Talk To Astrologers

पूर्वा फाल्गुनी नक्षत्राची भविष्यवाणी

The symbol of Purva Phalguni Nakshatra तुम्हला संगीत कला आणि साहित्याविषयी खूप माहिती आहे कारण लहानपणापासून तुम्हाला या विषयांची आवड आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीचा शांतपणे विचार करता. सत्याच्या मार्गावर तुम्ही आपल्या जीवनाची वाटचाल करू इच्छिता. प्रेम तुमच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही हिंसेपासून आणि वादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करता, कारण तुम्हाला शांतता प्रिय आहे. एखादी समस्या उद्भवली तर तुम्ही शांततापूर्ण मार्गाने त्या समस्येवरील उपाययोजना शोधता. पण जेव्हा तुमच्या आत्मन्मानाचा विषय असतो तेव्हा तम्ही तुमच्या विरोधकांवर वरचढ ठरता. त्याचप्रमाणे मित्रांचे आणि चांगल्या माणसांचे स्वागत कसे करायचे, हे तुम्हाला नीट कळते. तुम्ही अंतर्ज्ञानी असल्यामुळे दुसरे तुमच्याबाबत काय विचार करतात हे तुम्हाला आधीच कळू शकते. तुमचा स्वभाव अत्यंत उदार आहे आणि तुम्हाला प्रवास करण्याची आवड आहे. तुम्हाला प्रामाणिकपणे काम करायला आवडते आणि आयुष्यात प्रगती साधण्यासाठी तुम्ही सच्चा आणि चांगल्या मार्गाची निवड करता. आयुष्यात तुम्हाला तुमच्या क्षेत्रात विशेष नावलौकिक प्राप्त होईल. असे असूनही तुमची चलबिचल होत राहील. दुसऱ्याला मदत करण्यासाठी तुम्ही त्यांच्या विनंतीची वाट न पाहता हजर होता कारण तुम्ही सहृदय आहात. तुम्ही स्वातंत्र्याचे भोक्ते आहात. त्यामुळे तुम्हाला कोणतीही बंधने मान्य नाहीत. दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागेल, अशी कोणतीही गोष्ट करणे तुम्हाला मान्य नाही. तुमचा अजून एक गुण म्हणजे नोकरीमध्ये तुम्ही तुमच्या वरिष्ठांची खुशामत करत नाही. त्यामुळे वरिष्ठांकडून तुम्हाला लाभ होत नाही. तुमची त्यागी वृत्ती असल्यामुळे तुम्हाला दुसऱ्याकडून लाभ घेणे आवडत नाही. तुमचे तुमच्या कुटुंबाशी अत्यंत जवळचे नाते आहे आणि तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसाठी सर्वस्व अर्पण करायला तयार असता.

शिक्षण आणि उत्पन्न

तुम्ही तुमचे कामाचे क्षेत्र नेहमी बदलत राहाल. वयाच्या २२, २७, ३०, ३२, ३७ आणि ४४ वे वर्ष तुमच्या नोकरी अथवा व्यवसायासाठी महत्त्वाचे असेल. सरकारी नोकरी, वरिष्ठ अधिकारी, महिलांचे कपडे, अॅक्सेसरीज आणि सौंदर्यप्रसाधनांची विक्री किंवा वितरण, मनोरंजन, मॉडेल, छायाचित्रकार, गायक, अभिेता, संगीतकार, लग्नाचे कपडे तयार करणारे, अॅक्सेरीज, भेटवस्तूंचा व्यवसाय, जीवशास्त्रज्ञ, सोनार, कापूस, लोकर किंवा रेशीम याचा वापर होणारे काम, ही तुमच्यासाठी अनुकूल कार्यक्षेत्रे असतील.

कौटुंबिक आयुष्य

तुमचे कौटुंबिक आयुष्य आनंदी असेल. तुमचा जोडीदार आणि मुलांची वागणूक चांगली असेल आणि तुम्हाला त्यांच्याकडून पुरेसा आनंद मिळेल. तुमचा जोडीदार विश्वासू असेल आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी तो सर्वस्व अर्पण करायला तयार असेल. तुमचा प्रेम विवाह अथवा ओळखीच्या व्यक्तीशी विवाह होईल.

Call NowTalk to Astrologer Chat NowChat with Astrologer