अश्विनी नक्षत्राची भविष्यवाणी
तुम्ही स्वभावाने बऱ्यापैकी उत्साही आणि क्रियाशील आहात. त्याचप्रमाणे तुम्ही नेहमीच
खूप उत्साही असता. मूलभूत गोष्टींनी तुम्हाला समाधान मिळत नाही आणि तुम्ही नेहमी काहीतरी
मोठे ध्येय साध्य करण्यासाठी धडपडत असता. आपले काम लवकरात लवकर संपवणे हे तुमच्या स्वभावातच
आहे. वेग, उर्जा आणि क्रियाशीलता तुमच्यात स्पष्टपणे दिसून येते. तुमच्या डोक्यात एखादी
कल्पना आली, तर तुम्ही लगेचच ती कल्पना अमलात आणता. तुम्ही खिलाडूवृत्तीचे आणि बुद्धिमान
आहात. तुमचा सर्वात चांगला गुण म्हणजे तुम्ही सर्वकाही व्यवस्थित जाणून घेतल्यावरच
योग्य तो निर्णय घेता. तुमच्या स्वभावातच एक प्रकारचा गुढपणा आहे, ज्यामुळे तुम्हाला
धार्मिक, अलौकिक आणि गुप्त ज्ञानाबद्दल कुतूहल असते. तुम्ही बिनधास्त आणि धाडसी आहात,
पण तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. शत्रूकडून तुम्हाला फारसा त्रास
संभवत नाही, कारण त्यांना कसे सामोरे जयचे हे तुम्हाला नीट माहीत आहे. सत्ता, दबाव
किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तुम्ही वश होऊ शकत नाही, केवळ प्रेम आणि ममतेने तुम्हाला
जिंकता येऊ शकेल. तुमच्या बाह्यरुपावरून तुम्ही शांत आणि संयमी वाटता; जो कधीही घाईघाईत
निर्णय घेत नाही. एखाद्या गोष्टीबाबत सखोल विश्लेषण केल्यावरच तुम्ही निर्णय घेता आणि
एकदा तुम्ही एखादा निर्णय घेतला की, तो बदलण्याची शक्यता फारच कमी असते. दुसऱ्याच्या
प्रभावाचा तुमच्या निर्णयावर परिणाम होणे तुमच्या स्वभावात नाही. तुमचे काम पूर्ण कसे
करायचे याची तुम्हाला चांगली समज आहे. या सगळ्याबरोबरच तुम्ही एक चांगले मित्र आहात.
तुमच्या जवळच्यांसाठी तुम्ही काहीही करू शकता. तुम्हाला एखादा कुणी संकटात सापडलेला
दिसला तर तुम्ही त्याला शक्य तेवढी मदत देऊ करता. परिस्थिती कितीही बिघडली तरी तुम्ही
शांत असता आणि तुमची इश्वरावरील श्रद्धा अढळ असते. एकीकडे तुम्हाला परंपरांविषयी प्रेम
असले तरी तुम्ही नवीन विचारांचाही स्वीकार करता. या सगळ्याबरोबरच तुम्ही तुमचे आजुबाजूचे
वातावरण स्वच्छ आणि नीटनेटके ठेवता.
शिक्षण आणि उत्पन्न
तुम्ही अष्टपैलू आहात. याचा अर्थ तुम्हाला बहुतेक प्रत्येक विषयाच्या बाबतीत थोडी माहिती
निश्चित असेल. तुमच्या करिअरमध्ये शैक्षणिक विभाग तुमच्यासाठी उत्तम असेल. असे असले
तरी तुम्ही औषधशास्त्र, सुरक्षा, पोलीस, लष्कर, गुप्त सेवा, अभियांत्रिकी, शिक्षक,
प्रशिक्षण इत्यादी क्षेत्रांमध्येही प्रयत्न करू शकता. तत्त्वज्ञान आणि संगीताकडे तुमचा
ओढा असेल आणि यातूनही तुम्हाला अर्थार्जन करता येऊ शकेल. वयाच्या तीसाव्या वर्षापर्यंत
तुम्हाला अनेक चढउतार पाहावे लागतील.
कौटुंबिक आयुष्य
तुमचे तुमच्या कुटुंबावर जीवापाड प्रेम आहे. असे असले तरी तुमचे तुमच्या वडिलांशी काही
वाद होण्याची शक्यता आहे. पण तुमच्या आईकडील नातेवाईक नेहमीच तुमच्या पाठीशी उभे राहतील
आणि परिवाराच्या बाहेरील लोकांकडूनही तुम्हाला मदत मिळू शकते. तुमचे वैवाहिक आयुष्य
आनंददायी असेल. तुम्हाला कन्यारत्नांपेक्षा पुत्ररत्न अधिक असतील.