जन्माष्टमी 2022 - Janmashtami 2022 In Marathi

Author: योगिता पलोड |Updated Wed, 10 August 2022 10:59 AM IST

हिंदू मान्यतेनुसार असे मानले जाते की, भाद्रपदाच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्र असताना याच काळात भगवान श्री कृष्णाचा जन्म झाला होता. अशा स्थितीत दरवर्षी भादो महिन्यात कृष्ण पक्षातील आठव्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी किंवा कृष्ण जन्मोत्सव म्हणून ओळखला जातो. सन 2022 मध्ये कृष्ण जन्माष्टमीचा हा पवित्र सण 18 ऑगस्ट आणि 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे.


कृष्णाच्या भक्तांसाठी हा दिवस खूप खास, महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे. या दिवशी प्रत्येकाला विविध पूजा विधी करून भगवान श्री कृष्णाचा आनंद मिळवायचा असतो. अशा परिस्थितीत, अ‍ॅस्ट्रोसेजच्या या विशेष ब्लॉगद्वारे, आम्ही तुम्हाला या दिवशी कोणत्या उपायांनी तुमच्या जीवनात श्री कृष्णाचा आनंद आणि आशीर्वाद प्राप्त करू शकतो हे सांगणार आहोत.

भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!

तसेच या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला या वर्षीच्या जन्माष्टमीशी संबंधित इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती देणार आहोत, या दिवशी घडलेल्या शुभ संयोगांची माहिती, या दिवसाच्या पूजेमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा आणि काय करावे आणि काय करू नये या सारख्या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती देणार आहोत. तर, या सर्व गोष्टींची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचा. सर्वप्रथम, या वर्षी जन्माष्टमी कोणत्या दिवशी आहे आणि या दिवसाचा शुभ मुहूर्त कोणता असेल हे जाणून घेऊया.

जन्माष्टमी 2022: तिथी आणि शुभ मुहूर्त

18 (वैष्णव मत)आणि 19 ऑगस्ट (स्मार्त मत) 2022

(गुरुवार-शुक्रवार)

जन्माष्टमी मुहूर्त्त (19 ऑगस्ट-2022)

निशीथ पूजा मुहूर्त: 24:03:00 पासून 24:46:42 पर्यंत

अवधी : 0 तास 43 मिनिटे

जन्माष्टमी पारणा मुहूर्त : 05:52:03 च्या नंतर 20, ऑगस्ट

विशेष माहिती : वरील मुहूर्त स्मार्त मतानुसार दिले आहेत. वैष्णव आणि स्मार्त पंथ मानणारे लोक हा सण वेगवेगळ्या नियमांनी साजरा करतात हे लक्षात ठेवा.

बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा

जन्माष्टमीला बनत आहेत शुभ योग-संयोग

या वर्षी 18 ऑगस्ट गुरुवारी वृद्धी योगाचे शुभ संयोग बनत आहे. या व्यतिरिक्त, जन्माष्टमी ला अभिजित मुहूर्ताची गोष्ट केली तर, हे 18 ऑगस्ट दुपारी 12:05 पासून सुरु होऊन 12:56 पर्यंत राहणार आहे. या सोबतच वृद्धीचे योग 17 ऑगस्ट दुपारी 8:56 पासून सुरु होऊन 18 ऑगस्ट रात्री 8:41 पर्यंत राहील. ध्रुव योग 18 ऑगस्ट ला रात्री 8:41 पासून सुरु होऊन 19 ऑगस्ट ला रात्री 8:59 पर्यंत राहील.

म्हणजेच यावर्षी 18 आणि 19 ऑगस्ट या दोन्ही दिवशी कृष्ण जन्माष्टमी साजरी होत असून या दोन्ही दिवशी शुभ योग जुळून येणार आहेत.

कृष्ण जन्माष्टमी च्या पूजेत या मंत्राचे आहे विशेष महत्व

हिंदू धर्मात श्री कृष्ण जन्माष्टमीला खूप महत्त्व सांगितले जाते. या दिवशी लोक आपल्या जीवनात श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी पूजा करतात. तसेच अनेक लोक या दिवशी उपवास करतात. या दिवशी रात्री पूजा केली जाते.

एवढेच नाही तर असे म्हटले जाते की, ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र कमजोर आहे त्यांच्यासाठी कृष्ण जन्माष्टमीचे व्रत वरदानापेक्षा कमी नाही. या शिवाय संतती प्राप्ती साठी ही हे व्रत विशेष आणि फलदायी मानले जाते. चला तर मग आता पुढे जाऊन जाणून घेऊया की, कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेमध्ये कोणत्या मंत्रांचा समावेश करून तुम्ही तुमच्या जीवनात या दिवसाचे अधिक शुभ प्रभाव प्राप्त करू शकतात.

ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा

शुद्धि मंत्र

"'ॐ अपवित्रः पवित्रोवा सर्वावस्थां गतोअपि वा। यः स्मरेत पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः।।"

स्नान मंत्र

"गंगा, सरस्वती, रेवा, पयोष्णी, नर्मदाजलैः। स्नापितोअसि मया देव तथा शांति कुरुष्व मे।।"

पंचामृत स्नान

“पंचामृतं मयाआनीतं पयोदधि घृतं मधु। शर्करा च समायुक्तं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्।।”

भगवान श्रीकृष्ण ला वस्त्र अर्पित करण्यासाठीचा मंत्र

“शीतवातोष्णसन्त्राणं लज्जाया रक्षणं परम्। देहालअंगकरणं वस्त्रमतः शान्तिं प्रयच्छ मे।”

देवाला नैवेद्य दाखवा

“इदं नाना विधि नैवेद्यानि ओम नमो भगवते वासुदेवं, देवकीसुतं समर्पयामि।”

देवाला आचमन करा

“इदं आचमनम् ओम नमो भगवते वासुदेवं, देवकीसुतं समर्पयामि।”

जन्माष्टमीच्या पूजेमध्ये नक्की शामिल करा ह्या वस्तू अथवा अपूर्ण राहील कृष्ण भक्ती

कोणत्या ही पूजेमध्ये काही विशेष साहित्य किंवा वस्तूंचा समावेश करण्याला वेगळे महत्त्व असते. असे म्हटले जाते की, जर त्या पूजेमध्ये त्या गोष्टींचा समावेश केला नाही तर पुष्कळ वेळा व्यक्तीला पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. अशा परिस्थितीत, कृष्ण जन्माष्टमीच्या या पवित्र सणावर तुमच्याकडून कोणती ही चूक होऊ नये, अशा परिस्थितीत जन्माष्टमीच्या पूजेमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश करायचा आहे ते आम्हाला आधीच कळू द्या.

जन्माष्टमीला राशीनुसार या गोष्टींचा भोग देईल श्रीकृष्णाला प्रसन्नता

भगवान श्रीकृष्ण हा नारायणाचा आठवा अवतार मानला जातो. भगवान श्री कृष्णाला प्रसन्न करणाऱ्यांच्या जीवनात धन, सुख आणि समृद्धीची कमतरता नसते, असे म्हटले जाते. तर, भगवान श्री कृष्णाचा आनंद मिळवण्यासाठी, श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी, तुम्ही तुमच्या राशीनुसार त्यांना काय अर्पण करू शकता याची माहिती जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला ही श्रीकृष्णाचे असीम आशीर्वाद मिळू शकतील.

हे तुम्हाला ठाऊक आहे का? श्रीकृष्णाला छप्पन भोग का अर्पण केला जातो?

हिंदू धर्मात सर्व देवतांना भोग अर्पण करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. काही भोग काही देवाला प्रिय असतात तर काही भोग इतर देवाला प्रिय असतात. अशा स्थितीत भगवान श्री कृष्णाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांना छप्पन भोग अर्पण केले जातात. भगवान श्रीकृष्णाला छप्पन भोग का अर्पण केला जातो? कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने जाणून घेऊया यामागचे मोठे आणि अनोखे कारण.

पौराणिक मान्यतेनुसार असे सांगितले जाते की, आई यशोदा ह्या लहानपणी भगवान श्रीकृष्णाला 8 वेळा भोजन द्यायच्या. अशा परिस्थितीत एकदा गावातील सर्व लोक इंद्रदेवांना प्रसन्न करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करत होते. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने नंद बाबांना विचारले, हा कार्यक्रम का आयोजित केला जात आहे? तेव्हा नंददेवांनी त्यांना सांगितले की हा कार्यक्रम भगवान इंद्राला प्रसन्न करण्यासाठी आयोजित केला जात आहे आणि ते प्रसन्न झाल्यास चांगला पाऊस देतील, ज्यामुळे चांगले पीक येईल.

तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, पाऊस पाडणे हे इंद्रदेवाचे काम असताना आपण त्याची पूजा का करतो? ज्या गोवर्धन पर्वतापासून आपल्याला फळे आणि भाज्या मिळतात त्या गोवर्धन पर्वताची आपण पूजा का करत नाही? आणि त्या सोबत आपल्या जनावरांना चारा ही मिळतो. लहान कृष्णाचे म्हणणे तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना बरोबर होते. तेव्हा सर्वांनी इंद्रदेवाची पूजा न करता गोवर्धनाची पूजा केली.

याचे इंद्र देवांना फार वाईट वाटले आणि रागाच्या भरात त्यांनी मुसळधार पाऊस पाडला. असे म्हणतात की, गोकुळवासीयांना पावसाच्या या कोपापासून वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत 7 दिवस काही ही न खाता बोटावर उचलून धरला. शेवटी जेव्हा पाऊस थांबला आणि गोवर्धन पर्वताखालून भगवान श्रीकृष्ण गोकुळातील लोकांसह आले तेव्हा सर्वांच्या लक्षात आले की कान्हा 7 दिवसांपासून काहीच खाल्लेले नाही.

त्यानंतर आई यशोदा यांनी 7 दिवस आणि दररोज 8 पदार्थानुसार 56 वेगवेगळे पदार्थ बनवून भगवान श्रीकृष्णाला अर्पण केले आणि तेव्हापासून छप्पन भोगाची ही अनोखी आणि सुंदर परंपरा सुरू झाली.

लड्डू गोपालाला भोग लावतांना ठेवा या गोष्टींवर विशेष लक्ष

केवळ श्रीकृष्ण जन्माष्टमीलाच नाही तर, सहसा घरात लाडू गोपाळ असले तरी त्यांना चारवेळा भोग द्यावा, असे सांगितले जाते. मात्र, भोग अर्पण करण्याचे काही नियम आहेत. ते नियम काय आहेत ते जाणून घेऊया. श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ही हे नियम अवश्य पाळा, यामुळे बालगोपाळांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल.

कृष्ण जन्माष्टमीला काय करावे आणि काय करू नये

शेवटी, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेच्या वेळी आपण काय करावे आणि काय टाळावे ते जाणून घेऊया.

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer