तुम्ही सत्यमेव जयते या तत्वावर विश्वास ठेवता. सत्यासाठी तुम्ही जीव पणाला लावू शकता.
आयुष्यातल्या तुमच्या ठाम तत्वांमुळे इतरांशी तुमचे खटके उडतात. तुम्ही स्वार्थासाठी
गोष्टी करत नाही. तुम्ही मृदू स्वभावाचे आणि धार्मिक आहात. तुम्ही शूर आणि धाडसी आहात.
तुमचा उद्देश ठाम आणि खंबीर असतो ज्यामुळे तुम्ही एकदा ठरवलेली गोष्ट करता. तुम्हाला
जबाबदा-यांची जाणीव असते आणि त्या योग्य रित्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करता. तुमचे
विचार राजकारणाने प्रेरित असतात आणि राजकीय युक्त्यांमध्ये तुम्ही हुशार असता. तुमचा
अंगमेहनतीवर खूप विश्वास नसतो त्यापेक्षा तुम्ही बुध्दीचा जास्त वापर करता. मनाची मर्जी
असल्याने तुम्ही भागीदारीपेक्षा स्वत: काम करणे पसंत करता. तुम्ही थोडे आळशी असता आणि
खूप मजा करायला आवडते. तुम्हाला स्वर्गसुखात आयुष्य जगायला आवडते.यंत्रासारखे काम करणे
तुम्हाला जमत नाही आणि आयुष्य मोकळेपणी जगायला आवडते. कोणत्याही अडचणीने तुम्ही डगमगत
नाही उलट धीराने परिस्थिती हाताळता आणि सामना करता. तुमची श्रध्दा आणि ताकद तुम्हाला
बळ देते ज्यामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीवर जय मिळवता. तुमच्या व्यक्तिमत्त्वातला
आणखीन एक गुण म्हणजे जर तुमच्याशी कोणी वाकडेपणा घेतला तर तुम्ही त्यांना हरवता. तुम्ही
लवकर रागवत नाही पण राग आला तर नियंत्रित करणं कठीण असते. पण मृदू मन आणि हुशारी यामुळे
राग लगेच निघून जातो. एकदा ठरवल्यावर तुम्ही मागे हटत नाही. तुम्ही योग्यता आणि हुशारी
यामुळे आयुष्यात सर्व क्षेत्रात यशस्वी होता. कोणाशीही बोलल्यावर समोरची व्यक्ती तुमची
फॅन होते. तुम्हाला देखावा करणे आवडत नाही आणि शक्य तितके तसे वागणे तुम्ही टाळता.
तुमची स्मरणशक्ती खूपच चांगली असते, तुम्ही एकदा वाचले की ते दीर्घकाळ तुमच्या लक्षात
राहते. तुमच्यात साहित्यिकाचे गुणही आहेत आणि लवकरच तुमचे हे कौशल्यही प्रकाशात येईल.
तुमच्या चांगल्या स्वभावामुळे तुम्ही खूप लोकप्रिय असता.
शिक्षण आणि उत्पन्न
उच्चशिक्षित होण्याची तुमच्यात क्षमता आहे. मानसशास्त्र, टच थेरपी या क्षेत्रात तुम्ही
प्रावीण्य मिळवू शकता. तुम्हाला ज्योतिषशास्त्राची विशेष आवड आहे आणि तुम्ही चांगले
आणि निष्ठावान ज्योतिषी होऊ शकता. तसेच तुमच्यात वैद्यकीय क्षेत्रात नाव आणि प्रसिध्दी
मिळवण्याचीही क्षमता आहे. तुमच्यासाठी योग्य क्षेत्रे म्हणजे इलेक्ट्रीशियन, केमोथेरपिस्ट,
अंतराळवीर किंवा ज्योतिषी, वैमानिक, सैन्य प्रशिक्षक, फिल्म किंवा टेलिव्हीजन संबंधित
कामे, चित्रपट अभिनेता किंवा कलाकार, मॉडेल, फोटोग्राफर, शिक्षक किंवा विज्ञान लेखक,
अणुविज्ञानाशी संबंधित कामे, फार्मास्युटीकल कामे, डॉक्टर किंवा सर्जन, अल्कोहोल निर्मिती
किंवा इन्टॉक्सीकंट्सशी संबंधित कामे, प्लास्टीक किंवा प्लास्टीक उत्पादन संबंधित कामे,
पेट्रोलियम संबंधित कामे, योग प्रशिक्षक, संशोधक इ.
कौटुंबिक आयुष्य
तुमच्या जिवलगांबाबत तुम्हाला अनेक समस्यांच्या सामना करावा लागू शकतो. उदात्त विचारांमुळे
तुम्ही इतरांना मदत करण्यास नेहमी तयार असता, पण तुम्ही स्वत: मात्र मानसिक त्रास सहन
करता. विशेषत: भावांमध्ये दुरावा येऊ शकतो. तुमच्या पालकांकडून तुम्हाला भरपूर प्रेम
मिळेल. तुमचे वैवाहिक आयुष्य समाधानकारक असेल कारण तुम्ही तुमच्या जोडीदारावर अमर्याद
प्रेम कराल. तुम्हाला मोठ्या मनाचे उदाहरण मानले जाईल. तो/ती कुटुंबाची चांगली काळजी
घेतील आणि मोठ्यांचा आदर करतील. तुमचा जोडीदार “भलं करा विसरून जा” असं आयुष्य जगेल.