Talk To Astrologers

चित्रा नक्षत्राची भविष्यवाणी

The symbol of Chitra Nakshatra तुम्ही खूप मेहेनती आणि समाजात वावरणारे आहात. तुमचे बहुधा सगळ्यांशीच चांगले संबंध आहेत. तुम्ही कुणालाही भेटल्यावर भरपूर प्रेम व्यक्त करता. तुमच्यात उत्तम वक्तृत्वगुण आहे आणि तुम्ही तुमच्या नात्यांमध्ये नेहमी समतोल साधण्याचा प्रयत्न करता. तुम्ही खूप भावनिक आहात. पण तुम्ही फायदा-नुकसानही चांगल्या प्रकारे जाणता. त्यामुळे तुम्ही तुमच्या भावनांना तुमच्या सामाजिक जीवनावर वर्चस्व गाजवू देत नाही. तुमच्यात नेहमी उर्जा सळसळत असते आणि तुम्ही धाडसी आहात. काहीही असले तरी तुम्ही तुमच्या उर्जेने ते काम पूर्ण करता. कोणत्याही विपरित परिस्थितीमध्ये तुम्ही बावरून जात नाही. उलट तुमच्या धाडसी स्वभावानुसार तुम्ही त्या समस्यांना सामोरे जाता, त्यावर मात करता आणि पुढे जाता. तुम्हाला काहीतरी वेगळे करायला आवडते आणि तुम्ही स्वस्थ बसू शकत नाही. तुम्ही कोणतेही काम न करण्यासाठी कारणे शोधत नाही, जे काही करायचे आहे, ते लवकरात लवकर करण्याकडे तुमचा कल असतो. एखादी गोष्ट पूर्ण करून झाल्यावर लगेचच दुसरे काहीतरी करण्यात तुम्ही व्यग्र होता. तुम्ही लगेचच दुसरे काम घेता. किंबहुना विश्रांती हा शब्दच तुम्हाला माहीत नाही. तुम्ही कधी कधी हट्टी होता. तुम्ही नोकरीपेक्षा व्यवसायाला प्राधान्य देता कारण व्यवसायाशी निगडीत गोष्टींमध्ये तुमचा मेंदू अधिक चांगले काम करतो. याच उद्योगी विचारांमुळे तुम्हाला खूप यश मिळेल. तुमचे तुमच्या वाणीवर प्रभूत्व आहे, पण तुम्ही राग नियंत्रणित करणे आवश्यक आहे आणि संयमाने काम केले पाहिजे. तुम्ही सहजासहजी निराश होत नाही कारण आशावादी राहणे, हा तुमचा अजून एक चांगला गुण आहे. संपत्ती गोळा करणे तुम्हाला अत्यंत आवडते आणि तुम्हाला भौतिक सुखांचा उपभोग घ्याला आवडतो. तुम्हाला विज्ञान आणि कलेच्या क्षेत्रात चांगली रुची आहे. एखादी उणीव तुम्ही पटकन भरून काढता आणि आपल्या तुमची झळाळी शाबूत कशी ठेवायची, हे तुम्हाला चांगले ठावूक आहे. तुमचे बांधलेला अंदाज बहुधा योग्य निघतो, त्यामुळे तुमचे विश्लेषण नेहमी बरोबर असते. तुमच्या हटवादीपणामुळे तुम्हाला कधीकधी विरोधही सहन करावा लागू शकतो. पण, तुमची वाढ होण्यासाठी या अडथळ्यांचा उपयोग होणार आहे. वयाच्या ३२ व्या वर्षापर्यंत तुमचे आयुष्य काहीसे खडतर असेल, पण त्यानंतर सर्वकाहीच अद्भूत असेल. तुमच्या वडिलांकडून तुम्हाला विशेष प्रेम आणि संरक्षणही मिळेल. विज्ञानाचे तुम्हाला नेहमीच आकर्षण राहील आणि बहुधा तुम्ही याच शाखेतून शिक्षण घ्याल. तुम्ही आकर्षक, स्वातंत्र्याचे भोक्ते आहात, पण कधीतरी बेजबाबदारपणे वागता.

शिक्षण आणि उत्पन्न

वास्तु तज्ज्ञ, फॅशन डिझायनर, मॉडेल, सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित कामे, प्लास्टिक सर्जरी, शस्त्रक्रीया, छायाचित्रण, ग्राफिक डिझायनिंग, संगीत दिग्दर्शक किंवा गीतकार, सोनार, चित्रकार किंवा कलाकार, पटकथा लेखक, औषधाशी संबंधित कामे, जाहिरातीशी निगडित कामे इत्यादी क्षेत्रा तुमच्यासाठी अनुकूल आहेत.

कौटुंबिक आयुष्य

तुमचे तुमच्या पालकांवर आणि भावंडांवर खरे प्रेम आहे. पण, तुमच्या कामाच्या स्वरुपामुळे तुम्हाला त्यांना कदाचित सोडावे लागेल. तुम्हाला तुमच्या जन्मस्थळापासून कदाचित दूर जाऊन राहावे लागेल. त्यामुळ तुम्हाला तुमच्या पालकांपासून दूर जाऊन राहावे लागेल. वैवाहिक आयुष्यात तुम्ही नेहमी तंटे आणि वादविवादांपासून दूर राहा, नाही तर तुम्हा दोघांमध्ये समस्या निर्माण होतील.

Call NowTalk to Astrologer Chat NowChat with Astrologer