प्रजासत्ताक दिवस 2022
भारत हा जगातील महान आणि सर्वात मोठ्या लोकशाही देशांपैकी एक आहे आणि सन 2022 मध्ये, भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे जो स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ स्वातंत्र्याचा अमृत उत्सव म्हणून ही साजरा केला जाईल. म्हणजेच या वेळी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा काही खास असणार आहे. तसे ही हा सण दरवर्षी कुतूहल, उत्साह आणि रोमांचने भरलेला असतो कारण, तो आपल्या देशाची झाँकी पाहण्याची संधी देतो आणि सेनेचे विशेष कर्तव्य तसेच विमान आणि आयुध पाहण्यास मिळते.
या वेळी ही असेच काहीसे घडणार आहे आणि या मुळेच देशातील तरुणांचे, देशातील शेतकरी, देशाचे सैनिक आणि सर्व सामान्यांसोबतच विदेशी देशांची दृष्टी ही भारतातील या गणतंत्र दिवसावर भारताकडे राहते आणि ते जाणून घेण्याची इच्छा ठेवतात की,या वेळी प्रजासत्ताक दिनाच्या परेड मधील विशेष आकर्षणे कोणती असू शकतात तर, आज या लेखाद्वारे आपण जाणून घेणार आहोत की प्रजासत्ताक दिन 2022 कसा असेल आणि या प्रजासत्ताक दिनी काय खास असेल. चला तर मग या समारंभाबद्दल काही खास तथ्ये जाणून घेऊया. 2022 मध्ये भारताच्या भविष्या बद्दल वैदिक ज्योतिष विशेष काय सांगणार आहे हे देखील जाणून घ्या.
गणतंत्र दिवस 2022: या वर्षी काय आहे खास!
बऱ्याच समस्यांना आणि आव्हानांचा सामना करून आपला महान देश भारत वर्ष 2022 मध्ये 26 जानेवारी ला आपला 73 वा गणतंत्र दिवस साजरा करत आहे. हे कुठल्या ही आचरणाने कमी नाही की, ज्या प्रकारे आपण अनेक आव्हानांना मागे सोडून आपल्या गणतंत्राची रक्षा केली आहे आणि जगामध्ये उत्तम उच्चता प्राप्त केली आहे. प्रत्येक भारतीयासाठी हा एक गौरव प्रदान करणारा क्षण आहे. जेव्हा आपल्याला आपल्या देश आपल्या नीती आणि आपल्या सेनेवर ही गर्व वाटतो कारण, त्यांच्या कारणानेच आम्ही आज आपल्या घरात सुरक्षित जीवन व्यतीत करत आहोत. या वेळी गणतंत्र दिवस 2022 मध्ये काही विशेष गोष्टी ही होतील. चला आता नजर टाकूया की, असे काय खास असेल या वेळी गणतंत्र दिवसाच्या समारंभात:
- प्रजासत्ताक दिनाची परेड अर्धा तास उशिराने सुरू होण्याची 75 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. या मागे ही एक मोठे कारण आहे, त्यामुळे हा कार्यक्रम अर्धा तास उशिराने सुरू होणार आहे. खरं तर तुम्हाला माहिती आहे की, जगातील इतर देशांप्रमाणे आपला देश देखील कोरोना विषाणूच्या विळख्यात आहे आणि सरकार आणि जनता या धोकादायक विषाणूशी सतत लढा देत पुढे जात आहे. या क्रमात, कोरोना प्रोटोकॉलचे पालन केले जाईल आणि आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी प्रजासत्ताक दिन सोहळा सुरू होण्यापूर्वी जम्मू आणि काश्मीरमध्ये बलिदान देणाऱ्या सुरक्षा जवानांना श्रद्धांजली अर्पण करतील. त्या नंतरच प्रजासत्ताक दिन 2022 चा उत्सव सुरू होईल.
- या वेळी ही ही परेड चोख सुरक्षा व्यवस्थेत पार पडणार असून सुमारे ३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने प्रत्येक कोपऱ्यावर नजर ठेवली जाणार आहे जेणेकरून कोणत्या ही प्रकारचे असामाजिक कृत्य टाळता येईल.
