अंक ज्योतिष साप्ताहिक राशिभविष्य जाणून घेण्यासाठी अंक ज्योतिष मूलांकाचे अधिक महत्व आहे. मूलांक जातकाच्या जीवनाचे महत्वपूर्ण अंक मानले गेले आहे. तुमचा जन्म महिन्याच्या कुठल्या ही तारखेला झालेला आहे, त्याची बेरीज करून जो एक अंक प्राप्त होतो तो तुमचा मूलांक असतो. मूलांक 1 ते 9 अंकांच्या मधील कुठला ही अंक असू शकतो. उदाहरणार्थ- तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 10 तारखेला झालेला आहे तर, तुमचा मूलांक 1+0 म्हणजे 1 असेल.
अश्या प्रकारे कुठल्या ही महिन्याच्या 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत जन्म घेतलेल्या जातकांसाठी 1 ते 9 पर्यंतच्या मूलांकाची गणना केली जाते. अश्या प्रकारे सर्व जातक आपले मूलांक जाणून त्याच्या आधारावर साप्ताहिक राशिभविष्य जाणून घेऊ शकतात.
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
आपल्या जन्म तिथीने जाणून घ्या साप्ताहिक अंक राशि भविष्य(10 मार्च- 16 मार्च, 2024)
अंक ज्योतिषाचा आपल्या जीवनावर सरळ प्रभाव पडतो कारण, सर्व अंकांचा आपल्या जन्म तारखेसोबत संबंध असतो. खाली दिल्या गेलेल्या लेखात आम्ही सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जन्म तिथीच्या हिशोबाने त्याचा एक मूलांक निर्धारित असतो आणि हे सर्व अंक वेगवेगळ्या ग्रहांच्या द्वारे शासित असतात.
जसे की, मूलांक 1 वर सूर्य देवाचे अधिपत्य असते. चंद्रमा मूलांक 2 चा स्वामी आहे. अंक 3 ला देव गुरु बृहस्पतीचे स्वामित्व प्राप्त आहे, राहू अंक 4 चा राजा आहे. अंक 5 बुध ग्रहाच्या अधीन आहे. 6 अंकाचा राजा शुक्र देव आहेआणि 7 अंक केतू ग्रहाचा आहे. शनिदेवाला अंक 8 चा स्वामी मानले गेले आहे. अंक 9 मंगळ देवाचा अंक आहे आणि याच ग्रहाच्या परिवर्तनाने जातकाच्या जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन होतात.
250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झालेला आहे)
या सप्ताहात मूलांक 1 असलेले जातक तत्त्वांचे पालन करतील. या सोबतच ते फिरवून बोलण्याऐवजी स्पष्ट थेट बोलणे पसंत करतात. या जातकांना त्यांचे काम पटकन करायला आवडते आणि हे त्यांच्या संघटित जीवनशैलीमुळे असू शकते. तुम्ही यश मिळवण्याबाबत अधिक आशावादी असाल आणि तुमचे धैर्य आणि सामर्थ्य देखील वाढेल.
प्रेम जीवन: गैरसमज आणि कौटुंबिक समस्यांमुळे तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाते बिघडण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नाते घट्ट करायचे असेल तर, तुम्हाला अधिक सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी आणि रोमांस वाढवण्यासाठी तुमच्या बाजूने नैतिकतेने वागणे आवश्यक आहे. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामधील संवादातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही असे न केल्यास तुमचे नाते आणखी बिघडू शकते. ही परिस्थिती टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या नात्यात मूल्ये प्रस्थापित करण्याचा आणि तुमचे नाते मजबूत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे तुम्हाला तुमच्या नात्यात आनंद आणि शांतता टिकवून ठेवण्यास मदत करेल परंतु, जर असे झाले नाही तर तुमच्या कुटुंबातील शांतता भंग होऊ शकते.
शिक्षण: या सप्ताहात विद्यार्थी विचलित होऊ शकतात आणि त्यांचा आत्मविश्वास ही डगमगू शकतो. यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करताना अडथळे येऊ शकतात. तुम्हाला अभ्यासात अधिक लक्ष देणे आवश्यक आहे जेणेकरून, तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. स्वतःसाठी वेळापत्रक तयार करा. हे तुम्हाला तुमच्या लपलेल्या क्षमता आणि कौशल्ये परत मिळवण्यात मदत करेल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सहकारी विद्यार्थ्यांशी स्पर्धा करू शकाल. तथापि, स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेण्यासाठी ही चांगली वेळ नाही.
व्यावसायिक जीवन: या सप्ताहात मूलांक 1 असलेल्या जातकांवर कामाचा दबाव वाढू शकतो. हे टाळण्यासाठी, तुम्हाला समाधान देणारी नोकरी शोधायला सुरुवात करावी. तुम्हाला कामानिमित्त एखाद्या सहलीला जावे लागेल आणि या सहलींमुळे तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल. व्यावसायिकांना यावेळी नुकसान होण्याची शक्यता आहे आणि यामुळे तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांचा सामना करणे थोडे कठीण होऊ शकते.
आरोग्य: आरोग्याच्या क्षेत्रात या सप्ताहात तुम्हाला कंबरदुखी आणि पाठीत जडपणा जाणवेल. यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागू शकतो. तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला योग्य उपचार आणि औषधांची आवश्यकता असू शकते.
उपाय: नियमित 108 वेळा 'ॐ भास्कराय नम:' मंत्राचा जप करा.
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झालेला आहे)
मूलांक 2 असलेले जातक यावेळी लांबच्या प्रवासात व्यस्त राहू शकतात. त्यांना गुंतवणुकीची खूप आवड आहे आणि त्यांना जास्त पैसे गुंतवणे आवडते जेणेकरून, त्यांना त्यातून जास्तीत जास्त नफा मिळू शकेल. दुसरीकडे, हे जातक त्यांच्या आयुष्यात कोणता ही निर्णय त्वरित घेण्यास सक्षम नसतात आणि यामुळे त्यांना संघर्षाचा सामना करावा लागतो. व्यवसायानिमित्त ते समुद्री प्रवासात अधिक व्यस्त असणार आहेत.
प्रेम जीवन: या सप्ताहात तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते बिघडण्याची शक्यता आहे. परस्पर समंजसपणाच्या अभावामुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये मतभेद होऊ शकतात ज्यामुळे तुमच्या दोघांमध्ये अंतर निर्माण होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात आनंद आणि शांती टिकवून ठेवायची असेल, तर तुम्ही तुमच्या मनातील गोंधळ आणि समस्या दूर करा. तुमच्या मनातील तुमच्या जोडीदाराप्रती प्रेम टिकवून ठेवण्याचा आणि नात्यात आपुलकी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा.
शिक्षण: या सप्ताहात विद्यार्थ्यांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमजोर होऊ शकते. तुम्ही काहीही केले तरी तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासात मागे राहू शकतात. याशिवाय, आपण काय अभ्यास केला आहे हे लक्षात ठेवणे देखील आपल्यासाठी कठीण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुम्ही कायदा, रसायनशास्त्र आणि इंग्रजी साहित्याचा अभ्यास करत असाल तर, तुम्हाला अधिक काळजीपूर्वक अभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो.
व्यावसायिक जीवन: नोकरदार जातकांसाठी हा सप्ताह फारसा फलदायी जाणार नाही. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी तुमचे संबंध बिघडू शकतात. या व्यतिरिक्त या सप्ताहात तुमच्या कामाचा ताण ही वाढेल आणि तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण करू शकणार नाही. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या मेहनतीकडे लोक दुर्लक्ष करू शकतात आणि यामुळे तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते. व्यावसायिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे यावेळी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
आरोग्य: या सप्ताहात तुमचा उत्साह कमी होऊ शकतो. त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर ही दिसून येईल आणि तुमच्या आरोग्यामध्ये असंतुलन होण्याची शक्यता आहे. यामुळे, यावेळी तुम्हाला तुमच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. याशिवाय ॲलर्जीमुळे कडक थंडीमुळे तुमची प्रकृती ही बिघडू शकते. यावेळी थंड पाणी पिणे टाळावे.
उपाय: नियमित 108 वेळा 'ॐ सोमाय नम:' मंत्राचा जप करा.
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झालेला आहे)
हे मूलांक असलेले जातक आध्यात्मिक आहेत आणि त्यांना या सप्ताहात धार्मिक सहलीला जाण्याची संधी मिळू शकते. हे जातक खुल्या मनाचे असतात. त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन आहे. त्यांची ही सवय त्यांना खूप दूर घेऊन जाते किंवा शिखरावर पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करते.
प्रेम जीवन: या सप्ताहात तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराच्या नात्यात आनंद आणि शांती राहील. तुमच्या दोघांमधील नाते मजबूत होईल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतच्या आनंदी नातेसंबंधाचे उत्तम उदाहरण मांडाल. या सप्ताहात तुम्हाला धार्मिक कार्यासाठी प्रवास करावा लागू शकतो आणि हे प्रवास तुमच्यासाठी फलदायी ठरतील आणि त्यांच्यामुळे तुमच्या जीवनशैलीत बदल होण्याची शक्यता आहे. तुमचा आणि तुमचा जोडीदार यांच्यात चांगला समन्वय असेल आणि तुम्ही प्रेमात उच्च मापदंड स्थापित कराल.
शिक्षण: या सप्ताहात तुम्ही अभ्यासात चांगली कामगिरी कराल. फायनान्शिअल अकाउंटिंग आणि बिझनेस मॅनेजमेंट सारखे कोर्स तुमच्यासाठी अधिक फलदायी ठरतील आणि तुम्ही या विषयांमध्ये चांगली कामगिरी करू शकाल. यावेळी तुम्ही वर नमूद केलेल्या विषयात उच्च गुण मिळवू शकाल. या सप्ताहात तुम्ही तुमची क्षमता ओळखू शकाल.
व्यावसायिक जीवन: या सप्ताहात तुम्ही करत असलेल्या कामात निपुणता प्राप्त होईल. नोकरदारांना पदोन्नतीसह प्रोत्साहन मिळू शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या मेहनतीची आता ओळख होणार आहे. तुम्ही तुमच्या कामासाठी अधिक वचनबद्ध आणि समर्पित दिसाल. तुम्ही व्यवसाय करत असाल तर, तुम्हाला यावेळी तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त व्यावसायिक सौदे मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना उत्तम टक्कर देऊ शकाल.
आरोग्य: या सप्ताहात तुमची ऊर्जा वाढेल. यावेळी तुम्हाला अधिक सकारात्मक वाटेल आणि या सकारात्मकतेमुळे तुमचा आवेश आणि उत्साह आणखी वाढेल. यामुळे तुमचे आरोग्य ही चांगले राहील.
उपाय: गुरुवारी गुरु बृहस्पतीला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ-हवन करा.
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झालेला आहे)
हे मूलांक असलेले जातक काही गोष्टींबद्दल अधिक उत्कट असतात. हे जातक खूप सर्जनशील असतात आणि चांगले परिणाम मिळविण्यासाठी त्यांच्या सामान्य ज्ञानाचा वापर करतात. हे जातक नेहमी मोठा विचार करतात आणि कधी-कधी ते अचानक आवेगपूर्ण निर्णय घेतात जे त्यांच्या विरोधात जाऊ शकतात.
प्रेम जीवन: मूलांक 4 असलेल्या जातकांच्या प्रेम जीवनासाठी हा सप्ताह फारसा आनंददायी जाणार नाही. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाते कमजोर होऊ शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत सुसंवादाने राहण्याची गरज आहे जेणेकरून, तुमच्या नात्यात परस्पर सौहार्द आणि आनंद असेल. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जायचे असेल तर, तुम्हाला ही योजना यावेळी पुढे ढकलण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शिक्षण: विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह फारसा शुभ राहणार नाही आणि त्यांना अभ्यासात अधिक मेहनत घ्यावी लागेल. जर तुम्ही व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि वेब डिझायनिंग सारख्या कोर्सचा अभ्यास करत असाल तर, तुम्हाला या विषयांवर अधिक मेहनत आणि लक्ष केंद्रित करावे लागेल. तुम्ही तुमचा अभ्यास पद्धतशीर आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यावर भर द्यावा. अभ्यास करताना तुमचे लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या ही नवीन विषयाचा अभ्यास करणे किंवा कोणता ही महत्त्वाचा निर्णय घेणे तुमच्यासाठी फलदायी ठरणार नाही.
व्यावसायिक जीवन: या सप्ताहात तुमच्यावर कामाचा ताण वाढू शकतो आणि त्यामुळे तुम्ही चिंतेत पडू शकता. लोक तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या मेहनतीकडे दुर्लक्ष करू शकतात आणि यामुळे तुम्ही नाराज होऊ शकता. तुमची कामाची कार्यक्षमता कमी झाली आहे असे तुम्हाला वाटू शकते. या कारणास्तव, तुम्हाला नियोजित पद्धतीने हलविण्याचा सल्ला दिला जातो. व्यावसायिकांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो आणि या सप्ताहात तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल.
आरोग्य: निरोगी राहण्यासाठी वेळेवर अन्न खाण्यास सुरुवात करावी. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात आणि यामुळे तुमच्यामध्ये ऊर्जा कमी होण्याची शक्यता आहेत. यावेळी मसालेदार पदार्थ खाणे ही टाळावे.
उपाय: नियमित 22 वेळा 'ॐ दुर्गाय नम:' चा जप करा.
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झालेला आहे)
मूलांक 5 चे जातक विनोदी स्वभावाचे असतात आणि त्यांना व्यवसायात जास्त रस असतो. यावेळी ते त्यांच्या वागण्याबाबत खूप सावध राहतील. ते तार्किक आहेत आणि त्यांची तर्कशुद्धता त्यांच्या कृतीतून ही दिसून येते. या जातकांना प्रवास करायला आवडते आणि ते प्रवासात जास्त वेळ घालवतात.
प्रेम जीवन: या सप्ताहात तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत परस्पर समन्वय राखण्याची गरज आहे. त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या नात्यातील अंतर कमी करू शकता. परस्पर समंजसपणाच्या अभावामुळे, तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकमेकांशी जुळवून घेण्यात अडचण येऊ शकते. तुमच्या नात्यात कटुता येण्याची शक्यता आहे म्हणून, तुम्हाला तुमचे नाते सुधारण्याचा आणि तुमच्या जोडीदारासोबत सामंजस्याने राहण्याचा सल्ला दिला जातो.
शिक्षण: या सप्ताहात विद्यार्थी अभ्यासात त्यांचे उत्कृष्ट कौशल्य दाखवण्यात अपयशी ठरू शकतात. हे घडू शकते कारण तुमची स्मरणशक्ती कमजोर आहे आणि यामुळे तुम्हाला भविष्यात लक्षपूर्वक अभ्यास करण्यात अडचण येऊ शकते. एकाग्रतेच्या अभावामुळे तुमची अभ्यासावरील पकड कमजोर होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून चांगली कामगिरी करावी. उच्च व्यावसायिक अभ्यासक्रम करण्यासाठी ही योग्य वेळ नाही.
व्यावसायिक जीवन: कामाच्या बाबतीत तुम्ही तुमची क्षमता दाखवू शकणार नाही. कामाच्या वाढत्या दबावामुळे कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी बिघडण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कठोर परिश्रम करून ही तुम्ही तुमच्या कामात उत्कृष्ट कामगिरी करण्यात अयशस्वी होऊ शकता. त्याच वेळी, व्यावसायिकांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेमुळे नुकसान सहन करावे लागू शकते.
आरोग्य: या सप्ताहात तुमची प्रतिकारशक्ती कामोर होणार आहे आणि त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर ही दिसून येईल. कमजोर प्रतिकारशक्तीमुळे, आपल्याला त्वचेच्या समस्या आणि ऍलर्जी असू शकतात.
उपाय: नियमित 41 वेळा 'ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:' मंत्राचा जप करा.
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे)
मूलांक 6 असलेले जातक खूप मजबूत असतात आणि त्यांना सर्जनशील गोष्टींमध्ये जास्त रस असतो. ते खूप गोड आणि दृढनिश्चयी आहेत. त्यांचा स्वभाव मनोरंजक आहे आणि त्यांना लांबचा प्रवास करायला आवडतो. याशिवाय या जातकांना मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात ही रस आहे.
प्रेम जीवन: या सप्ताहात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात पूर्वीपेक्षा अधिक समाधानी असाल. तुमच्या नात्यात आकर्षण वाढेल आणि तुम्ही दोघे ही एकमेकांच्या गरजा समजून घेऊ शकाल. यावेळी, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकता आणि तुम्ही दोघे ही या सहलीचा खूप आनंद घ्याल.
शिक्षण: तुम्हाला कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, सॉफ्टवेअर आणि अकाउंटिंग या सारख्या काही विषयांमध्ये प्राविण्य मिळेल. तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात स्वत:साठी एक स्थान निर्माण करू शकाल आणि तुमच्या सहकारी विद्यार्थ्यांना कठीण स्पर्धा देऊ शकाल. यावेळी तुमची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता देखील वाढेल आणि यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य विकसित करण्यात मदत होईल. अभ्यासाच्या बाबतीत तुम्ही तुमच्यातील काही कौशल्य किंवा प्रतिभा सिद्ध कराल आणि तुमचे हे कौशल्य विशेष किंवा अद्वितीय असू शकते.
व्यावसायिक जीवन: यावेळी तुम्ही कामात खूप व्यस्त असाल आणि तुम्हाला यातून चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. या सोबतच तुम्हाला तुमच्या आवडीनुसार नोकरीच्या नवीन संधी ही मिळू शकतात. व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्यासाठी हा काळ उत्तम राहील. तुम्ही नवीन भागीदारीत व्यवसाय देखील सुरू करू शकता आणि या सप्ताहात तुम्हाला तुमच्या कामासाठी लांबच्या प्रवासाला जावे लागेल. व्यावसायिक यावेळी अनेक प्रकारचे व्यवसाय सुरू करू शकतात ज्यामुळे त्यांना अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात होणाऱ्या नफ्याने तुम्ही समाधानी असाल.
आरोग्य: या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहील. आरोग्याच्या किरकोळ समस्या देखील यावेळी तुम्हाला त्रास देणार नाहीत. तुमच्या आनंदी स्वभावामुळे तुमचे आरोग्य ही निरोगी राहील. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही इतरांसमोर आदर्श ठेवाल.
उपाय: नियमित 33 वेळा 'ॐ शुक्राय नम:' मंत्राचा जप करा.
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला झालेला आहे)
या मूलांक संख्या असलेले जातक खूप धार्मिक असतात आणि त्यांना प्रार्थना करणे आणि देवाला समर्पित होणे यासारख्या आध्यात्मिक कार्यात अधिक रस असतो. त्यांना आध्यात्मिक पुस्तके वाचण्यात आणि पवित्र गोष्टींबद्दल बोलण्यात रस निर्माण होऊ शकतो. सोप्या शब्दात सांगायचे तर, मूलांक 7 असलेल्या जातकांचा आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढू शकतो आणि गूढ विज्ञान इत्यादींमध्ये देखील रस निर्माण होऊ शकतो.
प्रेम जीवन: या सप्ताहात मूलांक 7 असलेल्या जातकांच्या वैवाहिक नात्यात खळबळ येऊ शकते. कुटुंबात सुरू असलेल्या समस्यांमुळे तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यातील आनंद आणि शांती भंग पावू शकते. मालमत्तेच्या खरेदीबाबत तुमच्या नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्ही थोडे नाराज दिसतील. काळजी करण्याऐवजी कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याचा सल्ला घ्यावा. अशा प्रकारे, तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या नात्यात परस्पर समंजसपणा आणि प्रेम असेल.
