अंक ज्योतिष - Numerology In Marathi (25 डिसेंबर - 31 डिसेंबर, 2022)

कसा जाणून घ्याल आपला मुख्य अंक (मूलांक) ?

अंक ज्योतिष साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेण्यासाठी अंक ज्योतिष मध्ये मूलांकाचे मोठे महत्व आहे. मूलांक जातकाच्या जीवनाचा महत्वाचा अंक मानला गेला आहे. तुमचा जन्म महिन्याच्या कुठल्या ही तारखेला होतो, तो युनिट च्या अंकात बदलल्यानंतर जो अंक प्राप्त होतो, तो आपला मूलांक मानला जातो. मूलांक 1 ते 9 अंकांच्या मध्ये कुठला ही असू शकतो उदाहरणार्थ- तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 10 तारखेला झाला असेल तर, मूलांक 1+0 म्हणजे 1 असेल.

Numerology

त्याच प्रमाणे, कोणत्या ही महिन्याच्या 1 ते 31 तारखेपर्यंत जन्मलेल्या जातकांसाठी 1 ते 9 पर्यंतच्या मूलांकांची गणना केली जाते. अशा प्रकारे सर्व स्थानिक जातक त्यांचा मूलांक जाणून घेऊन त्यांचे साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेऊ शकतात.

अश्या प्रकारे कुठल्या ही महिन्याच्या 1 तारखे पासून 31 तारखेत जन्म घेतलेल्या जातकांसाठी 1 ते 9

भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!

आपल्या जन्म तिथीने जाणून घ्या साप्ताहिक अंक राशि भविष्य (25 डिसेंबर ते 31 डिसेंबर, 2022)

अंकशास्त्राचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो कारण, सर्व संख्या आपल्या जन्मतारखेशी संबंधित असतात. खाली दिलेल्या लेखात आम्ही सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा मूलांक ठरतो आणि या सर्व संख्या वेगवेगळ्या ग्रहांद्वारे शासित असतात.

जसे की, मूलांक 1 वर असुरी देवाचे अधिपत्य आहे. चंद्र देव मूलांक 2 चा स्वामी आहे. अंक 3 ला देव गुरु बृहस्पतीचे स्वामित्व प्राप्त आहे, राहू अंक 4 चा राजा आहे. अंक 5 बुध ग्रहाच्या अधीन आहे. 6 अंकाचा राजा शुक्र देव आहे आणि 7 चा अंक केतू ग्रह आहे. शनिदेवाला अंक 8 चा स्वामी मानले गेले आहे. अंक 9 मंगळ देवाचा अंक आहे आणि याच ग्रहांच्या परिवर्तनाने जातकाच्या जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन होतात.

250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!

मूलांक 1

(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झालेला आहे)

या आठवड्यात, मूलांक 1 चे जातक धैर्यवान, निर्भय आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असतील. तुम्हाला फक्त अति-आत्मविश्वास टाळावा लागेल कारण, यामुळे निराशा होऊ शकते आणि ती तुमच्यासाठी समस्या बनू शकते. यामुळे, तुम्ही भांडणात पडू शकता, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होऊ शकतात.

प्रेम जीवन: लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाल्यास, या आठवड्यात हे जातक त्यांच्या मित्र परिवारातील एका व्यक्ती सोबत रोमँटिक भेट घेऊ शकतात किंवा नवीन प्रेमळ नातेसंबंध सुरू करू शकतात. दुसरीकडे, विवाहित व्यक्तींनी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. तुमचा आक्रमक स्वभाव किंवा आवेग तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका अन्यथा, तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते बिघडू शकते.

शिक्षण: शैक्षणिक दृष्टीने हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी उत्तम जाणार आहे. तुम्ही तुमचे पूर्ण लक्ष अभ्यासात द्याल. या दरम्यान तुम्हाला तुमचे शिक्षक, सल्लागार, कुटुंबातील सदस्य, मित्र आणि सहकारी विद्यार्थ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. सर्जनशील लेखन, गणित, जनसंवाद या विषयांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विशेषतः चांगला ठरेल. तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल.

व्यावसायिक जीवन: हा आठवडा व्यावसायिक जीवनातून फलदायी ठरेल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमच्या चांगल्या कामासाठी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून प्रशंसा आणि पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. जे आपले कार्यक्षेत्र बदलण्यास इच्छुक होते, त्यांच्यासाठी ही हा काळ चांगला आहे. प्रॉपर्टी डीलिंगचे काम करणारे जातक चांगला नफा कमवू शकतात.

आरोग्य: आरोग्याच्या दृष्टीने मूलांक 1 चे जातक या आठवड्यात ऊर्जा आणि प्रचंड उत्साहाने परिपूर्ण असतील. उच्च ऊर्जा पातळीमुळे निर्णय आवेगाने घेतले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमची ऊर्जा पातळी नियंत्रित करण्याचा सल्ला दिला जातो.

उपाय: देवी दुर्गेला नियमित लाल फुल अर्पण करा.

मूलांक 2

(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झालेला आहे)

मूलांक 2 च्या जातकांना या आठवड्यात संमिश्र परिणाम मिळू शकतात. मनातील स्पष्टतेच्या अभावामुळे, या काळात आपण आपल्या आंतरिक भावना व्यक्त करू शकणार नाही अशी शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या विचारांकडे ही लक्ष द्या आणि अध्यात्माची मदत घ्या.

प्रेम जीवन: मूलांक 2 च्या जातकांच्या रोमँटिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास हा आठवडा सरासरी असेल परंतु, चांगल्या संभाषणामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मजबूत संबंध निर्माण करू शकतात.

शिक्षण: या सप्ताहात मूलांक 2 च्या विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात अडथळे येऊ शकतात. गडबडीमुळे तुमचे लक्ष अभ्यासातून विचलित होऊ शकते आणि लक्ष्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागू शकतो.

व्यावसायिक जीवन: व्यावसायिक जीवनाच्या दृष्टीने, हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी ठरेल. मल्टिनॅशनल किंवा जागतिक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. परदेशातील व्यवसायाशी निगडीत असलेले जातक या काळात चांगली कमाई करू शकतात.

आरोग्य: आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा फारसा अनुकूल नाही. मानसिक तणाव आणि चिंतेमुळे आरोग्याशी संबंधित समस्या त्रासदायक ठरू शकतात. अशा परिस्थितीत जास्त विचार करून तणाव न घेण्याचा सल्ला दिला जातो.

उपाय: नियमित शिवलिंगावर दूध अभिषेक करा.

मूलांक 3

(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झालेला आहे)

मूलांक 3 च्या जातकांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. या दरम्यान तुम्हाला आत्मविश्वासाने भरलेले वाटेल. इतरांसाठी चांगला प्रेरक ठरेल. उत्तम संवाद कौशल्याने स्वत:ला सादर करू शकाल. या आठवड्यात तुम्ही प्रसिद्धीचे आणि आकर्षणाचे केंद्र राहाल.

प्रेम जीवन: लव्ह लाइफबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही सिंगल असाल तर तुम्हाला अनेक प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे परंतु, काळजीपूर्वक विचार करूनच नातेसंबंध जोडण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही विवाहित असाल तर, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे प्रेम आणि सहकार्य मिळेल.

शिक्षण: शैक्षणिक क्षेत्रात मूलांक 3 च्या जातकांना अभ्यासात सकारात्मक परिणाम मिळतील. परदेशात संशोधन, पीएचडी किंवा उच्च शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्यांना या काळात यश मिळेल.

व्यावसायिक जीवन: मूलांक 3 च्या जातकांसाठी हा आठवडा व्यावसायिकदृष्ट्या खूप चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. तुम्हाला अनेक नवीन संधी मिळू शकतात. विशेषतः जे इतरांना मार्गदर्शन करतात.

आरोग्य: आरोग्याच्या दृष्टीने, हा आठवडा तुमच्यासाठी अतिशय अनुकूल आहे. तुमची प्रतिकारशक्ती वाढू शकते. तुम्हाला सात्विक अन्न खाण्याचा आणि योगासने करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच अध्यात्मिक आणि शारीरिक कार्यात सहभागी व्हा.

उपाय: भगवान गणपतीची पूजा करा आणि त्यांना 5 बेसन लाडू अर्पण करा.

मूलांक 4

(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झालेला आहे)

मूलांक 4 च्या जातकांसाठी हा आठवडा आर्थिक क्षेत्राच्या दृष्टीने चांगला जाणार आहे. रखडलेले पैसे मिळण्याची आशा आहे. या आठवड्यात तुमचा बराचसा वेळ सामाजिक मेळावे आणि तुमच्या जुन्या मित्रांना भेटण्यात ही जाईल.

