पापमोचनी एकादशी- Papmochani Ekadashi 2022 In Marathi

Author: योगिता पलोड |Updated Fri, 25 Mar 2022 09:15 AM IST

एकादशीच्या या स्पेशल ब्लॉगमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत की, पापमोचनी एकादशीचा पारण मुहूर्त काय आहे? या तारखेचे महत्त्व काय आहे? आणि या दिवशी काही उपाय केल्याने तुम्हाला भगवान विष्णूची कृपा तुमच्या आयुष्यात कायम स्वरूपी प्राप्त होऊ शकते? या सोबतच, या दिवसा विषयी आणखी लहान-मोठ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा.


होलिका दहन आणि चैत्र नवरात्री मध्ये पडणाऱ्या एकादशी ला पापमोचनी एकादशी म्हणतात. ही संवत वर्षाची शेवटची एकादशी असते आणि युगादी/उगादी च्या आधी साजरी केली जाते.

भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!

पापमोचनी एकादशी 2022: शुभ मुहूर्त आणि पारणा मुहूर्त

एकादशी तिथी प्रारंभ - मार्च 27, 2022 ला 06 वाजून 04 मिनिटांपासून

एकादशी तिथी समाप्त - मार्च 28, 2022 ला 04 वाजून 15 मिनिटांपर्यंत

पापमोचनी एकादशी पारणा मुहूर्त: 06:15:24 पासून 08:43:45 पर्यंत 29, मार्च ला

अवधी: 2 तास 28 मिनिटे

माहिती: वरती दिले गेलेले पारणा मुहूर्त नवी दिल्ली साठी मान्य आहे. जर तुम्हाला आपल्या सहाराच्या अनुसार पारणा मुहूर्त जाणून घ्यायचा आहे तर, येथे क्लिक करा.

एकादशी तिथीमी जोडलेल्या काही महत्वपूर्ण शब्दांचे महत्व आणि अर्थ

पारणा: एकादशीचे व्रत पूर्ण करण्याच्या पद्धतीला पारण म्हणतात. एकादशीचे व्रत दुसऱ्या दिवशी म्हणजे सूर्योदया नंतर द्वादशीला मोडले जाते. येथे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे की, जर तुम्ही एकादशीचा उपवास केला असेल तर, तो पारण द्वादशी तिथीच्या समाप्तीपूर्वी करावा.

हरी वासर: हरी वासर दरम्यान, एकादशीचे व्रत कधी ही मोडू नये. जर तुम्ही व्रत केले असेल तर, तुम्ही हरिवासाच्या समाप्तीची वाट पहावी आणि त्यानंतरच तुम्ही तुमचे व्रत पूर्ण करावे. हरी वासर हा द्वादशी तिथीचा पहिला चतुर्थांश कालावधी आहे. कोणता ही उपवास पूर्ण करण्यासाठी सर्वात योग्य वेळ म्हणजे पहाटेची वेळ मानली जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या दिवशी उपवास करत असाल तर, मध्यरात्री उपवास सोडू नयेत याची विशेष काळजी घ्या. जर कोणत्या ही कारणाने तुम्ही सकाळी उपवास सोडू शकत नसाल किंवा सकाळी उपवास सोडला नाही तर, तुम्ही दुपार नंतर उपवास सोडला पाहिजे.

दान-पुण्य: हिंदू धर्मात दानाचे विशेष महत्त्व आहे. कोणता ही व्रत पूर्ण करण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार योग्य ब्राह्मणाला दान दिल्यास या व्रताचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो असे मानले जाते. अशा स्थितीत एकादशीचे व्रत सुरू करण्यापूर्वी दान करावे.

