Talk To Astrologers

मूळ नक्षत्राची भविष्यवाणी

The symbol of Moola Nakshatra तुमचा स्वभाव गोड आहे आणि तुम्हाला शांतता प्रिय आहे. तुमचा न्यायावर अत्यंत विश्वास आहे. तुमचे लोकांशी चांगले संबंध आहेत आणि तुमचा स्वभाव मैत्रीपूर्ण आहे. आरोग्याचा विचार करता, तुम्ही नेहमी निरोगी असता. तुमचे पक्के विचार आहेत. तुम्ही समाजसेवेते हिरीरिने भाग घेता. तुमच्या गुणांमुळे आणि कामामुळे तुम्हाला प्रसिद्धी आणि नावलौकिक मिळेल. तुमच्या आयुष्याचे काही ठरलेले नियम आहेत. तुम्ही कोणत्याही विपरित परिस्थितीला सामोरे जाऊ शकता आणि तुम्ही सगळे अडथळे पार करून तुमचे लक्ष्य गाठता. एकदा एखादी गोष्ट करायचे तुम्ही ठरवले की, ती तुम्ही करून टाकता. तुम्ही भविष्याची फार चिंता करत नाही किंवा आयुष्यातील संघर्षाची तुम्ही फार पर्वा करत नाही. तुमचा देवावर गाढ विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही सगळं त्या देवावर सोडता. तुम्ही दुसऱ्याला चांगले सल्ले देऊ शकता, पण स्वत:च्या बाबतीत फार शिथिल असता. तुम्ही तुमच्या कामात प्रामाणिक आहात. त्याचप्रमाणे तुमचे मन सहसा शांत नसते. तुम्हाला अनेक विषयांबाबत ज्ञान आहे आणि तुम्हाला लेखन, कला किंवा सामाजिक क्षेत्रात विशेष यश मिळू शकेल. मित्रांबाबत तुम्ही फार उदार झालात तर तुम्ही आर्थिक अडचणीत येऊ शकाल. तुमच्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्च करणे ही तुमची सवय आहे. तुम्ही तुमच्या जन्मस्थळापासून दूर गेलात की, तुमचे गुण आणि नशीब उजळून निघेल. तुम्हाला परदेशी जायची संधी मिळाली तर तुम्हाला मोठा लाभ होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांकडून पाठींबा मिळाला किंवा न मिळाला काय, तुम्ही तुमचे विधिलिखत स्वत: रचाल. तुम्ही अभ्यासात खूप हुशार आहात आणि तत्वज्ञानामध्ये तुम्हाला विशेष रुची असेल. तुम्ही आदर्शवादी आहात आणि तुमच्या स्वत:च्या आदर्शांवर मार्गक्रमण करता. समजा एखाद्या वेळी आदर आणि संपत्ती असे दोन पर्याय तुमच्यासमोर ठेवले तर तुम्ही आदर मिळविण्यास प्राधान्य द्याल. तुम्ही नोकरी आणि व्यवसाय या दोहोंमध्ये यशस्वी व्हाल. पण तुमची प्रथम पसंती नोकरीला असेल. तुम्ही ज्या क्षेत्रात जाता, त्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी पोहोचता. शारीरिक कष्ट करण्यापेक्षा तुमचे काम कसे पूर्ण करून घ्यायचे हे तुम्हाला व्यवस्थित माहीत आहे. आध्यात्माची तुम्हाला आवड असून पैशाचा फार मोह नाही. गरजूंसाठी असलेल्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही सक्रीय सहभाग घेता. त्यामुळे तुम्हाला खूप आदर मिळतो. मैत्रीचा विचार करता समाजातील उच्चभ्रूंचा क्रमांक तुमच्या यादीत वर असतो. तुमचे आयुष्य आनंद आणि ऐशआरामाचे आहे आणि तुम्ही त्या सगळ्याचा उपभोग घेता.

शिक्षण आणि उत्पन्न

औषधशास्त्र, दंतचिकित्सा, मंत्री, व्याख्याते, ज्योतिषी, पोलीस अधिकारी, हेर, न्यायधीश, सैनिक, संशोधक, जीवाणू या विषयातील संशोधक, अंतराळवीर, व्यावसायिक, राजकारणी, गायक, समुपदेशक, औषधे आणि वनौषधींशी संबंधित व्यवसाय, अंगरक्षक किंवा सुरक्षा कर्मचारी, कुस्तीपटू, गणितज्ज्ञ किंवा संगणकतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, कोळशाशी किंवा पेट्रोलिअम पदार्थांशी संबंधित काम ही कार्यक्षेत्रे तुमच्यासाठी अनुकूल असतील.

कौटुंबिक आयुष्य

तुम्ही स्वत:च्या बळावर सर्वकाही मिळविले आहे. तुमचे कुटुंब तुम्हाला मदत करते किंवा नाही, याने काही फरक पडत नाही. तुमचे वैवाहिक आयुष्य समाधानी असेल. जोडीदार सर्वगुणसंपन्न आणि तुम्हाला पाठींबा देणारा असेल.

Call NowTalk to Astrologer Chat NowChat with Astrologer