अंक ज्योतिष - Numerology In Marathi (10 सप्टेंबर - 16 सप्टेंबर, 2023)
अंक ज्योतिष साप्ताहिक राशिभविष्य जाणून घेण्यासाठी अंक ज्योतिष मूलांकाचे अधिक महत्व आहे. मूलांक जातकाच्या जीवनाचे महत्वपूर्ण अंक मानले गेले आहे. तुमचा जन्म महिन्याच्या कुठल्या ही तारखेला झालेला आहे, त्याची बेरीज करून जो एक अंक प्राप्त होतो तो तुमचा मूलांक असतो. मूलांक 1 ते 9 अंकांच्या मधील कुठला ही अंक असू शकतो. उदाहरणार्थ- तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 10 तारखेला झालेला आहे तर, तुमचा मूलांक 1+0 म्हणजे 1 असेल.
अश्या प्रकारे कुठल्या ही महिन्याच्या 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत जन्म घेतलेल्या जातकांसाठी 1 ते 9 पर्यंतच्या मूलांकाची गणना केली जाते. अश्या प्रकारे सर्व जातक आपले मूलांक जाणून त्याच्या आधारावर साप्ताहिक राशिभविष्य जाणून घेऊ शकतात.
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
आपल्या जन्म तिथीने जाणून घ्या साप्ताहिक अंक राशि भविष्य (10 सप्टेंबर - 16 सप्टेंबर, 2023)
अंक ज्योतिषाचा आपल्या जीवनावर सरळ प्रभाव पडतो कारण, सर्व अंकांचा आपल्या जन्म तारखेसोबत संबंध असतो. खाली दिल्या गेलेल्या लेखात आम्ही सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जन्म तिथीच्या हिशोबाने त्याचा एक मूलांक निर्धारित असतो आणि हे सर्व अंक वेगवेगळ्या ग्रहांच्या द्वारे शासित असतात.
जसे की, मूलांक 1 वर सूर्य देवाचे अधिपत्य असते. चंद्रमा मूलांक 2 चा स्वामी आहे. अंक 3 ला देव गुरु बृहस्पतीचे स्वामित्व प्राप्त आहे, राहू अंक 4 चा राजा आहे. अंक 5 बुध ग्रहाच्या अधीन आहे. 6 अंकाचा राजा शुक्र देव आहेआणि 7 अंक केतू ग्रहाचा आहे. शनिदेवाला अंक 8 चा स्वामी मानले गेले आहे. अंक 9 मंगळ देवाचा अंक आहे आणि याच ग्रहाच्या परिवर्तनाने जातकाच्या जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन होतात.
250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!
मूलांक 1
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झालेला आहे)
मूलांक 1 असलेले जातक काळजीपूर्वक विचार करून निर्णय घेतात आणि जो काही निर्णय घेतात त्यावर ठाम असतात. ते प्रत्येक काम पद्धतशीरपणे करतात आणि कोणता ही निर्णय घेण्यात अधिक गती दाखवतात. हे जातक उत्तम यश मिळवतात आणि ते त्यांच्या पक्षात करण्यासाठी अधिक दृढनिश्चय करतात. ते स्वभावाने साधे आहेत आणि त्यामुळे अवघड कामे ही सहज पूर्ण करू शकतात. ते नवीन संधी शोधत आहेत ज्यामुळे त्यांचे भविष्य आणखी चांगले होईल.
प्रेम जीवन: मूलांक 1 च्या जातकांच्या प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, हा सप्ताह तुमच्यासाठी चांगला आहे. या काळात, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रेमळ भावना व्यक्त करण्याच्या स्थितीत असाल आणि नातेसंबंधात उच्च दर्जा स्थापित कराल. तुम्ही लोकांसाठी एक उदाहरण म्हणून असाल. तुमच्या नात्यात गोड संबंध प्रस्थापित होतील आणि तुम्ही एकमेकांना चांगले समजून घ्याल, त्यामुळे तुमच्यामध्ये अधिक प्रेम दिसून येईल. या व्यतिरिक्त, आपण आपल्या जीवन साथीदाराशी कौटुंबिक विषयांवर चर्चा करू शकता आणि कुटुंबात काही समस्या असल्यास, आपण ते सौहार्दपूर्णपणे सोडविण्यात यशस्वी व्हाल.
