तुळ राशि भविष्य 2022 - Libra Rashi Bhavishya in Marathi

अ‍ॅस्ट्रोसेज च्या तुळ वार्षिक राशि भविष्य 2022 (Libra Horoscope 2022) च्या माध्यमाने जाणून घ्या तुळ राशीतील जातकांसाठी नवीन वर्ष जीवनातील विभिन्न महत्वाच्या मोर्चे जसे करिअर, प्रेम, विवाह, आर्थिक स्थिती, संपत्ती, संतान, नोकरी व्यवसाय इत्यादींवर कसा राहणार आहे. वैदिक ज्योतिष वर आधारित या राशि भविष्यात जाणून घ्या वर्ष 2022 चे सर्वात विस्तृत आणि सटीक राशि भविष्य 2022 च्या वार्षिक भविष्यवाणी च्या अनुसार, तुळ राशीतील जातकाच्या जीवनात बऱ्याच क्षेत्रात 2022 मध्ये अनुकूल वेळेचा लाभ घेऊ शकतात. जीवनाला संतुलित बनवण्यासाठी तुम्हाला जीवनातील प्रत्येक लहान गोष्टीची काळजी घेण्याची आवश्यकता पडेल. या वर्षी तुमच्या कुटुंबात काही समस्या होण्याची शंका आहे परंतु, अश्या वेळात तुम्हाला आपल्याला शांत राहण्याचा सल्ला दिला जातो. मागील वर्षाच्या तुलनेत हे वर्ष तुमचे श्रम आणि अधिक यशाच्या संदर्भात शुभ राहणार आहे. वर्षभर तुम्ही स्वतःला आराम प्रदान करण्यात व्यस्त राहाल आणि याचीच तुम्हाला इच्छा असेल. वर्षाच्या अधिकतम वेळात चतुर्थ भावात शनीचे संक्रमण तुम्हाला कठीण मेहनत करण्यासाठी प्रेरित करेल. अशी शक्यता आहे की, कधी कधी निराश होऊन तुम्हाला असे वाटेल की, तुम्ही या कामाला सोडून द्यावे परंतु, तुम्ही त्याच उत्साहाने त्या कामाला सुरु कराल.

तुळ राशि भविष्य 2022

2022 मध्ये बदलेल नशीब? विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!

13 एप्रिल ला बृहस्पती मीन राशीमध्ये सहाव्या भावात आणि 12 एप्रिल ला राहू मेष राशीमध्ये सातव्या भावात संक्रमण करेल. 29 एप्रिल ला शनी कुंभ राशीमध्ये पंचम भावात संक्रमण करेल आणि 12 एप्रिल ला हे विक्री होऊन मकर राशीमध्ये चतुर्थ भावात संक्रमण करेल. वर्षाच्या मध्यात तुम्हाला कौटुंबिक संबंधांवर लक्ष केंद्रित करण्याचा, आपल्या प्रियजनांसोबत बोलण्याचा आणि रोजच्या मुद्द्यांना लवकर सोडवण्याचा सल्ला दिला जातो. या राशीतील मेहनती जातक वर्षाच्या मध्यात उत्तम पैसा कमावतील. तुळ राशीतील जातकांसाठी वर्षाच्या शेवटचा भाग अनुकूल राहील. प्रेम आणि कामात तुम्हाला भाग्याची भरपूर साथ मिळेल सोबतच, शेवटी भाग्यात महत्वाचे परिवर्तन होण्याची शक्यता आहे. थोड्या वेळेसाठी तुम्हाला आपल्या रोजच्या व्यस्त आयुष्यापासून बचाव करण्यासाठी शुभ वेळ सिद्ध होऊ शकते अर्थात, या वेळी तुम्ही लहान ट्रिप किंवा सुट्टीवर जाण्याची योजना बनवू शकतात. असामान्य कार्य आणि लक्ष्य उत्पन्न होऊ शकतात आणि तुमच्या संचाराचा विस्तार होईल.

