जेष्ठ महिना 2024

Author: Yogita Palod | Updated Fri, 17 May 2024 03:06 PM IST

हिंदी कॅलेंडर चा तिसरा महिना जेष्ठ चा महिना असतो. ग्रेगोरियन कॅलेंडर मध्ये हे मे आणि जून मध्ये येते.जेष्ठ महिना 2024 ला हिंदी मध्ये जेठ महिना ही संबोधले जाते, याचा अर्थ असतो मोठा महिना. या महिन्यात खूप उन्हाळा असतो आणि तापमानाचा उचांक खूप जास्त असतो. या महिन्यात सूर्यदेव आपल्या रौद्र रूपात असतात म्हणून, जेष्ठ चा महिना सर्वात अधिक गरम असण्याने समस्यांनी भरलेला ठरतो. सनातन धर्मात जेष्ठ महिन्यात जल बचतीवर अधिक लक्ष दिले जाते म्हणून, या महिन्यात पाण्याचे अधिक महत्व सांगितले गेले आहे. जेष्ठ महिन्यात गंगा दशहरा आणि निर्जला एकादशी सारखे व्रत ठेवले जातात आणि हे व्रत प्रकृतीत पाणी वाचवण्याचे संदेश देते.


भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!

शास्त्रांमध्ये जेष्ठ च्या महिन्याचे खास धार्मिक महत्व सांगितले गेले आहे. धार्मिक मान्यतेच्या अनुसार, जेष्ठ महिन्यात हनुमान, सूर्य देव आणि वरून देवाची विशेष पूजा केली जाते. सांगितले जाते की, वरून जल देवता आहे, सूर्य देव, अग्नी चे आणि हनुमान कलयुगाचे देवता मानले जाते. या पवित्र महिन्यात पूजा-पाठ आणि दान धर्म केल्याने बऱ्याच प्रकारच्या ग्रह दोषापासून मुक्ती मिळते.

अ‍ॅस्ट्रोसेज च्या या विशेष ब्लॉग मध्ये आपण जेष्ठ महिन्याने जोडलेली अधिक माहिती विस्ताराने सांगू. जसे की, या महिन्यात कोण-कोणते सण येतील? या महिन्यात कश्या प्रकारचे उपाय लाभदायी ठरतील? या महिन्याचे धार्मिक महत्व काय आहे? आणि या महिन्यात जातकांनी कोठ्या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे तसेच, या महिन्यात काय दान केले पाहिजे हे सर्व जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा.

जेष्ठ महिना 2024: तिथी

जेष्ठ महिन्याचा आरंभ बुधवारी 22 मे 2024 पासून सुरु होईल आणि याची समाप्ती 21 जून 2024 शुक्रवारी होईल. जेष्ठ महिना भगवान विष्णू चा सर्वात प्रिय महिना आहे. या नंतर आषाढ महिन्याचा प्रारंभ होईल. या महिन्यात भगवान विष्णूच्या पूजेचे विशेष महत्व सांगितले गेले आहे. धार्मिक मान्यता आहे की, या महिन्यात सर्व देवी देवतांची आराधना करण्याने प्रत्येक समस्येपासून सुटका मिळू शकते आणि व्यक्तीला सुख समृद्धी ची प्राप्ती होते.

ज्येष्ठ महिन्याचे महत्व

सनातन धर्मातजेष्ठ महिना 2024 खूप महत्वपूर्ण आणि अहम सांगितला गेला आहे आणि या महिन्यात बरेच उपवास आणि सण येतात. या महिन्यात पाण्याचे विशेष महत्व सांगितले आहे म्हणून, या महिन्यात जल संरक्षण आणि झाडांना पाणी घातल्याने बऱ्याच दुःखांचा नाश होतो. सोबतच पित्र ही प्रसन्न होतात. पौराणिक कथेच्या अनुसार, जेष्ठ महिन्यात भगवान विष्णू आणि त्याच्या चरणांपासून निघणारी देवी गंगेची पूजा केली जाते. या सोबतच, जेष्ठ महिन्यात जितके मंगळवार येतात, त्या सर्वांचे विशेष महत्व आहे आणि येणाऱ्या मंगळवारी हनुमानाच्या नावाचा उपवास केला पाहिजे. यामुळे मनोकामना पूर्ण होतात.

बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा

ज्येष्ठ महिना 2024 येणारे प्रमुख व्रत-सण

ज्येष्ठ महिना म्हणजे की 23 मे 2024 ते 21 जून 2024 च्या वेळेत सनातन धर्मातील बरेच प्रमुख व्रत-सण येणार आहे, जे की अश्या प्रकारे आहे:

तिथी दिवस व्रत व सण
23 मे, 2024 गुरुवार वैशाख पौर्णिमा व्रत
26 मे, 2024 रविवार संकष्टी चतुर्थी
02 जून, 2024 रविवार अपरा एकादशी
04 जून, 2024 मंगळवार मासिक शिवरात्र, प्रदोष व्रत (कृष्ण)
06 जून, 2024 गुरुवार ज्येष्ठ अमावस्या
15 जून, 2024 शनिवार मिथुन संक्रांत
18 जून, 2024 मंगळवार निर्जला एकादशी
19 जून, 2024 बुधवार प्रदोष व्रत (शुक्ल)

ज्येष्ठ महिन्यात जन्म घेणाऱ्या लोकांचे गुण

ज्येष्ठ च्या महिन्यात बऱ्याच लोकांचा वाढदिवस येतो. या लेखात आम्ही तुम्हाला सांगू की, जेष्ठ महिन्यात जन्म घेतलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो आणि त्या मध्ये काय वेगळ्या गोष्टी असतात. ज्योतिष शास्त्रात काही खास तारीख आणि महिन्यांमध्ये जन्म घेतलेल्या लोकांचे वेगवेगळे कौशल्य आणि विशेषता सांगितली गेली आहे. व्यक्ती ज्या महिन्यात जन्म घेतो त्याच्या आधारावरच त्याच्या स्वभावाच्या बाबतीत सांगितले जाऊ शकते. ज्योतिष शास्त्रात सांगितले आहे की, आपल्या जन्माचा महिना आपल्या जीवनावर सकारात्मक व नकारात्मक रूपात प्रभाव टाकतो.

ज्येष्ठ महिन्यात जन्म घेणारे व्यक्ती बरेच ज्ञानी असतात आणि याचा कल अध्यात्मिक गोष्टींकडे अधिक असतो. यामुळे ते धर्म-कर्माच्या बाबतीत अधिक लीन असतात. या जातकांना तीर्थ स्थळी फिरायला जायला अधिक आवडते. हे जातक आपल्या जीवनसाथीची बरीच काळजी घेतात आणि अधिक प्रेम ही करतात.

ज्येष्ठ महिन्यात जन्मलेल्या काही जातकांना परदेशात राहावे लागते. या शिवाय या लोकांना परदेशातून ही लाभ मिळतो. या जातकांना मुख्यतः त्यांच्या घरापासून दूर राहण्यास भाग पाडले जाते. त्यांच्या मनात कोणाबद्दल ही वैर नसते. यांना पैशाची कमतरता नसते. दीर्घायुष्य लाभते आणि त्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग चांगल्या कामात करायला आवडते.

या जातकांच्या प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, हे जातक खूप रोमँटिक असतात आणि आपल्या जोडीदारासोबत सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास सक्षम असतात. ते त्यांच्या नात्याची खूप काळजी घेतात आणि इतर कोणाचा हस्तक्षेप त्यांना आवडत नाहीत. ते छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि गोष्टींशी त्यांचा संबंध बिघडवत नाहीत. त्यांचा स्वभाव विनोदी आहे, त्यामुळे त्यांचे नाते आनंदाने भरलेले आहे. जोडीदारासाठी ते काहीही करायला तयार असतात. ज्येष्ठ महिन्यात जन्मलेल्या जातकांचे काही नकारात्मक पैलू ही असतात. जसे की, ते खूप हट्टी असतात आणि खूप लवकर त्यांना राग येतो, ज्यामुळे त्यांना आयुष्यात अनेक चढउतारांना सामोरे जावे लागू शकते. ते जितके दयाळू ही आहेत, तितकेच या लोकांना गोष्टींबद्दल वाईट देखील वाटते. हे जातक सहजपणे कोणावर ही विश्वास ठेवतात आणि यामुळे त्यांची आयुष्यात अनेकदा फसवणूक होऊ शकते.