व्यावसायिक जीवन: व्यावसायिक जीवनाच्या बाबतीत, मूलांक 1 च्या जातकांना या सप्ताहात नोकरीच्या अनेक उत्तम संधी मिळतील आणि या संधी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुमची स्वप्ने पूर्ण करतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांची आणि मेहनतीबद्दल तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला प्रशंसा मिळेल. या व्यतिरिक्त, तुमच्यासाठी पदोन्नती आणि पगार वाढण्याची शक्यता आहे किंवा तुम्हाला बोनसच्या रूपात अतिरिक्त फायदे देखील मिळू शकतात. तुमचा स्वतःचा व्यवसाय असल्यास, तुम्ही काही नवीन प्रशासकीय कौशल्ये शिकाल आणि या कौशल्यांमुळे तुम्ही तुमचा व्यवसाय जलद गतीने वाढवू शकाल.
शिक्षण: मूलांक 1 च्या जातकांसाठी हा सप्ताह शैक्षणिक दृष्टीने अतिशय अनुकूल राहील. तुम्ही तुमच्या अभ्यासात अधिक चांगले करण्याच्या स्थितीत असाल आणि उच्च मापदंड प्रस्थापित कराल. या काळात तुम्हाला शिक्षणात चांगले परिणाम मिळतील आणि त्याच वेळी तुमच्यामध्ये काही विशेष गुण दिसून येतील. फिजिक्स, मेडिसिन आणि बायोकेमिस्ट्री या सारख्या विषयांमध्ये तुम्ही चमकदार कामगिरी करू शकाल आणि उच्च गुण मिळवू शकाल. या काळात तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रोजेक्टवर काम करू शकता.
आरोग्य: आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, या सप्ताहात तुम्हाला उत्साही वाटेल आणि तुमची प्रतिकारशक्ती देखील मजबूत राहील, ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. जरी किरकोळ आरोग्य समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात परंतु, सप्टेंबरच्या या सप्ताहात कोणती ही मोठी आरोग्य समस्या तुम्हाला त्रास देणार नाही.
उपाय: प्राचीन पाठ आदित्य हृदयम चा नियमित जप करा.
मूलांक 2
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झालेला आहे)
मूलांक 2 च्या जातकांना या सप्ताहात अधिक तणावग्रस्त वाटू शकते, ज्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता आहे आणि कोणते ही मोठे आणि छोटे निर्णय घेण्यात अयशस्वी होऊ शकतात. या काळात तुम्ही जास्त प्रवासात व्यस्त असाल. शिक्षण क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही उच्च शिक्षण घेण्याचा विचार करू शकता. या काळात तुम्ही तुमच्या आईबद्दल अधिक काळजी व्यक्त कराल आणि तिच्याबद्दल अधिक आसक्ती आणि आपुलकी अनुभवाल.
प्रेम जीवन: मूलांक 2 च्या जातकांसाठी हा सप्ताह प्रेम जीवनाच्या बाबतीत चांगला सिद्ध होईल, तुमची सखोल समज आणि खऱ्या प्रामाणिकपणामुळे तुमचे जीवन साथीदारासोबतचे नाते घट्ट होईल. या दरम्यान तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर तुमच्या भावना उघडपणे मांडाल. याशिवाय, कौटुंबिक बाबींवर तुम्ही तुमचा सकारात्मक विचार ठेवाल, ज्यामुळे अनुकूल परिणाम मिळतील. या काळात तुमच्या कुटुंबात शुभ कार्ये घडू शकतात, ज्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या जीवनसाथीला अविस्मरणीय क्षण मिळतील.
व्यावसायिक जीवन: या सप्ताहात तुम्हाला नोकरीच्या संदर्भात लांबचा प्रवास करावा लागू शकतो. नवीन कामासाठी बाहेर जावे लागू शकते. ही देखील शक्यता आहे की, या कालावधीत तुम्हाला कामाशी संबंधित लक्ष्य नियुक्त केले जातील आणि तुमचे वरिष्ठ तुम्हाला ते एक किंवा दोन सप्ताहात पूर्ण करण्याचे आदेश देतील, ज्यामुळे तुम्हाला तणाव होऊ शकतो. तथापि, तुम्ही तुमचे ध्येय सहज साध्य करू शकाल. जर तुम्ही डेअरी आणि दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय करत असाल तर तुम्ही अधिक चांगली कामगिरी करू शकाल. तसेच, तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना कठीण स्पर्धा देण्यास सक्षम असाल आणि शीर्षस्थानी पोहोचण्याचा प्रयत्न करू शकता. याशिवाय, तुम्ही पुढे एक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता आणि ते तुमच्या भविष्यासाठी चांगले सिद्ध होईल आणि तुमच्यासाठी समृद्धीचे दरवाजे उघडू शकतात. शिवाय, ते अधिक नफा देखील प्रदान करेल.
शिक्षण: शिक्षणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही रसायनशास्त्र आणि सागरी अभियांत्रिकी यांसारख्या विषयांमध्ये चांगली कामगिरी कराल आणि या विषयांमध्ये तुम्ही उंची गाठू शकता. याशिवाय बायोमेडिसिन सारख्या विषयात ही तुम्ही रस घेऊ शकता. हे तुमच्या भविष्यासाठी चांगले सिद्ध होतील. या काळात तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या संदर्भात प्रवासाला जाऊ शकता आणि तुम्ही तुमचा वैद्यकीय अभ्यास ही सुरू करू शकता. या सप्ताहात तुम्ही अनेक प्रकल्पांवर काम कराल आणि तुमच्या कौशल्यात सुधारणा दिसून येईल.
आरोग्य: आरोग्याच्या दृष्टीने, या सप्ताहात तुम्ही उर्जा पूर्ण अनुभवाल, त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. तथापि, तरी ही तुम्हाला तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. उत्तम आहारामुळे तुमचे आरोग्य स्थिर राहील. दररोज योगा किंवा व्यायामासाठी वेळ काढा. तसेच, कोणत्या ही प्रकारची कोणती ही मोठी आरोग्य समस्या तुम्हाला त्रास देणार नाही. उच्च पातळीची ऊर्जा तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक उपयुक्त ठरेल.
उपाय: नियमित दुर्गा चालीसाचा जप करा.
करिअरचे आहे टेंशन! आत्ताच ऑर्डर करा कॉग्निएस्ट्रो रिपोर्ट
मूलांक 3
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झालेला आहे)
या सप्ताहात, मूलांक 3 च्या जातकांचा अध्यात्माकडे कल असू शकतात आणि अशा प्रवृत्तीमुळे तुमच्यामध्ये विशेष गुण वाढण्यास मदत होईल आणि तुम्हाला दीर्घकालीन लाभ मिळतील. तुमच्यामध्ये बरेच चांगले बदल तुम्हाला दिसतील, मग ते करिअर, पैसा किंवा कोणत्या ही नातेसंबंधातील असो. या काळात तुम्ही तुमच्या ज्येष्ठांप्रती अधिक निष्ठावान राहाल, त्यांच्या शब्दांना अधिक महत्त्व द्याल आणि त्यांचे आशीर्वाद घ्याल. या व्यतिरिक्त, तुम्ही या सप्ताहात काहीतरी वेगळे करून पहा आणि स्वतःला त्याच्याशी जुळवून घेऊ शकता. ही देखील शक्यता आहे की, या सप्ताहात तुम्ही अहंकाराची झलक दाखवू शकतात आणि तुमच्या बोलण्यात कठोरपणा येऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो.
प्रेम जीवन: या सप्ताहात तुमचा तुमच्या जोडीदारासोबतचा दृष्टीकोन खूप साधा असेल आणि तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने बोलतांना दिसू शकाल, ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या जवळ येऊ शकता. तुम्ही तुमच्या भावना एकमेकांशी शेअर कराल आणि एका अद्भुत क्षणाचा आनंद घ्याल. अशा प्रकारे तुमचे प्रेम वाढेल आणि तुम्ही पाहिजे त्या दिशेने पुढे जाल. तथापि, तुम्हाला अभिमान टाळण्याचा सल्ला दिला जातो कारण, ते तुमच्या नात्याला हानी पोहोचवू शकते.
शिक्षण: शिक्षणाविषयी बोलायचे झाले तर, या सप्ताहात तुम्ही व्यवस्थापन, व्यवसाय प्रशासन यासारख्या व्यावसायिक अभ्यासात चांगली कामगिरी कराल. या विषयाचा तुम्हाला भविष्यात ही फायदा होईल. तुमची स्मरणशक्ती मजबूत असेल ज्यामुळे तुम्ही तुमचे कौशल्य सुधारू शकाल आणि अशा प्रकारे तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात उच्च गुण मिळवाल. तुमच्याकडे शीर्षस्थानी पोहोचण्यासाठी आवश्यक कौशल्ये असतील. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा आहे, त्यांची इच्छा या सप्ताहात पूर्ण होईल. परदेशात शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळतील.