शिक्षण: अभ्यासाच्या दृष्टीने, या सप्ताहात विद्यार्थ्यांची लक्षात ठेवण्याची क्षमता ठीक-ठाक राहील. यामुळे तुम्ही जास्त गुण मिळवण्यात मागे पडू शकता. तथापि, या सप्ताहात तुमचे लपलेले कौशल्य बाहेर येईल परंतु, वेळेअभावी पूर्णपणे प्रकट होणार नाही. जर तुम्हाला अभ्यासात चांगली कामगिरी करायची असेल तर, योगाभ्यास करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कमजोर स्मरणशक्तीमुळे तुमची एकाग्रता ही कमी होऊ शकते आणि तुम्ही अभ्यासात तुमची क्षमता दाखवू शकत नाही.
व्यावसायिक जीवन: मूलांक 7 असलेल्या जातकांना या सप्ताहात त्यांच्या कामाच्या ठिकाणी सरासरी परिणाम मिळण्याची शक्यता आहे. यावेळी, तुमच्यामध्ये काही नवीन कौशल्य विकसित होऊ शकते आणि तुम्हाला तुमच्या कामासाठी तुमच्या वरिष्ठांकडून प्रशंसा देखील मिळेल. व्यावसायिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायावर लक्ष ठेवण्याचा आणि तो अंदाज घेऊन चालवण्याचा सल्ला दिला जातो. या व्यतिरिक्त, तुम्ही यावेळी कोणत्या ही नवीन भागीदारासोबत व्यवसाय सुरू करू नये. नवीन व्यावसायिक सौद्यांवर काम करण्यासाठी देखील ही वेळ योग्य नाही.
आरोग्य: या सप्ताहात मूलांक 7 असलेल्या जातकांसाठी ऍलर्जीमुळे त्वचेची जळजळ आणि पचन समस्या येण्याची शक्यता आहे. निरोगी राहण्यासाठी वेळेवर खा. याशिवाय तळलेले पदार्थ ही टाळावे अन्यथा यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.
उपाय: नियमित 41 वेळा 'ॐ गणेशाय नम:' मंत्राचा जप करा.
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झालेला आहे)
मूलांक 8 असलेल्या जातकांचा दृष्टीकोन थोडा हलका असू शकतो. ते खूप मेहनती आहेत आणि त्यांच्या कामात जास्त मेहनत घेतात. सामान्यतः या जातकांना त्यांच्या करिअरमध्ये चढ-उतार पहावे लागतात आणि यामुळे ते कधी-कधी दुःखी होतात. त्यांना त्यांच्या वैयक्तिक जीवनासाठी क्वचितच वेळ मिळतो कारण त्यांचा बहुतेक वेळ त्यांच्या कामात किंवा नोकरीत जातो.
प्रेम जीवन: कुटुंबात संपत्तीशी संबंधित समस्यांमुळे तुम्ही थोडे चिंतेत राहू शकता. तुमचे मित्र तुमच्या जोडीदाराशी किंवा प्रियकराशी सौहार्दपूर्ण संबंध राखण्यात अडथळे निर्माण करू शकतात. यामुळे, तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाते कमकुवत होण्याची शक्यता असते आणि तुम्हाला तुमच्या नात्यात जवळीक राखण्यात काही अडचणी येऊ शकतात.
शिक्षण: खूप प्रयत्न करून ही हा सप्ताह विद्यार्थ्यांसाठी फारसा चांगला जाणार नाही. यश मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. विद्यार्थ्यांना यावेळी धीर धरण्याचा आणि त्यांच्या अभ्यासात अधिक दृढनिश्चय करण्याचा सल्ला दिला जातो. त्याच्या मदतीने तुम्ही उच्च गुण मिळवण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही यांत्रिक अभियांत्रिकी किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शिकत असाल तर, चांगली कामगिरी करण्यासाठी तुम्हाला अधिक लक्ष आणि एकाग्रतेने अभ्यास करणे आवश्यक आहे. शैक्षणिक क्षेत्रात शिखर गाठण्यासाठी तुम्हाला वेळापत्रक पाळावे लागेल. अशा प्रकारे तुम्ही उच्च गुण मिळवण्यात यशस्वी व्हाल.