  • वर्षाच्या मध्यात, मंगळ तुमच्या दशम भावात कर्क राशीमध्ये संक्रमण करेल. ज्याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला करिअर संबंधित काही नवीन आणि वेगळा अनुभव करायला मिळू शकतो आणि म्हणून तुम्हाला खूप लाभ होईल.
  • बृहस्पती तुम्हाला पद उन्नती किंवा स्थानांतरणात आशीर्वाद देईल ज्या बाबतीत तुम्ही मागील काही वेळापासून विचार करत होते.
  • अष्टम भावात चंद्र उत्तर नोड राहु अवांछित खर्चाचे कारण बनू शकते अश्यात, विशेषतः या दिवसात आपल्या वित्तीय खर्चाची विशेष काळजी घ्या.
  • आपल्या चतुर्थ भावात स्थित शनी तुमच्या कुटुंबाचे कल्याण आणि सुखात कधी कधी बाधा उत्पन्न करू शकतो.
  • मागील वर्षाच्या तुलनेत तुमचे प्रेम जीवन या वर्षी उत्तम राहील.
  • जनवरी ची शुरुआत चांगली राहील आणि तुम्हाला आपल्या परिश्रमाचा उत्तम परिणाम मिळेल. तुम्ही या वेळी खूप सक्रिय असाल आणि तुम्ही बऱ्याच नवीन मित्रांना भेटाल आणि तुंकय्या कुटुंबात जवळीकता कायम राहील.

फेब्रुवारी पासून जून महिना आणि नंतर सप्टेंबर पासून डिसेंबर मध्ये तुम्हाला काही कागद पत्रावर विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. कुठली ही चल संपत्ती खरेदी करण्यात तुमची रुची वाढू शकते तथापि, घर खरेदी किंवा विकण्याच्या आधी घरातील मोठ्या व्यक्ती आणि जाणकारांचा सल्ला नक्की घ्या. जर तुम्ही काही नवीन काम सुरु करण्याची इच्छा ठेवतात तर, आर्थिक लाभ मिळणे तुमच्यासाठी अनुकूल राहील.

ऑगस्ट नंतर पैश्याच्या बाबतीत स्थिती सामान्य राहणार आहे. या काळात तुमचे माता-पिता द्वारे तुम्हाला चुकीचे समजले जाऊ शकते अश्यात, तुम्ही सावध राहिले पाहिजे. नात्यामध्ये काही समस्या येऊ शकतात. जर तुम्ही काही नवीन नोकरीची सुरवात करत आहे तर, तुम्हाला अधिक सतर्क आणि सावधान राहण्याची आवश्यकता असेल आणि तुम्हाला प्रेम आणि पैसे दोन्ही बाबतीत अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असेल. आपल्या आरोग्याच्या प्रति सावधान राहिले तर तुम्हाला विशेष रूपात चांगले राहील.

शेवटच्या तिमाही मध्ये तुम्हाला आपल्या आरोग्याच्या प्रति अधिक सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो आणि आरोग्याच्या प्रति कुठल्या ही प्रकारचा निष्काळजीपणा न करण्याचा सल्ला दिला जातो. कामासोबतच नियमित रूपात आराम केल्याने तुम्हाला ताजे वाटेल एकूणच, येणारे वर्ष उत्तम राहणारे आहे. यश तुमच्या पाऊली येईल. हे तुमची योग्यता सिद्ध करण्यासाठी खूप उपयुक्त वेळ आहे आणि या वेळी तुमच्या सामाजिक गोष्टींचा विस्तार होईल.

वर्ष 2022 तुळ राशीतील जातकांसाठी भाग्यशाली वेळ सिद्ध होईल कारण, शनी कुंभ राशीच्या पंचम भावात राहील. तुम्ही या वेळी तुमच्या जीवनात नवीनपण असेल आणि तुम्ही नवीन गोष्टी सुरु कराल. या वर्षी परिवर्तन आणि संधी दोन्ही आपल्या जीवनात भरपूर राहील तथापि, स्वतःला अधिक थकवू नका. या पूर्ण वर्षी तुम्ही लो प्रोफाइल बनवून ठेवा, तुमच्यासाठी अधिक उत्तम सिद्ध होऊ शकते. चंद्र राशीवर आधारित तुळ वार्षिक राशि भविष्य 2022 विस्ताराने वाचा.

