शनी वक्री मकर राशी (12 जुलै 2022) : वेळ आणि महत्व
अॅस्ट्रोसेज च्या या लेखात वैदिक ज्योतिष शास्त्रावर आधारित वक्री शनी चे मकर राशीमध्ये संक्रमण (12 जुलै 2022) ने जोडलेल्या भविष्यवाणी वाचूया आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम जाणून घेऊया. त्याचे नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी कोणते योग्य उपाय केले जाऊ शकतात हे देखील जाणून घेऊ शकतात.
अॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!
शनी हा कर्माचा ग्रह मानला जातो. हे जातक त्यांच्या कर्माच्या आधारे फळ देते. असे मानले जाते की शनी देव व्यक्तीच्या भूतकाळातील आणि वर्तमान कर्मांवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम देतात. शनीच्या कठोर प्रभावांमुळे तो एक अशुभ ग्रह म्हणून ओळखला जातो. सर्वात संथ संक्रमण करणाऱ्या ग्रहांपैकी एक असल्याने, एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी शनीला सुमारे 2.5 वर्षे लागतात. त्यामुळे त्याचा परिणाम माणसाच्या आयुष्यात ही बराच काळ टिकतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील कोणत्या ही भावात शनी स्थित असतो तेव्हा त्याचा संबंधित क्षेत्रावर अधिक प्रभाव पडतो.
कुठला ही ग्रह वक्री होणे त्याची एक अशी गती असते. ज्यामध्ये ग्रह विरुद्ध दिशेने गती करतांना दिसतो. या हालचालीमुळे त्या ग्रहाच्या सकारात्मक आणि नकारात्मक प्रभावांमध्ये तीव्रता येते म्हणजेच त्या ग्रहाचे परिणाम जास्त प्रमाणात दिसतात.
हे राशिभविष्य चंद्र राशीवर आधारित आहे. याच्या व्यतिरिक्त व्यक्तिगत भविष्यवाणी जाणून घेण्यासाठी ज्योतिषींसोबत फोनवर किंवा चॅट ने जोडा.
वक्री शनी संक्रमण 2022 तिथी
मकर आणि कुंभ राशींचे स्वामी चा स्वामी शनी 12 जुलै, 2022 च्या सकाळी 10:28 मिनिटांनी स्वराशी मकर मध्ये वक्री होत आहे आणि नंतर 23 ऑक्टोबर, 2022 ला याच राशीमध्ये मार्गी होईल. मकर राशीतील शनीचे वक्री सर्व 12 राशींच्या जीवनावर कसा परिणाम करेल तसेच, जातकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा कसा परिणाम होईल हे जाणून घेऊया.
Read in English: Retrograde Saturn Transit in Capricorn (12 July, 2022)
मेष
मेष राशीच्या जातकांसाठी, शनी दहाव्या आणि अकराव्या भावाचा स्वामी आहे आणि तो तुमच्या दहाव्या भावात म्हणजेच व्यवसाय आणि प्रतिष्ठेमध्ये वक्री स्थितीत प्रवेश करणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या करिअरवर पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल आणि तुमची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतांना दिसाल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यात तुम्हाला काही चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो परंतु, शेवटी गोष्टी तुमच्यासाठी अधिक चांगल्या होतील आणि तुमच्यासाठी फलदायी ठरतील. तुमची खरी भक्ती आणि समर्पण पाहून तुमचे वरिष्ठ ही तुम्हाला सहकार्य करतील. या काळात तुम्हाला तुमची नोकरी बदलण्याची संधी देखील मिळू शकते. या सोबतच, तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात अनेक चांगले बदल घडवून आणण्याच्या दिशेने लक्ष केंद्रित करताना दिसतील.
आर्थिक दृष्टिकोनातून, हा काळ तुमच्यासाठी मध्यम आहे. तुम्ही तुमचे सर्व खर्च भागवू शकाल आणि अशा प्रकारे तुम्ही तुमची आर्थिक स्थिती संतुलित ठेवण्यात यशस्वी व्हाल.
तुमच्या घरात सुख-शांती नांदेल आणि या काळात तुम्ही घराचे नूतनीकरण करण्याची योजना करू शकता. जे आता पर्यंत कोणती ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत होते, त्यांची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. या वेळी लोह, पोलाद, खाणी आणि वायू समभागांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर सिद्ध होईल. तसेच, हा काळ तुमच्या काही जुन्या मित्रांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या सोबत जुन्या आठवणी जपण्यासाठी मजबूत आहे म्हणजेच, तुम्ही या काळात अशी योजना करू शकतात.
उपाय: शनिवारी शनी मंदिरात काळी दाळ दान करा.
आपल्या कुंडली मध्ये असलेल्या राज योग ची संपूर्ण माहिती मिळवा
वृषभ
वृषभ राशीच्या जातकांसाठी, शनी नवव्या आणि दहाव्या भावाचा स्वामी आहे आणि तो तुमच्या नवव्या भावात म्हणजेच पिता, अध्यात्म आणि धर्मात वक्री होईल. अशी भीती आहे की, या काळात तुमचे पुढील अभ्यास किंवा शिकण्यात रस कमी होईल, त्या ऐवजी तुम्ही स्मार्ट वर्क करण्याच्या तंत्राकडे अधिक लक्ष देताना दिसाल. तुमचा कल अध्यात्माकडे थोडा कमी असेल पण तुमचा कर्मावरचा विश्वास जास्त राहील, जो तुम्हाला तुमची कृती करताना योग्य निर्णय घेण्यास प्रवृत्त करेल. या काळात तुम्ही काही महत्त्वाच्या सहलींचे नियोजन करू शकता आणि तुमची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी या सहली खूप उपयुक्त ठरतील. या काळात तुमचे तुमच्या वडिलांसोबतचे संबंध फारसे चांगले नसतील, तुमचा त्यांच्याशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. विश्वास ठेवा, या काळात तुमच्या संयमाची परीक्षा घेतली जाईल पण शेवटी तुम्हाला तुमच्या तपश्चर्येचे आणि परिश्रमाचे सकारात्मक फळ नक्कीच मिळेल.
जे जातक सर्व्हिस करतात ते त्यांचे कार्य उत्तम प्रकारे करू शकतील परंतु, त्यांचे त्यांच्या बॉसशी संबंध खराब होऊ शकतात. साहजिकच मग त्यांच्या बाजूने तुम्हाला फारसा पाठिंबा मिळणार नाही. तथापि, तुमचे कार्य कौशल्य आणि कठोर परिश्रम तुमचे व्यावसायिक जीवन आनंददायक बनवेल आणि तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी मजबूत पकड राखू शकाल. दुसरीकडे, व्यावसायिक लोक त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी काही नवीन संसाधने शोधण्यात सक्षम होतील. या काळात तुम्ही काही नवीन रणनीती अंमलात आणू शकता तसेच, जुन्या योजना आणि रणनीतींमध्ये काही बदल करू शकतात.
उपाय: झोपताना डोक्याजवळ नीलम ठेवा.
वृषभ मासिक राशिभविष्य
मिथुन
मिथुन राशीच्या जातकांसाठी, आठव्या आणि नवव्या भावाचा स्वामी शनी आहे आणि तो तुमच्या आठव्या भावात म्हणजे अनिश्चितता आणि गूढ भावामध्ये वक्री स्थितीत प्रवेश करेल. या दरम्यान, तुम्हाला आगामी कार्यक्रमांची आगाऊ कल्पना मिळेल. तुमचा कल अध्यात्माकडे असेल आणि तुम्ही अध्यात्माच्या गोष्टींबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतांना दिसाल. या काळात तुम्हाला अशा काही घटनांचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठे बदल होऊ शकतात.
आर्थिक दृष्टीकोनातून, हा काळ अनिश्चिततेने भरलेला असेल, त्यामुळे तुम्हाला या काळात शेअर बाजार किंवा शेअर मार्केट इत्यादींमध्ये गुंतवणूक टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. दुसरीकडे, वयक्तिक आरोग्याबद्दल बोलताना, या काळात सांधेदुखी, दात समस्या आणि केस गळणे या सारख्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात.
