केतु संक्रमण 2020: केतुचे धनु राशीमध्ये राशी परिवर्तन
केतूला वैदिक ज्योतिषात एक मायावी आणि रहस्याने भरलेल्या ग्रहांचा दर्जा प्राप्त आहे.
केतू ग्रहाच्या बाबतीत सांगितले जाते की, हा जर कुंडली मध्ये शुभ स्थानात असेल तर भांडार
भरून देतो आणि जर याची स्थिती कुंडली मध्ये खराब असेल तर, हा सर्व भांडार खाली करून
देतो. केतू जितक्या लवकर धन आणि प्रतिष्ठा व्यक्तीला देतो तितकेच लवकर त्याच्या कडून
हिसकावून ही घेतो. केतूची माया कुणावर चालली तर तो व्यक्ती आपल्या समोर कुणाला काहीच
समजत नाही. तसेच केतूच्या चांगल्या प्रभावाने माणसाच्या कल्पना शक्तीला सकारात्मकता
मिळते.
वर्ष 2020 च्या सुरवातीला केतूचे संक्रमण धनु राशीमध्ये होईल आणि सप्टेंबर पर्यंत केतू
धनु राशीमध्ये स्थित राहील. 23 सप्टेंबर, 2020 नंतर प्रातः 08: 20 ला केतू राशी परिवर्तन
करेल आणि वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल. वर्षाच्या शेवट पर्यंत केतू वृश्चिक राशीमध्ये
संक्रमण राहील. केतू नेहमी राहूची भांती विक्री चाल चालतो. चला तर मग जाणून घेऊया केतूच्या
संक्रमणाच्या विभिन्न राशीवर 2020 मध्ये काय प्रभाव पडेल.
मेष राशि
- वर्षाच्या सुरवातीत केतू तुमच्या राशी मध्ये नवम भावात संक्रमण करेल ज्यामुळे धर्माने
जोडलेल्या कार्यात तुमची रुची वाढेल आणि धार्मिक यात्रेवर ही जाणे होऊ शकते.
- काही व्यर्थ यात्रा होऊ शकते ज्यामुळे तणाव वाढू शकतो.
- जमिनीच्या गुंतवणुकीला घेऊन काही विचार केला असेल तर, तो करू नका हेच उत्तम असेल.
- सप्टेंबर नंतर नवम भावा पासून अष्टम भाव मध्ये केतूच्या येण्याने विदेश जाण्याची तुमची
कामना पूर्ण होऊ शकते.
- कुठले नवीन कार्य सुरु करू शकतात.
- अधिक खर्च करण्यापासून सावध राहा नाहीतर मानसिक तणावाचे शिकार होऊ शकतात.
उपाय: मंगळवारच्या दिवशी कुठल्या ही मंदिरात जाऊन लाल रंगाचा झेंडा लावा आणि कुत्रांना पोळी खाऊ घाला.
वृषभ राशि
- वर्षारंभात केतू तुमच्या राशी पासून आठव्या भावात म्हणजे धनु राशीमध्ये संक्रमण राहील,
ज्यामुळे तुम्ही धार्मिक कार्या सोबत कुठल्या गूढ विषयात शोध करू शकतात.
- रिसर्च ने जोडलेला अभ्यास करत आहे तर या वर्षी मनासारखे यश मिळू शकते.
- कौटुंबिक सुख-शांति साठी केतुचे हे संक्रमण शुभ आहे.
- विनाकारण खर्च तुम्हाला मानसिक तणावात टाकू शकतात.
- वैवाहिक जीवनात कुठला ही निर्णय विचार घ्या.
- कर्ज देवाण-घेवाणीत सावधान राहा.
उपाय: तुम्ही श्री गणपति अथर्वशीर्ष चे पाठ केले पाहिजे आणि गरिबांना वेगवेगळ्या रंगाचे ब्लॅंकेट दान केले पाहिजे.
मिथुन राशि
- केतू वर्षाच्या सुरवातीत तुमच्या राशीच्या सप्तम भावात संक्रमण करेल या संक्रमणामुळे
जीवनसाथी सोबत तुमचे काही मतभेद होऊ शकतात आणि वाद-विवादाची स्थिती ही निर्माण होऊ
शकते.
- अविवाहित लोकांना सल्ला दिला जातो की, या वेळी नवीन साथीची निवड करू नका.
- या संक्रमणात कुठल्या ही प्रकारच्या धोक्यापासून सावध राहा.
- कुणी जुना मित्र येण्याच्या कारणाने या वर्षी तुमचा एकटेपणा दूर होईल.
- सप्टेंबर नंतर विद्यार्थ्यांना अभ्यास आणि नोकरीपेक्षा लोकांना आपल्या कामावर लक्ष
देण्याची आवश्यकता आहे.
उपाय: तुम्ही असगंध अथवा अश्वगंधा चे मूळ धारण केले पाहिजे आणि नियमित श्री गणपतीची पूजा केली पाहिजे.