व्यावसायिक जीवन: तुम्ही नोकरी करत असाल तर, सप्टेंबरचा हा सप्ताह तुमच्या व्यावसायिक जीवनासाठी अपेक्षेपेक्षा चांगला असेल. या काळात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. या सोबतच, कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी पदोन्नतीची शक्यता असेल आणि तुम्हाला उच्च पद देखील मिळेल जे तुमच्यासाठी आश्चर्यचकित होऊ शकते. जर तुम्ही व्यवसायात असाल तर, तुम्ही मल्टीलेव्हल नेटवर्किंग व्यवसायात पाऊल टाकू शकता आणि तुम्हाला या व्यवसायात प्रचंड नफा मिळेल. मल्टीलेव्हल नेटवर्किंग व्यवसायात प्राविण्य मिळवताना तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना कठीण स्पर्धा देऊ शकाल. ही संधी तुमच्यासाठी उत्तम ठरेल.
आरोग्य: या काळात तुम्हाला डोकेदुखी, सर्दी आणि खोकला यासारख्या किरकोळ आरोग्य समस्या असू शकतात. अशा परिस्थितीत दररोज ध्यान आणि योगासने करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला तळलेले आणि तेलकट पदार्थ खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो कारण, त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
उपाय: "ॐ बृं बृहस्पतये नमः" चा नियमित 21 वेळा जप करा.
मूलांक 4
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झालेला आहे)
मूलांक 4 असलेले जातक एखाद्या विशिष्ट गोष्टीकडे आकर्षित होऊ शकतात आणि ते साध्य केल्यानंतर, तुम्ही समाधानी दिसू शकता. तथापि, इच्छित समाधान मिळवणे आपण विचार करत आहात तितके सोपे नाही. या काळात तुम्हाला लांबचा प्रवास करण्यात रस असेल. तसेच, धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांकडे तुमचा कल मर्यादित असू शकतो. निर्णय घेण्याची क्षमता ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाची गुणवत्ता असू शकते परंतु, या सप्ताहात तुम्ही घेतलेला कोणता ही निर्णय तुम्हाला अडचणीत आणू शकतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून, या सप्ताहात तुमचे आरोग्य अनुकूल दिसत नाही कारण, तुम्हाला तणाव जाणवू शकतो, ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
प्रेम जीवन: प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, कुटुंबातील चालू परिस्थितीशी अधिक जुळवून घेण्याची गरज असू शकते कारण, तुमच्या कुटुंबात दीर्घकाळ चाललेल्या मुद्द्यांवरून वाद होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या जीवनसाथीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. परस्पर समंजसपणाच्या अभावामुळे नात्यात सौहार्दपूर्ण संबंध राखण्यात अडचण येऊ शकते. अशा परिस्थितीत, हा सप्ताह अधिक आनंददायी करण्यासाठी तुम्हाला संयम राखण्याची आणि नातेसंबंधात सुसंवाद राखण्याची आवश्यकता असू शकते.
शिक्षण: मूलांक 4 च्या जातकांच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाल्यास, या सप्ताहात तुम्हाला अभ्यासात एकाग्रतेची कमतरता जाणवू शकते, त्यामुळे कामात चुका होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही तुमच्या कामात मागे राहून सहकाऱ्यांपेक्षा मागे पडू शकतात. अशा परिस्थितीत, या काळात तुम्हाला अभ्यासावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करावे लागेल आणि तुमची एकाग्रता वाढवावी लागेल जेणेकरून, यश तुम्हाला मिळेल.
व्यावसायिक जीवन: जर तुम्ही नोकरी करत असाल तर, या सप्ताहात तुमच्यावर कामाचा दबाव वाढू शकतो, ज्यामुळे तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात अडचण येऊ शकते. तुमच्याकडून कामात चुका ही होऊ शकतात, त्यानंतर तुमच्या क्षमतेवर शंका येऊ शकते. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि कामाच्या ठिकाणी यश मिळविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतील. ज्या जातकांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना या काळात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे, तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची आणि तुमच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असू शकते.
आरोग्य: आरोग्याच्या दृष्टिकोनातून, या सप्ताहात तुम्हाला ऍलर्जीमुळे त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे या काळात तुम्हाला त्रास होऊ शकतो. जास्त तळलेले आणि जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने अशा गोष्टी घडू शकतात म्हणून, पिष्टमय, जास्त गोड आणि चरबीयुक्त पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो कारण, अशा गोष्टी तुमचे वजन वाढवू शकतात. तुम्ही हलके अन्न खावे आणि नियमित व्यायाम करावा.