वयक्तिक जीवनात, तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांसोबत काही तणावाचा सामना करावा लागू शकतो.
व्यावसायिकदृष्ट्या, व्यावसायिक जातक या काळात त्यांच्या कर्जातून मुक्त होऊ शकतात परंतु, तरी ही तुम्हाला कोणत्या ही नवीन प्रकल्पात गुंतवणूक करण्याची योजना काही काळासाठी पुढे ढकलण्याचा सल्ला दिला जातो. दुसरीकडे, नोकरदार लोकांना या काळात अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण, त्यांच्या करिअर मध्ये चढ-उतार होऊ शकतात किंवा नोकरी मध्ये अचानक बदल होऊ शकतो.
उपाय: शनिवारी मद्यपान आणि मांसाहार टाळा.
तुमच्या कुंडलीमध्ये आहे काही दोष? जाणून घेण्यासाठी आत्ताच खरेदी करा अॅस्ट्रोसेज बृहत् कुंडली
कर्क
कर्क राशीच्या जातकांसाठी, शनी सातव्या आणि आठव्या भावाचा स्वामी आहे आणि तो तुमच्या सातव्या भावात म्हणजेच संस्था, भागीदारी आणि विवाहाच्या भावात वक्री होईल.
जे जातक त्यांच्या लग्नाची वाट पाहत होते, ते या काळात लग्न करणार असल्याची दाट शक्यता आहे. तसेच वैवाहिक जीवनातील अडथळे ही दूर होतील. जे वैवाहिक जीवन जगत आहेत त्यांना या काळात त्यांच्या जोडीदारासोबतच्या नात्यात काही तणाव येऊ शकतो. या सोबतच घरातील सुख-शांती भंग पावू शकते. या सर्व कारणांमुळे तुमच्या संयमाचा भंग होऊ शकतो आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीत घाई करू शकता. परिणामी तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये नकारात्मक परिणाम मिळतील.
व्यावसायिकदृष्ट्या, जे जातक भागीदारी व्यवसायात आहेत त्यांना काही तणावपूर्ण परिस्थितींचा सामना करावा लागेल. या काळात, तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध थोडेसे बिघडू शकतात, ज्यामुळे तुमच्या फर्मच्या प्रतिमेवर आणि व्यावसायिक व्यवहारांवर थेट परिणाम होईल. दुसरीकडे, पगारदार लोकांना त्यांच्या नोकरीमध्ये स्थिरता राखण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल, कारण या काळात तुमच्या कामाच्या कौशल्यावर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रतिमेवर परिणाम होईल.
आरोग्याच्या दृष्टीने पुन्हा काही जुन्या आजाराने ग्रासण्याची शक्यता आहे, त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आणि स्वतःची काळजी घेणे चांगले राहील.
उपाय: भगवान शंकराची पूजा करून शिवलिंगाला जल अर्पण करा.
सिंह
सिंह राशीच्या जातकांसाठी सहाव्या आणि सातव्या भावाचा स्वामी शनि आहे आणि तो तुमच्या सहाव्या भावात म्हणजे रोग, स्पर्धा, कर्ज आणि सेवा यांमध्ये वक्री होईल.
या काळात तुमच्या प्रियजनांशी तुमचे संबंध थोडे बिघडू शकतात. जर तुम्ही वैवाहिक जीवन जगत असाल तर, तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नाते ही थोडे तणावपूर्ण असेल, ज्यामुळे तुम्हाला त्यांच्या पासून भावनिक किंवा शारीरिक अंतर जाणवू शकते. घरातील सुख-शांती देखील काही विशेष राहणार नाही. तुमची कोर्टात केस चालू असेल किंवा तुम्ही एखाद्या प्रकरणात अडकले असाल तर, या काळात तुमची सुटका होण्याची शक्यता जास्त असते. या सोबतच तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व वाद मिटवून निकाल तुमच्या बाजूने लावू शकाल.