कर्क राशि
- तुमच्या राशीच्या सहाव्या भावात केतू वर्षाच्या सुरवातीमध्ये संक्रमण करेल. या वेळी
तुम्हाला बरेच संघर्ष आणि बाधांपासून जावे लागू शकते.
- आपल्या विरोधी पासून सावध राहा ते तुमचे काम बिघाडू शकतात.
- विद्यार्थ्यांना या काळात कठीण मेहनत करावी लागेल तेव्हाच मनासारखे परिणाम मिळू शकतील.
- सप्टेंबर नंतर संतान कडून काही मतभेद होऊ शकतात आणि मुलांचे ही अभ्यासातून लक्ष भरकटू
शकते.
- तुमचे जुने प्रेम वर्षाच्या शेवटी तुमच्या आयुष्यात परत येऊ शकते.
उपाय: तुम्ही 9 मुखी रुद्राक्ष धारण करायला हवा आणि या रुद्राक्षाला धारण केल्यानंतर ॐ ह्रीं हूं नमः मंत्राचा जप केला पाहिजे. याच्या अतिरिक्त तुम्हाला नियमित शॉवर मध्ये अंघोळ केली पाहिजे आणि जर संधी मिळाली तर कुठल्या झऱ्यावर जाऊन ही स्नान करू शकतात.
सिंह राशि
- वर्षाच्या प्रारंभात केतू तुमच्या राशी पासून पाचव्या भावात संक्रमण राहील. हे संक्रमण
तुमचे निर्णय घेण्याच्या क्षमतेला क्षीण करेल आणि तुम्हाला मानसिक तणाव ही देईल.
- कुठल्या भ्रमाच्या स्थिती मध्ये फसू शकतात ज्यामुळे तुम्हाला गुदमरल्यासारखे वाटेल.
- वैवाहिक जीवनात तुमच्या पार्टनरला कुठून अन्य कमाई होण्याची शक्यता आहे ज्यामुळे धन
संबंधित समस्या दूर होऊ शकते.
- सप्टेंबर नंतर केतू तुमच्या राशीने चतुर्थ भावात संक्रमण करेल या काळात जमिनीच्या बाबतीत
कुठली ही गुंतवणूक करू नका.
उपाय: तुम्हाला मंगळवारच्या दिवशी चार केली हनुमानाला अर्पित केले पाहिजे तसेच मंगळवारचा उपवास ठेवणे ही तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होईल.
कन्या राशि
- वर्षाच्या सुरवाती पासून 23 सप्टेंबर पर्यंत केतू तुमच्या राशीच्या चतुर्थ भावात राहील.
- केतुचे हे संक्रमण माता आणि मानसिक सुखांसाठी चांगले नाही.
- जमीन आणि धनाने जोडलेल्या गोष्टींमध्ये कुणावर विश्वास ठेऊ नका अन्यथा धोका मिळू शकतो.
- वाहन सावकाश चालावा अन्यथा अचानक दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
- नोकरी बदलण्याची घाई करू नका याने तुम्हाला नुकसान होऊ शकते.
- सप्टेंबर नंतर केतुचे संक्रमण चतुर्थ भावापासून तुमच्या तृतीय भावात येऊन जाईल ज्यामुळे
लहान यात्रा होऊ शकते आणि या काळात नवीन गोष्टींना घेऊन उत्साहित राहाल.
उपाय: तुम्हाला भगवान विष्णूच्या मत्स्य स्वरूपाची पूजा केली पाहिजे आणि माश्यांचे दाणे टाकले पाहिजे.
तुळ राशि
- वर्ष सुरु होताच केतुचे हे संक्रमण तुमच्या राशीच्या तृतीय भावात स्थित राहील.
- केतुचे धनु राशीमध्ये संक्रमण तुम्हाला विनाकारण यात्रा करावी लागू शकते.
- लहान भाऊ बहिणींसोबत गैरसमज होऊ शकतात आणि तणाव निर्माण होऊ शकतो.
- व्यापारात चढ उताराची स्थिती कायम राहील.
- कमाईला घेऊन समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
- आपल्या व्यस्त आयुष्यातून जोडीदारासाठी अवश्य वेळ काढा अथवा नाते बिघडू शकतात.
- जे लोक खेळण्यात रुची ठेवतात त्यांना चांगल्या स्तरावर खेळण्याची संधी मिळू शकते.
उपाय: तुम्ही गणपति अथर्वशीर्ष चे पाठ केले पाहिजे आणि गणपतीला बुधवारच्या दिवशी दुर्वा अर्पण केली पाहिजे.
वृश्चिक राशि
- केतुचे हे संक्रमण वर्षाच्या सुरवातीमध्ये तुमच्या राशीच्या दुसऱ्या भावात होईल.
- या संक्रमणाच्या वेळेत आपल्या वाणीवर संयम ठेवा. वाद विवाद टाळा.
- खेळाने जोडलेले व्यक्ती या वर्षी चांगल्या लेवल वर जाऊन खेळू शकतात.
