उपाय:
(१) पूर्वजांची संपत्ती आणि आणि घरातले सोने विकू नका.
(2) घरामध्ये हरीण पाळा.
(३) दुध गरम करताना लक्षात ठेवा कि, ते ऊतू जाऊ नये आणि आगेमध्ये पडू नये.
(४) आंधळे आणि ज्याला मुले नाहीत अशा व्यक्तींची मदत करा.

Talk to Astrologer Chat with Astrologer