अंक ज्योतिष - Numerology In Marathi (27 मार्च - 2 एप्रिल, 2022)
कसा जाणून घ्याल आपला मुख्य अंक (मूलांक) ?
अंक ज्योतिष साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेण्यासाठी अंक ज्योतिष मध्ये मूलांकाचे मोठे महत्व आहे. मूलांक जातकाच्या जीवनाचा महत्वाचा अंक मानला गेला आहे. तुमचा जन्म महिन्याच्या कुठल्या ही तारखेला होतो, तो युनिट च्या अंकात बदलल्यानंतर जो अंक प्राप्त होतो, तो आपला मूलांक मानला जातो. मूलांक 1 ते 9 अंकांच्या मध्ये कुठला ही असू शकतो उदाहरणार्थ- तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 10 तारखेला झाला असेल तर, मूलांक 1+0 म्हणजे 1 असेल.

त्याच प्रमाणे, कोणत्या ही महिन्याच्या 1 ते 31 तारखेपर्यंत जन्मलेल्या लोकांसाठी, 1 ते 9 पर्यंतच्या मूलांकांची गणना केली जाते. अशा प्रकारे सर्व स्थानिक रहिवासी त्यांचा मूलांक जाणून घेऊन त्यांचे साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेऊ शकतात.
अश्या प्रकारे कुठल्या ही महिन्याच्या 1 तारखे पासून 31 तारखेत जन्म घेतलेल्या लोकांसाठी 1 ते 9
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
आपल्या जन्म तिथीने जाणून घ्या साप्ताहिक अंक राशि भविष्य (27 मार्च ते 2 एप्रिल, 2022)
अंकशास्त्राचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो कारण, सर्व संख्या आपल्या जन्मतारखेशी संबंधित असतात. खाली दिलेल्या लेखात आम्ही सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा मूलांक ठरतो आणि या सर्व संख्या वेगवेगळ्या ग्रहांद्वारे शासित असतात.
जसे की, मूलांक 1 वर असुरी देवाचे अधिपत्य आहे. चंद्र देव मूलांक 2 चा स्वामी आहे. अंक 3 ला देव गुरु बृहस्पतीचे स्वामित्व प्राप्त आहे, राहू अंक 4 चा राजा आहे. अंक 5 बुध ग्रहाच्या अधीन आहे. 6 अंकाचा राजा शुक्र देव आहे आणि 7 चा अंक केतू ग्रह आहे. शनिदेवाला अंक 8 चा स्वामी मानले गेले आहे. अंक 9 मंगळ देवाचा अंक आहे आणि याच ग्रहांच्या परिवर्तनाने जातकाच्या जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन होतात.
250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!
मूलांक 1
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला प्रगती दिसेल. मग ते तुमच्या करिअरच्या, व्यवसायाच्या बाबतीत असो किंवा शेअर बाजार, स्टॉक मार्केट इत्यादी सट्टेबाजांच्या बाबतीत असो. एकूणच, या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामावर चांगली पकड राखाल, तुमची सर्व उद्दिष्टे साध्य कराल, तसेच, तुमच्या पदावर ठाम राहाल आणि तुमचे स्थान टिकवण्यात यशस्वी व्हाल.
जर तुम्ही नोकरी करत असाल तर, या आठवड्यात तुमची बढती होण्याची शक्यता आहे. इतर लाभांसह पगारवाढीची ही दाट शक्यता आहे. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर, तुम्हाला चांगले धन कमावण्याची संधी मिळेल. या सोबतच तुमच्या व्यवसायावर चांगले नियंत्रण ठेवण्याची संधी ही उपलब्ध होईल.
दुसरीकडे, जर तुम्ही एखाद्या संपत्तीमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, ही वेळ तुमच्यासाठी फारशी मजबूत नाही. यासाठी तुम्हाला थोडा वेळ थांबण्याचा सल्ला दिला जातो. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, या आठवड्यात तुमचे प्रियजन आणि जोडीदाराशी संबंध चांगले राहतील.
उपाय: नियमित 19 वेळा "ॐ आदित्याय नमः" चा जप करा.
मूलांक 2
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झालेला आहे)
अंक ज्योतिष साप्ताहिक राशी भविष्यनुसार, या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी चांगली राहील परंतु, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही समस्यांमधून जावे लागेल.