उपाय: नियमित 22 वेळा "ऊँ दुर्गाय नमः" चा जप करा.
मूलांक 5
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झालेला आहे)
मूलांक 5 चे जातक सामान्यतः अधिक हुशार आणि स्वावलंबी असतात. प्रत्येक काम नियोजन करून करायला त्यांना आवडते. या जातकांना शेअर ट्रेडिंगशी संबंधित व्यवसायात अधिक रस असतो आणि ते या क्षेत्रात अधिक कमाई करण्याचा प्रयत्न करतात. एकूणच, मूलांक 5 जातक व्यवसायाकडे अधिक कललेले आहेत. हे जातक बहु-स्तरीय व्यवसायात देखील वेगाने वाढवतात आणि भरपूर नफा मिळवण्यास सक्षम असतात.
प्रेम जीवन: प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, या सप्ताहात तुमची विनोदबुद्धी तुमचा जोडीदार तुमच्या जवळ आणेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत हसण्यात आणि मस्करी करण्यात चांगला वेळ घालवाल. तुम्हाला असे वाटेल की, तुम्ही दोघे एकमेकांसाठी बनलेले आहात. तुम्ही तुमच्या भावना तुमच्या जीवन साथीदाराच्या समजुतीमध्ये ठेवाल आणि तुमच्या नात्यात चांगली परस्पर समंजसता आणि उत्तम समन्वय असेल. अत्यंत कठीण काळात ही तुम्ही तुमच्या ज्ञानाने तुमच्या जोडीदाराला पटवून देऊ शकाल.
शिक्षण: शैक्षणिक क्षेत्रात तुमची क्षमता दाखवण्यासाठी हा सप्ताह सर्वोत्तम सप्ताहापैकी एक असेल. विशेषत: आर्थिक लेखा आणि व्यवस्थापन यासारखे व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फलदायी ठरेल. या दरम्यान तुम्ही तुमची क्षमता आणि कौशल्य सिद्ध करण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही या क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त कराल आणि अभ्यासात चांगले मापदंड स्थापित कराल. फायनान्शिअल अकाउंटिंग सारख्या विषयात तुम्ही अधिक प्रवीण व्हाल आणि या दरम्यान तुम्ही जास्त गुण मिळवू शकाल. शैक्षणिक क्षेत्रात या सप्ताहात तुम्ही स्वत:साठी निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य करण्यात यशस्वी व्हाल.
व्यावसायिक जीवन: या सप्ताहात, तुम्ही नोकरीत असाल किंवा तुमच्या व्यवसायात, तुम्हाला मोठा फायदा होईल आणि प्रचंड यश मिळेल. या दोन्ही क्षेत्रात तुम्ही तुमची वेगळी ओळख निर्माण कराल. तुम्ही सल्लागार म्हणून काम करत असाल तर, या सप्ताहात तुम्ही तुमच्या कौशल्याच्या जोरावर काहीतरी चांगले करू शकता. जर तुम्ही नोकरी करत असाल तर, तुम्हाला अनेक नवीन आणि अद्भुत संधी मिळतील आणि या संधी तुमच्या भविष्यासाठी ही अनुकूल ठरतील. या संधी मिळाल्यानंतर तुमच्या आनंदाला थारा नसेल. जर तुम्ही व्यवसायात असाल तर, तुम्ही चांगला व्यवहार कराल ज्यामुळे तुम्हाला नफा मिळेल. तसेच, तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी नवीन धोरणे तयार करू शकता आणि रणनीती तुम्हाला जास्त नफा देईल.
आरोग्य: आरोग्याच्या दृष्टीने, मूलांक 5 च्या जातकांचे आरोग्य या सप्ताहात चांगले राहील आणि तुम्हाला ऊर्जा आणि उत्साह जाणवेल. यामुळे तुमचे आरोग्य ही तंदुरुस्त राहील. या काळात तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणती ही समस्या उद्भवणार नाही. पण तुम्हाला तुमच्या आहाराकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. तुमचे आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्हाला सकारात्मक विचार, व्यायाम आणि योगासने करण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: नियमित प्राचीन पाठ विष्णु सहस्रनामाचा जप करा.
