Do you want to get married?

FREE Matrimony site by No. 1 astrology portal AstroSage.com

Rashi Bhavishya 2012 - Marathi Horoscope 2012 - Marathi Astrology 2012


Select Your Zodiac Sign:
मेष वृषभ मिथुन कर्क
सिंह कन्या तुला वृश्चिक
धनु मकर कुम्भ मीन

मेष मेष (चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ)

जानेवारी - नव्या वर्षात कोणतेही काम करण्याआधी नीट विचार करा. तब्येतीची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. मित्रांच्या मदतीशिवाय यश मिळणे सोपे नाही, यासाठी त्यांच्याशी चांगले संबंध ठेवा. देवाची आराधना करा, यामुळे आपले चित्त शांत राहील आणि येणारे कष्ट त्रासदायक ठरणार नाहीत.

फ़ेब्रुवारी - या महिन्यात आपल्याला संभाळून राहण्याची आवश्यकता आहे. शत्रू आपले अहित करण्यात सफल ठरू शकतात. जोडीदारासोबत बाचाबाची होऊ शकते. आर्थिक दॄष्ट्याही हा महिना लाभदायक नाही - विशेषकरून महिन्याच्या शेवटी. सुदैवाने भेटलेल्या एखाद्या व्यक्तीमुळे जीवनाला नवी दिशा मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. मित्र आणि नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

मार्च - आपले नवे घर बनू शकते. व्यापारात गती सामान्य राहील. राजनैतिक क्षेत्रात आपले वर्चस्व वाढू शकेल. विरोधक आपल्यासमोर मात खातील. हो, फालतू कायदेशीर प्रकरणात फसण्यापासून वाचा. थोड्या विशेष व्यापारी वर्गाला लाभ होऊ शकेल.

एप्रिल - नशीब बलवत्तर आहे. नवे वाहन खरेदी करू शकता. प्रेमाच्या दॄष्टीने महिना चांगला आहे. एखाद्या जुन्या मित्राची अचानक भेट होणे शक्य आहे. ही भेट फायदेशीर ठरेल. जुन्या दुर्धर आजारापासून सुटका मिळण्याचा योग आहे. कोणालाही उधार देण्यापासून सावध राहा, नाहीतर ते परत मिळवण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील.

मे - या महिन्यातही स्थिती चांगली नसेल. नियोजीत कार्यक्रमानुसारच कामे करा. कौटुबिक प्रश्न भेडसावू शकतात, खासकरून स्त्रियांना. आपल्या धर्मस्थळात जाऊन प्रार्थना करा. महिन्याचा शेवट येता-येता चांगल्या परिस्थितीची सुरुवात होईल.

जून - आपला वाईट काळ संपला आहे. जुन्या कामाचा फायदा मिळण्यास सुरुवात होईल. आपण नव्या कामाचा शुभारंभही करू शकता. मित्र आपल्याला मदत करतील. हो, पण कोणावरही डोळे मिटून भरवसा ठेवू नका, नाहीतर नंतर पश्चाताप करण्याची पाळी येईल. आणि हो, कुटुंबात लहान-मोठ्या समस्या उद्भवू शकतात. पण आर्थिक बाजू मजबूत राहील.

जुलै- पार्टी देण्याची तयारी ठेवा, महिन्यापासून अडकलेले काम मार्गी लागेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. सासरच्या लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवा. व्यापारी वर्गाला विशेष लाभ होईल. जग आपल्या कामाचे कौतूक करेल. मानसन्मानात वाढ होईल. प्रपंचातही सर्वकाही ठीकठाक राहील. विद्यार्थ्यांसाठीही निकाल अशादायक असतील.

ऑगस्ट - घरात नव्या पाहुण्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. नव्या लोकांवर डोळे मिटून भरवसा ठेवू नका. जुन्या समस्या नव्या रुपात तुमच्यासमोर उभ्या ठाकतील. मित्रांसोबत मिळून नव्या कामाची सुरुवात करू शकता. नोकरीतही आपल्याला पदोन्नती मिळू शकते.

सप्टेंबर - लक्षात असू द्या वाणीच मित्र आणि शत्रू बनवते, म्हणून तिचा वापर विचारांती करा. स्त्री वर्गासाठी हा महिना फारच शुभ आहे. शत्रुच्या गुप्त कारस्थानांपासून सावध राहण्याची गरज आहे. फार परिश्रम करावे लागतील. तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे निकाल उत्तम असतील.

ऑक्टोबर - हा महिना कडू-गोड अनुभवांचा असेल. महिन्याची सुरूवात तर चांगली असेल, पण महिन्याच्या शेवटी काही समस्या भेडसावू शकतात. दीर्घ यात्रा फायदेशीर तर असतील पण यासाठी अधिक पैसेही खर्चावे लागतील. शत्रू आपल्याला त्रास देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतील पण त्यांना यश येणार नाही.

नोव्हेंबर - नो प्रॉफीट नो लॉस, हा महिना अशा प्रकारचा असेल. भौतिक गरजेच्या वस्तू खरेदी कराल. फिरण्यावर आणि मनोरंजनावर अधिक खर्च कराल. शत्रुंपासून सावध राहा.

डिसेंबर - या महिन्यात धनप्राप्तीचे आकस्मिक योग जुळून येत आहेत. जर आपल्या डोक्यावर कर्ज असेल तर या महिन्यात ते फ़ेडून टाकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जी कामं केवळ डोक्यातच कल्पनेच्या स्वरूपात होती ती आता वास्तवात उतरण्याची शक्यता आहे. ही आपल्या यशोगाथेतील एक मोठी झेप ठरेल.

वृषभ वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

जानेवारी - या महिन्यात काहीतरी खास होणार आहे. राजकारणातली आवड उच्च स्थानावर पोहोचायला साहाय्यभूत ठरेल. स्पर्धेत यश मिळेल, साहित्य, संगीतातील आवडीचा फायदा होईल. तब्येतीची काळजी घ्या. महिन्याच्या पूर्वार्धात खर्च अधिक होईल, ज्यामुळे धन संचयात अडचण निर्माण होईल. चांदीच्या तांब्यात वाहत्या नदीचे पाणी भरून ठेवल्यास फायदा होईल.

फ़ेब्रुवारी - हा महिना गोचर ग्रहानुसार मध्यमफळ देणारा दिसत आहे. ललित कलेत रूची वाढेल, पाहुण्यांच्या आगमनाने आनंद होईल. ठरवलेले काम मोठ्या मुष्किलीने होईल, अधिकारींसोबतची जवळीक टाळा. उदरनिर्वाहासाठी आपापल्या क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना आपल्या सहकारी लोकांसोबत जुळवून घेणे आवश्यक ठरेल. आपण आपल्या पराक्रमाने परिस्थितीला सकारात्मक बनवण्यात सफल व्हाल.

मार्च - कुटुंबीयांच्या साहाय्याने जीवनात आनंद निर्माण होईल. पैशाचा अपव्यय टाळा. बाहेर फिरायला जाण्याचा कार्यक्रम बनू शकतो. शिक्षणाच्या क्षेत्रात विध्यार्थ्यांची अभ्यासात आवड वाढू शकते. प्रेम संबंध मजबूत होतील. व्यापारात लाभ आणि पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील.

