अंक ज्योतिष - Numerology In Marathi (3 जुलै- 9 जुलै, 2022)
कसा जाणून घ्याल आपला मुख्य अंक (मूलांक) ?
अंक ज्योतिष साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेण्यासाठी अंक ज्योतिष मध्ये मूलांकाचे मोठे महत्व आहे. मूलांक जातकाच्या जीवनाचा महत्वाचा अंक मानला गेला आहे. तुमचा जन्म महिन्याच्या कुठल्या ही तारखेला होतो, तो युनिट च्या अंकात बदलल्यानंतर जो अंक प्राप्त होतो, तो आपला मूलांक मानला जातो. मूलांक 1 ते 9 अंकांच्या मध्ये कुठला ही असू शकतो उदाहरणार्थ- तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 10 तारखेला झाला असेल तर, मूलांक 1+0 म्हणजे 1 असेल.
त्याच प्रमाणे, कोणत्या ही महिन्याच्या 1 ते 31 तारखेपर्यंत जन्मलेल्या लोकांसाठी, 1 ते 9 पर्यंतच्या मूलांकांची गणना केली जाते. अशा प्रकारे सर्व स्थानिक रहिवासी त्यांचा मूलांक जाणून घेऊन त्यांचे साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेऊ शकतात.
अश्या प्रकारे कुठल्या ही महिन्याच्या 1 तारखे पासून 31 तारखेत जन्म घेतलेल्या लोकांसाठी 1 ते 9
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
आपल्या जन्म तिथीने जाणून घ्या साप्ताहिक अंक राशि भविष्य (3 जुलै ते 9 जुलै, 2022)
अंकशास्त्राचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो कारण, सर्व संख्या आपल्या जन्मतारखेशी संबंधित असतात. खाली दिलेल्या लेखात आम्ही सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा मूलांक ठरतो आणि या सर्व संख्या वेगवेगळ्या ग्रहांद्वारे शासित असतात.
जसे की, मूलांक 1 वर असुरी देवाचे अधिपत्य आहे. चंद्र देव मूलांक 2 चा स्वामी आहे. अंक 3 ला देव गुरु बृहस्पतीचे स्वामित्व प्राप्त आहे, राहू अंक 4 चा राजा आहे. अंक 5 बुध ग्रहाच्या अधीन आहे. 6 अंकाचा राजा शुक्र देव आहे आणि 7 चा अंक केतू ग्रह आहे. शनिदेवाला अंक 8 चा स्वामी मानले गेले आहे. अंक 9 मंगळ देवाचा अंक आहे आणि याच ग्रहांच्या परिवर्तनाने जातकाच्या जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन होतात.
250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!
मूलांक 1
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात तुमची प्रगती खूप मंद गतीने होईल, अशी भीती आहे, मग ती तुमची नोकरी, आर्थिक जीवन किंवा नातेसंबंधांच्या बाबतीत असो. पण सकारात्मक बाजूबद्दल बोलायचे झाले तर या काळात तुम्ही तुमची वेगळी ओळख दाखवण्याच्या स्थितीत असाल. तुम्हाला अध्यात्मात स्वतःला समर्पित करण्याचा सल्ला दिला जातो कारण, ते तुम्हाला मनःशांती देईल.
या काळात तुम्हाला प्रेम जीवन किंवा वैवाहिक जीवनाबाबत काळजी घ्यावी लागेल कारण, काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला परस्पर संबंध वाढवण्याचा प्रयत्न करण्याची आणि तुमच्या जोडीदाराशी नेहमी नम्रपणे वागण्याचा सल्ला दिला जातो.
जर तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या पाहिले तर, तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. पण चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या कामाकडे लक्ष दिले जाईल.
आर्थिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, या आठवड्यात तुम्हाला लाभ मिळतील परंतु तुम्हाला खर्चाचा सामना करावा लागू शकतो.
आरोग्याच्या बाबतीत, तुम्हाला डोकेदुखी आणि पचनाच्या समस्यांमुळे त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या आहाराबाबत काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: रविवारी सूर्य ग्रहासाठी यज्ञ करा.
मूलांक 2
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झालेला आहे)
भावनिक असंतुलनामुळे या आठवड्यात महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्ही गोंधळात पडू शकता. जे तुमच्या प्रगतीला बाधा आणू शकतात.
आर्थिकदृष्ट्या तुमचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आईच्या तब्येतीवर जास्त पैसे खर्च करावे लागतील असे संकेत आहेत. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची आणि आर्थिक व्यवस्थापन योग्यरित्या करावे लागेल.
व्यावसायिकदृष्ट्या तुमच्यावर कामाचा ताण वाढू शकतो. तसेच, सहकारी आणि वरिष्ठांकडून फारसे सहकार्य मिळणार नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल.
उपाय: प्रतिदिन 20 वेळा 'ॐ चंद्राय नमः' चा जप करा.
250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!
मूलांक 3
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झालेला आहे)
हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी ठरेल. या काळात तुमची आवड अध्यात्माकडे जास्त असू शकते आणि तुम्ही अनेक अध्यात्मिक कार्यात गुंतलेले दिसू शकता.
करिअरच्या दृष्टीने तुम्हाला अनेक नवीन आणि चांगल्या संधी मिळतील. तसेच, तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. या शिवाय काही कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.
आर्थिकदृष्ट्या या आठवड्यात उत्पन्नाचा प्रवाह चांगला राहील आणि बचतीला ही वाव असेल. अशा परिस्थितीत, जर तुम्ही पैशाशी संबंधित कोणता ही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा विचार करत असाल तर ही वेळ अनुकूल आहे.
उपाय: प्रतिदिन 21 वेळा 'ॐ गुरुवे नमः' चा जप करा.
मूलांक 4
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास उंचावेल. परिणामी तुम्ही तुमचे कौशल्य सिद्ध करू शकाल. यामुळे तुम्हाला एक वेगळी ओळख मिळेल आणि तुम्हाला यश मिळेल.
व्यावसायिकदृष्ट्या पाहिल्यास, कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल आणि सौहार्दपूर्ण असेल. या सोबतच तुम्हाला सहकारी आणि वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. या काळात तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी ही मिळतील.
आर्थिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, वारसा सारख्या अनपेक्षित स्त्रोतांकडून लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. वयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, या आठवड्यात तुम्ही अनौपचारिक प्रवासाचा आनंद घ्याल. दुसरीकडे, तुमच्या घरात काही शुभ कार्यक्रम असू शकतात, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल.
आरोग्याच्या दृष्टीने, हा आठवडा अनुकूल आहे. तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त शरीराचा अनुभव येईल. अशा स्थितीत स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा, व्यायाम आणि ध्यान या सारख्या चांगल्या सवयींचा आपल्या दैनंदिन दिनक्रमात समावेश करा.
उपाय: मंगलवारी दुर्गा यज्ञ करा.
मूलांक 5
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झालेला आहे)
व्यावसायिकदृष्ट्या पाहिले तर, जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांना चांगला नफा मिळेल. तसेच ते कोणत्या ही नवीन व्यवसायात किंवा उद्योगात प्रवेश करू शकतात.
वयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे तर, तुमच्या कुटुंबातील वातावरण खूप आनंददायी आणि सौहार्दपूर्ण असेल. प्रियजनांशी तुमचे संबंध सौहार्दाचे असतील. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह सहलीला जाऊ शकता.
उपाय: नियमित 41 वेळा 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' चा जप करा.
आपल्या कुंडली मध्ये ही आहे राजयोग? जाणून घ्या आपला राजयोग रिपोर्ट
मूलांक 6
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे)
हा आठवडा तुमच्यासाठी थोडा व्यस्त असू शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला मोठे किंवा महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते.
व्यावसायिकदृष्ट्या पाहता, कामाच्या ठिकाणी गोंधळलेल्या वातावरणामुळे तुमच्यावर कामाचा ताण वाढू शकतो. अशा परिस्थितीत तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष होऊ शकते.
तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर, नवीन प्रकल्प मिळवण्याच्या तुमच्या प्रयत्नात तुम्ही या आठवड्यात अयशस्वी होऊ शकता. दुसरीकडे, आर्थिकदृष्ट्या, तुम्हाला पैशाच्या प्रवाहात चढ-उतार दिसू शकतात. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी पैसे वाचवणे खूप कठीण जाईल.
वयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, प्रियजनांसोबतच्या नात्यात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला स्वतःला शांत ठेवण्याचा सल्ला दिला जातो आणि इतरांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा एकूणच, या आठवड्यात तुमची मेहनत तुमच्यासाठी फलदायी ठरू शकते.
उपाय: प्रतिदिन 33 वेळा "ॐ शुक्राय नमः" चा जप करा.
मूलांक 7
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात यश मिळविण्यासाठी तुम्हाला बर्याच प्रमाणात धीर धरावा लागेल कारण, तुम्हाला कामाच्या ठिकाणी उच्च नोकरीच्या दबावासह अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. तसेच तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष होऊ शकते. अशा परिस्थितीत सक्तीची बदली होण्याची शक्यता ही जास्त आहे.
तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर, तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला नव्या पद्धतीने रणनीती बनवावी लागेल.
वयक्तिक जीवनाबद्दल बोलताना, प्रियजनांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला अधिक सुसंवाद आवश्यक असेल. दुसरीकडे, आरोग्याच्या बाबतीत, तुम्हाला पचनाच्या समस्यांमुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमचा आहार सुधारण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: प्रतिदिन 16 वेळा 'ॐ गं गणपतये नमः' चा जप करा.
मूलांक 8
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झालेला आहे)
या सप्ताहात तुम्ही किती ही प्रयत्न केले तरी काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. व्यावसायिकदृष्ट्या पाहिल्यास, तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांशी अधिक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो कारण, ते तुमच्याविरुद्ध कट रचून तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा परिस्थितीत तुमच्याकडून काही चुकाही होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही अधिक सावध राहणेच हिताचे ठरेल.
जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर, या आठवड्यात तुमचे प्रतिस्पर्धी तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात आणि उच्च स्तरावर पोहोचू शकतात. त्यामुळे या कालावधीत तुम्हाला तुमच्या व्यवसायाबाबत अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आरोग्याच्या दृष्टीने या आठवड्यात तुम्हाला पाय दुखणे आणि पचनाच्या समस्यांनी त्रस्त होऊ शकते. तुम्हाला चिंतेच्या तक्रारी देखील असू शकतात. आपल्या आहाराबद्दल सावधगिरी बाळगा आणि नियमित ध्यान इ.
प्रेम संबंधित बोलायचे झाले तर, जोडीदारासोबतच्या नात्यात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन समजून घेऊन त्यांच्याशी नम्रपणे वागण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: शनिवारी दिव्यांग लोकांना दान-पुण्य करा.
मिळवा आपल्या कुंडलीच्या आधारित सटीक शनि रिपोर्ट
मूलांक 9
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झालेला आहे)
व्यावसायिक जीवनात हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी ठरेल. तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळतील, ज्यामुळे तुमचे कौशल्य वाढेल.
आर्थिकदृष्ट्या, उत्पन्नाचा प्रवाह चांगला राहील आणि धन बचत देखील शक्य होईल. अशा परिस्थितीत तुम्ही धन संबंधित मोठे निर्णय घेण्याची योजना करू शकतात.
प्रेम संबंध बद्दल बोलायचे झाल्यास, तुमच्या जीवनसाथी सोबत तुमचे नाते सौहार्दपूर्ण असेल. यामुळे तुमच्यातील प्रेम आणि रोमांस वाढेल. त्याच बरोबर आरोग्याच्या दृष्टीने ही हा आठवडा अनुकूल असणार आहे.
उपाय: मंगळवारी हनुमान चालीसाचा पाठ करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2024
- राशिफल 2024
- Calendar 2024
- Holidays 2024
- Chinese Horoscope 2024
- Shubh Muhurat 2024
- Career Horoscope 2024
- गुरु गोचर 2024
- Career Horoscope 2024
- Good Time To Buy A House In 2024
- Marriage Probabilities 2024
- राशि अनुसार वाहन ख़रीदने के शुभ योग 2024
- राशि अनुसार घर खरीदने के शुभ योग 2024
- वॉलपेपर 2024
- Astrology 2024