मूलांक 6
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे)
मूलांक 6 चे जातक सहसा अधिक कलात्मक आणि सर्जनशील स्वभावाचे असतात आणि ते सध्याच्या परिस्थितीनुसार स्वत: ला बदलण्याचा प्रयत्न करतात म्हणजेच जो ट्रेंड चालू आहे तो स्वीकारण्याचा प्रयत्न करतात. मूलांक 6 असलेले जातक मीडिया आणि इतर सर्जनशील गोष्टींमध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्यांचे फायदे देखील होतील. या सप्ताहात तुम्ही तुमच्या करिअरच्या संदर्भात लांबचा प्रवास करू शकता. याशिवाय, हे जातक त्यांचे संवाद कौशल्य आणखी सुधारण्याचा प्रयत्न करू शकतात आणि त्यावर लक्ष केंद्रित करू शकतात.
प्रेम जीवन: मूलांक 6 च्या जातकांच्या प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, या सप्ताहात तुम्हाला तुमच्या जीवन साथीदारासोबत सौहार्दपूर्ण संबंध राखणे कठीण होऊ शकते कारण, तुम्ही तुमचा संयम गमावू शकता. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी सौम्यपणे वागण्याचा आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, परस्पर सामंजस्याने संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुमच्या नात्यात गोडवा येईल आणि तुमचा आणि तुमच्या जोडीदारातील कोणता ही वाद दूर होईल. तसेच, तुम्ही नातेसंबंधात सुसंवाद राखण्यास सक्षम असाल.
शिक्षण: शिक्षणाच्या दृष्टीकोनातून, हा सप्ताह मूलांक 6 च्या जातकांसाठी अनुकूल दिसत नाही. या सप्ताहात तुम्ही अभ्यासात चांगले गुण मिळवण्यात अपयशी होण्याची शक्यता आहे कारण, तुमचे मन अभ्यासातून विचलित होऊ शकते आणि तुमची लक्षात ठेवण्याची क्षमता देखील कमजोर होऊ शकते, जे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. व्हिज्युअल कम्युनिकेशन, फॅशन डिझाइन यासारखे विषय तुमच्यासाठी फलदायी ठरतील. तुम्ही शिक्षणात जास्त गुणांनी मागे पडू शकता, ज्यामुळे निराशा देखील होऊ शकते.
व्यावसायिक जीवन: तुमच्या व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, या सप्ताहात तुम्हाला कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी लागेल कारण, तुमच्यावर कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे कामात अधिक चुका होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यावसायिक जीवनात या काळात तुम्हाला वेगवेगळ्या नवीन रणनीती आणि नवीन पद्धतींचा अवलंब करावा लागेल ज्यामुळे तुम्हाला यश मिळवण्यात मदत होईल. दुसरीकडे, जर तुम्ही व्यवसायात असाल तर, या कालावधीत तुमचे अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे कारण, या काळात तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. तुमचे प्रतिस्पर्धी त्यांच्या व्यवसायासाठी एक अनोखी रणनीती अवलंबू शकतात आणि अधिक नफा मिळवू शकतात. अशा परिस्थितीत, तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी तुम्हाला सध्याच्या धोरणात बदल करून नवीन व्यवसाय ट्रेंडशी जुळवून घेणे आवश्यक आहे.
आरोग्य: आरोग्याच्या दृष्टीने, सप्टेंबरचा हा सप्ताह तुमच्यासाठी प्रतिकूल ठरू शकतो कारण, या काळात तुम्हाला त्वचेची ऍलर्जी, तीव्र सर्दी आणि ट्यूमर सारखा कोणता ही मोठा आजार होण्याची शक्यता असते, जी तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. जास्त तेल आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने ही समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमच्या आहाराकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला आहे, बाहेरचे तळलेले अन्न खाणे टाळा कारण, या सर्व गोष्टी तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. या व्यतिरिक्त, तुम्हाला या काळात तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यावर ही लक्ष केंद्रित करावे लागेल.
उपाय: नियमित 33 वेळा "ऊं शुक्राय नमः" चा जप करा.
मूलांक 7
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला झालेला आहे)
मूलांक 7 च्या जातकांच्या व्यक्तिमत्वात अनेक गुण आढळतात आणि ते त्यांच्यातील कौशल्यामुळे प्रभुत्व मिळवतात. तुमचा अध्यात्मिक गोष्टींकडे अधिक कल आहे आणि त्याच संदर्भात तुम्हाला प्रवास करायला आवडते. मूलांक 7 च्या जातकांची सर्वात मोठी कमजोरी ही आहे की, ते अनेकदा आवेगपूर्ण निर्णय घेतात ज्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात.
