बुध चे मीन राशि मध्ये संक्रमण, नीच राशि चा प्रभाव (7 एप्रिल, 2020)
बुध ग्रह मंगळवार, 7 एप्रिल 2020 ला दुपारी 2:16 वाजता आपल्या मित्र ग्रह शनीच्या स्वामित्वाच्या
कुंभ राशी पासून निघून देव गुरु बृहस्पतीच्या अधिपत्य असलेल्या मीन राशीमध्ये प्रवेश
करेल. ही राशी बुधची नीच राशी आहे आणि काल पुरुषाच्या कुंडलीमध्ये द्वादश अर्थात व्यय
भावाची राशी मानली जाते. ही जल तत्वाची राशी आहे म्हणून, या राशीमध्ये बुधाचे संक्रमण
महत्वाचे परिणाम देईल.
काही समस्यांनी चिंतीत असाल तर, समाधान मिळवण्यासाठी
प्रश्न विचारा
तुमच्या कुंडलीमध्ये बुध ग्रहाचे संक्रमण त्वरित प्रभाव दाखवते आणि बुध कारण बुद्धीचा
प्रदाता ग्रह आहे म्हणून, बुधाच्या संक्रमणाचा प्रभाव सर्वात जास्त तुमची बुद्धी, तुमची
विचार करण्याची शक्ती आणि तुमच्या वाणीवर पडतो.
बुध ग्रहाचे मीन राशीमध्ये संक्रमणाचे राशि भविष्य
आता जेव्हा बुध मीन राशी मध्ये संक्रमण करणार आहे तर, चला जाणून घेऊया की, या संक्रमणाचे
ही चक्र सर्व राशींमध्ये जन्म घेतलेल्या लोकांवर काय प्रभाव पडणार आहे:
हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे जाणून घ्या आपली
चंद्र राशि
मेष राशि
तुमच्या राशीच्या तिसऱ्या आणि सहाव्या भावाचा स्वामी बुध संक्रमण तुमच्या बाराव्या
भावात प्रवेश करेल. या संक्रमणाच्या प्रभावाने तुमच्या आरोग्य संबंधित समस्या पाहायला
मिळू शकतात. तुम्हाला शारीरिक समस्या त्रास देईल. विशेष रूपात तुम्हाला त्वचा संबंधित
समस्या येऊ शकतात आणि या वेळात तुमची झोप खराब ही होऊ शकते अर्थात तुमची झोप कमी होऊ
शकते यामुळे तुम्हाला असहज वाटू शकते. तुमच्याद्वारे केल्या गेलेल्या प्रयत्नात या
वेळात अधिकता न मिळाल्याने तुमचे मन नाराज होऊ शकते. तुमचे विरोधी ही या काळात त्रास
देऊ शकतात आणि ते तुम्हाला चिंतीत करू शकतात तथापि, स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये
लागलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही वेळ काही विशेष परिणाम देऊ शकते परंतु, बरीच मेहनत
करावी लागेल. कोर्ट कचेरीच्या बाबतीत या वेळी आंशिक रूपात यश मिळेल आणि तुमच्या खर्चात
ही जबरदस्त वाढ होईल. जे तुमच्या आर्थिक स्थितीवर बोझा बनू शकते. तुमच्या भाऊ बहिणींपैकी
कुणी परदेश गमन करू शकण्याची शक्यता होती परंतु जी परिस्थिती सध्या कोरोना मुळे आहे
यामुळे शक्यता नाही परंतु, तुम्हाला एक चांगल्या कंपनीमधून नोकरीची संधी मिळण्याची
शक्यता आहे. कायद्याचा अभ्यास करणाऱ्या लोकांना या संक्रमणाचा अनुकूल परिणाम मिळेल.
उपायः बुधवारी देवाकडे संध्याकाळच्या वेळी तुपाचा दिवा लावा.
