शुक्राचे मिथुन राशीमध्ये गोचर, जे की 2 मे 2023 च्या दुपारी 13:46 वाजता होईल, वैदिक ज्योतिषशास्त्रात सामान्यतः अनुकूल गोचर मानले जाते. शुक्र ग्रह आपली स्वराशी वृषभ मधून निघून आणि त्याची मित्र राशी मिथुन मध्ये प्रवेश करेल आणि 30 मे 2023 च्या संध्याकाळी 19:39 पर्यंत चंद्राच्या स्वामित्वाची राशी कर्क मध्ये प्रवेश करेल. अशा स्थितीत शुक्राचे हे गोचर सर्वांसाठी काहीतरी चांगले घडवून आणेल अशी शक्यता आहे. शुक्र हा नैसर्गिकरित्या शुभ ग्रह मानला जातो. वृषभ आणि तुळ या दोन राशींवर त्याचे प्रतिनिधित्व केले जाते आणि शनीच्या मकर आणि कुंभ राशीसाठी, तो केंद्र आणि त्रिकोणाचा स्वामी बनतो आणि योगकार ग्रह बनतो. शुक्र हा आनंद आणि ऐषोआराम देणारा असा ग्रह आहे, ज्याचा आशीर्वाद आजच्या काळात प्रत्येकाला मिळावा अशी इच्छा आहे कारण, शुक्राच्या कृपेनेच तुम्हाला तुमच्या जीवनात सर्व सुख-सुविधा मिळतात. यामुळे तुमच्या जीवनात प्रेम निर्माण होते आणि तुम्ही प्रेम प्राप्त करण्याचा हक्कदार बनता. खरे तर प्रत्येक व्यक्तीला अनुकूल शुक्र असणे आवश्यक आहे कारण, तसे न झाल्यास व्यक्ती सुखापासून वंचित राहते. त्याच्या आयुष्यात प्रेम येत नाही किंवा प्रेम संबंधात अडचण येत नाही. वैवाहिक जीवन दुःखाने भरलेले असते आणि तो लैंगिक दुर्बलतेचा ही बळी होऊ शकतो. या लेखात शुक्राचे हे गोचर समजावून सांगितले आहे जेणेकरून, तुम्हाला कळेल की, शुक्राचे मिथुन राशीमध्ये गोचर तुमच्या राशीनुसार तुमच्यासाठी फलदायी ठरेल.
शुक्र गोचर आपल्या जीवनावर प्रभाव जाणून घेण्यासाठी अॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!
मीन राशीमध्ये शुक्र आपल्या उच्च स्थितीत मानला जातो. दुसरीकडे, कन्या राशीमध्ये, ते मध्यम राशी बनतात. अध्यात्मिक आणि धार्मिक मान्यतांनुसार, शुक्राला दैत्य गुरु शुक्राचार्य म्हणून ही ओळखले जाते. ज्याप्रमाणे देवांचे गुरु बृहस्पती आहेत, त्याचप्रमाणे देव आणि दानवांचे गुरु शुक्राचार्य आहेत, ज्यांना भगवान शिवाकडून मृत संजीवनी विद्या प्राप्त झाली आहे. शुक्र हा कलांचा कारक आहे, त्यामुळे शुक्र जर तुमच्यावर दयाळू असेल तर तुमच्या जीवनात काही कलात्मक गुण देखील सापडू शकतात आणि तुम्हाला जीवनातील सुख-सुविधांचा आनंद मिळेल. तुमच्या आयुष्यात ही प्रेम येईल आणि तुम्ही चांगले जीवन जगू शकाल.
हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे. चंद्र राशी कॅल्क्युलेटर ने जाणून घ्या आपली चंद्र राशी!