ज्येष्ठ महिन्यात जल दान करण्याचे महत्व

जेष्ठ महिना 2024 मध्येजल दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. आपण सर्वजण पाण्याशिवाय जगण्याचा विचार ही करू शकत नाही म्हणूनच, असे म्हटले जाते की पाणी हे जीवन आहे. पाणी दान करणे नेहमीच चांगले मानले गेले आहे परंतु, जेष्ठ महिन्यात जल दान करणे अधिक पुण्य मानले जाते. या महिन्यात तुम्ही तुमच्या घराच्या छतावर किंवा बागेत पक्ष्यांसाठी पाणी भरून ठेवू शकता. प्राणी आणि पक्षी ही निसर्गाची अनमोल देणगी आहे आणि ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून ही प्राणी आणि पक्ष्यांना पाणी देणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. वास्तविक, सनातन धर्मात प्रत्येक देव-देवतेला काही ना काही वाहन असते आणि ही वाहने प्राणी किंवा पक्षी असतात. अशा स्थितीत ज्येष्ठ महिन्यात पशु-पक्ष्यांना पाणी देणे हे अत्यंत पुण्यपूर्ण कार्य आहे, यामुळे देव प्रसन्न होतो आणि त्याचा विशेष आशीर्वाद मिळतो. याशिवाय ज्येष्ठा महिन्यात गरजू लोकांना पाणी, गूळ, सत्तू, तीळ इत्यादी दान केल्याने भगवान श्री हरी विष्णू ही प्रसन्न होतात. तसेच पितृदोष आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळू शकते.

ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा

ज्येष्ठ महिन्यात काय करावे

ज्येष्ठ महिन्यात काय करू नये

करिअर चे येत आहे टेंशन! आत्ताच ऑर्डर करा कॉग्निअ‍ॅस्ट्रो रिपोर्ट

ज्येष्ठ महिन्यात नक्की करा हे खास उपाय

या महिन्यात काही विशेष उपाय केले पाहिजेत. असे मानले जाते की, यामुळे लक्ष्मीची कृपा होते आणि पैशाची कमतरता भासत नाही. चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल.

नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करण्यासाठी

ज्येष्ठ महिन्यात दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून हनुमानाच्या मंदिरात जाऊन तुळशीच्या पानांचा हार घालावा. या सोबतच हलवा-पुरी किंवा इतर गोड भोग लावा. त्याच्या समोर बसा, त्यानंतर श्री हनुमान चालीसा, बजरंग बाण आणि श्री सुंदरकांड यांचे यथायोग्य पठण करा.

मंगळ दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी

ज्या लोकांच्या कुंडली मध्ये मंगळ दोष आहे त्यांनी ज्येष्ठ महिन्यात मंगळ दोष दूर करण्यासाठी तांबे, गूळ यांसारख्या वस्तूंचे दान करावे.

नोकरी मध्ये पद उन्नतीसाठी

ज्येष्ठ महिन्यात सूर्य देवाचा प्रकाश अतिशय तेजस्वी राहतो. अशा स्थितीत या संपूर्ण महिन्यात सूर्य देवाला अर्घ्य दिल्याने व्यक्तीचा आदर वाढतो आणि नोकरीत बढती ही होते.

मिळवा आपल्या कुंडली आधारित सटीक शनी रिपोर्ट

ज्येष्ठ महिना 2024: ज्येष्ठ महिन्यात राशी अनुसार या वस्तू करा दान

या खास महिन्यात राशी अनुसार उपाय केल्याने साधकाला दुप्पट फळ प्राप्त होईल सोबतच, धन दौलत मध्ये वृद्धीचे योग बनतात.