- प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारी परेड सुमारे 90 मिनिटांची असेल. ही परेड दरवर्षी 26 जानेवारी रोजी राजपथ येथून सकाळी 10:00 वाजता सुरू होते, परंतु या वेळी परेड सकाळी 10 ऐवजी 10:30 वाजता सुरू होईल.
- 26 जानेवारी 2022 रोजी होणारी परेड सुमारे 8 किमी लांबीची असेल जी रायसीना हिल पासून सुरू होईल. येथून सुरुवात होऊन ती राजपथ आणि इंडिया गेट पासून जाईल आणि लाल किल्ल्यावर जाऊन संपेल.
- 26 जानेवारी 2022 रोजी परेड सुरू करण्यापूर्वी देशाचे माननीय पंतप्रधानांच्या द्वारे इंडिया गेट वर जाणून अमर जवान ज्योती आणि त्या नंतर राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे पुष्पहार अर्पण केले जाईल आणि शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल.
- 2021 मध्ये सुमारे 25000 लोकांना यात सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती आणि या वेळी ही तेवढ्याच लोकांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तसेच, ज्यांना या मध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांना कोविड-19 सुरक्षा मानकांचे पूर्णपणे पालन करावे लागेल.
- मागील काही काळापासून आपल्या देशाने लष्करी क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळवले आहे आणि आता भारताची परिस्थिती अशी आहे की आपण परदेशातून कमी वस्तू खरेदी करतो पण आपला माल परदेशात विकण्याच्या स्थितीत आलो आहोत. या वेळी विमानांद्वारे फ्लाय पास्ट केला जाईल, तो जवळपास 75 विमानांद्वारे केला जाईल. जो की, अतिशय भव्य आणि प्रेक्षणीय असणार आहे. तिथे उपस्थित प्रेक्षकांसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी हा खूप अभिमानाची वेळ असेल. जेव्हा आपण आपल्या सेना आणि सेनेच्या जवानांना पराक्रम गाजवताना पाहतो तेव्हा आपले हृदय देखील रोमांचित होईल.
- स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही साजरा केला जात आहे आणि त्यामुळेच यंदाचा फ्लायपास्ट सर्वात मोठा आणि भव्य असण्याची शक्यता आहे. या मध्ये भारतीय वायुसेना, भारतीय लष्कर आणि भारतीय नौदलाची सुमारे 75 विमाने प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये आपली कला दाखवतील.
- या वेळच्या परेड मध्ये समाविष्ट असलेल्या मुख्य विमानांमध्ये राफेल तसेच, भारतीय नौदलाचे मिग-29 पी8आय निगराणी विमान आणि जग्वार सारख्या लढाऊ विमानांचा समावेश आहे. या सोबतच, या परेडमध्ये भारतीय वायुसेनेची एक झांकी, ज्यामध्ये हलकी लढाऊ हेलिकॉप्टर, राफेल आणि इतर युद्ध विमाने आणि अश्लेषा एमके1 रडार सारख्या विशेष शस्त्र सामग्रीचा समावेश असेल.
आपल्या कुंडली मध्ये ही आहे राजयोग? जाणून घ्या आपला राजयोग रिपोर्ट
- या शिवाय या वेळच्या प्रजासत्ताक दिनी आणखी एक खास गोष्ट घडणार आहे की, दरवर्षी आपल्या देशात प्रजासत्ताक दिनानिमित्त परदेशातील प्रमुखांना राजपथावर आमंत्रित केले जाते आणि विशेष पाहुणे म्हणून, त्यांना आपल्या देशात परेड पाहण्यासाठी निमंत्रित जाते परंतु हे या वर्षी केले जाणार नाही, म्हणजेच या वेळी परदेशातील कोणत्या ही राष्ट्रप्रमुखाला निमंत्रण नसण्याची शक्यता आहे.