आठवड्याची सुरुवात तुमच्या करिअर, व्यवसाय आणि नोकरीच्या दृष्टीने अनुकूल राहण्याचे संकेत आहेत. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरेल. तुम्हाला सुरुवातीलाच चांगले परिणाम दिसून येतील. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकतात.
आठवड्याच्या शेवटी काही महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्ही गोंधळात पडू शकतात. तसेच, पैशाचा ओघ देखील कमी असू शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. या सोबतच, वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलल्यास तुमच्या नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत स्वतःला शांत ठेवून गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करा.
उपाय: नियमित 20 वेळा "ॐ सोमाय नमः" चा जप करा.
आपल्या कुंडली मध्ये ही आहे राजयोग? जाणून घ्या आपला राजयोग रिपोर्ट
मूलांक 3
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये चांगले यश मिळेल. तसेच तुमची आवड अध्यात्माकडे अधिक असेल. अध्यात्माकडे अधिक कल असल्यामुळे तुम्ही अध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल आणि तुम्हाला मानसिक शांती मिळेल.
करिअरच्या दृष्टीने, या आठवड्यात तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळतील, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल. आर्थिक दृष्ट्या, धन प्रवाह खूप चांगला असेल आणि अशा परिस्थितीत धन बचत देखील शक्य होईल. तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर, या आठवड्यात तुम्हाला कामाच्या संदर्भात परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.
वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, तुमचा जोडीदार किंवा प्रियकराशी तुमचे नाते मधुर असेल. तुमच्यामध्ये प्रेम आणि परस्पर समंजसपणा वाढेल आणि यामुळे तुमच्या दोघांमधील जवळीक वाढेल.
उपाय: गुरुवारी भगवान महादेवाला दूध चढवा.
मूलांक 4
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात तुम्हाला काही ही गोष्ट सहजासहजी मिळणार नाही. अशा परिस्थितीत, काही ही करण्यापूर्वी तुम्हाला त्याचे योग्य नियोजन करावे लागेल.
व्यावसायिकदृष्ट्या पाहता, या आठवड्यात तुमच्यावर कामाचा ताण जास्त असू शकतो. तसेच, तुमची कामावरील एकाग्रता देखील कमी होऊ शकते. तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर, या आठवड्यात तुम्हाला तुमचा अपेक्षित नफा मिळणार नाही. अशा परिस्थितीत, शेअर बाजार, स्टॉक मार्केट इत्यादी सारख्या सट्टा बाजारांमध्ये गुंतवणूक करणे टाळणे आपल्यासाठी चांगले होईल, कारण अशा सौद्यांमुळे तुमचे नुकसान होऊ शकते.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, जोडीदारासोबतच्या नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात. याचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर ही परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, तुमच्या जोडीदाराला वेळ देणे आणि गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करणे योग्य ठरेल.
उपाय: नियमित 40 वेळा"ॐ दुर्गाय नमः" चा जप करा.
मूलांक 5
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झालेला आहे)
व्यावसायिकदृष्ट्या, तुम्ही या आठवड्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची क्षमता आणि योग्यता सिद्ध करू शकाल. या सोबतच तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी ही मिळतील. हे तुमच्यासाठी खूप आनंदाचे असेल. तुम्ही कोणता ही व्यवसाय करत असाल तर, तुम्हाला तुमच्या व्यवसायातून चांगला नफा मिळेल. अशा प्रकारे तुम्ही धन बचत ही करू शकतात.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, जोडीदार किंवा प्रियकर यांच्या नात्यात गोडवा दिसून येईल. या सोबतच काही नवीन आणि चांगले मित्र बनण्याची चिन्हे आहेत. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूल आहे. तुम्ही तुमच्या उत्तम आरोग्यासह संपूर्ण आठवडा भरभरून एन्जॉय करताना दिसाल.
उपाय: बुधवारी बुध ग्रहासाठी यज्ञ करा.
मूलांक 6
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे)
व्यावसायिकदृष्ट्या, तुम्हाला या आठवड्यात चढ-उतार दिसतील. अशा स्थितीत, जर तुम्ही खूप चांगल्या भाग्याची अपेक्षा करत असाल, तर हा आठवडा तुमच्या अपेक्षा पूर्ण करणार नाही.
जर तुम्ही तुमच्या नोकरीबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या मेहनतीचे कौतुक होईल. तुम्हाला बढती मिळण्याची ही शक्यता आहे.