व्यावसायिक जीवन: जातक तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या मेहनतीकडे दुर्लक्ष करू शकतात आणि यामुळे तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. यावेळी तुमच्यासमोर अशी परिस्थिती उद्भवू शकते की तुमचे सहकारी तुम्हाला सोडून नवीन पद मिळवू शकतात. स्वतःला विशेष सिद्ध करण्यासाठी, तुम्हाला काही कौशल्य आत्मसात करावे लागेल जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवू शकेल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर, यावेळी तुमच्या व्यवसाय क्षेत्रात उच्च दर्जा राखणे तुमच्यासाठी थोडे कठीण होऊ शकते. या सप्ताहात तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते आणि त्यांचे व्यवसायावर चांगले नियंत्रण असू शकते.
आरोग्य: या सप्ताहात जास्त तणावामुळे तुम्हाला पाय आणि सांधे दुखू शकतात. त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. कमजोर प्रतिकारशक्ती आणि धैर्य कमी झाल्यामुळे असे होऊ शकते. तुम्हाला भेडसावत असल्या आरोग्याच्या समस्या तुम्ही खूप ताण घेतल्यामुळे असू शकतात. तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला ध्यान आणि योगासने करण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: तुम्ही नियमित 11 वेळा 'ॐ हनुमते नम:' चा जप करा.
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झालेला आहे)
मूलांक 9 असलेले जातक दृढनिश्चयी आणि तत्त्वनिष्ठ असतात. त्यांना चक्कर मारण्यापेक्षा थेट बोलणे आवडते. त्यांना राजकारण आणि प्रशासनात रस असू शकतो. इतरांशी चांगले वागून आणि चांगले संबंध राखून तुम्ही उच्च यश मिळवाल. हे जातक त्यांच्या नात्याला जास्त महत्त्व देतात.
प्रेम जीवन: या सप्ताहात तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या नात्यात गोडवा येईल आणि तुमचे नाते अधिक घट्ट होईल. या सोबतच तुम्हाला रोमान्सचा ही खूप आनंद मिळेल. कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात परंतु, आपण या समस्या सोडवू शकाल. तुमच्या बुद्धीच्या मदतीने आणि तुमच्या जोडीदाराशी जुळणारे विचार, तुमच्या दोघांमध्ये चांगला परस्पर समन्वय दिसून येईल.
शिक्षण: विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह चांगला जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता प्रदान कराल. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग इत्यादी व्यावसायिक विषयांचा अभ्यास तुम्ही करू शकाल. यावेळी, विद्यार्थी स्वतःसाठी एक विशेष स्थान निर्माण करण्यात आणि उच्च गुण मिळवण्यात यशस्वी होतील.
व्यावसायिक जीवन: यावेळी, कार्यरत जातक त्यांच्या कामात चांगली कामगिरी करणार आहेत आणि नेते बनतील. तुमच्या कामामुळे, कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि हे तुमच्या कामातील समर्पणामुळे होऊ शकते. या सप्ताहात तुम्ही मीटिंगमध्ये अधिक व्यस्त असाल आणि या मीटिंगमध्ये तुम्ही तुमच्या क्षमता आणि प्रतिभेने उत्कृष्ट कामगिरी कराल अशी शक्यता आहे. व्यावसायिकांना अधिक नफा कमावण्यात आणि राखण्यात यश मिळेल.
आरोग्य: या सप्ताहात तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत अत्यंत सावध राहाल. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहील. उत्तम प्रतिकारशक्तीमुळे तुमचे आरोग्य ही चांगले राहील. डोकेदुखी आणि सर्दी इत्यादी सारख्या किरकोळ आरोग्य समस्यांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. तथापि, तुम्हाला कोणती ही मोठी आरोग्य समस्या असण्याची शक्यता नाही.
उपाय: नियमित 27 वेळा 'ॐ भौमाय नम:' मंत्राचा जप करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा:अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर.
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!