एप्रिल - तयार राहा, नशीब आपले दार ठोठावणार आहे. नोकरीत पदोन्नती आणि व्यापारात वृध्दीचे योग आहेत. हिंडण्या-फिरण्याची संधी मिळेल, पण तितकेच थकायलाही होईल. चांगल्या बातमीने मन खुश होईल, पण अधिक भावनिक होऊ नका. विद्यार्थी वर्गाला एकाग्र चित्त होण्यासाठी अतिशय मेहनत करावी लागेल.

मे - हा महिना आपल्याला अधिकतर ठीकठाक ठरेल. व्यापारात नव्या युक्त्यांचा फायदा होईल. भावुक होणे चांगले आहे, पण अती भावनिकता टाळा. सुख आणि धन प्राप्तीचे संकेत आहेत. सांध्यांचे दुखणे किंवा शल्य चिकित्सा होऊ शकेल. नोकरी व्यवसायात परिवर्तनामुळे घरापासून दूर राहावे लागेल.

जून - वेळेची मागणी आहे की तुम्ही सावधानी बाळगावी. प्रवास करण्याआधी इश्वराचे स्मरण नक्की करा. वाहन चालवताना दक्ष राहा. खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा. एखादी शुभ बातमी कळेल.

जुलै- इच्छीत लाभाने आनंद होईल. स्पर्धेचा निकाल आपल्याला प्रसन्न करेल. स्त्रियांनी तब्येतीची काळजी घ्यावी. वजन वाढेल. नोकरीत पदोन्नती शक्य आहे. तब्येतही थोडी नाजुक राहील. विद्यार्थी वर्गासाठी चांगली बातमी आहे.

ऑगस्ट - आपल्या जीवनात नवा उत्साह आणि रंगांची उधळण होणार आहे. बहिणी-भावंडांचे साहाय्य जीवनात नवा आनंद निर्माण करेल. व्यापारात नवे यश आणि वृध्दी होईल. थांबलेली कामे मार्गी लागतील. लॉटरीने फायदा होईल.

सप्टेंबर - बदलत्या रुतुमानानुसार आपली तब्येत बिघडू शकते. दूरचे नातेवाईक आपल्याकडे येऊ शकतात. आपली जराशी बेपर्वाई आपल्याला हानीकारक ठरू शकते.

ऑक्टोबर - सावध राहा, कोणीतरी आपल्याविरुध्द कट रचत आहे. हलकीशी चूक आपल्याला महागात पडू शकते. एका मांगलिक कार्याचा योग जुळत आहे. सकारात्मक वातावरण कायम राहील. फार मेहनत करावी लागेल. हो, त्यानुसार फळही मिळेल.

नोव्हेंबर - एकुणच ग्रह आपल्यासोबत आहेत. व्यस्त जीवनात चढ -उतार पाहायला मिळतील. एखादे काम घाई-गडबडीत करणॆ टाळा, नाहीतर तुमचेच नुकसान आहे. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. उगीचच वादात पडू नका. तब्येत ठीक राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा.

डिसेंबर - या महिन्यात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू बळकट राहील. नव्या खरेदीसाठी ही वेळ अनुकूल आहे. नवे लाभदायक संबंध प्रस्थापित होतील. धार्मिक कार्यात रूची वाढेल. वैवाहिक जीवन कडू-गोड राहील. विध्यार्थी वर्गाला अधिक मेहनत करण्याची आवश्यकता आहे.

मिथुन मिथुन (का, कि, कु, घ, ड., छ, खे, खो, हा)

जानेवारी - थोडा कठिण काळ आहे. आपण कार्यक्रमांप्रती अरूची अनुभव कराल. मेहनत केली तरी फळ न मिळाल्यामुळे आलेल्या उदासीने तुमचे मन चिंतित राहू शकेल. अति विश्वासाच्या बदल्यात तुम्हाला धोका मिळू शकतो.

फ़ेब्रुवारी - इतर व्यक्तींच्या समस्येत उगीच हस्तक्षेप करू नका. व्यापारात पैसे गुंतविणे लाभदायक ठरेल. कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण राहील. जेव्हा आपल्या विचारांनी काम होत नसेल तेव्हा एखाद्या योग्य आणि विश्वासपात्र व्यक्तीच्या सल्ल्यानुसार कार्य करणे उचित ठरेल.

मार्च - चांगला काळ येणार आहे. शुभ संदेश आयुष्यात आनंदाची पखरण करतील. या शुभ काळाचा पूर्ण फायदा घ्या. मिळकतीची नवी साधने उपलब्ध होतील. कुटुंबात सुख-शांती नांदेल. मन प्रसन्न राहील. व्यापारी लोकांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील.

एप्रिल - जीवनात काही आश्चर्यकारक घटना घडतील. अशा वेळी आपले मित्र साहाय्यभूत ठरतील. विद्यार्थी वर्गाला आपल्या अभ्यासात अधिक परिश्रम घेणे आवश्यक आहे. कायदेशीर प्रकरणे मनस्ताप देऊ शकतात. प्रॉपर्टीत गुंतवणुक करणे टाळा.

मे - जर तुम्ही परिश्रम केलेत तर प्रगतीचे नवे दरवाजे खुलतील. बदलत्या वातावरणामुळे स्वास्थ्य बिघडू शकते. आई-वडिलांशी बाचाबाची होण्याची शक्यता आहे. फ़िरायला जाण्याआधी घराच्या सुरक्षेची नीट तजवीज करून जा. मनोरंजनावर अधिक खर्च केल्यामुळे महिनाअखेरीस तुम्हाला आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागेल.

जून - कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. कुठेतरी बाहेर फिरायलाही जाऊ शकाल. शत्रू तुमचे नुकसान करण्यासाठी टपून बसले आहेत, सावध राहा. परिवारात नवा आनंद येणार आहे. एकुणच हा महिना चांगलेच फळ देईल.

जुलै - ज्याची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण तुमचा दरवाजा ठोठावणारच आहे. जुन्या कोर्ट-खटल्यांपासून सुटका मिळेल. वेळॆचा योग्य वापर करा. मनातल्या इच्छा पूर्ण होतील. स्वाध्यायात आवड वाढेल, व्यापार चालेल.

ऑगस्ट - जीवनात काही नवे घडेल. सामाजिक पातळीवर मान-सम्मान वाढेल. अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील. अपत्याचे वागणे साहाय्यकारक ठरेल. व्यापारात यश येईल.

सप्टेंबर - ही वेळ निव्वळ योजना आखण्याची नाही तर त्यावर अंमलबजावणी करण्याची आहे. अचानक एखाद्या दूरवरच्या प्रवासाला जाऊ शकता. जीवनात नवा आनंद प्राप्त होणारच आहे, खुल्या मनाने त्याचे स्वागत करा. एकाग्रचित्ताने काम करा, यश नक्की मिळेल.

ऑक्टोबर - काहीतरी नवे घडणारच आहे. मिळकतीचे नवे पर्याय उपलब्ध होतील. प्रॉपर्टीत गुंतवणुक करणे फायद्याचे ठरेल .तुमच्या अपत्याला तुमचा वेळ हवा आहे, हे ध्यानात असू द्या.

नोव्हेंबर - या महिन्यात सर्वकाही मध्यम राहील. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या वातावरण अनुकूल नसेल. तुम्ही मानसिक दृष्ट्या त्रस्त राहाल. आप्तजनांकडून वाईट बातमी कळू शकेल.