Click here to read in English: Libra Horoscope 2022

हे राशिभविष्य चंद्र राशीवर आधारित आहे. याच्या व्यतिरिक्त व्यक्तिगत भविष्यवाणी जाणून घेण्यासाठी ज्योतिषींसोबत फोनवर किंवा चॅट ने जोडा.

तुळ प्रेम राशि भविष्य 2022

तुळ प्रेम राशि भविष्य 2022 भविष्यवाणीच्या अनुसार, 2022 मध्ये तुळ राशीतील व्यक्तींचे जीवन काही प्रमाणात सुचारू रूपात चालू शकतात. तुळ राशीतील जे जातक आपल्या प्रेम संबंधांना घेऊन गंभीर आहे ते या वर्षी विवाहाच्या बंधनात येऊ शकतात. जे जातक सिंगल आहे आणि कुणासोबत नात्यामध्ये येण्याची इच्छा ठेवतात त्यांना या वर्षी यश मिळू शकते. विवाहित जातकांच्या जीवनात ही प्रेम आणि शांतता कायम राहणार आहे. आपल्या साथी च्या प्रति कठोर वाणी आणि खराब व्यवहार करू नका आणि त्यांच्या प्रति सन्मान आणि समज दाखवा. वर्ष 2022 मध्ये एक उत्तम आहे स्वस्थ नात्याचा आनंद घेण्यासाठी ही सर्वात उत्तम पद्धत सिद्ध होऊ शकते.

तुळ करियर राशि भविष्य 2022

तुळ राशीतील जातकांसाठी करिअर राशि भविष्य 2022 च्या अनुसार, तुळ राशीतील जातकांसाठी करिअरच्या दृष्टिकोनाने हे सर्व उत्तम सिद्ध होईल. तुळ राशीतील पेशावर जातकांसाठी करिअर च्या दृष्टीने उत्तम राहणारे आहे. तुम्ही वर्षाच्या आधी काही महिन्यात पद उन्नतीची अपेक्षा ठेऊ शकतात. वर्षाचा दुसरा भाग करिअर च्या दृष्टीने बराच आव्हानात्मक राहू शकतो म्हणून, सहकर्मीं आणि वरिष्ठांसोबत उत्तम संबंध ठेवण्याचा सल्ला दिला जातो. जे लोक नोकरी किंवा काम बदलण्याचा विचार करत आहे, त्यांना आपल्या वर्तमानात नोकरी सोडण्याच्या आधी आणि नवीन नोकरी मध्ये शामिल होण्याच्या आधी योग्य विश्लेषण आणि शोध करण्याचा सल्ला दिला जातो. या वर्षी फ्रेशर्स ला त्यांच्या मनासारखी नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

तुळ शिक्षण राशि भविष्य 2022

तुळ राशीतील विद्यार्थ्यांचे वर्ष 2022 मध्ये उत्तम परिणाम मिळण्याची शक्यता बनतांना दिसत आहे. हे वर्ष स्पर्धा परीक्षेसाठी एक उत्तम वर्ष असू शकते. जे विद्यार्थी पुढचे शिक्षण विदेशात घेण्याची इच्छा ठेवतात त्यांना जानेवारी पासून जून मध्ये शुभ वार्ता मिळू शकतात. हे वर्ष तुमच्या येणाऱ्या करिअरसाठी ही महत्वाचे वर्ष आहे. तुम्हाला कठीण मेहनत करण्याची आवश्यकता असेल आणि उत्तम परिणामाची अपेक्षा करू शकतात.