दुसरीकडे, जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर, तुम्हाला या आठवड्यात फारसा फायदा होणार नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे योग्य नियोजन करावे लागेल.
उपाय: नियमित 33 वेळा "ॐ भार्गवाय नमः" चा जप करा.
मूलांक 7
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे)
व्यावसायिकदृष्ट्या, तुम्हाला या आठवड्यात खूप सावधगिरी बाळगावी लागेल तसेच, प्रत्येक गोष्टीची आगाऊ योजना करा कारण, या काळात तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही कामात घेतलेल्या मेहनतीकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते किंवा कौतुक केले जात नाही.
या आठवड्यात मोठी गुंतवणूक किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असलेल्या व्यावसायिकांनी या काळात असा कोणता ही निर्णय घेणे टाळावे कारण, हा काळ तुमच्यासाठी अनुकूल नाही.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, जोडीदारासोबतच्या नात्यात काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत स्वतःला शांत ठेवा आणि जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर तुम्हाला तुमच्या प्रियकराच्या नात्यात काही समस्या येऊ शकतात.
उपाय: नियमित 16 वेळा "ॐ गणेशाय नमः" चा जप करा.
मूलांक 8
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात कोणता ही महत्त्वाचा निर्णय घेताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. करिअरच्या बाबतीत, तुम्हाला या काळात काही समस्यांना तोंड द्यावे लागेल जसे की, नवीन नोकरीच्या संधी न मिळणे, कामाचे गोंधळलेले वातावरण, वैयक्तिक वाढीमध्ये अडथळा इत्यादींचा सामना करावा लागू शकतो.
तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर, तुम्हाला या आठवड्यात बाजारातील कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत व्यवसायातून अपेक्षित नफा मिळवणे सहज शक्य होणार नाही.
आरोग्याच्या दृष्टीने, या आठवड्यात तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग आणि ध्यान यांसारख्या सवयी समाविष्ट करणे तुमच्यासाठी चांगले होईल. यामुळे तुमचे मन शांत राहील.
उपाय: शनिवारी शनीसाठी यज्ञ करा.
मिळवा आपल्या कुंडलीच्या आधारित सटीक शनि रिपोर्ट
मूलांक 9
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात गुंतवणुकीशी संबंधित कोणता ही महत्त्वाचा निर्णय घेताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. तसे, अशी कोणती ही योजना तूर्तास पुढे ढकलणे चांगले होईल अन्यथा, आपल्याला काही समस्यांना सामोरे जावे लागेल.
पैशाशी संबंधित कोणता ही निर्णय घेताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो कारण, या आठवड्यात तुम्ही घेतलेला कोणता ही चुकीचा निर्णय तुम्हाला अडचणीत आणू शकतो. तुमचे धन अडकू शकते. तुमचे नुकसान देखील होऊ शकते.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, अहंकारामुळे जोडीदार सोबतच्या नात्यात चढ-उतार येण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःला शांत ठेवा आणि तुमच्या जोडीदाराशी संयम दाखवून संवाद साधा आणि त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा. या सर्व बाबतीत, या आठवड्याची सुरुवात चांगली असेल परंतु, शेवटी तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
उपाय: हनुमान चालीसाचा जप करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems

AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2023
- राशिफल 2023
- Calendar 2023
- Holidays 2023
- Chinese Horoscope 2023
- Education Horoscope 2023
- Purnima 2023
- Amavasya 2023
- Shubh Muhurat 2023
- Marriage Muhurat 2023
- Chinese Calendar 2023
- Bank Holidays 2023
- राशि भविष्य 2023 - Rashi Bhavishya 2023 Marathi
- ராசி பலன் 2023 - Rasi Palan 2023 Tamil
- వార్షిక రాశి ఫలాలు 2023 - Rasi Phalalu 2023 Telugu
- રાશિફળ 2023 - Rashifad 2023
- ജാതകം 2023 - Jathakam 2023 Malayalam
- ৰাশিফল 2023 - Rashifal 2023 Assamese
- ରାଶିଫଳ 2023 - Rashiphala 2023 Odia
- রাশিফল 2023 - Rashifol 2023 Bengali
- ವಾರ್ಷಿಕ ರಾಶಿ ಭವಿಷ್ಯ 2023 - Rashi Bhavishya 2023 Kannada