प्रेम संबंध: या आठवड्यात जोडीदारासोबत चांगले संबंध राखण्यात या व्यक्तीला यश मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर फिरण्याची योजना आखू शकता किंवा खरेदीला जाऊ शकता. एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल.

शिक्षण: शिक्षणाच्या दृष्टिकोनातून, मूलांक 4 च्या जातकांसाठी हा आठवडा आव्हानांनी भरलेला असू शकतो. तुम्ही बाह्य गोष्टींमध्ये अधिक गुंतून राहाल, ज्यामुळे तुमचे मन अभ्यासातून वळवू शकते. अशा परिस्थितीत, तुम्हाला इतर कामांसोबत तुमच्या अभ्यासाकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो.

व्यावसायिक जीवन: व्यावसायिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी सामान्य राहणार आहे. नोकरदार लोक आपल्या कामात सातत्य राखतील. जे लोक रिअल इस्टेट व्यवसायात आहेत त्यांना या काळात चांगली कमाई होऊ शकते.

आरोग्य: आरोग्याच्या बाबतीत, 4 मूलांकाच्या जातकांना या आठवड्यात आरोग्याशी संबंधित कोणत्या ही समस्यांचा सामना करावा लागणार नाही. तुम्हाला फक्त पार्टी करणे किंवा जास्त सामाजिक करणे टाळावे लागेल कारण, जास्त मद्यपान केल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

उपाय: शनिवारी काली मातेला नारळ चढवा.

मूलांक 5

(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झालेला आहे)

मूलांक 5 च्या जातकांना या आठवड्यात सकारात्मक परिणाम मिळतील. तुम्ही तुमच्या संभाषणात अगदी स्पष्ट दिसू शकता, ज्यामुळे प्रभावशाली लोकांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल आणि भविष्यात तुम्हाला याचा फायदा देखील मिळू शकेल. तुम्हाला अतिआत्मविश्वास टाळण्याचा सल्ला दिला जातो कारण, त्यामुळे नाते बिघडू शकते.

प्रेम जीवन: या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत धार्मिक यात्रेला जाऊ शकता किंवा घरी होरा किंवा सत्य नारायण कथा सारख्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू शकता, जे तुमच्यासाठी चांगले सिद्ध होईल आणि तुमचे नाते अधिक दृढ होईल.

शिक्षण: शिक्षणाच्या दृष्टीने, या आठवड्यात तुमच्या अभ्यासात अडथळे निर्माण होऊ शकतात आणि हे अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. तथापि, आठवड्याच्या शेवटी आपण आपल्या कठोर परिश्रमाने सर्व अडचणींवर मात करू शकाल.

व्यावसायिक जीवन: मूलांक 5 च्या जातकांच्या व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, या आठवड्यात स्थिरता येईल. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर, ही योजना पुढे ढकलून द्या. प्रकृती अस्वस्थता सारख्या काही कारणांमुळे किंवा इतर कोणत्या ही वयक्तिक कारणांमुळे घरून काम केले जाण्याची शक्यता आहे.

आरोग्य: मूलांक 5 च्या जातकांच्या आरोग्याबद्दल बोलायचे झाल्यास, या आठवड्यात तुम्हाला त्वचेच्या समस्या आणि ऍलर्जी असू शकतात. त्यामुळे तुम्हाला योग्य स्वच्छता राखण्याचा सल्ला दिला जातो. तसेच भरपूर पाणी प्या आणि कोणत्या ही कीटक चावण्यापासून सावध रहा.

उपाय: बुधवारी गाईला हिरवा चारा खाऊ घाला.

मूलांक 6

(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे)

या आठवड्यात मूलांक 6 च्या जातकांना चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा वेगळे काम कराल. इतरांना अधिक प्राधान्य द्याल. गरजू लोकांसाठी उत्कटतेने काम करेल, ही चांगली गोष्ट आहे पण स्वतःबद्दल विचार करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. तुम्ही स्वतःला तितकेच प्राधान्य द्या असा सल्ला दिला जातो.

प्रेम जीवन: या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे अधिक समाजसेवा केल्यामुळे दुर्लक्ष करू शकता. तुमच्या या वागण्यामुळे तुमच्या जोडीदाराला वाईट वाटू शकते. तथापि, तुम्हाला तुमच्या सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात संतुलन राखण्याचा सल्ला दिला जातो.

शिक्षण: जे विद्यार्थी डिझायनिंग, कला, सर्जनशीलता, कविता, अभिनय किंवा गायन इत्यादी क्षेत्रात आहेत त्यांना या आठवड्यात चांगली कामगिरी करण्यात अडचणी येऊ शकतात. तुम्हाला अभ्यासात लक्ष केंद्रित करणे देखील कठीण होऊ शकते परंतु, जर तुम्ही मानवता, मानवाधिकार, सामाजिक शास्त्र या विषयांचे विद्यार्थी असाल तर, हा काळ तुमच्यासाठी अधिक चांगला आहे. तुम्ही तुमचे विचार इतरांसमोर मांडू शकाल.

व्यावसायिक जीवन: प्रोफेशनल दृष्ट्या, एनजीओ किंवा समाजाच्या कल्याणासाठी काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे.

आरोग्य: या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरुक राहण्याची गरज आहे. खबरदारी म्हणून स्वच्छता राखण्याचा सल्ला दिला जातो. कामाच्या दबावाखाली स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. आपले व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी थोडा वेळ घालवा.

उपाय: नेत्रहीन संस्थेला दान करा.

मूलांक 7

(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला झालेला आहे)

मूलांक 7 च्या जातकांसाठी हा आठवडा खूप चांगला जाणार आहे. तुमचा आत्मविश्वास आणि उर्जा पातळी उच्च असेल. ज्याच्या मदतीने तुम्ही टार्गेट पूर्ण करू शकाल. या काळात तुमचा कल पौराणिक कथा जाणून घेण्याकडे असेल, ज्यामुळे तुम्हाला शांती मिळेल.

प्रेम जीवन: प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, या आठवड्यात तुम्ही तुमच्या नात्याबद्दल खूप उत्कट असाल आणि तुमच्या जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी कठोर प्रयत्न करू शकाल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराविषयी आणि नातेसंबंधांबद्दल जास्त ताबा नसण्याचा सल्ला दिला जातो कारण, याचा तुमच्या प्रेम जीवनावर काही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

शिक्षण: क्रीडा क्षेत्राशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. जे लोक क्रीडा क्षेत्रात विशेषत: मार्शल आर्ट्सची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला जाईल. सैन्यात किंवा पोलिसात भरती होण्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा आठवडा त्यांच्या तयारीसाठी शुभ राहील.

व्यावसायिक जीवन: मूलांक 7 च्या जातकांसाठी व्यावसायिक जीवन या आठवड्यात चांगले राहील. या काळात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या बाजूच्या उत्पन्नातून भरीव रक्कम जमा करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात.

आरोग्य: आरोग्याच्या दृष्टीने, हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील. शारीरिक ताकद वाढेल. या आठवड्यात तुम्हाला नियमित व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या शिवाय संतुलित आहार घ्या आणि ध्यान करा.

उपाय: सौभाग्यासाठी ज्योतिषींचा सल्ला घेऊन कॅट आय ब्रेसलेट धारण करा.

मूलांक 8

(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झालेला आहे)

मूलांक 8 चे जातक या आठवड्यात थोडे आळशी वाटतील, ज्यामुळे जीवनाची गती मंद होऊ शकते आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत विलंबाचा सामना करावा लागू शकतो. यामुळे तुमची वाढ खुंटू शकते. त्यामुळे तुम्हाला तुमचा आळस दूर ठेवून पूर्ण उर्जेने तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जातो.

प्रेम जीवन: या आठवड्यात तुमचे प्रेम आणि वैवाहिक जीवन रोमान्सने भरलेले असेल. तुमचा जोडीदार तुम्हाला खूश करण्यासाठी आणि तुमच्यासोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी अनेक प्रयत्न करेल. ज्यामुळे तुम्ही प्रेमाने भरलेल्या यशस्वी जीवनाचा आनंद घेऊ शकाल.

शिक्षण: जे जातक इंजिनिअरिंग करत आहेत किंवा इतर कोणत्या ही तांत्रिक क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. या दरम्यान, ते त्यांची योग्यता सिद्ध करण्यात यश मिळवू शकतात.