प्रेम जीवन: मूलांक 7 च्या जातकांच्या प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला तुमच्या नात्यात प्रेमाची कमतरता जाणवू शकते. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी सुसंवाद राखण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा अन्यथा नात्यात प्रेम नसल्यामुळे तुम्ही एकमेकांपासून वेगळे होऊ शकता. तुम्ही तुमच्यातील अहंकाराची प्रवृत्ती टाळली पाहिजे अन्यथा, तुमच्या अहंकाराचा तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. तसेच, या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल.
शिक्षण: एकाग्रतेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकते. तुमची कामगिरी सुधारण्यासाठी तुमच्याकडे ज्ञान असेल तरी तुम्ही या सप्ताहात तुमचे ज्ञान आणि कौशल्ये योग्यरित्या वापरण्यात अयशस्वी होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या अभ्यासात अनेक अडथळे येऊ शकतात. अशा परिस्थितीत, आपण सर्व गोष्टींपासून दूर राहून स्वत: ला आपल्या अभ्यासात समर्पित करणे आवश्यक आहे जेणेकरून, आपण उच्च गुण मिळवू शकाल.
व्यावसायिक जीवन: तुम्ही नोकरी करत असाल तर, या सप्ताहात तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून अधिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमचे सहकारी तुमचे शोषण करून तुमचा गैरफायदा घेऊ शकतात आणि त्यामुळे तुमच्या कामाच्या गोष्टींवर ही परिणाम होऊ शकतो. याशिवाय तुम्हाला कामाच्या अधिक दबावाचा ही सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारावा लागेल आणि तुमच्या विरोधकांपासून अंतर ठेवावे लागेल. जर तुम्ही व्यवसायात असाल तर, तुम्हाला तुमच्या व्यवसाय भागीदारासोबत समस्या येऊ शकतात आणि यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय व्यवस्थापित करण्यात अयशस्वी होऊ शकता. तसेच, तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते.
आरोग्य: या सप्ताहात मूलांक 7 चे जातक त्वचेची ऍलर्जी आणि सूर्य प्रकाशामुळे जळजळ होण्याची तक्रार करू शकतात आणि ही तुमच्यासाठी समस्या बनू शकते. ही समस्या तुमच्या आत असलेल्या कमजोर प्रतिकारशक्तीमुळे असू शकते, त्यामुळे आहाराबाबत सावधगिरी बाळगा आणि योगासने आणि ध्यान इत्यादी नियमितपणे करा.
उपाय: नियमित 41 वेळा "ॐ केतवे नमः" चा जप करा.
मूलांक 8
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झालेला आहे)
मूलांक 8 चे जातक त्यांच्या कामासाठी अत्यंत समर्पित असतात आणि त्यांची सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. ते त्यांच्या कामाबद्दल जागरूक ही आहेत. हेच कारण आहे की, जास्त व्यस्ततेमुळे हे जातक आपल्या जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. या लोकांना कामासाठी लांबचा प्रवास ही करावा लागू शकतो.
प्रेम जीवन: मूलांक 8 च्या जातकांसाठी हा काळ प्रेम जीवनाच्या दृष्टीने फारसा अनुकूल नाही. अहंकार आणि गैरसमजामुळे तुमच्या जोडीदाराशी वाद-विवाद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या नात्यात अंतर येऊ शकते. तसेच, परस्पर समंजसपणाच्या अभावामुळे, नात्यात सौहार्दपूर्ण संबंध राखण्यात अडचणी येऊ शकतात. अशा परिस्थितीत, तुम्हाला सल्ला दिला जातो की, या काळात तुम्ही दोघांनी ही परस्पर समन्वय सुधारण्याचा प्रयत्न करा अन्यथा, तुम्हाला तुमच्या नात्यात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
शिक्षण: जर आपण मूलांक 8 च्या जातकांच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर, आपण या सप्ताहात चांगली कामगिरी करू शकत नाही. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमच्या अभ्यासात चांगले गुण मिळविण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील कारण, या सप्ताहात तुमची एकाग्रता बिघडू शकते ज्यामुळे तुम्हाला चांगले गुण मिळू शकत नाहीत.