Read in English: Venus Transit In Gemini (2 May 2023)
मेष राशीच्या जातकांसाठी शुक्र दुसऱ्या आणि सातव्या भावाचा स्वामी आहे आणि जेव्हा शुक्र मिथुन राशीत प्रवेश करेल तेव्हा तो तुमच्या तिसऱ्या भावात प्रवेश करेल. तृतीय भावात शुक्राच्या गोचर मुळे तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत जास्त वेळ घालवायला आवडेल. त्यांच्यासोबत पार्टी करणे, मजा करणे, तुम्हाला खूप आवडेल. भावंडांशी जवळीक वाढेल आणि त्यांच्याशी प्रेम वाढेल. हा काळ तुमचे प्रेम जीवन उत्तम करेल. तुमची तुमच्या प्रियकराशी जवळीक वाढेल आणि तुमच्यामध्ये रोमांस वाढण्याची शक्यता आहे. शुक्राच्या गोचर प्रभावाने तुम्ही तुमची कोणती ही कलात्मक अभिव्यक्ती सर्वांसमोर आणू शकाल आणि त्यातून पैसे कमवण्यात ही यशस्वी होऊ शकता. या दरम्यान, जोडीदारासोबत काही मुद्द्यांवर वाद आणि संघर्ष होऊ शकतो. तुम्ही तुमच्या भावंडांना मदत करण्यासाठी तुमचे पैसे खर्च करू शकता. कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या सहकाऱ्यांशी तुमची मैत्रीपूर्ण वागणूक असेल, ज्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल आणि यामुळे तुमच्या करिअरला यश मिळेल. ते तुम्हाला सर्व प्रकारे मदत करतील. व्यवसायासाठी वेळ उत्तम राहील. व्यवसायात छोट्या प्रवासात फायदा होईल.
उपाय: शुक्रवारी लक्ष्मीच्या कृपा प्राप्तिसाठी श्री सूक्ताचा पाठ करा.
शुक्र हा तुमच्या राशीचा स्वामी तसेच तुमच्या सहाव्या भावाचा स्वामी आहे आणि जेव्हा शुक्र मिथुन राशीत प्रवेश करेल तेव्हा तो तुमच्या दुसऱ्या भावात प्रवेश करेल. शुक्राचे हे गोचर तुमच्या जीवनात अनुकूलता, सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येणार आहे. तुम्हाला मजबूत आर्थिक लाभ मिळू शकाल. तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकाल ज्यामुळे तुमची बँक शिल्लक वाढेल. उत्तम आणि चविष्ट जेवणाचा आस्वाद घ्याल आणि डिश खाण्याची संधी मिळेल. विवाह समारंभात सहभागी होऊन आनंद वाटेल आणि अनेक लोकांना भेटावे लागेल, त्यामुळे सामाजिक वर्तुळ वाढेल. तुमच्या घरात ही काही कार्य किंवा शुभ कार्य होऊ शकते. वाद-विवाद सोडवण्याचा प्रयत्न केल्यास फायदा होईल आणि त्यातून पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. नोकरीत तुमची स्थिती चांगली राहील. तुम्ही कौतुकास पात्र असाल आणि तुमच्या प्रयत्नांसाठी तुम्हाला प्रोत्साहन दिले जाईल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. लोकांशी गोड बोलून तुमचे काम पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात वाढ होईल.
उपाय: तुम्हाला नियमित लहान कन्यांचा पाय पडून आशीर्वाद घेतला पाहिजे.
मिथुन राशीतील जातकांची गोष्ट केली असता शुक्र तुमच्या द्वादश भावाचा स्वामी होण्यासोबतच पंचम भावाचा स्वामी ही आहे आणि शुक्राचे मिथुन राशीमध्ये गोचर ते तुमच्या पहिल्या भावात म्हणजेच तुमच्या राशीत असेल. शुक्राच्या या गोचर प्रभावाने तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. तुम्ही लोकांच्या आकर्षणाचे केंद्र व्हाल. पूर्वी कोणत्या ही कारणाने थांबलेली तुमची कामे आता हळूहळू सुरू होतील आणि तुम्हाला आनंद देईल. तुम्हाला कार किंवा घराचा लाभ मिळू शकतो, त्यामुळे तुम्हाला मालमत्ता खरेदी करायची असेल तर, या काळात प्रयत्न करून आनंद मिळवू शकता. तुम्हाला मुलांकडून चांगले सहकार्य मिळेल आणि त्यांच्याकडून तुम्हाला प्रेम मिळेल. परकीय चलन मिळण्याची शक्यता आहे. परदेशी संपर्कांसह तुमचा व्यवसाय ही प्रगती करेल. तुम्ही नोकरीत असाल तर, हा कालावधी तुमच्याकडून अधिक मेहनत आणि अधिक एकाग्रतेची मागणी करेल. तुम्हाला स्वतःवर खर्च करायला आवडेल. काही छान आणि महागडे कपडे आणि गॅजेट्स खरेदीवर पैसे खर्च होतील. वैवाहिक जीवनात प्रेम आणि रोमांस होण्याची शक्यता आहे.
उपाय: मंगळवार आणि शुक्रवारी गाईला पीठ आणि गूळ खाऊ घाला.
कर्क राशीतील जातकांसाठी शुक्र चतुर्थ आणि एकादश भावाचा स्वामी आहे आणि शुक्राचे मिथुन राशीमध्ये गोचर तुमच्या द्वादश भावात असेल. शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्ही अमर्याद खर्च करू शकाल. अनपेक्षित खर्चात झालेली वाढ पाहून तुम्ही अस्वस्थ व्हाल परंतु, तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही कारण, या बाराव्या भावात स्थित शुक्र महाराज तुम्हाला भक्कम आर्थिक लाभ ही देतील. तुमच्या सुखसोयी वाढवण्यासाठी तुम्ही काही नवीन गोष्टी खरेदी आणि आणू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सजावटीवर पैसे खर्च करू शकता. घरामध्ये नूतनीकरणाचे काम करता येईल आणि कौटुंबिक गरजांच्या वस्तूंबरोबरच सुखसोयींच्या वस्तूंमध्ये ही वाढ होऊ शकते. कोर्टात प्रकरण प्रलंबित असल्यास त्यावर खर्च करावा लागू शकतो. तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम वाढण्याची शक्यता आहे.
उपाय: तुम्हाला शुक्रवारी श्री देवी कवच चे पाठ केले पाहिजे.
शुक्राचे मिथुन राशीमध्ये गोचर सिंह अकराव्या भावात असेल. हा तुमच्यासाठी तिसऱ्या आणि दहाव्या भावाचा स्वामी आहे. शुक्राच्या या गोचरच्या प्रभावामुळे तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील आणि तुमच्या सर्व कामात तुम्हाला मदत करतील. तुम्हाला त्यांचे समर्थन मिळेल जेणेकरून, तुम्ही तुमची कामे अधिक चांगल्या पद्धतीने संपादित करू शकाल. तुमच्या प्रेम जीवनासाठी हा काळ खूप आनंदाचा असेल. तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियकरासाठी एकमेकांसोबत चांगला वेळ घालवण्यासाठी आणि रोमान्स करण्यासाठी भरपूर संधी असतील. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर, तुम्हाला तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून तुमचा अभ्यास व्यवस्थित करण्यात मदत मिळेल. तुमच्या मुलांकडून ही तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. ते कोणत्या ही क्षेत्रात काम करत असले तरी या काळात त्यांना प्रगती होऊ शकते. नोकरीत चार्ज वाढण्याची शक्यता राहील. तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की, जास्त प्रवास आणि खूप व्यस्त असल्यामुळे शारीरिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात, त्यामुळे तुमच्या आरोग्याच्या समस्यांकडे ही लक्ष द्या आणि गाफील राहू नका.
उपाय: तुम्हाला रविवारी गाईला गव्हाचे पीठ खाऊ घातले पाहिजे.
कन्या राशीच्या जातकांसाठी शुक्र दुसऱ्या आणि नवम भावाचा स्वामी आहे आणि शुक्राचे मिथुन राशीमध्ये गोचर तुमच्या दशम भावात होईल. हा काळ प्रगतीचा कारक असेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि तुमची रखडलेली कामे पुन्हा मार्गी लागतील. जर तुमच्याकडे काही व्यावसायिक प्रकल्प असतील तर ते देखील पुढे जाण्यास सुरुवात करतील, ज्यामुळे तुम्हाला मजबूत आर्थिक लाभ मिळतील. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमची बदली चांगल्या ठिकाणी होऊ शकते जिथे तुमची स्थिती आणि पगार पूर्वीपेक्षा जास्त असू शकतो. हा काळ तुमच्या करिअरसाठी अनुकूल असेल आणि नशिबाच्या कृपेने तुम्हाला खूप काही मिळेल. हा कालावधी व्यावसायिक जातकांसाठी देखील खूप महत्वाचा ठरेल आणि तुम्हाला नवीन लोकांसोबत तुमचा व्यवसाय पुढे चालवण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. शुक्राचे गोचर तुम्हाला आनंद देईल.
उपाय: तुम्ही शुक्र देव बीज मंत्राचा जप केला पाहिजे.