वृषभ राशि
बुध ग्रह तुमच्या राशी स्वामी शुक्राचा जवळचा मित्र आहे आणि तुमच्या कुंडलीमध्ये हे
तुमच्या दुसऱ्या आणि पाचव्या भावाचा स्वामी आहे. आपल्या या संक्रमण काळात ते तुमच्या
एकादश भावात प्रवेश करेल जे की, आय किंवा लाभ भाव म्हटला जातो. या संक्रमणाच्या प्रभावाने
तुम्हाला आपल्या व्यापारात पुढे जाण्यास मदत मिळेल. तुम्ही आपल्या व्यापाराला उत्तम
करण्यासाठी उत्तम गुंतवणूक कराल. यात तुम्हाला तुमच्या कुटुंबातील लोकांची ही मदत मिळेल.
या वेळात तुमच्या कमाई मध्ये वाढ होईल आणि जी समस्या आर्थिक दृष्ट्या चालत आलेली आहे
ती या काळात कमजोर पडेल आणि तुम्ही एक चांगला व्यवसाय करू शकाल. याच्या व्यतिरिक्त
तुमच्या प्रेम जीवनातील दृष्टीकोनासाठी हे संक्रमण फायदेशीर राहील कारण, तुमच्या प्रेम
जीवनात जे गैरसमज चालू आहेत ते दूर होतील आणि एकमेकांच्या प्रति समज विकसित होईल. तुम्ही
एकमेकांसोबत आपल्या गोष्टी व्यक्त करू शकाल आणि एकमेकांच्या प्रति समजदारी दाखवाल.
तुमची बुद्धी मजबूत होईल. नवीन नवीन गोष्टी शिकण्यात तुमचे मन लागेल आणि तुम्ही उत्तम
शिक्षण प्राप्तीच्या दिशेमध्ये पुढे जाल. याच्या व्यतिरिक्त कुटुंबातील लोकांच्या मदतीने
तुमच्या जीवनात आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही मदत केली जाऊ शकते.
उपायः बुधवारी विधारा मुळ पाण्यात भिजवून अंघोळ केल्याने अनुकूल परिणाम मिळतील.
मिथुन राशि
तुमच्या राशीतील स्वामी बुध देव तुमच्या दशम भावात संक्रमण करतील. हे तुमच्या प्रथम
भावासोबतच तुमच्या चौथ्या भावाचा स्वामी ही आहे म्हणून, या संक्रमण काळात तुम्हाला
आपल्या करिअर आणि आपल्या कुटुंबासोबत स्वतःच्या व्यक्तित्वाचा बाबतीत विचार करण्याची
भरपूर संधी मिळेल. तुमचे काही निर्णय चांगले असतील जे तुम्हाला कार्य क्षेत्रात मदत
देतील आणि काही ठिकाणी तुम्ही अत्याधिक आत्मविश्वासाचे शिकार होऊ शकतात यामुळे तुमच्या
कार्यस्थळी समस्या उचलाव्या लागू शकतात. या काळात तुमच्या कौटूंबिक जीवनात आनंदाची
वेळ असेल आणि कुटुंबातील लोक तुमच्या गोष्टी एकमेकांकडे व्यक्त करणे पसंत करतील. अश्यात
कुटुंबात समरसतेचे वातावरण असेल. या काळात प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार कराल परंतु
काही कागदी गोष्टींमध्ये अडचणी येऊ शकतात. तुम्ही आपल्या कामाला अधिक महत्व द्याल यामुळे
तुम्हाला थकवा येऊ शकतो आणि शारीरिक रूपात तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते म्हणून आपल्या
बुद्धी आणि बळाचा प्रयोग करून तुम्हाला आपल्या कामात योग्य प्रकारे लावले पाहिजे म्हणजे
तुम्ही आपल्या कामाला उत्तम प्रकारे करू शकाल आणि शरीर ही ठीक राहू शकेल. आपल्या घरातील
गोष्टी आपल्या ऑफिस मधील व्यक्तींसमोर व्यक्त करू नका.
उपायः तुम्ही बुध ग्रहाच्या बीज मंत्र ॐ ब्रां ब्रीं ब्रौं सः बुधाय नमः चे
नियमित जप केला पाहिजे.