डिसेंबर - प्रेमासाठी अनुकूल वेळ आहे. महिना अखेरीस चांगली बातमी कळू शकेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. विदेशातही जाऊ शकता.

कर्क कर्क ( ही, ह, हे, हो, डा, डी, डू, डे, डो)

जानेवारी - अडलेली कामे मार्गी लागतील. समवयस्क लोकांसोबत प्रेमभाव वाढेल. नोकरीचे नवे योग जुळत आहेत. ऑफिसमध्ये कोणीतरी तुमच्याविरुद्ध कट रचत आहे, सावध राहा. मैत्री प्रेमात बदलण्याचे संकेत आहेत. विश्वास ठेवा, सर्व काही चांगले होईल.

फ़ेब्रुवारी - महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी चांगली आहे. प्रकृतीत सुधारणा होईल. बचत वाढेल. प्रेमींसाठी वेळ अनुकूल आहे.

मार्च - सेवेसाठी काही वेळ द्या, लाभ होईल. छोट्या-मोठ्या आजारांकडे दुर्लक्ष केलेत तर आरोग्य चांगले राहील. आर्थिक बाजूही सामान्य राहील. प्रेम-प्रसंगात निरर्थक वाद टाळा.

एप्रिल - तुमच्या हुकूमशाही वागण्यामुळे तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागेल. काही नवे सुरू करणे टाळा. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. गुंतवणूक करण्याआधी जाणकारांचा सल्ला घ्या.

मे -पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार राहा. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. मालमत्तेत गुंतवणूक करा. बॉससोबत उगीच वाद् घालणे टाळा. गुंतवणुकीच्या नव्या योजना आखा.

जून - अपेक्षित परिणाम मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील. मिळकतीतील वृद्धीने आर्थिक बाजू सुदृढ होईल. आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहा. मित्रांचे वागणे साहाय्यकारी ठरेल. पत्नीचे स्वास्थ्य चिंताजनक राहू शकेल. दीर्घ प्रवास थकवणारे ठरतील. हवेत गप्पा मारणे ठीक नाही.

जुलै- सर्व काही सामान्य राहील. उगीचच इथे-तिथे भटकणे टाळा. अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा. चढ-उताराच्या दृष्टीने या महिन्याचा उत्तरार्ध ठीक असेल. अडलेली कामे पूर्ण होण्याची वेळ जवळ आली अहे.

ऑगस्ट - जुन्या मित्रांच्या भेटी तुमच्या जीवनाला नवा रंग देतील. बाहेर खाणे टाळा, नाहीतर आरोग्यावर याचे वाईट परिणाम दिसून येतील. कुटुंबीय एका मजबूत भिंतीसारखे तुमच्यासोबत ठामपणे उभे राहतील. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे.

सप्टेंबर - कुटूबीयांना नाराज करू नका, नाहीतर होत असलेली कामे होणार नाहीत. एखाद्या गरजूला मदत केल्यास तुमच्या मनाला सुख-शांती लाभेल. स्पर्धेची तयारी करत असाल तर यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. सांधेदुखी होऊ शकते. व्यापारात नफ्यात घट होईल.

ऑक्टोबर - तुम्ही चिंतित राहाल. शत्रू पक्ष तुमच्यावर हावी होऊ शकतो. भौतिक साधनांवर निरर्थक पैसे खर्च होण्याची चिन्हे दिसत आहेत. लक्षात असू द्या, क्रोध सगळ्यात आधी तुमचे नुकसान करतो, म्हणून रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात संशय घातक ठरू शकतो. या विषयावर जोडीदारासोबत चर्चा करून तोडगा काढा.

नोव्हेंबर - महिन्याची सुरुवात कष्टप्रद होईल, पण १५ तारखेनंतर आर्थिक बाजूत सुधार होण्याची चिन्हे आहेत. पण शारीरिकदृष्ट्या उदर आणि गुडघ्याच्या दुखण्याचा त्रास होऊ शकतो. आप्तजनांची साथ तुम्हाला जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देत राहील. अपत्य-प्राप्तीचे सुख मिळण्याचे संकेत आहेत. जुन्या मित्रांच्या भेटी तुम्हाला साहाय्यकारी ठरतील. शत्रू शांत असतील.

डिसेंबर - वाहन आणि मालमत्तेची खरेदी वगैरे तुमच्यासाठी फारच फ़ायदेशीर ठरेल. अर्धवट आणि अडलेल्या कामांना गती येईल. आरोग्याप्रती बेपर्वाई तुम्हाला महागात पडू शकते. धर्माप्रती आवड वाढेल. मित्रांची मदत मिळेल.

सिंह सिंह (मा, मी, मू, मो, टा, टी, टू, टे)

जानेवारी - महिन्याच्या पूर्वार्धात नवे काम सुरू करणे टाळा. व्यापारी वर्गाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागेल. दीर्घ प्रवास विशेष फायदेशीर ठरणार नाही. आरोग्यही ठीक राहणार नाही. नोकरदार लोकांना आपल्या सह-कर्मचारींच्या कट-कारस्थानांचा सामना करावा लागेल.

फ़ेब्रुवारी - महिन्याचा आरंभ सामान्य असेल. आर्थिक पैलूकडे दुर्लक्ष करू नका. जमिनीत वगैरे गुंतवणूक करणे टाळा. पत्नीचे आरोग्य चिंतेची बाब ठरू शकते. कामात मन लागणार नाही. फालतू गोष्टी मानसिक ताण निर्माण करतील. व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. नोकरदारांचा आपल्या वरिष्ठांशी वाद होऊ शकेल.

मार्च - मेहनतीचे फळ दिसू लागले आहे, पण अति महत्त्वाकांक्षी बनू नका. रणनीती अवलंबूनच पुढे व्हा. स्वास्थ्य ठीकठाक राहील. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. लक्षात असू द्या, प्रेम देण्याचे नाव आहे म्हणून प्रेमसंबंधात देणे शिका.

एप्रिल - कोणीतरी जुना साथीदार किंवा नातेवाईक सुदैवाने भेटू शकतील. बदलत्या वातावरणाने आजारी पडण्याची लक्षणे आहेत, सावध राहा. चिकित्सकाजवळ जाणे तुमच्यासाठी उत्तम ठरेल. जोडीदाराचे तुमच्याप्रतीचे वागणे साहाय्यकारी असेल. स्पर्धेला घाबरू नका, त्याचा आनंद लुटा. मग पाहा काम करताना किती मजा येते ती. धार्मिक कृत्यांप्रती रूची वाढवा.

मे - साधारण महिना आहे. काम करण्यात मन रमणार नाही आणि शारीरिक दुखणे राहील. कोर्ट-खटलेबाजीचे निकाल आशेच्या विपरीत येऊ शकतील. कुठुनतरी शुभाशुभ बातमी येऊ शकेल. कामाबाबतीत सकारात्मक मनस्थिती ठेवा. मानसिक स्थिती साधारण ठेवा.

जून - कुठल्याही कागदपत्रांवर सही करण्याआधी योग्यरीत्या पडताळणी करा. तुमच्या वागण्यामुळे आसपासच्या लोकांना त्रास होऊ शकतो. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. इतरांच्या प्रकरणात उगीचच नाक खुपसू नका. हा महिना तुमच्यासाठी मिळता-जुळता असणार आहे. डॉक्टरकडे जाणे होऊ शकेल.

