‌ ‌‌ मेष राशि भविष्य 2025

Author: Yogita Palod | Updated Fri, 04 Oct 2024 04:37 PM IST

मेष राशि भविष्य 2025 च्या माध्यमाने वर्ष 2025 मेष राशीतील जातकांचे स्वास्थ्य, शिक्षण, व्यापार-व्यवसाय, नोकरी, आर्थिक पक्ष, प्रेम, विवाह, वैवाहिक जीवन, घर गृहस्थी व भूमी-भवन-वाहन इत्यादींसाठी कसे राहणार आहे? याच्या व्यतिरिक्त, या वर्षीच्या ग्रह गोचर च्या अधर्वट आम्ही तुम्हाला काही उपाय ही सांगू, जे करून तुमच्या संभावित समस्या किंवा दुविधा दूर होऊ शकतात. चला तर पुढे जाऊन जाणून घेऊया की, मेष राशीतील जातकांसाठी मेष राशि भविष्य 2025 काय सांगत आहे?


Read in English - Aries Horoscope 2025

वर्ष 2025 मध्ये मेष राशीतील जातकांचे स्वास्थ्य

मेष राशीतील जातकांसाठी स्वास्थ्य दृष्टिकोनाने वर्ष 2025 तुमच्यासाठी मिळता जुळता किंवा थोडा कमजोर राहू शकतो. अतः या वर्षीच्या स्वास्थ्याचे अपेक्षाकृत अधिक काळजी घेणे गरजेचे राहील. मेष राशि भविष्य 2025 च्या अनुसार वर्षाच्या सुरवाती पासून मार्च पर्यंत शनी तुमच्या लाभ भावात राहतील, ही चांगली गोष्ट आहे परंतु, शनीची तिसरी दृष्टी कुंडली च्या प्रथम भावात राहील. अतः थोडी जागरूकता असणे गरजेचे असेल. नंतर ही मार्च पर्यंतची वेळ स्वास्थ्य साठी अनुकूल राहील. या नंतर शनीचे गोचर दवडष भावात असण्याच्या कारणाने चंद्र कुंडलीच्या अनुसार साडेसातीच्या स्थितीची निर्मिती होईल. फळस्वरूप, इतर वेळी आरोग्याची काळजी घेणे अधिक गरजेचे राहील. तसेच शक्यतो तणावापासून मुक्त राहून चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करा. धावपळ आणि श्रम परिश्रम ही आपल्या स्वास्थ्य च्या अनुसार कराल तर आरोग्य अनुकूल कायम राहील.

हिंदी में पढ़ने के लिए यहां क्लिक करें: मेष राशिफल 2025

अ‍ॅस्ट्रोवार्ता : आमच्या ज्योतिषींसोबत बोला फोनवर आणि मिळवा, जीवनातील प्रत्येक समस्येचे समाधान!

वर्ष 2025 मध्ये मेष राशीतील जातकांचे शिक्षण

मेष राशीतील जातक, शिक्षणाच्या दृष्टिकोनाने वर्ष 2025 तुमच्यासाठी उत्तम राहू शकते. तसेच, जर तुमचे स्वास्थ्य पूर्णतः अनुकूल कायम असेल आणि तुम्ही पूर्ण मनोयोगाने शिक्षण कराल तर, परिणाम अधिक चांगले राहू शकतात. तसे सामान्यतः उच्च शिक्षणाचा कारक बृहस्पतीची स्थिती मे मानण्याच्या मध्य पर्यंत अपेक्षाकृत अधिक अनुकूल राहण्याच्या कारणाने या काळात अध्ययनाचा स्तर अधिक चांगला राहील. या नंतरची वेळ घरापासून दूर राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर अधिक सांगितली जाईल सोबतच, टूर आणि ट्रॅव्हल ने जोडलेल्या शिक्षणासाठी विद्यार्थी, मासकॉम किंवा दूर संचार इत्यादीने जोडलेल्या विषयांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम परिणाम प्राप्त होत राहील परंतु, इतर विद्यार्थ्यांना अपेक्षाकृत अधिक मेहनत करण्याची आवश्यकता राहू शकते.

वर्ष 2025 मध्ये मेष राशीतील जातकांचा व्यापार

मेष राशि भविष्य 2025 च्या अनुसार, व्यापार व्यवसायाने जोडलेल्या लोकांसाठी ही हे वर्ष मिळते-जुळते परिणाम देणारे प्रतीत होत आहे तथापि, वर्षाच्या सुरवाती पासून मार्च च्या महिन्यापर्यंत व्यापार व्यवसायात उत्तम नफा होतांना प्रतीत होत आहे. तुम्ही आपल्या मेहनतीच्या अनुरूप आपल्या व्यापार व्यवसायाला योग्य आणि चांगली दिशा देऊ शकाल परंतु, मार्च नंतर शनी ग्रहाचे द्वादश भावात जाणे काही लोकांसाठी कठीण समस्या देण्याचे काम करू शकतात तथापि, असे लोक जे आपल्या जन्मभूमी किंवा घरापासून दूर राहून व्यापार व्यवसाय करत आहे त्यांना तेव्हा ही संतोष परिणाम मिळत राहतील. विदेशात राहून व्यापार करणारे लोक अथवा विदेशी कंपन्यांसोबत जोडलेले लोक ही चांगले परिणाम प्राप्त करू शकतील इतर लोकांना अपेक्षाकृत काही कठीण समस्या पहायला मिळू शकतात.

बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा पूर्ण लेखा-जोखा

वर्ष 2025 मध्ये मेष राशीतील जातकांची नोकरी

मेष राशीतील जातक, नोकरीच्या दृष्टिकोनाने या वर्षीच्या सुरवातीपासून मार्च पर्यंतची वेळ अपेक्षाकृत अधिक चांगली राहील. तसेच नंतरची वेळ काही प्रमाणात कठीण समस्या देण्याचे काम करू शकते तथापि, मे नंतर राहू ग्रहाच्या गोचरची अनुकूलता तुलनात्मक रूपात उत्तम परिणाम देण्याचे काम करेल परंतु, शनी ची स्थिती पाहता अपेक्षेपेक्षा अधिक मेहनत करण्याची आवश्यकता पडू शकते. ज्या लोकांची नोकरी यात्रेने जोडलेली आहे अथवा ज्यांना ऑफिस नाही तर, फिल्ड मध्ये राहून काम करावे लागते त्यांना त्यांच्या मेहनतीच्या अनुरूप परिणाम मिळत राहतील परंतु, इतर लोकांना काही कठीण समस्या पहायला मिळू शकते. दूरसंचार विभाग, कुरिअर सर्व्हिसेस आणि यात्रेच्या संबंधित कार्यालयात काम करणारे नोकरीपेशा लोक मे नंतर ही चांगले परिणाम प्राप्त करत राहतील परंतु, इतर लोकांना अपेक्षाकृत अधिक मेहनत करण्याची आवश्यकता पडू शकते.

वर्ष 2025 मध्ये मेष राशीतील जातकांचा आर्थिक पक्ष

मेष राशीतील जातक आर्थिक बाबतीत वर्ष 2025 ऍव्हरेज पेक्षा बऱ्याच प्रमाणात उत्तम परिणाम देऊ शकतात. वर्षाच्या सुरवातीपासून मे महिन्याच्या मध्य पर्यंत धन चा कारक बृहस्पतीच्या धन भावात असणे, आर्थिक बाबतीत चांगले परिणाम देण्याचे काम करेल. अतः धन संचय करण्याच्या बाबतीत ही तुमचे प्रयत्न यशस्वी राहतील तसेच, मे नंतर बृहस्पती दुसऱ्या भावातून आपल्या प्रभावाला समेटतील परंतु, तिसऱ्या भावात जाऊन ते लाभ भावाला पाहतील. फळस्वरूप, लाभ मिळत राहील. मे नंतर राहूचे गोचर ही लाभ भावात होण्याच्या कारणाने लाभाचे प्रमाण वाढेल. अर्थात बचतीसाठी जरी 2025 थोडे कमजोर राहील परंतु, कमाई च्या दृष्टिकोनाने हे वर्ष चांगले असेल. या गोष्टीची अधिनिक शक्यता प्रतीत होत आहे. तुम्ही आपल्या मेहन्तीकय्या अनुसार आपल्या आर्थिक स्थितीला कायम ठेऊ शकाल.

तुमच्या कुंडली मध्ये ही आहे राजयोग? जाणून घ्या आपला राज योग रिपोर्ट

वर्ष 2025 मध्ये मेष राशीतील जातकांचे प्रेम जीवन

मेष राशि भविष्य 2025 च्या अनुसार, प्रेम संबंधाच्या बाबतीत वर्ष 2025 मिळते जुळते परिणाम देऊ शकते. वर्षाच्या सुरवातीपासून मार्च च्या महिन्यापर्यंत पंचम भावावर शनी ग्रहाची दृष्टी खरे प्रेम करणाऱ्या लोकांना नुकसान पोहचवले परंतु, इतर लोकांना काही समस्या पहायला मिळू शकतात तसेच, मे नंतर पंचम भावात केतूचा प्रभाव परस्पर गैरसमज देण्याचे काम करू शकते. अश्या स्थितीत प्रेम संबंधात विश्वसनीयता कायम ठेवणे आवश्यक राहील. एकमेकांच्या प्रति लॉयल राहणे खूप गरजेचे राहील तेव्हाच तुम्हाला अनुकूलतेचे दर्शन होऊ शकतील अथवा, संबंधात कमजोरी पहायला मिळू शकते.

वर्ष 2025 मध्ये मेष राशीतील जातकांचा विवाह व वैवाहिक जीवन

मेष राशीतील जातकांचे जर वय विवाहाचे झालेले आहे आणि तुम्ही विवाहासाठी ही प्रयत्न करत आहे तर, हे वर्ष या बाबतीत तुमच्यासाठी मदत करू शकते. वर्षाच्या सुरवाती पासून मे महिन्याच्या मध्य पर्यंत दुसऱ्या भावाचे बृहस्पती कौटुंबिक लोकांच्या संख्येत वृद्धी करवण्याचे काम करू शकते अश्या स्थिती मध्ये विवाहाचे योग बनू शकतात. तसेच, मे मध्य नंतर बृहस्पती पंचम दृष्टीने सप्तम भावाला पाहून विवाहाचे योग निर्मित करेल. वैवाहिक जीवनाची गोष्ट केली असता ता बाबतीत ही वर्ष 2025 बरेच चान्गले परिणाम देऊ शकते. मेष राशि भविष्य 2025 च्या अनुसार, तुमचे दाम्पत्य जीवन सुखमय राहण्यासाठी चांगले योग कायम राहतील.

वर्ष 2025 मध्ये मेष राशीतील जातकांचे कौटुंबिक व गृहस्थ जीवन

मेष राशीतील जातकांचे, कौटुंबिक बाबतीत वर्ष 2025 मिळते जुळते परिणाम देऊ शकते. वर्षाची सुरवात बरेच चांगले परिणाम देणारे प्रतीत होत आहे तसेच, वर्षाच्या दुसऱ्या हिस्यात काही कौटुंबिक सदस्यांमध्ये वाद पहायला मिळू शकतात. या वाद किंवा नाराजी च्या मागे कुठल्या सदस्याची विनाकारण जिद्द कारण बनू शकते अश्यात, तार्किक बोलायचे झाले तर, व्यर्थ जिद्द आणि विवाद करणे टाळा तेव्हा परिणाम चांगले राहतील तसेच, गृहस्थ संबंधित बाबतीत हे वर्ष मिळते जुळते परिणाम देऊ शकते. मेष राशि भविष्य 2025 च्या अनुसार, तुम्ही आपल्या गरज आणि मेहनतीच्या अनुरूप घर गृहस्थी ला सजवण्याचे काम कराल. कुठल्या ही मोठ्या विसंगतीचे योग नाही तर, तुमचे सातत्य, निष्ठा आणि कौटुंबिक सदस्यांच्या संयुक्त प्रयत्नाच्या अनुसार तुमचे गृहस्थ जीवन चांगले राहील.

वाचा: राशि भविष्य 2025

वर्ष 2025 मध्ये मेष राशीतील जातकांचे भूमी, भवन, वाहन सुख

मेष राशीतील जातकांसाठी भूमी आणि भवन संबंधित बाबतीत वर्ष 2025 ऍव्हरेज परिणाम देतांना प्रतीत होत आहे. जर तुम्ही आधीपासून कुठं;इ जमीन खरेदी करत आहे तर, त्यावर घर बनवण्याची इच्छा ठेवतात तर प्रयत्न करून तुम्ही करू शकाल. कुठल्या ही मोठ्या उपलब्धीचे योग नाही परंतु, जर तुम्ही इमानदारीने कुठल्या बाबतीत सतत प्रयत्न करत रहाल तर, काही दिवसानंतर तुमचे प्रयत्न फळाला लागू शकतात म्हणजे, तुम्ही भूमी किंवा भवन सुख प्राप्त करू शकतात. वाहन इत्यादी संबंधित बाबतीत ही या वर्षी तुम्हाला मिळते जुळते परिणाम प्रतीत होत आहे. जर तुमचे जुने वाहन योग्यरित्या काम करत आहे तर, नवीन वाहनावर खर्च करणे आत्ता सध्या योग्य नसेल. तसेच, जर तुमच्या जवळ वाहन नाही अथवा जुने वाहन पूर्णतः खराब झालेले आहे तर काही एक्स्ट्रा प्रयत्न केल्यानंतर तुम्ही नवीन वाहनाची सुख प्राप्ती करू शकाल. अर्थात, भूमी, भवन, वाहन इत्यादी संबंधित बाबतीत वर्ष अधिक सपोर्ट करतांना प्रतीत होत नाही परंतु, कुणी विरोध ही करणार नाही म्हणजे, तुम्ही आपल्या मेहनतीच्या अनुरूप परिणाम प्राप्त करू शकाल.

वर्ष 2025 मध्ये मेष राशीतील जातकांसाठी उपाय

रत्न, यंत्र, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा :अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

1. 2025 मध्ये मेष राशी कशी राहील?

2025 मध्ये मेष राशीतील जातकांच्या जीवनाच्या विभिन्न दृष्टीने अनुकूल परीबां प्राप्त होतील. या वर्षी तुम्हाला वाहनाचे सुख नशीब होऊ शकते.

2. मेष राशीतील सर्वात मोठी समस्या काय आहे?

मेष राशीतील जातकांची सर्वात मोठी समस्या त्यांच्या मनाची चंचलता आहे.

3. मेष राशीतील जातकांचा वेळ केव्हापर्यंत खराब राहणार आहे?

29 मार्च 2025 पासून मेष राशीवर शनीची साडेसाती सुरु होईल. 31 मे 2032 पर्यंत मेष राशीवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव राहील.

Talk to Astrologer Chat with Astrologer