व्यावसायिक जीवन: तुम्ही नोकरी करत असाल तर, तुम्हाला या सप्ताहात ऑन-साइट प्रकल्प नियुक्त केला जाऊ शकतो आणि तुम्हाला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वेळ लागू शकतो. तुम्हाला अनेक गुंतागुंत आणि अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो आणि त्यामुळे तुमच्या कामावर वरिष्ठांकडून प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. अशी शक्यता आहे की, या काळात तुम्ही इतके तणावग्रस्त होऊ शकता की तुम्ही नोकरी सोडण्याचा विचार कराल. दुसरीकडे, तुम्ही व्यवसायात असाल तर, तुम्ही चांगला नफा मिळवण्यात आणि उच्च मापदंड सेट करण्यात अयशस्वी होऊ शकता.
आरोग्य: तणाव आणि कमजोर प्रतिकारशक्ती यामुळे या सप्ताहात तुमचे पाय दुखू शकतात. अशा परिस्थितीत, तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल आणि तसेच, योग/ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून, तुमचे आरोग्य चांगले राहील.
उपाय: शनिवारी शनी ग्रहासाठी हवन-यज्ञ करा.
मूलांक 9
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झालेला आहे)
मूलांक 9 मध्ये जन्म घेतलेल्या जातकांकडे अधिक प्रशासकीय कौशल्ये असतात आणि अशा प्रकारे ते त्यांचे कार्य सिद्ध करण्यासाठी या कौशल्यांचा वापर करतात. याशिवाय, तुमच्या व्यक्तिमत्त्वात गोष्टी चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्याची गुणवत्ता असू शकते आणि ही गुणवत्ता तुम्हाला उच्च स्तरावर यश देईल. या सप्ताहात तुम्हाला तुमच्या कामात आणि प्रयत्नांमध्ये यश मिळेल. तसेच, तुम्ही मोठे आणि महत्त्वाचे निर्णय सहजपणे घेऊ शकाल.
प्रेम जीवन: या सप्ताहात, जर आपण मूलांक 9 च्या जातकांच्या प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, तुमचे तुमच्या जोडीदारासोबतचे नाते मधुर आणि सौहार्दपूर्ण असेल. तुमच्यातील प्रेम आणि आपुलकी वाढेल. काही कौटुंबिक समस्या असून ही तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी पूर्ण वेळ द्याल आणि चांगले सामंजस्य राखण्यास सक्षम असाल. ज्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला खूप जवळचे वाटू शकता. या व्यतिरिक्त, सप्टेंबरच्या या सप्ताहात, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता आणि तुम्ही एकमेकांसोबत उत्तम क्षण घालवाल.
शिक्षण: या सप्ताहात तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात उच्च दर्जा प्रस्थापित कराल आणि व्यावसायिकतेत पुढे जाल. जे विद्यार्थी मॅनेजमेंट आणि फायनान्स या विषयांचा अभ्यास करत आहेत ते चांगले काम करतील. याचा परिणाम म्हणून तुम्ही तुमच्या परीक्षेत चांगले गुण मिळवाल.
व्यावसायिक जीवन: मूलांक 9 च्या जातकांच्या व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचे स्किल वाढतील, ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व कामे वेळेत पूर्ण करू शकाल. या दरम्यान, योग्य वेळी काम पूर्ण करणे आणि चांगली कामगिरी करणे हे तुमचे पहिले प्राधान्य असेल. तुम्ही कामात करत असलेल्या समर्पण आणि मेहनतीमुळे तुम्हाला पदोन्नती आणि पगारवाढ आणि इतर फायदे मिळू शकतात. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करताना दिसतील.
जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर, या सप्ताहात तुम्ही उच्च पातळीवरील नफा मिळवण्याच्या स्थितीत असाल आणि हे व्यवसायातील तुमच्या मेहनतीमुळेच शक्य होऊ शकते. या व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना खडतर स्पर्धा देऊ शकाल आणि त्यांच्या पुढे जाऊ शकाल. एकंदरीत सप्टेंबरचा हा सप्ताह मूलांक 9 च्या जातकांसाठी खूप छान असणार आहे.
आरोग्य: आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, या सप्ताहात तुम्ही तुमच्या निरोगी आणि तंदुरुस्त शरीरासह संपूर्ण सप्ताह एन्जॉय करताना दिसाल, याचा अर्थ हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने ही अनुकूल असेल. तुम्हाला उर्जा आणि उत्साह जाणवेल. आरोग्याबाबत तुम्ही उचललेली पावले तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.
उपाय: नियमित 27 वेळा "ॐ भौमाय नमः" चा जप करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!