तुळ वित्त राशि भविष्य 2022

तुळ वित्त राशि भविष्य 2022 च्या भविष्यवाणीच्या अनुसार, तुळ राशीतील जातकांना आर्थिक पक्षाच्या दृष्टीने 2022 स्थिरता मिळवू शकतात. तरी ही तुम्हाला आपल्या आर्थिक स्थितीच्या बाबतीत सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो खासकरून, वर्षाच्या दुसऱ्या सहामाही मध्ये. वर्षाच्या दुसऱ्या सहामहिन्यात तुमचे खर्च अधिक होणार आहे म्हणून, तुम्हाला सतर्क राहावे लागेल आणि अधिक बचत करण्याकडे लक्ष द्यावे लागेल. जानेवारी पासून एप्रिल पर्यंत धनाचा प्रवाह निरंतर कायम राहील. या वर्षी तुमच्यासाठी कमाईचा नवीन स्रोत नसेल एकूणच, या वर्षी तुम्हाला आपल्या खर्चाची विशेष रूपात नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

तुळ पारिवारिक राशि भविष्य 2022

तुळ पारिवारिक राशि भविष्य 2022 च्या अनुसार, हे वर्ष तुमच्या कुटुंबासाठी अनुकूल राहणार आहे. तुमच्या कुटुंब आणि समुदायासोबत संबंधात सुधार होईल आणि तुम्ही त्यांच्या प्रति किंवा स्थानीय समुदायात चांगला अनुभव कराल. तुमच्या पैकी काही लोक आपल्या घराला उत्तम बनवण्यासाठी आणि आपल्या पर्यावरणाला आनंदित करण्यासाठी काही महत्वाचे पाऊल उचलू शकतात, यामुळे हे अधिक आकर्षक होईल. तुम्ही या काळात संपत्ती मध्ये उत्तम प्रदर्शन करू शकतात.

आपल्या कुंडली मध्ये असलेल्या राज योग ची संपूर्ण माहिती मिळवा

तुळ संतान राशि भविष्य 2022

तुळ संतान राशि भविष्य 2022 च्या अनुसार, वर्षाची सुरवात मुलांच्या दृष्टिकोनाने अनुकूल राहणार आहे कारण, या वेळी पंचम भावावर बृहस्पती ची शुभ दृष्टी आहे यामुळे मुलांचे लक्ष शिक्षणात अधिक लागेल. जर तुमची मुले उच्च शिक्षण प्राप्त करण्याची इच्छा ठेवतात तर ते या वेळी कुठल्या जाणकार आणि प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश घेऊ शकतात एकूणच, तुमच्या संतान ला या वर्षी यश मिळेल. जर तुमचा मुलगा विवाह योग्य वयाचा आहे तर, या वर्षी त्याचा विवाह होण्याची शक्यता आहे. वर्षाचा दुसरा भाग उत्तम राहील कारण, या काळात तुम्ही मुलांसोबत आरोग्याला घेऊन चिंतीत होऊ शकतात.

तुळ विवाह राशि भविष्य 2022

तुळ विवाह राशि भविष्य च्या अनुसार, तुळ राशीच्या विवाहित जातकांना 2022 मध्ये वर्ष मिश्रित परिणाम मिळतील कारण, वर्षाची सुरवात तुमच्यासाठी काही बाधा घेऊन येऊ शकते आणि तुम्हाला काही कौटुंबिक मुद्यांना आणि आपल्या जीवनसाथी सोबत वाद-विवाद स्थिती घेरू शकते तथापि, वर्षाच्या सुरवाती मध्ये तुम्हाला जीवनसाथी चे भरपूर सहयोग प्राप्त होईल. वर्षाच्या मध्यात तुम्हाला अधिकात अधिक सतर्क आणि सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो कारण, या काळात तुमच्या सप्तम भावात संक्रमणाचा प्रभाव पाहिला जाईल आणि तुमच्या जीवनसाथी सोबत वाद होण्याची शंका आहे तसेच, वर्षाच्या शेवटी मंगळाचे स्थान परिवर्तन तुम्ही भविष्यात सर्व संदेह दूर करण्यात सर्व विवाद आणि गैरसमज दूर करण्यात मदतगार सिद्ध होईल यामुळे तुम्ही एकमेकांवर विश्वास आणि प्रेम सोबतच आपले जीवन व्यतीत कराल.