जुलै- समाजात आपले यश वाढेल आणि करिअरमध्ये प्रगती होईल. भाग्य तुमचे साथ देईल. पण आर्थिक दृष्ट्या चढ-उताराचा सामना करावा लागू शकतो. यासोबतच प्रापंचिक आणि कौटुंबिक पातळीवरही समस्यांशी चार हात करावे लागू शकतील. कुटुंबातील सदस्यांसोबत कुठल्याही वादात पडणे टाळा.

ऑगस्ट - आपल्या रचनात्मकतेचे कौतूक होईल. भौतिक साधनांवर पैसे खर्च होतील. मित्रांचे सहकार्य आपल्या जीवनाच्या गाडीला गतिमान करेल. शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थी वर्गाला लाभ होईल. नोकरीत पुढे जाण्याची आशा आहे. आरोग्याप्रती सजग राहा.

सप्टेंबर - शत्रुंची नजर तुमच्या सफलतेवर आहे आणि तुमच्या क्रोधामुळे त्यांचे काम सोपे होऊ शकेल. गुप्त गोष्टी कोणालाही सांगणे टाळा. अपत्याची चिंता सतावेल.कौटुंबिक जीवनात उलथा-पालथ होऊ शकेल, सावध राहा.

ऑक्टोबर - या महिन्यात तुमच्यासाठी सर्वकाही सामान्य राहील. नव्या लोकांच्या ओळखी होतील, ज्या पुढे लाभदायक ठरतील. नोकरीसाठी एखाद्या नव्या शहरात जाऊ शकता. अड्कलेले धन परत मिळेल. जोडीदार तुमच्यासाठी पर्वतासमान सिद्ध होईल.

नोव्हेंबर - मानसिक शांती लाभेल. तणाव पुरेशा प्रमाणात कमी होऊ शकेल. चित्त शांत राहील. अपत्याकडून शुभ बातमी कळेल. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा, त्यामुळे तुम्हाला चांगले वाटेल. परिवारात आपला सम्मान वाढेल. तुमच्या बोलण्याला वजन येईल.

डिसेंबर - जीवनात नवा रंग भरण्याची वेळ आली आहे. जुन्या गोष्टी विसरून मार्गक्रमण करा. वातावरणाचा आनंद लुटा. शैक्षणिक कार्यात खर्च होईल. जोडीदाराचे वागणे तुमच्यासाठी साहाय्यकारी सिद्ध होईल.

कन्या कन्या (टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो)

जानेवारी - तुमच्या जीवनात मोठी उलथापालथ होणार आहे. नशीबाची गाडी थांबून थांबून पुढे सरकत आहे. कुठेतरी काहीतरी अडथळा आहे जो तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखतो आहे. मित्र तुम्हाला मदत करण्यासाठी कायम तत्पर राहतील. जोडीदाराचे हेकेखोर वागणे मानसिक तणाव वाढवेल. नोकरदार लोकांचे बॉसशी पटणार नाही. आरोग्यही साथ देणार नाही. एकुणातच हा महिना आपल्याला शुभ फ़ळ देणार नाही.

फ़ेब्रुवारी - महिन्याची सुरुवात चांगली होणार नाही. अपत्याकरवी त्रस्त होऊ शकता. आर्थिक स्तरावरही अडचणींचा सामना करावा लागेल. हो, महिना अखेरीस परिस्थितीत सुधारणा होईल. दूरून येणारी एखादी शुभ बातमी जीवनात उत्साह आणेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागेल.

मार्च - नशीबाचे ग्रह पालटत आहेत, पण दृढ इच्छाशक्तीशिवाय तुम्हाला यश मिळणारच नाही. तुमच्या मेहनतीचे कौतुक तर होईल पण यासह शत्रूंचे तुमच्याप्रती वैमनस्य वाढेल. वेळॆचे नीट नियोजन केल्यास अडलेली अनेक कामे होऊ शकतील. यावर ध्यान देण्याची गरज आहे.

एप्रिल - विदेश प्रवासाचा योग आहे. मिळकतीचे नवे मार्ग खुलतील. तुमचे शांत चित्त तुम्हाला अनेक त्रासांपासून वाचवेल. जोडीदाराची साथ मिळेल. अपत्यांकडून चांगली बातमी समजेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागेल.

मे - प्रॉपर्टीत गुंतवणुक करण्याची ही योग्य वेळ आहे. यशाचा मार्ग मोकळा होत आहे. नव्या संबंधांचा फायदा होईल. ऑफिसमध्ये सह-कर्मचारींचे वागणे सहाय्यभूत ठरेल. कुठे तरी बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. जोडीदारासोबत खास क्षण घालवू शकाल.

जून - धार्मिक कार्यात रूची वाढेल. एखाद्या धार्मिक क्षेत्राची यात्रा घडू शकते. एखादा नवा व्यवहार ठरवताना कागदपत्रांची योग्यरीत्या शहानिशा करून घ्या. नव्या जबाबदाया तुमच्यावर मानसिक दबाव टाकू शकतात. महिनाअखेरीस काही पाहुणे तुमच्या घरी येऊ शकतात.

जुलै- विद्यार्थ्याना चांगली बातमी कळू शकते. लोखंडाचा व्यापार करणायांना अतिरीक्त लाभ होऊ शकतो. नोकरदारांच्या पगारात वाढ तर होईल पण वाढत्या महागाईने हिशेब बरोबर होईल. मुलांसोबत काही खास क्षण घालवण्याची संधी मिळेल. भाऊ किंवा बहिणीकडून एखादी शूभ बातमी समजणार आहे.

ऑगस्ट - अडकलेले धन परत मिळेल. कोर्ट-कचेरीची प्रकरणे सुरळीत होतील. आनंदात वाढ होईल. मुलांच्या बाजूने काही तरी त्रास होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची तब्येत चिंताजनक असेल.

सप्टेंबर - राजनैतिक संबंधांचा लाभ होईल. व्यापाराच्या नव्या योजना लाभ देतील. शत्रू तुम्हाला त्रास देण्याची संधी शोधत आहेत, दक्ष राहा. आई-वडीलांकडून साहाय्य मिळेल. अपत्याचे स्वास्थ्य चिंतेची बाब ठरेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागणार नाही.

ऑक्टोबर - तुमच्या जीवनात काहीतरी नवे होणार आहे. वाटेत काही अडचणी येतील पण तुम्ही त्या पार कराल. कुटुंबात वातावरण ठीकठाक राहील. यात्रेचा लाभ होईल.

नोव्हेंबर - कोणीतरी जवळचा व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकतो. नोकरीत जागाबदल होण्याचे योग आहेत. वैवाहिक संबंधांमध्ये कटुता येऊ शकते. जोडीदाराच्या प्रती उदार धोरण ठेऊन वागा. तुमचा राग बनत्या गोष्टी बिघडवू शकतो. मद्यसेवनापासून दूर राहा, हे तुमच्यासाठी हितकारक आहे.

डिसेंबर - वैवाहिक जीवन तुमचे सहकार्य आणि वेळ मागत आहे. मित्रासोबत नवा व्यवसाय सुरू केल्यास कालांतराने लाभ होईल. वेळेचे महत्त्व ओळखा. तुम्ही जरा व्यावहारिक झाले पाहिजे, अति भावनिकता तुमचे नुकसान करू शकेल. वडिलांचे स्वास्थ्य तुम्हाला काळजीत पाडेल.