व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, पगारदार जातक त्यांच्या प्रोफाइल मध्ये वाढ पाहू शकतात आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ देखील मिळेल. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना या काळात नोकरीच्या काही चांगल्या संधी/ऑफर मिळतील. दुसरीकडे, व्यावसायिक जातकांसाठी हा काळ थोडा कठीण जाणार आहे कारण, या काळात त्यांना त्यांचे दायित्व भरण्यात काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि असे देखील होऊ शकते की, तुम्हाला तुमचा व्यवसाय चालवण्यासाठी बाजारातून काही कर्ज घ्यावे लागेल. जे व्यावसायिक सेवांमध्ये आहेत, त्यांच्यासाठी हा सर्वोच्च काळ आहे आणि या काळात तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये लक्षणीय झेप दिसेल. तुम्ही तुमच्या सेवा आणि पात्रतेच्या माध्यमातून तुम्ही संबंधित मार्केट मध्ये प्रवेश करण्यास सक्षम असाल.
उपाय: शनिवारी काळे वस्त्र धारण करू नका.
कन्या
कन्या राशीच्या जातकांसाठी, शनी पाचव्या आणि सहाव्या भावाचा स्वामी आहे आणि तो तुमच्या पाचव्या भावात म्हणजे शिक्षण, मुले आणि रोमांस यामध्ये वक्री होईल.
विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहणार आहे कारण, या काळात तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी समर्पित असाल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना या काळात खूप चांगले परिणाम मिळतील.
जे जातक प्रेम संबंधात आहेत त्यांच्या नात्यात काही उतार-चढाव येऊ शकतात कारण, या काळात तुमचे तुमच्या प्रिय सोबतचे नाते फारसे सौहार्दपूर्ण राहणार नाही. कोणत्या ही कारणास्तव तुमच्यामध्ये भांडणे आणि गैरसमज होऊ शकत नाहीत. या काळात मुलांना फ्लू आणि खोकला यांसारख्या आरोग्य समस्यांना ही सामोरे जावे लागू शकते.
व्यावसायिकदृष्ट्या पाहिल्यास, व्यावसायिक जातक या काळात त्यांच्या जुन्या योजना आणि रणनीतींद्वारे नफा मिळवण्यास सक्षम असतील, जे त्यांच्यासाठी पूर्वी फारसे प्रभावी नव्हते. दुसरीकडे, नोकरदार जातक कार्य प्रोफाइल किंवा स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे.
उपाय: कोणतेही काम जास्त काळ प्रलंबित ठेवू नका.
तुळ
तुळ राशीच्या जातकांसाठी चौथ्या आणि पाचव्या भावाचा स्वामी शनी आहे आणि तो तुमच्या चौथ्या भावात म्हणजेच इमारत आणि सुखसोयींच्या भावातून वक्री होईल.
जर तुम्ही संपत्ती खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा दीर्घकाळापासून तुमचे घर नूतनीकरण करण्याचा विचार करत असाल तर, या काळात तुमची इच्छा पूर्ण होईल. एकूणच, हा काळ इमारतीच्या बांधकाम आणि उत्पादनासाठी अनुकूल आहे. तुम्ही शेतीशी संबंधित कोणत्या ही मालमत्तेत ही गुंतवणूक करू शकता. तथापि, या काळात तुमच्या आईचे खराब आरोग्य तुमच्यासाठी चिंतेचे कारण बनू शकते.
तुळ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे कारण, ते त्यांच्या अभ्यासात समर्पित असतील आणि परिश्रमपूर्वक अभ्यास करताना दिसतील.
व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, व्यावसायिक लोकांना या काळात फलदायी परिणाम मिळतील. तसेच, तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. त्याच वेळी, नोकरदार लोकांसाठी बढतीची शक्यता अधिक आहे.