तुळ व्यापार राशि भविष्य 2022

तुळ व्यवसाय राशि भविष्य 2022 च्या अनुसार, तुळ राशीतील जातकांना 2022 मध्ये काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. भागीदारी व्यवसाय करत असलेल्या जातकांना व्यावसायिक कागदपत्र आणि फायलिंग च्या बाबतीत अधिक लक्ष देण्याची आवश्यकता पडू शकते. हा सल्ला दिला जातो की, आपल्या पार्टनर वर कुठल्या ही प्रकारचा अंध विश्वास करू नका आणि आपली प्रतिभा आणि कौशल्यावर विश्वास ठेवा. या वर्षी मह्तवपूर्ण गुंतवणूक फळदायी सिद्ध होणार नाही आणि तुम्हाला खूप नुकसान सहन करावे लागू शकते. जर तुम्ही भागीदारी मध्ये व्यवसाय सुरु करण्याची योजना बनवत आहे तर, या वर्षी याला टाळण्याचा सल्ला दिला जातो. या वर्षी कुठल्या ही नवीन कायद्याच्या सौद्यापासून दूर राहा. योग्य योजनेसाठी वेळ घ्या. जर तुम्हाला या वर्षी कुठला नवीन प्रोजेक्ट सुरु करण्याचा आहे तर, या वर्षी आपल्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करू नका अथवा मोठे नुकसान होऊ शकते.

तुळ संपत्ती आणि वाहन राशि भविष्य 2022

संपत्ती राशि भविष्य 2022 च्या अनुसार, हे वर्ष तुळ राशीतील जातकांसाठी वाहन खरेदी आणि विकण्यासाठी फळदायी सिद्ध होऊ शकतात. जर तुम्ही आपल्यासाठी संपत्ती खरेदी करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही यशस्वी व्हाल परंतु, जे संपत्ती तुम्हाला विरासत मध्ये भेटलेली आहे त्याला विकण्यासाठी वेळ अनुकूल सांगितली जाऊ शकत नाही. तुम्ही कुठला ही निर्णय घेण्याच्या आधी कुटुंबाच्या स्थिरतेवर लक्षपूर्वक विचार केला पाहिजे आणि तुम्हाला कुठली ही जटिल संपत्तीच्या सौद्यापासून बचाव केला पाहिजे अथवा याचे नुकसान होऊ शकते. या वर्षी जमीन, भवन आणि वाहन खरेदीची शक्यता आहे.

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

तुळ धन आणि लाभ राशि भविष्य 2022

तुळ धन आणि लाभ राशि भविष्य 2022 च्या अनुसार, तुळ राशीतील जातक 2022 मध्ये स्थिर कमाई अर्जित करतील. संपत्ती आणि किमती धातूंमध्ये गुंतवणूक न करणेच उत्तम राहील कारण, यासाठी वेळ अनुकूल नाही. 2022 मध्ये कठीण मेहनत तुम्हाला काही अधिक यश आणि धन देऊ शकते. ऑनलाइन लॉटरी किंवा जुगार मध्ये आपले पैसे व्यर्थ घालवू नका असा सल्ला दिला जातो. तुमच्या जवळ धनाचा निरंतर प्रवाह असेल परंतु, कौटुंबिक बाबतीत तुमच्या खर्चाच्या कारणाने तुम्ही या वर्षी वांछित बचत करू शकणार नाही. शनी आणि बृहस्पती च्या संक्रमणाच्या फळस्वरूप, तुम्ही कौटुंबिक सुख-सुविधा, भूमी, भवन निर्माण आणि वाहनात गुंतवणूक करू शकतात आणि एप्रिल चा महिना तुमच्यासाठी अधिक अनुकूल वेळ सिद्ध होईल.

तुळ स्वास्थ्य राशि भविष्य 2022

तुळ स्वास्थ्य राशि भविष्य 2022 भविष्यवाणीच्या अनुसार, तुळ राशीतील जातकांना या वर्षी थोड्या आरोग्य संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पचन आणि वायरल संक्रमण संबंधित रोग तुमच्या आरोग्याला प्रभावित करू शकतात तथापि, ही समस्या बऱ्याच काळापर्यंत टिकणार नाही. या वर्षी तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे म्हणून, तुम्हाला व्यायाम करण्याचा आणि आपल्या शरीराचा फिटनेस आणि वजनावर पूर्ण नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. उत्तम मानसिक आरोग्य कायम ठेवा आणि तणावापासून बचाव करण्यासाठी आपल्या आवडत्या गोष्टींना आपल्या जीवनात शामिल करा.