तुला तुला (रा, री, रु, रे, रो, ता, ती, तू, ते)

जानेवारी - जीवनात प्रगती करण्यासाठी आपल्याला सहाय्याची गरज आहे. उच्च पदावर असलेल्या एखादा व्यक्क्तीसाबतच्या तुमच्या खाजगी ओळखीचा तुम्हाला लाभ होईल. धंदयात नवे दरवाजे तर उघडतील, पण या संधीसाठी तुम्हाला सतर्क राहावे लागेल. वाहन वगैरे चालवताना जरा सावधानी बाळगा.

फ़ेब्रुवारी - नवे घर खरेदी करू शकता. मानसिक चिंतेचे निवारण होईल. आर्थिक स्वरूपात लाभ होईल. शत्रूंना दुर्लक्षित करू नका. माहेराकडून दु:खद बातमी कळू शकते.

मार्च - धंद्याला काळ अनुकूल आहे. नवे व्यवहार लाभदायक असतील. ट्रांसपोर्टशी संबंधित व्यावसायिकांसाठी विशेषकरुन चांगली वेळ आहे. तुमच्याजवळ धन येईल, पण राहणार नाही. कुठल्याही प्रकारच्या वादापासून दूर रहा.

एप्रिल - काही लोकं तुमची प्रतिमा खराब करु शकतात. शेजारी तुम्हाला सहकार्य करतील. धनाचे योग सामान्य आहेत. धार्मिक कार्यात वेळ दिल्यामुळे लाभ होईल. आविवाहितांच्या जीवनात प्रेमाची झुळूक येऊ शकते. दान दिल्यामुळे लाभ होईल.

मे - मिल किंवा फॅक्टरी मालकांना बंद किंवा इतर कुठल्यातरी कारणामुळे त्रास सहन करावा लागू शकतो. नोकरदार लोकांसाठी महिना सामान्य असला तरी पगार आणि खर्चामध्ये जुळवणी करणे अवघड होईल. नवे काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल.

जून - थोडा नीट विचार करुनच कोणत्याही कामात हात टाका. नव्या कामाची सुरुवात करण्याआधी प्रत्येक पैलूची आधीच माहिती मिळवणे आवश्यक आहे. कोर्ट-कचेरींपासून दूर राहणे ठीक होईल. कोणालाही उधार देणे टाळा, कारण यात तुमचे पैसे बुडू शकतील.

जुलै- वातावरण आपल्या तब्येतीसाठी ठीक नाही. पोटासंबंधीच्या विकारांपासून वाचण्यासाठी बाहेरचे खाणे टाळा. शेजाऱ्यांशी भांडण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवून आहे. यासाठी आपले काम पूर्ण प्रामाणिकपणे करा. मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल.

ऑगस्ट - लक्षात ठेवा क्रोध तुमचे नुकसानच करतो. तुमच्या वाणीला नियंत्रणात ठेवा. तुमच्या कुठल्यातरी गोष्टीवर तुमचा जोडीदार नाराज होऊ शकतो. कुठल्यातरी दुर्घटनेची शक्यता तयार होत आहे, यामुळे अतिरिक्त सावधानी बाळगा.

सप्टेंबर - एखाद्या पारिवारिक कार्यक्रमात जाणे होऊ शकतो. कोणीतरी आपल्यावर मोठी आस बाळगून आहे, कृपया त्या व्यक्तीला निराश करू नका. अपत्यांचे वागणे प्रसन्नता देईल. जीवनात उत्साह आणि आशा कायम राहील. २० तारखेनंतर काही आर्थिक समस्या येऊ शकतात. शत्रू आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतील.

ऑक्टोबर- जुनी थांबलेली कामे मार्गी लागतील. कोणालाही खोटे आश्वासन देऊ नका तुम्हाला इच्छेनुसार फळ मिळेल. पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनाही फायदा होईल. विरोधक शांत राहतील. जोडीदार प्रसन्न आणि अपत्य संतुष्ट राहतील. एकुणच तुमच्यासाठी हा चांगला महिना आहे.

नोव्हेंबर - व्यापारी वर्गासाठी हा महिना फारच लाभदायक आहे. नशीब आपल्यासोबत आहे, पण बेपर्वाई आपल्याला फार मोठी हानी पोहोचवू शकते. खाजगी संबंधांच्या मदतीने मिळकतीचे नवे स्त्रोत उपलब्ध होतील. महिला आणि वृद्धांना सांधेदुखीचा त्रास सोसावा लागू शकतो.

डिसेंबर - संघर्षानेच यशप्राप्ती होईल. अचानक कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू नका. तुमच्या या घाईगडबडीचा फायदा तुमचे विरोधक घेऊ शकतील. शांत राहून चांगले कर्म करत राहा. मांसाहार आणि मद्यसेवन टाळणे ठीक होईल. महिन्याच्या शेवटच्या आठवडयात परिस्थिती बदलायचा सुरूवात होईल. वर्षाचा शेवट सकारात्मकतेने होईल.

वृश्चिक वृश्चिक (ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू)

जानेवारी - नव्या वर्षाची सुरुवात झोकात होणार आहे. महिन्याचे उर्वरीत १५ दिवस फारच आनंददायक असतील. आपल्या मनाचा आवाज ऐका आणि जीव ओतून काम करा, यश नक्कीच मिळेल. जोडीदाराचे वागणे आपल्याला नवे काम करण्यासाठी प्रेरणा देईल. एखाद्या मंदिरात दान केल्याने लाभ होईल.

फ़ेब्रुवारी - ह्रदयात प्रेमाचा अंकुर वाढेल. एखाद्या वाद-विवादात पडल्याने होणारे काम बिघडू शकते. कोणाचे मन दुखवू नका. एखाद्या नव्या कामाची सुरुवात करण्याआधी सर्व पैलूंचा नीट विचार करा. घरी पाहुण्यांचे आगमन होण्याचे संकेत आहेत. आई-वडिलांच्या आशीर्वादाने जीवनात सुख-शांती राहील.

मार्च - तुमच्या कामाचे कौतुक तर केले जाईल, पण त्यासाठी तुम्हाला धीर धरावा लागेल. तब्येत सामान्य राहील. बॉससोबतचे संबंध सुधारतील. शत्रू शांत राहतील. अपत्यांकडून चांगली बातमी समजेल. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे.

एप्रिल - यश टिकवण्यासाठी आळसाचा त्याग करणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात निरसता येत आहे, जोडीदारच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. शत्रू तुमच्या बेजबाबदार वागण्याचा फायदा उचललील. आर्थिक पातळीवरही परिस्थिती सामान्य राहील.

मे - जीवनात संघर्षाचा काळ सुरू होत आहे. तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला या कठीण काळातून बाहेर काढील. प्रॉपर्टी वगैरेत गुंतवणूक करण्यासाठी वेळ अनुकूल नाही. तब्येतीची काळजी घ्या, बाहेर खाणे टाळा. जोडीदार आणि अपत्यांकडून त्रास होण्याची शक्यता आहे.