कर्क राशि
कर्क राशीतील लोकांसाठी बुध बाराव्या स्थानासोबतच तुमच्या तिसऱ्या भावाचा वामी आहे
आपल्या या संक्रमण काळात ते तुमच्या नवम भावात प्रवेश करेल. या संक्रमणाच्या प्रभावाने
तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते आणि जे लोक उच्च शिक्षण क्षेत्रात परदेशातील
कॉलेज मध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे त्यांना यश मिळू शकते. तुमची बुद्धी मजबूत होईल
आणि समाजात तुम्हाला चांगले स्थान मिळेल. तुम्ही आपल्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला
नवीन दिशा द्याल आणि लिहण्यात अर्थात रायटिंग च्या कामात तुमची रुची वाढेल. अशी शक्यता
आहे की, तुम्ही याला आपला पेशा बनवू शकतात. तुम्हाला मीडियाचा कामात आनंद येईल. याच्या
व्यतिरिक्त या वेळी तुम्ही स्पष्टपणे आपल्या गोष्टी बोलाल आणि सामाजिक कामात हिस्सा
घ्याल. तुमची कमाई ही वाढेल आणि तुम्हाला तुमच्या भाऊ बहिणींकडून चांगला सपोर्ट ही
प्राप्त होईल. तुम्ही आपला छंद पुढे कायम ठेवाल आणि गार्डनिंग किंवा राइटिंग किंवा
एक्टिंग जश्या कामात तुमचे मन लागेल. क्रिएटिव्ह कामाने समाजात काही कुप्रथेच्या विरुद्ध
काही उद्धेश्य घेऊन पुढे जाल. या काळात तुमचा संवाद कौशल्य खूप चांगला व्हायला लागेल
आणि तुम्हाला आपल्या मेहनतीचे फळ मिळेल परंतु, अति बोलणे तुम्हाला नुकसान ही देऊ शकते
याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
उपायः तुम्ही नियमित चंद्र देवाची पूजा केली पाहिजे.
सिंह राशि
सिंह राशीतील जातकांसाठी बुध तुमच्या राशीच्या आठव्या भावात प्रवेश करेल. येथे बुधाचा
नीच राशीमध्ये असण्याने तुम्हाला समस्या नक्कीच निर्माण करेल परंतु, तरी ही या संक्रमणाने
तुम्हाला काही अनुकूल परिणाम मिळतील. तुमच्या राशीसाठी बुध दुसऱ्या आणि नोकर्यांच्या
भावाचा स्वामी आहे यामुळे अचानक तुमच्या कमाईमध्ये घट येतांना पाहायला मिळू शकते. शक्यता
आहे की, तुमची काही व्यावसायिक डील फेल होऊ शकते यामुळे तुम्हाला आर्थिक हानी उचलावी
लागू शकते परंतु, दुसरीकडे याच्या सोबतच दुसरे पक्ष असे असेल की, अचानक तुमच्या कमाईमध्ये
वाढ होईल आणि काही असा मार्ग मिळू शकतो ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खूप लवकर चांगली
होईल. तुम्हाला आपल्या सासरच्या पक्षातील लोकांसोबत भेटण्याची संधी मिळेल. त्यांच्या
सोबत तुमचे बरेच बोलणे होईल आणि कुठल्या गोष्टीवर विचार विमर्श ही होईल. आपल्या ऑफस
मध्ये तुमचे कामकाज थोडे चढ उताराने भरलेले राहणार आहे यामुळे तुमचे संबंध तुमच्या
वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बिघडू शकतात आणि परिणाम स्वरूप तुम्हाला नोकरी पासून हात धुवावे
लागू शकते म्हणून थोडी काळजी नक्कीच घ्या आणि व्यर्थ वाद अजिबात करू नका. तुमचे मन
अध्यात्मिक कामात अधिक लागेल. मंत्र जप करण्यात तुम्हाला आनंद मिळेल यामुळे तुमचे ज्ञान
चक्षु मजबूत होतील.
उपायः तुम्ही बुधवारी राधा कृष्णाचे शृंगार करून त्यांची पूजा केली पाहिजे.