ज्योतिषीय दृष्टीने भारत 2022
वैदिक ज्योतिषशास्त्राच्या आधारे 2022 मध्ये गणतंत्र भारतासाठी जी भविष्यवाणी केली गेली आहे ती भारताच्या राजकीय, वित्तीय, धार्मिक आणि सांस्कृतिक परिस्थितींबद्दल बरेच काही सांगते. देशाच्या राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक परिदृश्यावर तारे आणि ग्रहांच्या हालचालींचा कसा परिणाम होतो ते आपण पाहूया. ह्या भविष्यवाणीला नीट समजून घेण्यासाठी स्वतंत्र भारताची कुंडली खाली दिली आहे:
स्वतंत्र भारतच्या कुंडलीवर लक्ष दिले असता, वृषभ लग्नची कुंडली आहे, ज्यांचे लग्नेश शुक्र महाराज कुंडली च्या तिसऱ्या भावात बुध सूर्य चंद्र आणि शनी सोबत स्थित आहे तसेच, लग्न मध्ये राहू महाराज विराजमान आहे. बृहस्पती महाराज सहाव्या भावात विराजमान आहेत, जे की, अष्टम आणि एकादश भावाचा स्वामी आहे तथा या कुंडलीचा योगकारक ग्रह शनि आहे कारण, ते त्रिकोण भाव नवम आणि केंद्र भाव दशम चा स्वामी आहे तसेच, कुंडलीच्या तिसऱ्या भावात विराजमान आहे.
वर्ष 2022 च्या सुरवाती मध्ये सर्वाधिक शुभ ग्रह मानले जाणारे देव गुरु बृहस्पती ग्रह भावाने दशम भाव आणि चंद्र राशीपासून अष्टम भावात संक्रमण करत आहे जे की, एप्रिल महिन्यात एकादश भावात संक्रमण करतील.
योगकारक ग्रह शनि महाराज वर्षाच्या सुरवाती मध्ये लग्न भावातून नवम भावात संक्रमण करत आहे जे की, एप्रिल च्या महिन्यात दशम भावात जातील आणि काही वेळेनंतर पुनः नवम भावात येतील. हे चंद्र राशीच्या सप्तम आणि अष्टम भावात होईल.
जो पर्यंत राहू महाराजाचा प्रश्न आहे, ते वर्षाच्या सुरवाती मध्ये लग्न भावातच विराजमान आहे परंतु, एप्रिल 2022 च्या मध्ये ते लग्न पासून द्वादश भाव आणि चंद्र राशीपासून दशम भावात संक्रमण करतील.
याच वेळी डिसेंबर 2022 च्या मध्य पर्यंत चंद्राच्या महादशा मध्ये बुधाच्या अंतर्दशेचा प्रभाव राहील. चंद्र देवाच्या कुंडली च्या तिसऱ्या भावाचा स्वामी होऊन तिसऱ्या भावात विराजमान आहे तर, बुध महाराज कुंडलीच्या द्वितीय आणि पंचमेश होऊन कुंडली च्या तिसऱ्या भावात स्थित आहे.
चला जाणून घेऊया की, कुंडली आणि वर्तमान ग्रहांची स्थिती भारताच्या भविष्याला कसे जोडते:
2022 मध्ये भारताचे राजनीतिक परिदृश्य
2022 हे वर्ष भारतातील राजकीय परिदृश्याच्या रूपात गोंधळाचे वर्ष असणार आहे. 2022 च्या सुरुवातीला, फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत भारतातील अनेक प्रमुख राज्यांमध्ये निवडणुका आहेत, ज्यात उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरुवाती पासूनच निवडणुकीचे बिगुल वाजू लागल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून देशाच्याच नव्हे तर परदेशातील अनेक मोट्या राष्ट्रांचा ही भारतातील या निवडणुकांवर डोळा आहे कारण, जिथे काही लोक याला वर्तमान केंद्र सरकारच्या यश आणि अपयशाला जोडून पाहतात तर, काही विरोधी देशांच्या नजरेत बऱ्याच निवडणुकांवर टिकलेली आहे.