जून - सर्व प्रयत्नांतीही काम होईलसे दिसणार नाही, मेहनतीच्या तुलनेत फळ मिळणार नाही. जोडीदाराशी आपले वागणे ठीक राहणार नाही. आई-वडिलांच्या प्रसन्नतेची पूर्ण काळजी घ्या. अपत्यांकडूनही चांगली बातमी समजणार नाही. शत्रू हावी राहतील.

जुलै- मन अशांत राहील. विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल वेळ. मनासारखी स्थळं न मिळाल्याने निराशा राहील. वडील आणि भावाशी वाद होतील. वाहन चालवताना अति-दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. मद्यपान करताना संयम ठेवा.

ऑगस्ट - वेळ बदलत आहे. १५ तारखेनंतर परिस्थिती चांगली होईल. तब्येत उत्तम राहील. बॉस तुमच्या कामावर युश होईल. सहकर्मचारी सहाय्य करतील. कलाक्षेत्राशी संबंधित लोकांसाठी ही चांगली वेळ आहे. स्वास्थ चांगले राहिल. नवे घर किंवा वाहन खरेदी करू शकता. कर वगैरे सारख्या कायदेशीर बावींपासून सुटका मिळू शकते. आडत्यांसाठी वेळ चांगली आहे.

सप्टेंबर - महिना लाभदायक आहे. नव्या योजना बनवाल. मित्र प्रत्येक अडचणीत तुमची साथ देतील. सासरच्या लोकांकडून साहाय्य मिळेल. आर्थिक बाजू ठीक राहील. कम्प्यूटर व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी वेळ चांगली असरणार आहे. शत्रूंची प्रत्येक चाल अयशस्वी ठरेल.

ऑक्टोबर- महिना साधारण आहे. स्वास्थ्य ठीक-ठाक राहील. जोडीदाराची साथ मिळेल. तुमच्या बोलण्याचा मान राखला जाईल. धार्मिक कार्यात आवड वाढेल. तब्येत ठीक करण्यासाठी सकाळी फिरायला जावे.

नोव्हेंबर - अडलेली कामे होतील. खूप दिवसांपासून तुम्ही बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरवत आहात, तो पूर्ण होईल. कोणीतरी तुमच्यावर खोटा आरोप लावण्याची संधी शोधत आहे., सावधान राहा. अधिकारी लोकांशी चांगले संबंध राहतील, जे तुम्हाला दीर्घकालीन लाभ देतील.

डिसेंबर - काम वेळेत पूर्ण होतील. योजना पूर्ण होतील. १५ तारखेनंतर कोणत्याही नव्या कामाची सुरुवात करा.

धनु धनु (ये, यो, भ, भी, भू, धा, फा, ढा, भे)

जानेवारी - नव्या वर्षाचा पहिला महिना आनंद घेऊन येणार आहे, त्याचे स्वागत करा. नोकरदार लोकांना चांगली बातमी कळेल. व्यापारी वर्गाला लाभ होईल. जीवनात नवा उत्साह संचारेल. शत्रूंवर विजय मिळवाल. वैवाहिक जीवन सुखद जाईल. जोडीदार तुमच्यासाठी ढालीसमान सिद्ध होईल. तुम्हाला तुमच्या चंचल मनावर नियंत्रण मिळवायला हवे, नाहीतर काही अडचणींचा सामना करावा लागेल.

फ़ेब्रुवारी - काम करण्यात मन गुंतणार नाही. चित्त अशांत राहील. मानसिक उलथा-पालथीचा महिना आहे. विद्यार्थ्यांना फार मेहनत करावी लागेल. आई-वडिलांशी वाद होऊ शकतो. शत्रू वरीष्ठ अधिकाऱ्यांना तुमच्याविरुद्ध भडकवू शकतात. ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहण्यातच फायदा आहे. जोडीदाराचे आरोग्य चिंतीत करू शकते.

मार्च - महिन्याचा पहिला पंधरवडा थोडा निराशाजनक असेल. होणारी कामे फार प्रयत्न करुनही न झाल्याने निराशा येईल. कोर्टाच्या प्रकरणात फसण्याची शक्यता आहे, यासाठी तुमच्या रागाला नियंत्रणात ठेवा. कुठल्याही प्रकारच्या वादापासून दूर राहणेच योग्य होईल. १५ तारखेनंतर परिस्थिती सुधारेल. मिळकतीचे नवे स्त्रोत उपलब्ध होतील.

एप्रिल - विद्यार्थ्यांसाठी चांगली वेळ आहे. मनासारखे फळ मिळेल. शत्रू प्रयत्न करतील, पण त्यांना तुमचे नुकसान करता येणार नाही. नोकरीत परिस्थिती साधारण राहील. तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल, जर तुम्ही त्यासाठी तयार असाल. मित्र मदतीसाठी पुढे येतील.

मे - महिना साधारण आहे. सर्व काही ठीक राहील. जोडीदारासोबत कुठेही बाहेर फिरायला जाऊ शकता. आर्थिक बाजू साधारण राहील. मुलांच्या बाजूने काही चिंता होण्याची शक्यता आहे. निरर्थक वादांमध्ये पडू नका.

जून - तुमच्यासाठी काहीतरी रचनात्मक करण्याची वेळ आली आहे. कला आणि साहित्यांशी संबंधित लोकांसाठी अनुकूल वेळ आहे. स्वास्थ्य उत्तम राहील, जोडीदार आणि मित्रांचा सहयोग प्राप्त होईल. परिवारात सुख-शांती राहील.

जुलै - आर्थिक बाजू सुदृढ राहील. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे. व्यापारी वर्गासाठी अनुकूल वेळ आहे. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ चांगली आहे. अडकलेले पैसे परत मिळतील.

ऑगस्ट - आळशीपणा दारिद्रयाचे दुसरे नाव आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. तुमचे चालढकलीचे वागणे तुमचे यश रोखू शकते. अधिकारीही तुमच्या या वागण्याने नाराज होऊ शकतात, वाहन वगैरे चालवताना सावधानी बाळगा. कोणा वृद्धाचा अपमान करु नका.

सप्टेंबर - तुम्ही आपल्या अपत्याबाबत फार दिवसांपाहून त्रस्त आहात त्या समस्येचा या महिन्यात अंत होईल. भविष्यात होणाऱ्या मांगलिक कार्यांचे योग जुळत आहेत. कायदेशीर अडचणींवर तोडगा मिळेल. राजनैतिक संबंधांचा फायदा होऊ शकतो. जोडीदाराचे पूर्ण साहाय्य प्राप्त होईल.

ऑक्टोबर- सर्व काही ठीक चालले आहे. लहानमोठया समस्या सोडल्या तर हा महिना उत्तम चालला आहे. तुमच्या मेहनतीचे आणि चिकाटीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. नवे वाहन किंवा घर वगैरे खरेदी करु शकता.

नोव्हेंबर - शत्रू तुमचे अहित करण्याची संधी शोधत आहे, सावधान राहा. तुमच्या जुन्या अनुभवांपासून शिकून जीवनात मार्गक्रमण करा. स्वत:वर विश्वास ठेवा हीच यशाची शिडी आहे. घरात मांगलिक कार्ये होऊ शकतात. आई-वडील आणि वृद्धांचा आशीर्वाद घेऊन नवे काम सुरू करा.