मेष राशि

मेष राशीच्या जातकांनीजेष्ठ महिना 2024 मध्ये शुक्रवारी लाल कपड्यात मूठभर अंबाडी आणि हळद बांधून तिजोरीत ठेवावी. असे मानले जाते की, यामुळे धन प्राप्तीचा मार्ग सुकर होतो. दर शुक्रवारी अंबाडीच्या बिया बदलण्याचे लक्षात मात्र लक्षात ठेवा.

वृषभ राशि

वृषभ राशीच्या जातकांनी ज्येष्ठ महिन्यात शंखपुष्पी वनस्पतीच्या मुळाला गंगाजलाने धुवून त्यावर केशराचा तिलक लावावा. यानंतर ते तिजोरीत ठेवा. असे केल्याने व्यवसाय दुप्पट वेगाने वाढेल आणि आर्थिक स्थितीत स्थिरता येईल.

मिथुन राशि

मिथुन राशीच्या जातकांनी ज्येष्ठ महिन्यात उसाचा रस पाण्यात मिसळून स्नान करावे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध आणि पाणी अर्पण करावे. यामुळे सौभाग्य प्राप्त होते. या शिवाय मुलांची बौद्धिक क्षमता वाढते. मुलांना बोलण्यात अडचण येत असेल तर, त्यांचे बोलणे सुधारते.

कर्क राशि

कर्क राशीच्या जातकांनी ज्येष्ठ महिन्यात घरी सत्यनारायणाची पूजा करावी आणि नंतर हवन करून कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. यामुळे रोगांपासून मुक्ती मिळेल आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल.

सिंह राशि

सिंह राशीच्या जातकांनी ज्येष्ठ महिन्याच्या रात्री पाण्यात केशर मिसळून लक्ष्मीचा अभिषेक करावा. असे केल्याने वाईट कामे होतात आणि शत्रू आणि विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवणार नाहीत असा विश्वास आहे.

कन्या राशि

कन्या राशीच्या जातकांनी या दिवशी पाण्यात वेलची टाकून स्नान करावे, ते तुमच्यासाठी शुभ राहील. या शिवाय रात्री देवी लक्ष्मीला पाण्याचे तांबूस आणि नारळ अर्पण करा. त्यामुळे कर्जाचा प्रश्न सुटतो.

तुळ राशि

या दिवशी तुळ राशीच्या जातकांनी घरामध्ये देवी लक्ष्मीला खीरचा प्रसाद द्यावा आणि नंतर सात मुलींमध्ये वाटून घ्यावा. नोकरीत सुरू असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी हे उपाय प्रभावी ठरतील. तसेच, या उपायाने उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशि

वृश्चिक राशीच्या जातकांनी ज्येष्ठ महिन्यात रात्री विष्णु सहस्त्रनाम किंवा माता लक्ष्मी चालीसाचे पठण करावे. यामुळे कीर्ती आणि भाग्य मिळते.

धनु राशि

धनु राशीच्या जातकांनी या महिन्यात कच्चे धागे हळदीमध्ये रंगवून वटवृक्षावर गुंडाळावेत. 11 वेळा प्रदक्षिणा घालून या मंत्राचा जप करा- ब्रह्मणा सहिंतां देवीं सावित्रीं लोकमातरम्। सत्यव्रतं च सावित्रीं यमं चावाहयाम्यहम्। यामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळेल आणि सुयोग्य वर प्राप्त होईल.

मकर राशि

मकर राशीच्या जातकांनी ग्रहांच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्येष्ठ महिन्यात छत्री, खडू, लोखंड, उडदाची डाळ दान करावी. तसेच काळ्या कुत्र्याला ब्रेड खायला द्या. असे केल्याने शनीची महादशा टाळता येते.

कुंभ राशि

कुंभ राशीच्या जातकांनी या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे. नंतर तेलात तळलेल्या पुरी गरिबांमध्ये वाटल्या पाहिजेत. यामुळे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्या दूर होतात.

मीन राशि

मीन राशीच्या जातकांनी ज्येष्ठ महिन्यात आंब्याचे फळ दान करावे आणि जाणाऱ्यांना पाणी ही द्यावे. यामुळे वास्तू दोषांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा येते.

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा :अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer