अंक ज्योतिष - Numerology In Marathi (23 जुलै - 29 जुलै, 2023)
अंक ज्योतिष साप्ताहिक राशिभविष्य जाणून घेण्यासाठी अंक ज्योतिष मूलांकाचे अधिक महत्व आहे. मूलांक जातकाच्या जीवनाचे महत्वपूर्ण अंक मानले गेले आहे. तुमचा जन्म महिन्याच्या कुठल्या ही तारखेला झालेला आहे, त्याची बेरीज करून जो एक अंक प्राप्त होतो तो तुमचा मूलांक असतो. मूलांक 1 ते 9 अंकांच्या मधील कुठला ही अंक असू शकतो. उदाहरणार्थ- तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 10 तारखेला झालेला आहे तर, तुमचा मूलांक 1+0 म्हणजे 1 असेल.
अश्या प्रकारे कुठल्या ही महिन्याच्या 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत जन्म घेतलेल्या लोकांसाठी 1 ते 9 पर्यंतच्या मूलांकाची गणना केली जाते. अश्या प्रकारे सर्व जातक आपले मूलांक जाणून त्याच्या आधारावर साप्ताहिक राशिभविष्य जाणून घेऊ शकतात.
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
आपल्या जन्म तिथीने जाणून घ्या साप्ताहिक अंक राशि भविष्य (16 जुलै - 22 जुलै, 2023)
अंक ज्योतिषाचा आपल्या जीवनावर सरळ प्रभाव पडतो कारण, सर्व अंकांचा आपल्या जन्म तारखेसोबत संबंध असतो. खाली दिल्या गेलेल्या लेखात आम्ही सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जन्म तिथीच्या हिशोबाने त्याचा एक मूलांक निर्धारित असतो आणि हे सर्व अंक वेगवेगळ्या ग्रहांच्या द्वारे शासित असतात.
जसे की, मूलांक 1 वर सूर्य देवाचे अधिपत्य असते. चंद्रमा मूलांक 2 चा स्वामी आहे. अंक 3 ला देव गुरु बृहस्पतीचे स्वामित्व प्राप्त आहे, राहू अंक 4 चा राजा आहे. अंक 5 बुध ग्रहाच्या अधीन आहे. 6 अंकाचा राजा शुक्र देव आहेआणि 7 अंक केतू ग्रहाचा आहे. शनिदेवाला अंक 8 चा स्वामी मानले गेले आहे. अंक 9 मंगळ देवाचा अंक आहे आणि याच ग्रहाच्या परिवर्तनाने जातकाच्या जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन होतात.
250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!
मूलांक 1
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झालेला आहे)
या मूलांकाचे जातक अतिशय संघटित आणि व्यावसायिक असतात आणि या गुणांमुळे या जातकांच्या जीवनात यश मिळते. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा सप्ताह फारसा अनुकूल नाही. या सप्ताहात तुमचा आत्मविश्वास कमी होईल. तुम्हाला खूप प्रवास करावा लागेल आणि कामामुळे तुम्ही खूप व्यस्त असाल. आध्यात्मिक प्रवासाला जाण्याची ही शक्यता आहे, जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या सप्ताहात तुम्ही जीवनाच्या विविध पैलूंमध्ये तुमची योग्यता सिद्ध करू शकाल.
प्रेम जीवन: तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नाते मधुर राहील, त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये चांगला समन्वय राहील. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य राहील. या सप्ताहात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. हा प्रवास तुम्हा दोघांसाठी खूप अविस्मरणीय असणार आहे. तुमच्या जोडीदाराला तुमच्या प्रेमाची जाणीव करून देण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.
शिक्षण: या सप्ताहात विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात चांगली कामगिरी करण्यासाठी काही सकारात्मक पावले उचलू शकतात. मॅनेजमेंट आणि फिजिक्स या विषयांचा अभ्यास करणारे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. हे देखील तुम्हाला चांगले परिणाम देईल. तुम्ही निवडलेल्या कठीण विषयात यश मिळेल.
व्यावसायिक जीवन: या सप्ताहात मूलांक 1 च्या जातकांची कामगिरी कामाच्या ठिकाणी उत्कृष्ट राहील. खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांसाठी ही हा सुवर्णकाळ असेल. ज्या जातकांचं स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना आउटसोर्स डीलचा चांगला फायदा मिळू शकतो. तुम्ही भागीदारीत नवीन काम सुरू कराल आणि हे पाऊल तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल.
आरोग्य: हा सप्ताह तुमच्या आरोग्यासाठी चांगला राहील आणि तुम्ही उत्साहाने परिपूर्ण असाल. नियमित व्यायाम केल्याने तुम्हाला निरोगी राहण्यास मदत होईल. अशाप्रकारे, तुम्हाला तंदुरुस्त वाटेल आणि या दरम्यान तुम्ही चांगले आरोग्य अनुभवत असल्याचे दिसून येईल.
उपाय: 'ओम भास्कराय नमः' चा जप दररोज 19 वेळा करा.
मूलांक 2
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झालेला आहे)
मूलांक 2 च्या जातकांना निर्णय घेताना गोंधळ वाटू शकतो आणि अशा परिस्थितीत तुम्हाला पुढे जाणे कठीण होऊ शकते. या सप्ताहासाठी तुम्हाला आगाऊ नियोजन करावे लागेल. या सप्ताहात तुम्ही मित्रांपासून दूर राहणे चांगले आहे कारण, ते तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात. लांबच्या प्रवासाला जाणे देखील टाळा कारण, यावेळी तुमचा प्रवास यशस्वी न होण्याची शक्यता आहे.
प्रेम जीवन: तुमच्या जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्ही दोघांनी ही अशी परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न केला तर, बरे होईल. हा सप्ताह रोमँटिक आणि शांततापूर्ण ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी थोडे जुळवून घ्यावे लागेल. बोलण्यातून, तुम्ही जोडीदाराशी संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकता.
शिक्षण: यावेळी एकाग्रतेने अभ्यास करावा लागेल कारण, अभ्यासातून तुमचे लक्ष विचलित होऊ शकते. या काळात तुम्हाला कठोर अभ्यास करावा लागेल आणि तर्कशुद्ध राहावे लागेल जेणेकरून, तुम्ही सहकारी विद्यार्थ्यांमध्ये तुमचे स्थान निर्माण करू शकाल. यावेळी, आपल्या अभ्यासाचे नियोजन करण्याचा प्रयत्न करा.
व्यावसायिक जीवन: नोकरदार जातकांना नोकरीमध्ये काही अडचणी येऊ शकतात आणि त्यामुळे कार्यक्षेत्रात पुढे जाण्यात अडचणी येऊ शकतात. या सप्ताहात तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल जेणेकरून, तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना मागे टाकू शकाल. प्रतिस्पर्ध्यांच्या दबावामुळे व्यावसायिकांना तोटा सहन करावा लागू शकतो.
आरोग्य: यावेळी तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल कारण, सर्दी आणि फ्लू सारख्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. तसेच रात्री झोपताना त्रास होऊ शकतो.
उपाय: सोमवारी चंद्रासाठी यज्ञ हवन करा.
करिअरचे आहे टेंशन! आत्ताच ऑर्डर करा कॉग्निएस्ट्रो रिपोर्ट
मूलांक 3
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झालेला आहे)
मूलांक 3 चे जातक या सप्ताहात अनेक धाडसी निर्णय घेऊ शकतात जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. यावेळी तुमचा कल अध्यात्माकडे जाईल आणि तुम्ही अध्यात्मिक कार्यात ही रस दाखवाल. या सप्ताहात तुम्हाला तुमची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित करण्याचे काम करावे लागेल. तुमचा विचार सकारात्मक असेल, ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. या काळात तुम्हाला प्रवासाच्या अनेक संधी मिळतील आणि तुम्हाला या ट्रिप चा नक्कीच फायदा होईल.
प्रेम जीवन: तुम्ही तुमच्या जोडीदाराप्रती तुमचे प्रेम आणि भावना व्यक्त कराल. एकमेकांशी मोकळेपणाने बोलाल, ज्यामुळे तुमच्या दोघांमधील परस्पर समज सुधारेल. कुटुंबात एखादा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराशी याबाबत चर्चा कराल. हा कौटुंबिक कार्यक्रम तुमचा उत्साह वाढवेल आणि तुमच्या प्रेम जीवनात सकारात्मकता आणेल.
शिक्षण: विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह अनुकूल राहील. या दरम्यान, तुमची कामगिरी उत्कृष्ट असेल आणि तुम्ही तुमचा अभ्यास पूर्वीपेक्षा अधिक पद्धतशीरपणे पूर्ण कराल. अर्थशास्त्र आणि व्यवसाय प्रशासन या सारख्या क्षेत्रात शिकणाऱ्या जातकांसाठी हा काळ शुभ राहील.
व्यावसायिक जीवन: या सप्ताहात तुम्हाला नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. ही बातमी तुमचे मन प्रसन्न करेल. नवीन नोकरीत तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकाल आणि तुमच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करू शकाल. व्यावसायिक काही नवीन काम सुरू करू शकतात, ज्यामुळे त्यांना भविष्यात मोठा फायदा होईल.
आरोग्य: शारीरिक आरोग्यासाठी हा सप्ताह चांगला जाणार आहे आणि त्यामुळे तुम्ही उर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण असाल. तुमचे आरोग्य चांगले राहील. धैर्य वाढल्यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी अनुभवू शकतात.
उपाय: नियमित '21 बार 'ॐ बृहस्पतये नमः' मंत्राचा जप करा.
मूलांक 4
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झालेला आहे)
मूलांक 4 असलेल्या जातकांना असुरक्षिततेची भावना असू शकते आणि त्यामुळे तुम्ही कोणता ही महत्त्वाचा निर्णय घेण्यात अयशस्वी होऊ शकता. या सप्ताहात तुम्हाला लांबच्या प्रवासाला जाणे टाळावे लागेल कारण, यावेळी केलेला कोणता ही प्रवास तुमच्यासाठी यशस्वी किंवा फायदेशीर ठरणार नाही. कोणता ही महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी मोठ्यांचा सल्ला घ्या. त्याची बुद्धी तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी काम करेल.
प्रेम जीवन: काही गैरसमजामुळे तुमच्या जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे नाते घट्ट करण्यासाठी तुम्हाला पावले उचलावी लागतील. संभाषण थांबवू नका अन्यथा, तुमच्या दोघांमधील अंतर वाढू शकते. संभाषणातून तुमच्या दोघांचे प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
शिक्षण: या सप्ताहात मूलांक 4 चे विद्यार्थी अभ्यासातून विचलित होऊ शकतात, त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी या सप्ताहात अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे चांगले राहील. विद्यार्थी त्यांच्या नवीन प्रकल्पांमध्ये व्यस्त वाटू शकतात आणि हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचा जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करावा लागेल.
व्यावसायिक जीवन: कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ न मिळाल्याने तुम्ही तुमच्या कामावर असमाधानी दिसू शकता. यामुळे तुमची ही निराशा होईल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर, या सप्ताहात तुमच्या दोघांमध्ये अंतर निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या कोणत्या ही डीलमधून व्यापाऱ्यांना फारसा नफा मिळण्याची शक्यता आहे.
आरोग्य: या सप्ताहात पचनाच्या समस्यांमुळे तुम्ही त्रस्त असाल. जेवण वेळेवर करणे चांगले. तुम्ही पाय आणि खांदे दुखण्याची तक्रार देखील करू शकता.
उपाय: नियमित 22 वेळा 'ॐ राहवे नम:' चा जप करा.
मूलांक 5
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झालेला आहे)
या सप्ताहात मूलांक 5 च्या जातकांची छुपी प्रतिभा समोर येईल. तुमच्या या कौशल्याने तुम्हाला अधिक नफा मिळवण्याची संधी देखील मिळेल. तुमचे प्रत्येक पाऊल तुम्हाला पुढे घेऊन जाईल आणि तुमची तार्किक शक्ती या कार्यात उपयोगी पडेल. कोणता ही मोठा किंवा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी हा सप्ताह शुभ राहील. तुम्ही कोणत्या ही नवीन गुंतवणुकीत पैसे ही गुंतवू शकतात. शेअर मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला मोठा नफा मिळण्याची दाट शक्यता आहे.
प्रेम जीवन: तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नाते अधिक चांगले असल्याचे दिसून येईल. तुम्ही दोघे ही इतरांसमोर चांगले उदाहरण मांडू शकता. तुमच्या प्रेम जीवनात प्रेम वाढेल. या सप्ताहात जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. हा काळ तुम्हा दोघांसाठी खूप खास असणार आहे.
शिक्षण: या सप्ताहात मूलांक 5 चे विद्यार्थी शिक्षणात चांगली कामगिरी करू शकतील. तुम्हाला अवघड विषय ही सहज समजू शकाल. तुम्हाला मेकॅनिकल इंजिनीअरिंग, लॉजिस्टिक आणि प्रगत अभ्यास यांसारखे विषय सोपे वाटतील. तुम्ही स्वत:साठी कोणता ही विषय निवडला असेल, त्यात तुम्ही चांगली कामगिरी करू शकाल आणि परीक्षेत ही तुम्हाला यश मिळेल.
व्यावसायिक जीवन: या सप्ताहात तुम्ही तुमच्या क्षमता जाणून घेऊ शकाल आणि कामाच्या ठिकाणी पूर्वीपेक्षा अधिक व्यावसायिकपणे काम कराल. तुमच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी तुम्हाला बक्षीस देखील मिळेल. व्यापारी यावेळी त्यांच्या क्षेत्रात उंची गाठतील.
आरोग्य: या सप्ताहात तुम्हाला तुमच्या प्रकृतीची चिंता करावी लागणार नाही. तुम्हाला पूर्णपणे निरोगी वाटेल आणि शरीरात भरपूर ऊर्जा असेल. तुमची विनोदबुद्धी तुम्हाला यावेळी निरोगी राहण्यास मदत करेल.
उपाय: दिवसातून 41 वेळा 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' चा जप करा.
मूलांक 6
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे)
मूलांक 6 चे जातक यावेळी त्यांची आंतरिक शक्ती आणि क्षमता ओळखण्यास सक्षम असतील. त्याच्या मदतीने, तुमची सर्जनशीलता वाढेल आणि तुमचा यशाचा मार्ग प्रशस्त होईल. कामाच्या ठिकाणी हुशारीने काम केल्याबद्दल तुम्हाला प्रतिफळ मिळेल. या सप्ताहात तुमच्या आयुष्यात अनेक शुभ गोष्टी घडणार आहेत ज्यामुळे तुम्हाला उत्साही वाटेल.
प्रेम जीवन: तुमच्या प्रियकराशी तुमच्या नात्यात प्रेम राहील आणि तुमचे नाते मजबूत होईल. महत्त्वाचे निर्णय घेताना तुमच्या दोघांचा विचार एकाच दिशेने असेल. यामुळे, तुमच्या दोघांमध्ये मतभेद किंवा वादविवाद होण्याची शक्यता कमी होईल. जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला जाऊ शकता. हे क्षण तुमच्यासाठी अविस्मरणीय असतील. या सप्ताहात तुमच्या घरात काही शुभ कार्य होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला आदरातिथ्य करण्याची संधी देखील मिळेल.
शिक्षण: या सप्ताहात विद्यार्थी उच्च शिक्षणाची पूर्ण मेहनत घेऊन तयारी करतील. तुम्हाला कोणत्या ही स्पर्धात्मक परीक्षेत भाग घेण्यासारखे वाटू शकते. तुम्ही स्वतःला अशा प्रकारे सादर कराल की तुम्ही तुमच्या अभ्यासात अव्वल स्थानी पोहोचाल. तुमच्या क्षमतेच्या जोरावर तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात यशाच्या शिखरांना स्पर्श कराल. तसेच, उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.