उपाय: शनिवारी काळे किंवा गडद निळे कपडे घालू नका.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शनी हा तिसर्या आणि चौथ्या भावाचा स्वामी आहे आणि तो तुमच्या तिसर्या भावात म्हणजेच धैर्य, छोटा प्रवास आणि भाऊ-बहिणीच्या भावात वक्री होईल.
या काळात तुमचे भावंडांसोबतचे संबंध फारसे चांगले राहणार नाहीत. तुम्ही त्यांच्याशी पुन्हा पुन्हा भांडू शकतात. तुम्ही तुमच्या शरीराच्या तंदुरुस्तीकडे अधिक लक्ष द्याल आणि यासाठी तुम्ही काही शारीरिक हालचाली करण्याचा ही प्रयत्न कराल.
व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, नोकरी बदलण्याची किंवा नोकरदार लोकांची बदली होण्याची अधिक शक्यता आहे. दुसरीकडे, व्यावसायिकांना त्यांच्या पूर्वीच्या प्रयत्नांचे आणि कृतींचे फळ मिळण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. तुम्हाला सल्ला दिला जातो की, तुम्ही नवीन प्रकल्प आणि धोरणांमध्ये गुंतवणूक करू नका परंतु, तुमच्या पूर्वीच्या प्रकल्पांवर अधिक लक्ष केंद्रित करा. या काळात तुमची प्रलंबित कामे पूर्ण करण्याची संधी ही तुम्हाला मिळेल. या व्यतिरिक्त, या काळात तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या विक्री आणि जाहिरातीसाठी काही सहलींचे नियोजन करावे लागेल.
उपाय: शनिवारी उपवास करा.
धनु
धनु राशीच्या जातकांसाठी, शनी हा दुसऱ्या आणि तिसऱ्या भावाचा स्वामी आहे आणि तो तुमच्या दुसऱ्या भावात म्हणजेच कुटुंब, संवाद आणि पैसा या सर्वांमध्ये वक्री करेल.
या काळात, तुमचे मित्र आणि भावंडांशी तुमचे संबंध थोडे कटू होऊ शकतात. अशा परिस्थितीत, आपण आपल्या संभाषणात अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण, आपल्या कडू आणि संतापजनक बोलण्यामुळे त्यांच्याशी मोठा वाद होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या, हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे कारण, तुम्हाला तुमच्या मागील काही गुंतवणुकीतून पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त आहे. या सोबतच अडकलेले धन ही तुम्हाला परत मिळू शकतात. कुटुंबातील सदस्यांमधील परस्पर समंजसपणाच्या कमतरतेमुळे, तुमच्या कुटुंबातील तुमचे नाते फारसे चांगले नसण्याची शक्यता आहे.
व्यावसायिकदृष्ट्या पाहिल्यास, या काळात व्यवसायातील जातकांना फलदायी परिणाम मिळविण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. दुसरीकडे, जे लोक खटल्याच्या व्यवसायाशी संबंधित आहेत, त्यांना या काळात त्यांच्या पूर्वीच्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. शेअर बाजार सारख्या सट्टेबाजाराशी संबंधित असलेल्यांनी या काळात कोणत्या ही प्रकारची गुंतवणूक टाळण्याचा सल्ला दिला जातो कारण, तोट्याचा धोका जास्त असतो.
उपाय: नियमित 9 वेळा हनुमान चालीसाचा पाठ करा.
मकर
मकर राशीच्या जातकांसाठी शनी हा पहिल्या भावाचा म्हणजेच व्यक्तिमत्वाचा आणि द्वितीय भावाचा म्हणजेच धन भावाचा स्वामी आहे आणि तो तुमच्या दुसऱ्या भावातून पहिल्या भावामध्ये वक्री होईल.
या काळात तुमचे विचार चांगले असतील. तुमची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्ही अधिक सक्रिय व्हाल. तुमचे वयक्तिक सौंदर्य आणि सवयी सुधारण्यासाठी तुम्ही स्वतःवर खर्च करताना दिसतील. तसेच तुम्ही तुमच्या वयक्तिक जीवनात आणि व्यावसायिक जीवनात ही सर्वकाही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न कराल.