शनि देव, गुरू आणि राहूचे संक्रमण अतिशय महत्त्वाचे संक्रमण असून ते या वर्षी दिसणार आहेत, त्यामुळे एप्रिल ते जुलै 2022 मधील काळ अतिशय अस्थिर असेल असे म्हणता येईल. या दरम्यान राजकीय आव्हाने ही पहायला मिळतील आणि जागतिक पटलावर भारताला ही काही आव्हाने दिसू लागतील, पण जस-जसा जुलै महिना निघून जाईल, तसतसा भारत पुन्हा एकदा आपल्या चांगल्या स्थितीत खंबीरपणे उभा राहील आणि राजकीय दृष्ट्या ही सत्ताधारी दल मजबूत स्थितीमध्ये दिसून येईल.
एप्रिल ते जुलै 2022 हा काळ सत्ताधारी लोकांसाठी ही आव्हानात्मक असेल कारण काही मोठी नावे एकमेकांशी भिडताना दिसतील पण ऑगस्ट 2022 नंतर ही आव्हाने कमी होतील आणि सरकार मजबूत स्थितीत दिसेल. काही मित्रपक्ष विरोधाला सामोरे जातील, पण सरकार आपल्या भक्कम स्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवेल आणि काहींशी संबंध ठेवू शकेल.
वर्षाच्या मध्यात शनि आणि गुरूच्या प्रतिगामी स्थितीमुळे काही मोठे न्यायपालिकेचे आदेश राजकीय वर्तुळात येऊ शकतात, जे अनेक बाबतीत देशात उदाहरण ठरतील. हा काळ देशात न्यायिक दृष्ट्या ही भक्कम दिसेल आणि राजकीय दृष्ट्या अशा अनेक घोषणा सुरू होतील, ज्या मध्यम वर्गीय आणि निम्न मध्यम वर्गीयांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील.
2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था
जर आपण अर्थव्यवस्थेबद्दल पाहिले असता, जगातील अनेक बलाढ्य देश देखील सध्या कोरोना वायरस सारख्या महामारीशी झुंज देत आहेत आणि अर्थव्यवस्थेतील अशांत परिस्थितीचा सामना करत आहेत आणि भारत देखील या पासून अस्पर्शित नाही परंतु, काही काळापासून भारताचा आर्थिक विकास दर वाढला आहे. काही वाढ झाली आहे, जी या वेळेत काही प्रमाणात घट नोंदवेल आणि जानेवारी ते जुलै 2022 पर्यंतचा काळ म्हणजे वर्ष 2022 च्या पहिल्या सहामाहीत थोडा कमकुवत राहू शकतो परंतु, निराश होण्याची गरज नाही कारण, ऑगस्ट 2022 नंतरचा काळ अधिक योग्य असेल आणि नंतरचे वर्ष अधिक मजबूत आर्थिक स्थिती प्रदान करेल.
तुम्ही शेअर बाजारात ऐतिहासिक पातळीवर पोहचाल. या वर्षी प्रामुख्याने तेल, वायू, खनिजे, माहिती तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रातील समभागांना चांगलीच गती मिळणार असून गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक लोक शेअर बाजारात हात आजमावताना दिसतील.
या वेळचा अर्थसंकल्प गेल्या अर्थसंकल्पापेक्षा मोठा असू शकतो, ज्या मध्ये निम्नवर्गीय आणि निम्न मध्यम वर्गीयांना लक्षात घेऊन काही मोठ्या घोषणा आणि करसवलती दिल्या जाऊ शकतात. शेतकऱ्यांबाबत मोठी घोषणा ही होऊ शकते. मात्र, संरक्षण बजेट मध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. थोडक्यात, लष्कर, संरक्षण, पायाभूत सुविधा आणि कनिष्ठ आणि मध्यम वर्गाला डोळ्यासमोर ठेवून यंदाचा अर्थसंकल्प येण्याची शक्यता आहे.
