Talk To Astrologers

पुष्य नक्षत्राची भविष्यवाणी

The symbol of Pushya Nakshatra तुम्ही क्षमाशील, दयाळू आणि उदार स्वभावाचे आहात. या नक्षत्राचा स्वामी गुरू आहे. यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व गंभीर, प्रामाणिक, समर्पित आणि देवासारखे सद्गुणी आहे. तुमचा बांधा सुदृढ आहे. शांतता, समाधान आणि आनंद मिळविणे हे तुमचे ध्येय आहे. तुम्ही समर्पित, विश्वासू, सामाजिकदृष्ट्या सक्रीय आणि सगळ्यांना त्यांच्या वाईट काळात मदत करणारे आहात. चविष्ठ पदार्थ तुम्हाला आकर्षित करतात आणि तुम्हाला भौतिक सुखांचा आनंद घ्यायला आवडतो. तुमची कुणी प्रशंसा केली तर तुम्ही आनंदी होता. तुमच्यावर झालेली टीका तुम्ही सहन करू शकत नाही. त्यामुळेच तुमच्याकडून काही करवून घ्यायचे असेल तर तुमची स्तुती केल्याने हे साध्य होऊ शकते. तुम्हाला विविध प्रकारच्या सुविधा जमा करायला आवडते. तुम्ही निर्धारी व्यक्ती आहात, त्याचप्रमाणे तुमचा देवावर विश्वास आहे. या गुणांमुळे तुम्ही खूप लोकप्रिय आहात, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. तुम्ही धार्मिक आणि दयाळू वृत्तीचे आहात. तुम्ही तीर्थयात्रांना जाणे पसंत करता. योग, तंत्र-मंत्र, ज्योतिष शास्त्र याची तुम्हाला अत्यंत आवड आहे. तुम्ही तुमच्या आईचा आणि तिच्यासारख्या महिलेचा अत्यंत आदर करता. तुमची काम करण्याची पद्धत अत्यंत सृजनशील आहे. तुमच्यात जन्मत:च अनेक कौशल्ये आहेत. जर तुमच्याकडे एखादे काम सोपविण्यात आले तर तर ते काम नक्की होणार असते कारण तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि कौशल्यांचा वापर करून ते काम पूर्ण करता. तुमच्या कामाच्या स्वरुपामुळे तुम्हाला कधीकधी तुमच्या जोडीदारापासून आणि मुलापासून लांब जावे लागू शकते. पण यामुळे तुमच्या नात्यावर काहीही परिणाम होणार नाही. ऐशोआरामी सुविधा मिळविण्यासाठी तुम्ही नेहमीच प्रयत्नशील असाल. तुमचे वागणे अत्यंत शांततापूर्ण व सौजन्याचे असते. त्यात नेहमी त्यागाची भावना असते. इतरांकडून तुम्हाला कधीही अपमानास्पद वागणूक मिळू शकते. तुमच्या मनात नक्की काय आहे हे व्यक्त करणे तुम्हाला खूप कठीण जाते. तुम्ही देवभक्त आहाता आणि नेहमी दुसऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न करता. वैवाहिक आयुष्यात सुद्धा आपल्या जोडीदाराला तुम्ही सर्व काही सांगत नाही. यामुळे कधी कधी गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला आतल्या आत खूप वेदना होतात.

शिक्षण आणि उत्पन्न

तुम्हाला नाट्यक्षेत्र, कला आणि वाणिज्यशाखेशी संबंधित व्यवसाय यातून यश मिळू शकते. त्याचप्रमाणे डेअरीशी संबंधित काम, शेती, बागकाम, पशुपालन, पदार्थ तयारकरणे आणि त्यांचे वितरण करणे, राजकारण, संसद, विधीमंडळ, धार्मिक गुरू, समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञ, धार्मिक किंवा समाजसेवी संस्थेत कार्यकर्ता, शिक्षक, प्रशिक्षक, बालसेवा, बालवाडी, घरबांधणी किंवा संकुलांची अथवा गृहनिर्माण प्रकल्पांची बांधणी, धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमांचे व्यवस्थापन, शेअर बाजार, वित्त विभाग, पाण्याशी संबंधित कामे, समाज सेवा, मालाचे दळणवळण आणि यासारख्या कष्टाच्या कामांमधून तुम्हाला यश मिळू शकेल.

कौटुंबिक आयुष्य

तुम्हाला तुमच्या जोडीदार आणि मुलांसमवते राहायची इच्छा आहे. पण, नोकरी किंवा व्यवसायामुळे तुम्हाला त्यांच्यापासून दूर राहावे लागेल. त्यामुळे तुमचे कौटुंबिक आयुष्य काहीसे खडतर असेल. असे असले तरी तुमचा जोडीदार अत्यंत समर्पित आहे आणि तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटुंबाची नीट काळजी घेईल. वयाच्या ३३ व्या वर्षापर्यंत तुमचे आयुष्य काहीसे खडतर असेल, पण त्यानंतर तुमची सगळ्याच बाजूंनी प्रगती होईल.

Call NowTalk to Astrologer Chat NowChat with Astrologer