Talk To Astrologers

कृत्तिका नक्षत्राची भविष्यवाणी

The symbol of Krittika Nakshatra तुम्ही चांगले सल्लागार आणि सकारात्मक व्यक्ती आहात. रुबाबदार वागणूक हे तुमचे वैशिष्ट्य आहे आणि सुखवस्तू आयुष्य जगाल. तुमचा चेहरा अत्यंत चैतन्यपूर्ण आहे आणि तुमचा चालण्याचा वेगसुद्धा जलद आहे. इंग्रजीमधील क्रिटिकल हा शब्द कृतिका या शब्दावरून बेतलेला आहे. त्यामुळेच तुम्ही दुसऱ्यामधील उणीवा बारकाईने पाहता आणि ते सुधारण्याचा प्रयत्न करता. त्याचप्रमाणे एखाद्या कामाच्या नष्कर्षाचे विश्लेषण करण्यात तुम्ही तज्ज्ञ आहात आणि त्यातील छुपे फायदे-तोटे तुम्ही शोधू शकता. तुम्ही नेहमी तुमचा शब्द पाळता आणि तुम्हाला समाजसेवेत रुची अाहे. तुम्ही प्रसिद्धीपराङ्मुख आहात आणि तुम्हाला कुणाकडूनही उपकार नको असतात. तुमचा स्वावलंबनावर विश्वास आहे. त्याचप्रमाणे तुम्ही परिस्थितीशी जुळवून घेत नाही आणि तुम्ही तुमच्या निर्णयांवर ठाम असता. तुमचे बाह्यरूप कठोर वाटू शकते, पण तुमच्या आत मात्र खूप प्रेम, माया, कारुण्य भरलेले आहे. केवळ बेशिस्त वागण्यामुळे तुम्हाला प्रचंड राग येतो. तुम्हाला कुणालाही घाबरवायची इच्छा नसते. याशिवाय तुम्हाला आध्यात्मात रुची असेल. जप, तप, उपवास इत्यादी मार्ग अनुसरून तुम्ही आध्यात्मिक प्रगती साधाल. एकदा तुम्ही आध्यात्मिक मार्गावर चालायचे ठरवले की, तुम्हाला तिथे जाण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. तुम्ही मेहेनती व्यक्ती असून एखादी गोष्ट नियमितपणे करण्यावर तुमचा विश्वास आहे. शिक्षण असो, नोकरी किंवा व्यवसाय असो, तुम्हाला सर्वांच्या पुढे राहायचे आहे. अपयश आणि मागे राहणे तुम्ही सहनच करू शकत नाही. तुम्ही खूप प्रामाणिक असल्यामुळे फसविले जाण्याचीही शक्यता आहे. जर तुम्ही तुमच्या जन्मस्थळापासून जास्तीत जास्त काळ लांब राहिलात तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. दुसऱ्याला समस्या सोडविण्यासाठी चांगला सल्ला देऊ शकण्याची क्षमता तुमच्यात आहे. तुम्हाला दुसऱ्या कोणाच्या दयेने किंवा चुकीच्या मार्गाने मिळणाऱ्या प्रसिद्धी, संपत्तीची हाव नाही. तुमच्याकडे अर्थाजन करण्यासाठी उत्तम कौशल्य आहे आणि कष्टाने कोणतेही ध्येय साध्य करण्याची तुम्हाला सवय आहे. तुम्ही आयुष्यात स्वत:च्या नियमांनुसार आणि तत्वांनुसार चालणारी व्यक्ती आहात. तुम्हाला संगीत आणि कलेत विशेष रुची असेल. त्याचप्रमाणे तुम्ही दुसऱ्याला चांगल्या प्रकारे शिकवू शकता.

शिक्षण आणि उत्पन्न

तुम्ही बहुतेक वेळा तुमच्या जन्मस्थळी राहत नाही. तुम्ही कामानिमित्त विविध ठिकाणी फिरत असता. औषधविक्रेता (फार्मसिस्ट), अभियांत्रिकी, दागिन्यांशी संबंधित काम, विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी किंवा खात्याचे अध्यक्ष, वकील, न्यायाधीश, लष्कर, पोलीस किंवा सुरक्षा दल, अग्निशमन अधिकारी, बालसुरक्षा विभाग, अनाथालयाशी संबंधित काम, व्यक्तिमत्त्व विकास किंवा आत्मविश्वासवृद्धीशी संबंधित काम, आध्यात्मिक गुरू किंवा वक्ता, आगीशी संबंधित व्यवसाय म्हणजे मिठाई, बेरी, वेल्डिंग, स्मिथिंग, शिवणकाम-एब्रॉयडरी, सिरॅमिक, भांडी तयार करणे आणि ज्या कामांमध्ये आगीशी किंवा धारदार वस्तूंशी संबंध आहे ते व्यवसाय तुमच्यासाठी नशीबवान ठरू शकेल.

कौटुंबिक आयुष्य

तुमचे वैवाहिक आयुष्य सुखाचे असेल. तुमचा जोडीदार कौशल्यपूर्ण, वचनबद्ध, निष्ठावान आणि घर सांभाळणारा असेल. घरात इतके चांगले वातावरण असूनही तुमच्या जोडीदाराची प्रकृती मात्र काळजी करण्यासारखी असेल. तुमची तुमच्या आईशी जवळीक आहे आणि तुमच्या भावंडांपेक्षा तुमच्या आईकडून तुम्हाला जास्त प्रेम मिळेल. वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत तुमचे आयुष्य खडतर असेल. पण ५० ते ५६ वर्षांचा काळात मात्र अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडतील.

Call NowTalk to Astrologer Chat NowChat with Astrologer