- कुठल्या ही नवीन कामाची सुरवात करण्याआधी आपल्या सहयोग किंवा सिनिअरचा सल्ला नक्की
घ्या.
- सप्टेंबर महिन्याने केतुचे संक्रमण तुमच्याच राशीमध्ये होईल म्हणून काही भटकवाची स्थिती
निर्माण होऊ शकते.
उपाय: नियमित आपल्या कपाळावर केशराचा टिळा लावा आणि केतू ग्रह ॐ कें केतवे नमः मंत्राचा जप करा.
धनु राशि
- वर्षाच्या सुरवाती पासून सप्टेंबर महिन्यापर्यंत केतुचे संक्रमण तुमच्याच राशीमध्ये
आहे. ज्यामुळे तुम्हाला कुठल्या प्रकारची भीती किंवा व्यहम होऊ शकतो.
- मनाला शांत ठेवण्यासाठी योग करा आणि धार्मिक स्थळावर जा.
- केतु का यह गोचर आपकी कल्पना शक्ति को ताकत देगा और आपकी पूर्वाभास की क्षमता भी बढ़ा
देगा। केतुचे हे संक्रमण तुमच्या कल्पना शक्तीला ताकद देईल आणि तुमच्या पूर्वाभासाच्या
क्षमतेला वाढावेल .
- वडिलांसोबत कुठल्या प्रकारचा मतभेद ठेऊ नका.
- भागीदारीत कुणासोबत काही ही काम करू नका आणि कुठला ही निर्णय विचार पूर्वक घ्या.
- नोकरीमध्ये नवीन पद मिळण्याचे योग आहेत.
- वर्षाच्या शेवटी विदेश यात्रेवर जाऊ शकतात.
उपाय: तुम्हाला अश्वगंधेचा रोपटे लावले पाहिजे आणि नियमित पाण्याने त्याला सिंचले पाहिजे. याच्या व्यतिरिक्त गरिबांना ब्लँकेट दान करणे ही उत्तम राहील.
मकर राशि
- वर्षारंभाने केतुचे संक्रमण तुमच्या राशीच्या बाराव्या भावात टिकून राहील. या वेळात
विदेश यात्रा होऊ शकते आणि खर्च वाढू शकतात.
- लांब धार्मिक यात्रेचे योग बनतात.
- या संक्रमणाच्या कारणाने तुमच्या स्वभावात गंभीरता येईल. तुम्ही आपल्या मनातील गोष्टी
कुणालाच सांगणार नाही.
- तुमचे मुलांसोबत वाद होऊ शकतात परंतु अश्या स्थितीमध्ये स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न
करा.
- विद्यार्थ्यांचे मन या काळात भटकू शकते म्हणून त्यांना ध्यान योग करण्याचा सल्ला दिला
जातो.
उपाय: तुम्ही नियमित दुर्गा चालीसाचे पाठ करायला हवे आणि दुर्गा माताच्या मंत्र ॐ दुं दुर्गायै नमः चा जप केला पाहिजे.
कुंभ राशि
- वर्षाच्या सुरवातीमध्ये केतू ग्रहाचे संक्रमण तुमच्या राशीने अकराव्या भावात होईल ज्यामुळे
वर्षाच्या सुरवातीत कुठल्या महाग वाहनाला खरेदी करण्यात तुम्ही पैसा लावू शकतात.
- या वर्षी समाजात तुमची ओळख वाढेल आणि समाज सेवेकडे तुमचा कल वाढेल.
- जीवनसाथी सोबत थोडे वाद होऊ शकतात याचे कारण तुमचा अहंकार असेल.
- जमिनीत गुंतवणूक करणे या वेळी चांगले राहील.
- सप्टेंबर नंतर तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी कुठल्या ही वादापासून लांब राहा.
उपाय: तुम्ही 9 मुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे तसेच देवी महालक्ष्मी आणि गणपतीची आराधना केली पाहिजे.
मीन राशि
- वर्षाच्या सुरवातीत केतू तुमच्या राशी पासून दशम भावात स्थित होईल. ज्यामुळे तुम्ही
आपल्या व्यापाराला घेऊन भ्रमित राहाल आणि कुठल्या ही प्रकारचा निर्णय घेऊ शकणार नाही.
- कार्याला घेऊन यात्रेचे योग बनलेले आहे.
- वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल आणि कुठल्या नवीन पाहुण्याच्या आगमनाने आनंद द्विगुणित
होईल.
- सप्टेंबर नंतर धार्मिक यात्रेचे योग बनत आहे.
उपाय: तुम्ही केतु ग्रहा च्या बीज मंत्र ॐ स्रां स्रीं स्रौं सः केतवे नमः चा जप केला पाहिजे आणि केतूच्या नक्षत्र अश्विनी, मघा किंवा मूळ मध्ये केतू संबंधित वस्तू जसे की, तीळ, केळी किंवा ब्लॅंकेटचे दान केले पाहिजे.
अपेक्षा आहे आमच्या द्वारे दिली गेली माहिती तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होईल. आम्ही
तुमच्या उज्वल भविष्याची कामना करतो.