शुक्राचे मिथुन राशीमध्ये गोचर तुळ नवव्या भावात असेल. शुक्र हा तुमच्या राशीचा स्वामी आहे तसेच तुमच्या आठव्या भावाचा स्वामी आहे. अचानक पैसे मिळण्याची ही वेळ असू शकते. तुम्हाला काही वडिलोपार्जित मालमत्ता किंवा वारसा मिळू शकतो आणि तुमचे अडकलेले पैसे ही परत मिळू शकतात, ज्याची तुम्ही आशा सोडली असेल. यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. तुमचे लांबचे प्रवास असतील परंतु, त्या प्रवास दरम्यान काही प्रकारची गैरसोय होऊ शकते, त्यामुळे कोणत्या ही प्रवासाला जाण्यापूर्वी पूर्ण तयारी करून तुम्हाला फायदा होईल. जाण्यापूर्वी, प्रवासाशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. भावंडांशी तुमचे संबंध दृढ होतील. काही आरोग्य समस्या तुमच्या वडिलांना त्रास देऊ शकतात. नोकरदार जातकांसाठी हा काळ थोडा तणावाचा असेल. तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर, व्यवसायीक सहलीतून फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीने तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले यश मिळवाल आणि समाजात मान-सन्मान वाढेल.
उपाय: तुम्ही शुक्रवारी श्री सूक्ताचा पाठ केला पाहिजे.
वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुक्र सातव्या आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे आणि आता तो तुमच्या आठव्या भावात गोचर करेल. शुक्राचे हे गोचर तुमच्या वैयक्तिक संबंधांमध्ये चढ-उतार आणेल. जिथे एकीकडे तुम्ही गुप्तपणे तुमचे प्रेम संबंध पुढे नेण्यावर लक्ष केंद्रित कराल आणि तुमच्या घनिष्ट नातेसंबंधांची वाढ अनुभवाल. गुप्त आनंद मिळविण्याच्या इच्छेमध्ये, तुम्ही खूप पैसा खर्च कराल, जे तुम्हाला नंतर त्रासदायक ठरू शकते परंतु, आर्थिकदृष्ट्या हे गोचर देखील तुमच्यासाठी चांगले असेल कारण, तुम्हाला चांगले पैसे मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आधीच शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल तर, तुम्हाला या काळात चांगला परतावा मिळू शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. या दरम्यान, सासरच्या घरात कोणाच्या लग्नात किंवा समारंभात जाण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे कुटुंबात प्रेम आणि उत्साहाचे वातावरण असेल आणि सर्वजण आनंदी दिसतील. जोडीदाराशी वाद होऊ शकतो. वाद-विवाद जास्त वाढू देऊ नका, ते तुमच्या हिताचे असेल. व्यवसायात प्रगती होईल आणि नोकरदार जातकांना त्यांच्या कामाची चांगली ओळख मिळेल.
उपाय: तुम्ही शिवलिंगावर श्वेत चंदन अर्पित केले पाहिजे.
धनु राशीतील जातकांसाठी शुक्र सहाव्या आणि अकराव्या भावाचा स्वामी आहे आणि शुक्राचे मिथुन राशीमध्ये गोचर तुमच्या सप्तम भावात होईल. या दरम्यान तुमचे जीवन साथीदारासोबतचे प्रेम वाढेल. तुमच्यामध्ये रोमांस वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही एकमेकांना भरपूर वेळ द्याल आणि एकमेकांचे खरे जीवनसाथी बनून तुमच्या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. तुम्ही तुमच्या लाइफ पार्टनरसाठी नवीन वस्तू खरेदी कराल, पण तुमच्या दोघांमध्ये वाद होऊ शकतो. जर तुमच्या कुंडलीत काही चुकीचे योग असतील तर, या काळात तुम्ही विवाहबाह्य संबंधांकडे वाटचाल करू शकता, त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे कारण, त्यामुळे मान-सन्मान हानी होऊ शकते. या काळात महिलांना मासिक पाळीशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे लवकरात लवकर वैद्यकीय उपचार घ्या. हा काळ व्यावसायिकांसाठी अनुकूलता आणेल आणि तुमच्या व्यवसायात चांगली वाढ दिसून येईल. जोडीदाराला आर्थिक लाभ मिळू शकतो, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती ही सुधारेल.उपाय: तुम्हाला गुरुवारी बृहस्पती देवाच्या बीज मंत्राचा जप केला पाहिजे.