व्यावसायिक जीवन: या आठवड्यात तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनाबद्दल फारसे असमाधानी असाल. तुम्ही काहीतरी नवीन सुरू करण्याचा विचार करू शकता आणि ही कल्पना तुमच्या आयुष्याला नवी दिशा देईल.

आरोग्य: या आठवड्यात मूलांक 8 च्या राशीच्या जातकांचे आरोग्य चांगले राहील. पण या आठवड्यात आळस सोडून मेहनत करण्याची वेळ आहे.

उपाय: रस्त्यावरील कुत्रांना पोळी खाऊ घाला आणि त्यांना आश्रय द्या.

मूलांक 9

(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झालेला आहे)

मूलांक 9 च्या जातकांसाठी हा आठवडा ऊर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. तुम्हाला संभाषण करताना तुमचे शब्द पाहण्याचा सल्ला दिला जातो कारण, तुमच्या आक्रमक वर्तनामुळे इतरांना त्रास होण्याची दाट शक्यता असते.

प्रेम जीवन: या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदाराला विवाहाचा प्रस्ताव देऊ शकता. जोडीदार तुमच्या प्रस्तावाला हो म्हणू शकतो आणि तुम्ही त्यांची कुटुंबाशी ओळख करून देऊन विवाह करू शकतात.

शिक्षण: या आठवड्यात तुम्ही तुमच्या अभ्यासाबाबत खूप सतर्क आणि गंभीर असाल आणि मेहनत कराल. पदव्युत्तर आणि पी. एच.डी.चे शिक्षण घेणाऱ्यांसाठी ही हा कालावधी अनुकूल राहील. या काळात त्यांना त्यांचे शिक्षक आणि सल्लागार यांचे सहकार्य मिळेल.

व्यावसायिक जीवन: या आठवड्यात मूलांक 9 चे जातक त्यांच्या व्यावसायिक जीवनावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतील. तुमची मेहनत तुमचे कौशल्य वाढवण्यासाठी कामी येईल. यश मिळण्यास उशीर झाल्यास तुमचा संयम गमावू नका असा सल्ला तुम्हाला दिला जातो. तुमची वाढ मंद आणि स्थिर असेल.

आरोग्य: आरोग्याच्या दृष्टीने, या आठवड्यात तुम्ही उर्जेने भरलेले अनुभवाल परंतु, तुमची ऊर्जा पातळी नियंत्रित करणे देखील आवश्यक असेल. या काळात मायग्रेन आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. या आठवड्यात तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण, तुम्ही अपघाताला बळी पडू शकता.

उपाय: हनुमानाची पूजा करा आणि बुंदीचा प्रसाद चढवा.

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Astrological services for accurate answers and better feature

33% off

Dhruv Astro Software - 1 Year

'Dhruv Astro Software' brings you the most advanced astrology software features, delivered from Cloud.

Brihat Horoscope
What will you get in 250+ pages Colored Brihat Horoscope.
Finance
Are money matters a reason for the dark-circles under your eyes?
Ask A Question
Is there any question or problem lingering.
Career / Job
Worried about your career? don't know what is.
AstroSage Year Book
AstroSage Yearbook is a channel to fulfill your dreams and destiny.
Career Counselling
The CogniAstro Career Counselling Report is the most comprehensive report available on this topic.

Astrological remedies to get rid of your problems

Red Coral / Moonga
(3 Carat)

Ward off evil spirits and strengthen Mars.

Gemstones
Buy Genuine Gemstones at Best Prices.
Yantras
Energised Yantras for You.
Rudraksha
Original Rudraksha to Bless Your Way.
Feng Shui
Bring Good Luck to your Place with Feng Shui.
Mala
Praise the Lord with Divine Energies of Mala.
Jadi (Tree Roots)
Keep Your Place Holy with Jadi.

Buy Brihat Horoscope

250+ pages @ Rs. 399/-

Brihat Horoscope

AstroSage on MobileAll Mobile Apps

Buy Gemstones

Best quality gemstones with assurance of AstroSage.com

Buy Yantras

Take advantage of Yantra with assurance of AstroSage.com

Buy Feng Shui

Bring Good Luck to your Place with Feng Shui.from AstroSage.com

Buy Rudraksh

Best quality Rudraksh with assurance of AstroSage.com
Call NowTalk to
Astrologer
Chat NowChat with
Astrologer