व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या काळात चांगल्या कंपन्यांकडून नोकरीच्या काही संधी मिळतील. दुसरीकडे, नोकरदार जातकांना कामाच्या ठिकाणी त्यांचे कौशल्य सिद्ध करण्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या अनेक संधी मिळतील. स्वतःचा व्यवसाय चालवणार्यांना फलदायी परिणाम मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. त्याच वेळी, तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी तुमच्या धोरणांवर आणि कौशल्यांकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. जर तुम्ही एखाद्या संस्थेत किंवा संयुक्त उपक्रमात काम करत असाल तर तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा कारण, तुमच्यात संवाद नसल्यामुळे कमाई आणि नफा मिळण्यात अडथळे येऊ शकतात.
उपाय: शनिवारी हनुमानजींची पूजा करून त्यांना सिंदूर अर्पण करा.
कुंभ
कुंभ राशीच्या जातकांसाठी, शनी बाराव्या भावाचा स्वामी आहे, म्हणजे परदेश प्रवास, खर्च आणि नुकसानीचा भाव आणि पहिला भाव म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा भाव आणि तो तुमच्या बाराव्या भावात वक्री होईल.
जे लोक काही कामासाठी किंवा सुट्टीसाठी परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांची इच्छा या काळात पूर्ण होईल. जे परदेशी कंपन्या किंवा परदेशी ग्राहकांसोबत काम करत आहेत त्यांना या काळात त्यांच्या करिअर मध्ये वाढ दिसून येईल.
आरोग्याच्या दृष्टीने हा काळ फारसा चांगला नाही. या दरम्यान, आपण शरीराच्या खालच्या भागात वेदनांची तक्रार करू शकता. तसेच, पायाला दुखापत किंवा अडखळण्याचा धोका असेल. या व्यतिरिक्त तुम्हाला पुन्हा काही जुन्या आजाराचा त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि रस्त्यावर चालताना किंवा वाहन चालवताना काळजी घ्या.
आर्थिक दृष्टिकोनातून, हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. या काळात तुम्ही धन वाचवू शकाल कारण तुमच्या खर्चावर तुमचे चांगले नियंत्रण असेल.
उपाय: शनिवारी संध्याकाळी मोहरीचे तेल आणि काळी मसूर मजूर किंवा गरिबांना दान करा.
मीन
मीन राशीच्या जातकांसाठी शनी हा अकराव्या भावाचा आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे आणि तो तुमच्या बाह्य भावातून अकराव्या भावात वक्री करेल.
तुमच्या बाराव्या भावातून अकराव्या भावात होणारी शनीची ग्रह स्थिती आर्थिकदृष्ट्या खूप अनुकूल ठरेल. या कालावधीत तुम्ही अनेक स्त्रोतांकडून कमाई करण्यास सक्षम असाल. पूर्वीच्या गुंतवणुकीतून ही फायदा होण्याची शक्यता आहे.
व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, नोकरी करणाऱ्या जातकांना काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल, जे त्यांच्या प्रोफाइलसाठी खूप चांगले सिद्ध होईल. दुसरीकडे, व्यावसायिक जातकांना त्यांची उत्पादने आणि सेवांच्या जाहिरात आणि विपणनासाठी काही सहली कराव्या लागतील. छंद आणि आवडीच्या कामाचे व्यवसायात रूपांतर करण्यासाठी आणि त्यातून चांगली कमाई करण्यासाठी देखील हा काळ अनुकूल आहे. तुमचे प्रयत्न भविष्यात फलदायी ठरतील. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून, मीन राशीच्या विद्यार्थ्यांना या काळात काही प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांच्या अभ्यासात अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते.
उपाय: सूर्यास्त नंतर संध्याकाळी कमीत कमी 108 वेळा शनी मंत्र "ॐ शं शनैश्चराय नमः" चा जप करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल. अॅस्ट्रोसेज सोबत जोडल्याबद्दल खूप आभार!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
AstroSage TVSubscribe
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025