Talk To Astrologers

मृगशीरा नक्षत्राची भविष्यवाणी

The symbol of Mrigashira Nakshatra तुमचे एका शब्दात वर्णन करायचे झाले तर संशोधक हा शब्द योग्य ठरेल, कारण तुमचा स्वभाव जिज्ञासू आहे. आध्यात्म, मानसशास्त्र आणि भावनांविषयी अधिकाधिक जाणून घेण्यास तुम्ही नेहमी तयार असता. ज्ञान आणि अनुभव मिळवणे हा तुमचा एक उद्देश असतो. तुमची बुद्दी चौकस आहे आणि तुम्ही एकाच वेळी अनेक गोष्टी समजून घेऊ शकता. तुमचा स्वभाव विनम्र, सौम्य,चैतन्यमय, मित्रत्वाचा आणि उत्साही आहे. तुमचा मेंदू नेहमी सक्रीय असतो आणि नवनवीन विचार नेहमी तुमच्या डोक्यात येत असतात. यामुळे तुम्हाला नवीन लोकांना भेटण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी आवश्यक असणारी मानसिक शांती मिळते. तुम्हाला परंपरा जपत साधे आयुष्य जगायला आवडते. तुमचे विचार हे न्याय्य आणि नि:पक्षपाती आहेत. तुमचे संवादकौशल्य उत्तम आहे आणि तुम्ही एक चांगले गायक आणि कवि आहात. त्याचप्रमाणे उपरोध आणि विनोदाच्याबाबतीतही तुम्ही कुणाहूनही कमी नाही. तुम्ही शक्यतो वाद, विवाद आणि भांडणे टाळता. त्यामुळे तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे, असे लोकांना वाटते, पण यात अजिबात तथ्य नाही. सत्य हे आहे की, तुम्हाला तुमचे आयुष्य आनंदात जगायचे आहे आणि निरर्थक गोष्टींनी तुम्ही महत्त्व देत नाही. प्रेम आणि सहकार्य हा यश आणि आनंदाचा पाया आहे, यावर तुमचा विश्वास आहे. कार्यकारणभाव तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, म्हणूनच तुम्ही प्रत्येक गोष्टीचे सखोल विश्लेषण करता. तुमचे विचार आणि श्रद्धेवर तुमचा गाढ विश्वास आहे. इतरांचा विचार करता तुम्ही त्यांच्याशी चांगले वागता आणि तशाच प्रकारच्या वागणुकीची त्यांच्याकडून अपेक्षा करता. पण दुर्दैवाने असे होत नाही. मित्र, भागीदार आणि नातेवाईकांशी वागताना तुम्ही नेहमी सतर्क असता कारण तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते. तुमच्यात नेतृत्वाचा एक वैशिष्टपूर्ण गुण आहे. तुम्ही एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात करता आणि सर्व समस्या सोडवता.

शिक्षण आणि उत्पन्न

तुम्हाला चांगले शिक्षण मिळेल आणि लोकांनी त्यांचा पैसा कसा व कुठे वापरावा, हे तुम्ही सांगाल. पण तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे कठीण जाईल. कधी कधी तुम्ही आर्थिक समस्यांमध्ये ओढले जाल. तुम्ही एक चांगले गायक, संगीतकार, कलाकार, कवि, भाषातज्ज्ञ, प्रेम कादंबरीकार, लेख किंवा विचारवंत म्हणून सिद्ध व्हाल. घरबांधणी, रस्तेबांधणी, पुलबांधणी, उपकरणे किंवा गृहोपयोगी वस्तू तयार करणे, कापड किंवा कपड्यांशी निगडीत काम, फॅशन डिझायनिंग, पाळीव प्राण्यांची निगा किंवा त्यांच्याशी निगडीत वस्तूंची विक्री, पर्यटन विभाग, संशोधनाशी संबंधित कार्य, भौतिक शास्त्र, खगोलशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्राचे शिक्षक, लिपिक, व्याख्याता, करस्पॉन्डन्ट, सर्जन, लष्करी किंवा पोलीस सेवा, चालक, बांधकाम, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी ही क्षेत्रे तुमच्या उपजीविकेचे साधन होऊ शकतील.

कौटुंबिक आयुष्य

तुमचे वैवाहिक आयुष्य चांगले असेल, पण जोडीदाच्या प्रकृतीशी निगडीत समस्या उद्भवू शकतात. तुमचे वैवाहिक आयुष्य आनंदात घालविण्यासाठी तुम्ही हटवादीपणे आणि संशयास्पदपणे वागू नका. तुमच्या वैवाहिक आयुष्यात हळुहळू सकारात्मकता येत जाईल. पती-पत्नीने एकमेकांच्या उणीवांकडे दुर्लक्ष केले तर तुमची जोडी अगदी शिव-पार्वतीसारखी असेल. वयाच्या ३२ व्या वर्षापर्यंत तुम्हाला आयुष्यात अाव्हानांना सामोरे जावे लागेल. त्यानंतर गोष्टी स्थिरस्थावर होतील. वयाची ३३ ते ५० ही वर्षे तुमच्यासाठी अनुकूल आणि यशस्वी राहतील.

Call NowTalk to Astrologer Chat NowChat with Astrologer