तुळ राशि भविष्य 2022 च्या अनुसार भाग्यशाली अंक

वर्ष 2022 मध्ये तुळ राशीतील जातकांसाठी भाग्यशाली अंक सात आहे. जे शुक्र द्वारे शासित आहे, आणि या वर्षीचे नेतृत्व अंक 6 करत आहे ज्याचा स्वामी बुध आहे. तुळ राशि भविष्य 2022 च्या अनुसार या वर्षी तुमच्या जीवनात बरेच बदल येणार आहे. तुमच्या राशीवर बृहस्पती ग्रहाचे सर्वात महत्वपूर्ण प्रभाव पहायला मिळेल तथापि, मंगळ ही एक लहान भूमिका निभावेल. एप्रिल आणि ऑक्टोबर च्या मधला वेळ तुमच्यासाठी सर्वात व्यस्त राहणार आहे. या वेळी तुम्हाला सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला जातो. नोव्हेंबर नंतर तुम्ही आपली सामान्य स्थितीमध्ये याल.

तुळ राशि भविष्य 2022: ज्योतिषीय उपाय

  • कुठल्या ही शुक्रवारी अनामिका बोटात चांदीच्या अंगठीमध्ये उच्च गुणवत्तेचा हिरा किंवा ओपल रत्न धारण करून आपल्या राशीचा स्वामी शुक्राला मजबूत करा.
  • जितके शक्य असेल गरजू लोकांना मदत करा आणि शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जा आणि काळ्या चण्याचा प्रसाद वाटा.
  • या वर्षी कुणासोबत चुकीचा व्यवहार करू नका, खासकरून सहकर्मींसोबत!
  • मुग्यांना गव्हाचे पीठ द्या.
  • काही वेळ गाईची सेवा करण्यात घालवा आणि कन्यांचा आशीर्वाद प्राप्त करा.

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल. अ‍ॅस्ट्रोसेज चा महत्वाचा हिस्सा बनण्यासाठी धन्यवाद! अधिक उत्तम लेखांसाठी आमच्या सोबत जोडलेले राहा.

Astrological services for accurate answers and better feature

33% off

Dhruv Astro Software - 1 Year

'Dhruv Astro Software' brings you the most advanced astrology software features, delivered from Cloud.

Brihat Horoscope
What will you get in 250+ pages Colored Brihat Horoscope.
Finance
Are money matters a reason for the dark-circles under your eyes?
Ask A Question
Is there any question or problem lingering.
Career / Job
Worried about your career? don't know what is.
AstroSage Year Book
AstroSage Yearbook is a channel to fulfill your dreams and destiny.
Career Counselling
The CogniAstro Career Counselling Report is the most comprehensive report available on this topic.

Astrological remedies to get rid of your problems

Red Coral / Moonga
(3 Carat)

Ward off evil spirits and strengthen Mars.

Gemstones
Buy Genuine Gemstones at Best Prices.
Yantras
Energised Yantras for You.
Rudraksha
Original Rudraksha to Bless Your Way.
Feng Shui
Bring Good Luck to your Place with Feng Shui.
Mala
Praise the Lord with Divine Energies of Mala.
Jadi (Tree Roots)
Keep Your Place Holy with Jadi.

Buy Brihat Horoscope

250+ pages @ Rs. 399/-

Brihat Horoscope

AstroSage on MobileAll Mobile Apps

Buy Gemstones

Best quality gemstones with assurance of AstroSage.com

Buy Yantras

Take advantage of Yantra with assurance of AstroSage.com

Buy Feng Shui

Bring Good Luck to your Place with Feng Shui.from AstroSage.com

Buy Rudraksh

Best quality Rudraksh with assurance of AstroSage.com
Call NowTalk to
Astrologer
Chat NowChat with
Astrologer