व्यावसायिक जीवन: यावेळी तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुम्हाला परदेशात जाण्याची संधी देखील मिळेल आणि ही संधी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. व्यावसायिकांना मोठा नफा कमावण्याची संधी मिळू शकते आणि तुम्ही या संधीचा फायदा ही घेऊ शकाल. व्यावसायिक देखील कोणते ही नवीन काम सुरू करू शकतात. तुम्हाला ही याचा फायदा होईल आणि तुम्ही व्यवसायाच्या क्षेत्रात तुमचे नाव कमवाल.
आरोग्य: यावेळी तुम्ही अत्यंत उत्साही असाल. आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्हाला असे वाटू शकते. या सप्ताहात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी करण्याची गरज नाही कारण, उत्साह आणि आत्मविश्वास वाढल्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील.
उपाय: दिवसातून 33 वेळा 'ॐ भार्गवाय नम:' मंत्राचा जप करा.
मूलांक 7
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला झालेला आहे)
मूलांक 7 च्या जातकांना पूर्वीपेक्षा यावेळी त्यांच्या कामात अधिक लक्ष द्यावे लागेल कारण, कामांमध्ये काही चूक होण्याची शक्यता आहे ज्यामुळे कामांच्या परिणामांवर परिणाम होऊ शकतो. या सप्ताहात आध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढण्याची अपेक्षा आहे.
प्रेम जीवन: तुम्हाला तुमच्या जीवनसाथी सोबतच्या नात्यात प्रेम आणि सुसंवाद राखावा लागेल. तुम्हाला सुसंवाद प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा लागेल अन्यथा, तुमच्या दोघांमध्ये अनावश्यक तेढ आणि वाद-विवाद होऊ शकतात. यामुळे तुमच्या दोघांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते. तुमच्या प्रेम संबंधात प्रेम आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला शांततेने काम करावे लागेल.
शिक्षण: शिक्षणासाठी हा सप्ताह फारसा अनुकूल म्हणता येणार नाही. तुमची शिकण्याची क्षमता थोडीशी कमकुवत होऊ शकते ज्यामुळे विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करू शकणार नाहीत. उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी फलदायी न होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात तुम्ही कोणत्या ही स्पर्धात्मक परीक्षेत भाग घेत असाल तर त्यात नापास होण्याची दाट शक्यता आहे.
व्यावसायिक जीवन: तुमच्या वरिष्ठांशी बोलताना तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागेल कारण, त्यांच्याशी तुमचा वाद होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतात. तथापि, या क्षणी तुम्हाला तुमच्या भावना आणि रागावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि परिस्थिती समजूतदारपणे आणि शांतपणे हाताळावी लागेल. व्यावसायिकांनी ही यावेळी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. कधी-कधी परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. या व्यतिरिक्त राशी मूलांक 7 च्या जातकांनी यावेळी भागीदारीत व्यवसाय करणे टाळावे अन्यथा, हा सप्ताह तुम्हाला अडचणीत आणू शकतो.
आरोग्य: वाहन चालवताना काळजी घ्या कारण, अपघाताला सामोरे जावे लागू शकते. यावेळी कोणते ही अवजड वाहन न चालवणे चांगले राहील.
उपाय: नियमित 41 वेळा 'ॐ गणेशाय नमः' मंत्राचा जप करा.
मूलांक 8
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झालेला आहे)
मूलांक 8 च्या जातकांसाठी हा सप्ताह फारसा चांगला जाण्याची शक्यता नाही. तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. अध्यात्मात तुमची रुची वाढेल आणि तुम्हाला धार्मिक यात्रेला जाण्याची इच्छा होईल.
प्रेम जीवन: कौटुंबिक समस्यांमुळे तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामधील अंतर वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, तुमचे वैवाहिक नाते बिघडू शकते आणि तुम्हाला असे वाटू शकते की, तुम्ही सर्वकाही गमावले आहे. तुमच्या जोडीदारासोबत सुरू असलेले मतभेद आणि वाद सोडवण्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि अंतर कमी करण्याचा प्रयत्न करा.