डिसेंबर - यश आपली वाट पाहत आहे, बस योग्य संधी ओळखा. कोर्ट-कचेरीपासून सुटका मिळेल. प्रेम-संबंध दृढ होतील. एखाद्याला दिलेले वचन जरूर पाळा.

मकर मकर (भो, जा, जी, खी, खू, खे, गो, गा, गी)

जानेवारी - वर्षाची सुरुवात चांगली होणार आहे. जुन्या कर्जांपासून सुटका मिळेल. हो, जुने कोर्ट-खटले त्रासात टाकू शकतात. मन चंचल होत आहे. त्यावर नियंत्रण ठेवा. अपत्याकडून चांगली बातमी समजेल. सासरकडून सुखद बातमी कळू शकते. नोकरी बदलण्याचे योग आहेत.

फ़ेब्रुवारी - शारीरिक कष्ट होऊ शकतात. स्त्रियांनी आणि वृद्धांनी आरोग्याची काळजी घ्यावी. जोडीदार पूर्ण सहकार्य करेल. महिना-अखेरीस परिस्थिती सामान्य होईल. व्यापारी वर्गाला फायदा होण्याची आशा आहे.

मार्च - साधारण महिना. सत्पुरुषांच्या साथीने लाभ मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थी वर्गाला फायदा होईल. शत्रू तुमच्यावर हावी होण्याच्या प्रयत्नात आहेत, सावधान राहा. फालतू गोष्टींमध्ये वेळ दवडू नका.

एप्रिल - वेळ प्रतिकूल आहे. होणारी कामे बिघडू शकतात. तुम्हाला असे वाटेल की सर्वजण तुमच्या विरोधात आहेत. मित्रांचे वागणेही खटकेल. अपेक्षित फळ न मिळाल्याने विद्यार्थ्यांना निराशा येईल.

मे - महिन्याची सुरुवात चांगली नसेल. ताण वाढेल. सहकर्मयाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. महिन्याचा दुसरा पंधरवडा लाभदायक असेल. भौतिक सामान खरेदी केल्याने वैभवात वाढ होईल. शत्रूंना वाटूनसुद्धा तुमचे नुकसान करता येणार नाही.

जून - धन लाभ होण्याचे योग. सासरकडून साहाय्य. मित्रांसोबत शहराबाहेर फिरण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. तुम्ही जे मेहनतीचे रोप आधी रोवले होते त्याची फळे खाण्याची वेळ आली आहे. पण घाई-गडबडी करू नका नाहीतर पश्चाताप करावा लागेल.

जुलै- या महिन्यात वरिष्ठ आणि सहकर्मचाऱ्यांच्या असहयोगामुळे कामात काही आव्हानांचा सामना करावा लागेल. पण जरा धीर ठेवलात, आपले गुण कायम ठेवलेत आणि रागावर नियंत्रण ठेवले तर कठीण परिस्थितीतही नुकसान पोहचणार नाही.

ऑगस्ट - ही वेळ एखाद्या धडयासारखी आहे. कठीण वेळ आहे आणि याच वेळी तुम्हाला समजेल की कोण तुमचा किती मित्र आहे. मानसिक तणाव तर असेल, पण ईश्वर- नामस्मरणाने शांती मिळेल. महिनाअखेरच्या आठवडयात परिस्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. धीर ठेवा तोच आपल्याला स्थिर ठेवेल.

सप्टेंबर - काळ बदलत आहे, पण लक्षात असू द्या की प्रगतीच्या झाडावर फळं मेहनतीचे पाणी पाजल्यावरच येतात. मित्र तुमच्यासाठी सावलीसारखे काम करतील. नवे वाहन तुमच्या आनंदात भर टाकेल.

ऑक्टोबर- हा महिना तुमच्यासाठी सोनेरी असेल. तुम्ही जीवनात नवे काहीतरी कराल. रचनात्मकतेत वाढ होईल आणि तुमच्या कामाचे कौतूक होईल. दूर राहणाऱ्या नातेवाइकांकडून शुभ बातमी मिळण्याचे संकेत आहेत.

नोव्हेंबर - तुम्ही जर तुमचा राग नियंत्रित करु शकलात, तर सर्व काही तुमच्या नियंत्रणात आहे. तुमचे शत्रू तुमच्या याच रागाचा फायदा घेऊ शकतील.लक्ष्य निर्धारीत करून मेहनतीने ते प्राप्त करण्यासाठी झटा, यश नक्की मिळेल.

डिसेंबर - या महिन्यात ग्रह तुमच्यासोबत आहेत. बिघडलेली कामे होतील. आप्त-स्वकीयांमध्ये लग्नाचे आयोजन होऊ शकेल. वेळेचा योग्य वापर करायला शिका. प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोनेरी वेळ आहे. लक्ष्य निर्धारीत करून मेहनतीने ते प्राप्त करण्यासाठी झटा, यश नक्की मिळेल.

कुम्भ कुंभ (गू, गे, गो, सा, सि, सु, से, सो, द)

जानेवारी - वर्षाची सुरुवात थोडी निराशाजनक असेल. शत्रूंनी तुमच्याविरुद्ध कट रचले आहेत, सावधान राहा. बॉससोबत मतभेद होऊ शकतात. मुलांकडूनही त्रास मिळण्याची शक्यता आहे. आई-वडिलांच्या आरोग्याची चिंता सतावत राहील.

फ़ेब्रुवारी - मिळकतीत चढ-उतार कायम राहील. एखाद्याचे बेमुर्वत वागणे खिन्न करू शकते. तुमचे मौल्यवान सामान सांभाळून ठेवा, ते हरवण्याचे किंवा चोरी व्हायचे संकेत आहेत. नशीब तुमच्यासोबत नाही, त्यामुळे तुम्हाला अपार मेहनत करावी लागेल.

मार्च - १५ तारख्रेच्या आधी नवे काम सुरु करु शकता. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडयात परिस्थिती बदलू शकते. दूरुन एखाद्या शुभ समाचार कळू शकतो. अडकलेले धन पुन्हा मिळेल. कायदेशीर बाबी त्रास देऊ शकतात. नकारात्मक लोकांपासून दूरच राहा. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळेल.

एप्रिल - कोणीतरी तुम्हाला आपलेपणा दाखवून धोका देण्याच्या विचारात आहे. या महिन्यात मिळकतीचे नवे मार्ग उपलब्ध होतील. नोकरीत प्रगतीचे योग आहेत. काही लोकांसाठी हे मनाजोगे नसेल. जोडीदार मजबूत स्तंभासारखा तुमच्यासोबत उभा ठाकेल.

मे - वेळ अनुकूल आहे, याचा लाभ घ्या. यशासाठी नव्या विचारांची गरज आहे. मुलांकडून त्रास होऊ शकतो. जोडीदारासोबत खाजगी वादावरून तणाव राहील. अधिकारींशी संबंधांचा फायदा होईल. नोकरदार लोकांसाठी सामान्य वेळ आहे. आरोग्याची काळजी घ्या.

जून - सुदैवाने होणारी कामे बिघडतील. साहित्यिक क्षेत्रातील लोकांसाठी वेळ खूप चांगली आहे. तुम्हाला मेहनतीचे फळ मिळेल. नव्या नोकरीची संधी आहे. शिक्षणासाठी विदेशात जाण्याचे योग आहेत.