2022 मध्ये भारत आणि धर्म
चंद्र राशीपासून बृहस्पती चे संलर्मान अष्टम भावात होत आहे आणि वर्षाच्या मध्य मध्ये शनी चे संक्रमण ही चंद्र राशीपासून अष्टम भावात होईल. ही ग्रह स्थिती देशात धार्मिक रूपात मजबूत स्थितीला दाखवते. धर्माच्या नावावर बऱ्याच अधिक गोष्टी होतील आणि अनेक लोकांच्या द्वारे या दिशेत काही कौतुकास्पद प्रयत्न ही केले जातील तथापि, काही लोक धर्माच्या आड आपला फायदा करतांना ही दिसतील परंतु, लोकांमध्ये धार्मिकता वाढेल आणि धर्म संबंधी विशेष स्थानांची सुरक्षा वाढवण्याकडे लक्ष द्यावे लागेल.
गणतंत्र दिवस 2022 समारोह
26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू होताच भारत एक गणतंत्र बनला आणि तेव्हापासून दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. हा भारतातील राजपत्रित अवकाश आहे आणि राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. सन 2022 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवावर ही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या रूपाने परिणाम होणार आहे कारण, आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत, जे आपल्याला अनेक रणबंकुरांच्या प्राणांची आहुती देऊन ब्रिटिशांकडून प्राप्त झाले आहे.
प्रजासत्ताक दिन हा भारतातील एक अतिशय सन्मान जनक सण आहे आणि प्रत्येक भारतीय तो उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतो. प्रजासत्ताक दिनी, एक परेड काढली जाते, ज्यामध्ये विविध राज्ये आणि मंत्रालयांच्या झाँकी असतात, जे देशात होत असलेल्या विकासकामांचे दर्शन घडवतात. ही परेड संरक्षण मंत्रालयाकडून आयोजित केली जाते.
या मध्ये भारतीय सेना, ज्यामध्ये भारतीय वायू सेना आणि भारतीय नौदल यांसह विविध सैन्यदल, इतर निमलष्करी दल, पोलीस आणि एनसीसी कॅडेट्स देखील सहभागी होतात आणि शालेय विद्यार्थी देखील या परेड मध्ये सहभागी होतात आणि लोकांसाठी अनेक प्रकारचे आकर्षक फ्लोट्स देखील उपलब्ध आहेत. अनेक प्रकारच्या आकर्षक झाँकी ही लोकांना मनोरंजना सोबत त्यांना रोमांच आणि ज्ञान प्रदान करणारे काम करते. या परेड च्या वेळी अर्थात गणतंत्र दिवसाच्या वेळी अनेक प्रकारचे युद्धक विमान आणि आयुध पाहण्याची संधी ही मिळते. जे प्रत्येक देशवासीचा गर्व वाढवते.
दरवर्षी साजरा केला जाणारा हा असा एक सण आहे, जो आपल्याला आपल्या भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. अॅस्ट्रोसेज तर्फे तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिन 2022 च्या खूप खूप शुभेच्छा!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems

AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2023
- राशिफल 2023
- Calendar 2023
- Holidays 2023
- Chinese Horoscope 2023
- Education Horoscope 2023
- Purnima 2023
- Amavasya 2023
- Shubh Muhurat 2023
- Marriage Muhurat 2023
- Chinese Calendar 2023
- Bank Holidays 2023
- राशि भविष्य 2023 - Rashi Bhavishya 2023 Marathi
- ராசி பலன் 2023 - Rasi Palan 2023 Tamil
- వార్షిక రాశి ఫలాలు 2023 - Rasi Phalalu 2023 Telugu
- રાશિફળ 2023 - Rashifad 2023
- ജാതകം 2023 - Jathakam 2023 Malayalam
- ৰাশিফল 2023 - Rashifal 2023 Assamese
- ରାଶିଫଳ 2023 - Rashiphala 2023 Odia
- রাশিফল 2023 - Rashifol 2023 Bengali
- ವಾರ್ಷಿಕ ರಾಶಿ ಭವಿಷ್ಯ 2023 - Rashi Bhavishya 2023 Kannada