शिक्षण: या सप्ताहात तुमचे सर्व लक्ष अभ्यासावर असेल जे तुम्हाला यश मिळविण्यात मदत करेल. या काळात तुम्ही कोणत्या ही स्पर्धात्मक परीक्षेत भाग घेत असाल तर, तुम्हाला त्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. परीक्षेत यशस्वी होण्यासाठी तुम्ही आधीच चांगली तयारी केल्यास उत्तम असेल.
व्यावसायिक जीवन: नोकरीमध्ये असंतोष जाणवल्यामुळे तुम्ही नोकरी बदलण्याचा निर्णय घेऊ शकता, त्यामुळे तुमच्या चिंता वाढू शकतात. काहीवेळा याचा तुमच्या कामावर ही परिणाम होतो, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कार्यक्षमतेत कमी दिसू शकते. व्यावसायिकांना नफा मिळविण्यात अडथळे येऊ शकतात. अगदी कमी खर्चात ही तुम्हाला व्यवसाय चालवावा लागेल अन्यथा, तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
आरोग्य: या सप्ताहात तणावामुळे पाय दुखणे आणि सांधे जडपणाची तक्रार कराल. तसेच, पायांना सूज येण्याची भीती असते. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी ध्यान आणि योगाची मदत घ्या.
उपाय: दिवसातून 44 वेळा 'ॐ शनैश्चराय नम:' मंत्राचा जप करा.
मूलांक 9
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झालेला आहे)
मूलांक 9 च्या जातकांसाठी हा सप्ताह सामान्य असेल आणि या काळात तुम्हाला तुमचे भविष्य घडवण्याच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील. करिअरमध्ये फायदा होईल, आर्थिक स्थिती सुधारेल आणि नवीन मित्र ही मिळतील. या सप्ताहात तुम्हाला अधिक प्रवास करावा लागू शकतो, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
प्रेम जीवन: तुमच्या नात्यात सामंजस्य आणि परस्पर समंजसपणा राहील. प्रेमसंबंधांसाठी ही हा काळ चांगला आहे. जातक जे आधीपासून नातेसंबंधात आहेत त्यांना आनंददायक वेळ मिळेल. त्याच बरोबर वैवाहिक जीवनात रोमान्स वाढेल.
शिक्षण: विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह चांगला राहील कारण, या काळात तुम्ही परीक्षेत चांगले गुण मिळवू शकाल. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, केमिस्ट्री यांसारख्या विषयात विद्यार्थी चांगली कामगिरी करतील. अभ्यासाच्या क्षेत्रात तुम्ही इतरांसाठी प्रेरणास्त्रोत बनण्याचे काम कराल.
व्यावसायिक जीवन: या राशीच्या जातकांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील. सरकारी नोकरीची इच्छा असलेल्यांना सुवर्णसंधी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना काही फायदेशीर सौदे करण्याची संधी मिळू शकते.
आरोग्य: या सप्ताहात तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असाल जे तुमच्यातील सकारात्मक उर्जेमुळे असू शकते. आपले आरोग्य सुधारण्यासाठी उत्तम प्रयत्न करा. तुमचे ध्येय साध्य करण्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
उपाय: दिवसातून 27 वेळा 'ॐ भौमाय नम:' मंत्राचा जप करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems

AstroSage on MobileAll Mobile Apps
- Mars Transit In Virgo: Mayhem & Troubles Across These Zodiac Signs!
- Sun Transit In Cancer: Setbacks & Turbulence For These 3 Zodiac Signs!
- Jupiter Rise July 2025: Fortunes Awakens For These Zodiac Signs!
- Jupiter Rise In Gemini: Wedding Bells Rings Again
- Saturn-Mercury Retrograde July 2025: Storm Looms Over These 3 Zodiacs!
- Sun Transit In Cancer: What to Expect During This Period
- Jupiter Transit October 2025: Rise Of Golden Period For 3 Lucky Zodiac Signs!
- Weekly Horoscope From 7 July To 13 July, 2025
- Devshayani Ekadashi 2025: Know About Fast, Puja And Rituals
- Tarot Weekly Horoscope From 6 July To 12 July, 2025
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025