कन्या राशि
तुमच्या राशीचा स्वामी बुध महाराज तुमच्या सातव्या भावात संक्रमण करेल. हे तुमच्या
दहाव्या भावाचा स्वामी ही आहे म्हणून, तुमच्यासाठी हे संक्रमण खूप जास्त प्रभावशाली
असेल. या संक्रमणाच्या प्रभावाने तुमच्या कार्यक्षेत्रात स्थिती तुमची पक्षात असेल
आणि तुम्ही आपल्या कामात पद उन्नती प्राप्त करू शकतात तेच नाही तर तुमच्या वेतनात ही
या काळात तुम्ही जे काम करायला घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमचे वडिलांसोबत नाते
चांगले होईल आणि तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये जवळीकता वाढेल तसेच, जीवनसाथी सोबत
ही तुमचे नाते सुधारेल आणि तुम्ही आपल्या कामाला महत्व द्याल. या संक्रमणाने तुम्हाला
सर्वात चांगला फायदा हा होईल की तुम्हाला धन लाभ नक्कीच होईल आणि तुम्ही आपल्या बुद्धीचा
वापर व्यवसायात ही चांगल्या प्रकारे कराल.
उपायः तुम्ही बुध ग्रहाचे यंत्र किंवा रत्न धारण केले पाहिजे.
तुळ राशि
बुधचे संक्रमण तुमच्या राशीच्या सहाव्या भावात होईल. या भावात बुधाचे संक्रमण तुमच्यासाठी
जास्त अनुकूल राहणार नाही कारण, हे तुमच्या कुंडलीमध्ये नवव्या आणि बाराव्या भावाचा
स्वामी ही आहे. भाग्य स्थानाचा स्वामी सहाव्या भावात जाणे अधिक मेहनत दर्शवते. अश्यात
अधिक मेहनती नंतर तुम्हाला अल्प यश मिळेल. कामात व्यत्यय येण्याने मन थोडे चिंतीत होऊ
शकते आणि या वेळात तुमच्या कमाईमध्ये कमी येऊ शकते. आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे
आहे आणि आपल्या खाण्या-पिण्याची विशेष रूपात काळजी घ्या. या संक्रमण काळात तुम्ही व्यर्थ
वादापासून लांब राहणेच तुमच्यासाठी चांगले असेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात तुमच्या
वडिलांसाठी या संक्रमणाचे चांगले परिणाम मिळतील आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात खूप चांगल्या
कामाचा जबरदस्त फायदा मिळेल. तुम्हाला एक गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागेल की, जिथे
तुम्ही नोकरी करतात तेथील कुठल्या ही व्यक्तीकडे आपल्या मनातील गोष्ट व्यक्त करू नका
कारण, ते तुमच्या कमजोरीचा फायदा उचलू शकतात.
उपायः तुम्ही बुध ग्रहाची अनुकूलता मिळवण्यासाठी चार मुखी रुद्राक्ष धारण केले
पाहिजे.
वृश्चिक राशि
तुमच्या राशीसाठी बुध ग्रह तुमच्या आठव्या आणि अकराव्या भावाचा स्वामी आहे. आपल्या
ह्या संक्रमण काळात ते तुमच्या पचवता भावात प्रवेश करतील आणि आपली नीच राशीमध्ये स्थित
होईल. या संक्रमणाच्या परिणाम स्वरूप तुम्हाला आपल्या प्रेम जीवनात चांगल्या आणि वाईट
काळाची झलक पाहायला मिळेल. इथे एकीकडे तुमचा प्रियतम तुमच्यासोबत प्रेमाच्या गोष्टी
करेल तसेच, तुमच्या काही गोष्टी त्यांना कमी समजतील आणि ते कुठल्या गोष्टीला घेऊन गैरसमज
होण्याने वाद विवाद वाढू शकतो आणि तुमच्या नात्यामध्ये अधिक वाद स्थिती निर्माण होऊ
शकते. अश्यात तुम्ही विचार करूनच बोला. जर तुम्ही विवाहित आहेत तर, या संक्रमण काळात
तुम्हाला आपल्या संतान कडून अनिश्चितता राहील आणि ते ही आपल्या शिक्षणात चांगले मन
लावतील परंतु, ही काळजी घेणे गरजेचे आहे कि, शिक्षण व्यतिरिक्त ते आपला वेळ इतर गोष्टींमध्ये
व्यर्थ नको घालवायला. तुम्हाला या काळात कमाईचे बरेच स्रोत मिळतील यामुळे या संक्रमणाचा
परिणाम तुम्हाला चांगला वाटेल. जर तुम्ही विद्यार्थी आहेत तर, या काळाचा पुरेपूर फायदा
घ्या कारण शिक्षणासाठी वेळ चांगली आहे.
उपायः तुम्ही बुधवारी उपवास ठेवला पाहिजे.
धनु राशि
धनु राशीतील लोकांसाठी बुधाचे संक्रमण चौथ्या भावात होईल. तुमच्यासाठी बुध सातव्या
आणि दहाव्या भावाचा स्वामी आहे आणि संक्रमण काळात तुमच्या दशम भावाला पूर्ण सप्तम दृष्टीने
पाहिल. या संक्रमणाच्या प्रभावाने तुमच्या कौटुंबिक जीवनात ज्या गोष्टी चालू आहेत त्याचा
सरळ परिणाम तुमच्या कामावर पडेल म्हणून, तुम्हाला आपल्याला खूप संतुलित ठेवावे लागेल.
कुटुंबातील वातावरण चांगले राहील. या कळत तुमच्या जीवनसाथीच्या कार्य क्षेत्र संबंधित
काही समस्यांचे निराकरण करण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल यात त्यांना तुमची मदतीची
आवश्यकता अधिक असेल. तुम्ही आपल्या कार्यात खूप कष्ट कराल आणि आपल्या बुद्धी प्रयोगाने
तुम्ही नवीन आयडिया घेऊन याल. जे तुमच्या कामाला सहज आणि अधिक इंटरेस्टिंग बनवेल. तुमचे
काम उत्तम चालेल आणि तुमच्या व्यापारात ही या वेळी प्रगतीची संधी दिसेल. या काळात तुम्हाला
आपल्या आईचे ऐकणे गरजेचे असेल.
उपायः तुम्ही बुधवारी संध्याकाळी देवाजवळ तुपाचा दिवा लावा आणि काळे तीळ दान
करा.
मकर राशि
तुमच्यासाठी बुध संक्रमण बरेच महत्वाचे आहे कारण, ते तुमच्या भाग्य स्थानाचा स्वामी
आहे. तुमच्या कुंडलीमध्ये बुध सहाव्या स्थानात आणि नवव्या स्थानाचा स्वामी आहे आणि
संक्रमण काळात तुमच्या तिसऱ्या भावात प्रवेश करेल. या संक्रमणाच्या प्रभावाने तुम्हाला
आपल्या संवाद कौशल्याकडे लक्ष द्यावे लागेल कारण, नीच राशीमध्ये बुध असण्याने आहि असे
संवाद होऊ शकतात जे तुमच्या आपल्या लोकांना त्याचे वाईट वाटू शकते आणि तुमचे काही काम
बिघडू शकतात. या काळात तुमचे विरोधी सक्रिय होऊ शकतात आणि तुमच्या प्रतिमेला ठेस पोहचवण्याचा
प्रयत्न करू शकतात. या काळात तुम्ही कुठल्या बँकेकडून लोन घेऊ शकतात आणि त्यात तुम्हाला
यश ही मिळेल. भाग्य तुमचा साथ देईल आणि तुम्ही जे प्रयत्न कराल ते तुमच्या कामी येईल.
कार्य क्षेत्रात आपल्या सहकर्मी सोबत चांगला व्यवहार तुमच्या कामात उन्नती मिळवण्यात
मदत करेल आणि ते तुमच्या पक्षात राहतील तर, तुम्हाला यश लवकरच मिळेल. या काळात कायद्याचे
काम करणाऱ्या लोकांकडून तुम्हाला चांगला लह मिळेल आणि त्यांना यश ही मिळेल. एक गोष्ट
तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की, अशी कुठली ही गोष्ट सोशल मीडिया वर टाकू नका जी समाजाच्या
विरोधात असेल कारण, या काळात तुम्हाला समस्या येऊ शकतात.
उपायः बुधवारी आपल्या घरातील अंगणात रोपटे लावा.
कुंभ राशि
कुंभ राशीतील लोकांच्या दुसऱ्या भावात बुधाचे संक्रमण मीन राशीमध्ये होईल. हे तुमच्यासाठी
पंचम भाव आणि अष्टम भावाचा स्वामी आहे. या संक्रमणाच्या प्रभावाने तुमच्या वाणीमध्ये
अचानक काही रहस्यमयी गोष्टी होतील. जर तुम्ही काही रहस्यमय अंदाजाने कराल ज्याचा अर्थ
समजेल पारंतू, पूर्णतः समजणार नाही म्हणून, असमंजस स्थिति बनेल. तुम्हाला आपल्या भोजन
आणि खाण्यापिण्याची काळजी घ्यावी लागेल अथवा आरोग्य संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्हाला चांगले यश मिळेल आणि जर तुम्ही विद्यार्थी आहेत तर,
या काळात तुमच्या परीक्षेचे परिणाम तुमच्या पक्षात येऊ शकतात यामुळे तुम्हाला बरीच
प्रसन्नता मिळेल आणि तुमचे आत्मबल वाढेल. जर तुम्ही विवाहित आहेत तर तुमच्या संतांनच्या
माध्यमाने तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल आणि ते आवश्यकता असल्यास तुम्हाला आर्थिक
दृष्ट्या मदत करेल. जर तुम्ही प्रेम संबंधात आहेत तर या काळात आपल्या प्रियतमला तुम्ही
आपल्या कुटुंबासोबत भेट करवून द्याल आणि त्यांच्या गोष्टी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या
तोंडी असेल. या काळात जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्या त्यांना त्वचा संबंधित रोग
होऊ शकतात.
उपायः बुधवारी हिरव्या मुगाची खिचडी बनवून खाणे आरोग्यासाठी चांगले असेल.
मीन राशि
बुध ग्रहाचे संक्रमण मीन राशीमध्ये होत आहे म्हणून मीन राशीतील लोकांसाठी बुधाचे संक्रमण
त्यांच्या प्रथम भावात होईल. बुध तुमच्यासाठी चौथ्या आणि सातव्या भावाचा स्वामी आहे
आणि या संक्रमणाच्या परिणाम स्वरूप बुधचा प्रभाव तुमच्या बुद्धी आणि तुमच्या स्मरण
क्षमतेमध्ये विशेष रूपात प्रभाव टाकेल. तुम्ही घाई गर्दीत काही निर्णय घेऊ शकतात यामुळे
तुम्हाला नंतर त्रास होऊ शकतो म्हणून, विचारपूर्वक निर्णय घ्या. या काळात व्यवसायात
पुढे जाल परंतु, तुम्हाला व्यवसायात वृद्ध व्यक्तींचा सल्ला घेऊनच पुढे गेले पाहिजे
कारण, या काळात काही परिणाम खराब ही असू शकतात. तुमच्या वाणीमध्ये बदल येऊ शकतो म्हणून,
आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. या काळात प्रॉपर्टीला घेऊन काही वार्तालाप होईल आणि गोष्टी
पुढे वाढू शकतात. आईचे सहयोग मिळेल आणि ते तुम्हाला उत्तम सल्ला देतील. दांपत्य जीवनात
काही समस्या येऊ शकतात. अहंकार कमी करा न केल्यास नाते खराब होण्याची शक्यता राहील.
या काळात तुम्ही काही नवीन शिक्षणाची आवड ठेवाल.
उपायः बुध देवाच्या विशेष कृपा प्राप्तीसाठी तुम्ही की विशेष
विधारा मूळ धारण केले पाहिजे.