मकर राशीतील जातकांसाठी शुक्र पंचम आणि दशम भावाचा स्वामी होऊन एक योगकारक ग्रह बनतात. शुक्राचे मिथुन राशीमध्ये गोचर तुमच्या षष्ठम भावात होईल. शुक्राच्या या गोचर दरम्यान, तुम्हाला तुमच्या आरोग्याची अत्यंत काळजी घ्यावी लागेल कारण, मंगळाच्या संयोगाने येथे स्थित शुक्र काही आरोग्य समस्या देऊ शकतो. आपण चांगले खावे. पचण्यायोग्य अन्नाने तुमचे पोट चांगले राहील आणि पचनसंस्थेशी संबंधित समस्या यामुळे टाळता येऊ शकतात. भरपूर पाणी आणि शीतपेये प्यायल्याने तुम्हाला अनेक आरोग्य समस्यांपासून वाचवता येते. या काळात तुमच्या खर्चात वाढ होण्याची ही शक्यता आहे, त्यामुळे तुमच्या पैशाकडे लक्ष द्या आणि त्याचा योग्य वापर करा. नोकरदार जातकांसाठी हा गोचर काळ अनुकूल राहील. शुक्र देवाच्या कृपेने तुम्हाला तुमच्या नोकरीत चांगले स्थान मिळेल आणि तुम्ही तुमची सर्व कामे वेळेत पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात चांगल्या संधी मिळतील आणि तुम्ही कोणत्या ही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला यश मिळू शकते.
उपाय: तुम्हाला शुक्र यंत्राची विधिवत पूजा केली पाहिजे.
कुंभ राशी शनीच्या आधिपत्य ची राशी आहे आणि यासाठी शुक्र चतुर्थ आणि नवम भावाचा स्वामी होऊन एक योगकारक ग्रह आहे आणि शुक्राचे मिथुन राशीमध्ये गोचर तुमच्या पाचव्या भावात असेल. पाचव्या भावात शुक्राचे गोचर तुमच्या प्रेमसंबंधांसाठी वरदान ठरेल. जर तुमची तुमच्या प्रेयसीशी भांडण होत असेल तर, ते आता संपुष्टात येईल आणि प्रेम पुन्हा वाढेल. तुम्हा दोघांचे प्रेम फुलताना दिसेल. तुमच्या आयुष्यात खूप प्रेम असेल. एकत्र बाहेर जाणे, एकत्र वेळ घालवणे, पार्टी करणे, चित्रपट पाहणे या सर्व गोष्टी तुमचे प्रेम वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील. जरी त्याची बुद्धिमत्ता चांगली असेल. त्यांचे म्हणणे त्यांना लवकरच समजेल परंतु, त्यांचे मन थोडेसे भरकटणार आहे, त्यामुळे या काळात ते त्यांच्या कोणत्या ही गुरूंचे मार्गदर्शन घेऊ शकतात. या काळात चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला मालमत्तेचा लाभ ही मिळू शकतो. तुमच्या अनेक गुप्त योजना पुन्हा सुरू होतील ज्यातून तुम्हाला पैसे मिळतील. तुमच्या मनात धार्मिक विचार ही येतील आणि तुम्ही उपासनेसारख्या कार्यात व्यस्त व्हाल. पोटाशी संबंधित समस्यांबाबत सावधगिरी बाळगणे अपेक्षित आहे. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते आणि जे नोकरीच्या शोधात होते, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते.
उपाय: तुम्हाला शुक्रवारी उत्तम गुणवत्तेचा ओपल रत्न आपल्या अनामिका बोटात धारण केले पाहिजे.
मीन राशीतील जातकांसाठी शुक्र तिसऱ्या आणि आठव्या भावाचा स्वामी आहे. शुक्राचे मिथुन राशीमध्ये गोचर तुमच्या चतुर्थ भावात होईल. शुक्राच्या या गोचर मुळे कुटुंबात काही समस्या निर्माण होतील कारण, लोक एकमेकांचे बोलणे नीट समजू शकणार नाहीत आणि यामुळे विनाकारण अडचणी निर्माण होतील परंतु, नवीन आणि मोठ्या गोष्टीच्या आगमनाने सर्वजण आनंदी होतील. शुक्र गोचर काळात तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता. भावंडांच्या मदतीने तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. तुम्ही कराल त्या प्रत्येक गोष्टीत ते तुम्हाला मदत करतील. तुम्हाला एखादे वाहन किंवा मालमत्ता घ्यायची असेल तर, त्यात ही ते सहकार्य करतील. सासरच्या मंडळींचे सहकार्य मिळेल. तुम्ही चांगले विचार मनात ठेवाल आणि सर्वांना शुभेच्छा द्याल. तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात तुम्ही किती सामंजस्य राखू शकता यावर नोकरीतील तुमचे स्थान अवलंबून असेल. व्यवसायासाठी हा काळ अनुकूल राहील. तुमचे मित्र ही तुम्हाला तुमच्या कामात मदत करतील. तुम्हाला त्यांच्या सोबत चांगला वेळ घालवायला ही आवडेल.
उपाय: तुम्हाला शुक्रवारी सफेद मिठाई दान केली पाहिजे.
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!