Talk To Astrologers

विशाखा नक्षत्राची भविष्यवाणी

The symbol of Vishakha Nakshatra एका शब्दात तुमचे वर्ण करायचे झाले तर समर्पित. तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करता. त्यामुळे एक उद्देश्श्य डोळ्यासमोर ठेवणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर तुम्ही तुमची सगळी उर्जा त्यात घातली पाहिजे. तुम्हाला सतत काम करायला हवे असते. अधिकाधिक सुविधा आयुष्यात मिळवाव्यात अशी तुमची इच्छा असते आणि सोहळे, प्रेम आणि ऐशआराम हे आयुष्यातील महत्त्वाचे घटक आहेत, अस तुम्हाला वाटते. तुमचे फीचर्स शार्प आणि डोळे सुंदर आहेत. तुम्ही उदार, मिळून मिसळून वागणारे आणि नेहमी आनंदी राहणारे आहात. तुमचा आवाज गोड आहे आणि तुम्ही कोणाविषयीही कटू बोलत नाही.शैक्षणिकदृष्ट्याही तुमची परिस्थिती चांगली आहे. गुरूच्या प्रभावामुळे लहानपणापासूनच ज्ञानार्जनाविषयी तुम्हाला एक खास आकर्षण आहे.तुम्ही अभ्यासात हुशार आहात. त्यामुळेच तुम्ही उच्चशिक्षित व्हाल.तुम्ही शक्यतो शारीरिक श्रम टाळता. असे असले तरी तुम्ही तुमच्या मेंदूचा खूप वापर करता. सामाजिक दृष्टिकोनातून विचार करता तुमचे मित्रवर्तुळ खूप मोठे आहे, कारण तुमचा स्वभाव मैत्रीपूर्ण आहे. तुम्ही सर्वांशी प्रेमाने आणि आदराने वागता. तुमची कुणाला आवश्यकता असेल तर तुम्ही त्यांच्या मदतीला नेहमी धावून जाता. याच कारणामुळे जेव्हा तुम्हाला एखाद्याची अत्यंत गरज असते, तेव्हा लोकही तुमच्या मदतीसाठी धावून येतात. सामाजिक संस्थांशी तुम्ही सलग्न असाल.सनातनी किंवा जुन्या परंपरांना तुमच्या लेखी काही स्थान नाही.कुणाच्याही आयुष्यात काहीही वाईट घडावे, असे तुम्हाला वाटत नाही.तुमचा आवाज चैतन्यमयी आहे. त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. त्यामुळेच तुम्ही राजकारणात स्वत:ला आजमावलेत तर तुम्ही समाजकल्याण करू शकाल. उपजीविकेसाठी तुमचे प्राधान्य उद्योगापेक्षा नोकरीला असेल. तुम्ही सरकारी नोकरी मिळविण्यासाठी खूप प्रयत्न कराल. तुम्ही उद्योग जरी केलात तरी तुम्ही सरकारशी या ना त्या निमित्ताने संबंधित असाल. तुमची आर्थिक स्थिती उत्तम असेल आणि लॉटरी इत्यादीमधून अचानक धनलाभाचीही शक्यता आहे.आर्थिक चणचण तुम्हाला कधीही भासणार नाही. जरी कधीतरी अशी परिस्थिती उद्भवलीच तर ते अगदी तात्पुरते असेल.

शिक्षण आणि उत्पन्न

तुम्ही प्रत्येक बाबतीत प्रावीण्य मिळविण्याचा प्रयत्न करता, त्यामुळे तुम्हाला नेहमी यश मिळते. फॅशन डिझायनिंग,मॉडेलिंग, स्टेज परफॉर्मर, रेडियो आणि दूरचित्रवाणी, राजकारण,लष्कर, नृत्य, कस्टम (सीमाशुल्क), पोलीस, सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक इत्यादी क्षेत्रे तुमच्यासाठी अनुकूल असतील.

कौटुंबिक आयुष्य

तुमचे तुमच्या जोडीदारावर आणि मुलांवर अत्यंत प्रेम आहे आणि जास्तीत जास्त वेळ त्यांच्यासोबत घालविण्याचा प्रयत्न करता. तुम्हाला संयुक्त कुटुंबपद्धत आवडते. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांशी खूप जोडले गेलेले आहात आणि तुमच्या कुटुंबीयांची काळजी कशी घ्यावी, हेही तुम्हाला चांगले माहीत आहे.

Call NowTalk to Astrologer Chat NowChat with Astrologer