जुलै- महिना साधारण आहे. कुठल्याही कागदपत्रावर सही करण्याआधी त्याची योग्यरीत्या तपासणी करा. आळस झटका. आई-वडिलांचा आशीर्वाद मिळवा. मित्रांच्या मदतीने अनेक कामे होतील.

ऑगस्ट - उधार देऊ नका आणि घेऊही नका. मानसिकरीत्या सुदृढता जाणवेल. पैसे येण्याचे नवे मार्ग खुलतील. आरोग्याच्या भल्यासाठी बाहेर खाणे टाळा. सुर्योपासेनचा लाभ होईल.

सप्टेंबर - हा महिना येणाऱ्या जीवनाची दिशा ठरवणारा आहे. विचार करून निर्णय घेणे योग्य होईल. नवा व्यवसाय सुरू करताना मित्रांची मदत घेतल्याने फायदा होईल. स्त्रियांसाठी खूप चांगली वेळ आहे. अपत्यप्राप्तीचा सुखद योग आहे.

ऑक्टोबर- भौतिक सुखांमध्ये वृद्धी होईल. मिळकतीचे नवे मार्ग उघडतील. नोकरी किंवा व्यवसाय संबंधाने शहराच्या बाहेर जाण्याचे योग आहेत. जुन्या समस्या निरोप घेण्याच्या मार्गावर आहेत. नव्या संपर्कांचा फायदा होईल.

नोव्हेंबर - प्रवासाच्या नियमांचे पालन करा वेगाने वाहन चालवणे साहसाचे द्योतक नाही, ही गोष्ट लक्षात असू द्या. गुंतवणुकीसाठी उत्तम वेळ आहे. सोन्याच्या खरेदीने भविष्यात फायदा होईल. आपल्या योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मार्मिक वेळ आहे.

डिसेंबर - लहान-मोठया समस्या बाजूला सारल्या तर वेळ तुमच्यासोबत आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. १५ तारखेनंतर कुटुंबीयांसोबत वाद होऊ शकतो. इतरांची बाजू नीट ऐकूनच कोणताही निर्णय द्या.

मीन मीन (दी, दू, थ, झ, य, दे, दो, ची)

जानेवारी - या वर्षाच्या सुरुवातीला समस्यांचा सामना करावा लागेल. गुंतवणुकीत आशानुरूप पैसे परत न मिळल्याने अशांती वाढेल. जोडीदाराचे वागणे खटकणारे असेल. तुमचा राग त्यात आणखी भर टाकू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. बाहेर खाणे टाळा.

फ़ेब्रुवारी - प्रेम-प्रसंग विवाहापर्यंत पोहोचण्याचे योग आहेत. आई-वडीलांच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष दया, नाहीतर ते नाराज होऊ शकतात. पण व्यवस्थित समजवल्याने त्यांची नाराजी दूर होऊ शकते. स्वास्थ्य उत्तम राहील. कोणतेही नवे काम करण्याआधी त्याच्या प्रत्येक पैलूचा बारकाईने विचार करा. हवेत प्रेम आहे. त्याचा फायदा घ्या.

मार्च - बॉससोबत वाद होऊ शकतो, तुमचा अहंकार परिस्थिती बिघडवू शकतो. इतर लोक तुमचा राग तुमच्या विरुद्धच हत्यारासारख्या वापरण्याची शक्यता आहे. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही केलेली घाई-गडबड, नुकसान करू शकते. नोकरीत त्रास होईल. आर्थिक स्तरावर त्रासात राहू शकता, जोडीदाराचे वागणेही तुम्हाला त्रासात टाकू शकते.

एप्रिल - हा महिना तुम्हाला मिळता-जुळता असेल. रागात तुम्ही तुमचेच नुकसान करुन घ्याल. इतर लोक तुमचा राग तुमच्या विरुद्धच हत्यारासारख्या वापरण्याची शक्यतो आहे. कुठलाही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही केलेली घाई-गडबड, नुकसान करू शकते. नोकरीत त्रास होईल. आर्थिक स्तरावर त्रासात राहू शकता, जोडीदाराचे वागणेही तुम्हाला त्रासात टाकू शकते.

मे - करिअरच्या दृष्टीने ही मार्मिक वेळ आहे. तुम्ही प्रगतीशिखर चढू शकता. नव्या जबाबदाया मिळू शकतात. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. मिळकतीचे स्त्रोत वाढतील. धनप्राप्तीचे योग आहेत. सामाजिक कार्यात तुम्ही सतत तत्पर राहाल.

जून - धन जरा संभाळून खर्च करा. तुमची बेपर्वाई तुमचे नुकसान करू शकते. कुठेतरी बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. हा ब्रेक तुम्हाला गरजेचा आहे. कारण याने तुम्ही ताजेतवाने व्हाल आणि तुमच्या भविष्यासाठी तयारी करू शकाल.

जुलै- आरोग्याशी संबंधित गोष्टी दुर्लक्षित केल्याने तुमच्या कामावर प्रभाव पडेल. नशीब तुमच्यासोबत आहे. या दरम्यान तुमची अडलेली कामे पूर्ण होतील. कुदुंबाकडून शुभ बातमी मिळेल. सृजनात्मक आणि धार्मिक कामांमध्ये आवड वाढेल. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे.

ऑगस्ट - कार्य प्रगतीवर राहतील. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडयात काही त्रास होऊ शकतो. जोडीदारासोबत तणाव होऊ शकतो. पण संयमाने वागल्यास तुम्ही प्रकरण सांभाळू शकता. मुलांच्या बाजूने काही समस्यांचा सामना करावा लागेल.

सप्टेंबर - तुमच्या राहण्या-वागण्या-बोलण्यात स्पष्ट बदल दिसून येतील. तुमच्या जीवनशैलीत आलेल्या सकारात्मक बदलाने सगळे अवाक् होतील. कामाच्या ठीकाणी तुमच्यावर नवी जवाबदारी सोपवली जाऊ शकते. तुमच्या या पदोन्नतीवर काहीजण ईर्ष्याही करतील आणि त्याच्याशी तुमचे भांडणही होऊ शकतो. चांगल्या परिणामांची गती कायम ठेवण्यासाठी तुम्हाला अपार मेहनत करावी लागेल.

ऑक्टोबर- तुमचे शत्रू तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करतील. व्यापार-संबंधित लोकांना नुकसान होऊ शकते. असे झाले तरी तुम्हाला वरिष्ठ लोकांचे आणि कुटुंबातील मोठयांचे भरपूर साहाय्य मिळेल. नकोसे खर्चही वाढू शकतात.

नोव्हेंबर - तुमच्या जीवनात अचानक बदल येतील. महिन्याच्या मध्यापर्यंत तुमचे नशीब पूर्णपणे तुमची साथ देईल. या दरम्यान भाग्य तुमचा दरवाजा ठोठावेल पण संधीचा फायदा घेणे तुमच्या हातात आहे. जोडीदाराचे वागणे तुमच्यासाठी सुखद असेल.

डिसेंबर - मिळकतीचे स्त्रोत वाढू शकतात. स्पर्धापरिक्षांमध्ये यश मिळू शकते. या दरम्यान तुम्ही उंच झेप घेऊ शकता, पण कठोर परिश्रमांना तयार असाल तरच तुमच्या सकारात्मक उर्जेचा स्त्रोत निरंतर टिकेल. मित्रांची मदत मिळेल.

Top