पापमोचनी एकादशी चे महत्व

वर्षभर साजऱ्या होणाऱ्या वेगवेगळ्या एकादशी तिथींना वेगळे महत्त्व आहे. अशा परिस्थितीत पापमोचनी एकादशी बद्दल बोलायचे झाले तर, नावाप्रमाणेच ही एकादशी पापांचा नाश करणारी एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने ब्रह्महत्या, सोने चोरी, दारू पिणे, अहिंसा, भ्रूणहत्या या सारख्या मोठ्या पापांपासून मुक्ती मिळते. या सोबतच, जो कोणी या दिवशी भगवान विष्णूची पूजा करतो त्याची जन्मजन्मीची पापे नष्ट होतात आणि असा मनुष्य मोक्षाचा पात्र बनतो.

पापमोचनी एकादशी व्रताबद्दल असे ही म्हटले जाते की, हे व्रत पाळल्याने हिंदू तीर्थक्षेत्री जाण्याचे आणि गायी दान करण्यापेक्षा माणूस अधिक पुण्य प्राप्त करतो. या शिवाय जे लोक हे शुभ व्रत पाळतात त्यांना सर्व प्रकारच्या सांसारिक सुखांचा आनंद मिळतो आणि अखेरीस भगवान विष्णूच्या स्वर्गीय राज्यात 'वैकुंठा' मध्ये स्थान मिळते.

बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा

पापमोचनी एकादशी व्रत पूजा विधी

पापमोचिनी एकादशीच्या दिवशी या पद्धतीची पूजा केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते.

पापमोचनी एकादशी संबंधित पौराणिक कथा

असे म्हणतात की एकदा चैत्ररथ नावाच्या सुंदर जंगलात प्रसिद्ध ऋषी च्यवन त्यांचा मुलगा मेधवी सोबत राहत होते. एके दिवशी, मेधावी तपश्चर्या करत असताना, स्वर्गीय जगाची अप्सरा मंजुघोषा तिथून निघून गेली. मेधावी ला पाहून त्याच्या कुशाग्र व सुंदर रूपाने मंजुघोषाला वेडावून लावले. अशा स्थितीत अप्सराने मेधवीला आपल्याकडे आकर्षित करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र यामध्ये ती अपयशी ठरली.

अप्सरा मंजुघोषाच्या या सर्व कृती कामदेव पाहत होता. मंजुघोषाचा आत्मा कामदेवाला चांगलाच माहीत होता. अशा स्थितीत कामदेवाने स्वतः मंजुघोषाला मेधवीला आकर्षित करण्यासाठी मदत केली आणि शेवटी दोघे ही यशस्वी झाले. या नंतर मेधवी आणि मंजुघोषा त्यांच्या आयुष्यात आनंदी होत्या. मात्र काही काळा नंतर, मेधवीला आपली चूक लक्षात आली की, आपले लक्ष विचलित करून तिने हे पाऊल कसे उचलले. मग त्याने मंजुघोषाला शाप दिला. ज्यामध्ये तो म्हणाला की, तू पिशाचनी बनून जा.

मंजुघोषाने आता मेधावी ची माफी मागायला सुरुवात केली आणि हा शाप दूर करण्याचे उपाय विचारू लागली. तेव्हा मेधवी त्याला म्हणाली, ‘तु पापमोचनी एकादशीचे व्रत कर. यामुळे तुझे पाप दूर होतील.’

मेधवीने जसे सांगितले मंजुघोषाने त्याच प्रमाणे त्या विधीने पूजा करून पापमोचनी एकादशीचे व्रत केले. त्यामुळे तिची पापांपासून मुक्तता झाली. या नंतर मेधवी ने ही या एकादशीचे व्रत केले आणि त्यांची ही पापातून मुक्तता झाली आणि परिणामी मेधवीला पुन्हा तेज प्राप्त झाले.

नवीन वर्षात करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअ‍ॅस्ट्रो रिपोर्ट ने करा दूर!

पापमोचनी एकादशी राशी अनुसार उपाय

मेष राशि: पापमोचनी एकादशीच्या दिवशी शुद्ध तुपात सिंदूर मिसळून भगवान विष्णूला अर्पण करा. हा उपाय केल्याने तुमचे सर्व पाप दूर होतात. पितृ दोषातून ही सुटका होते.

वृषभ राशि: या दिवशी भगवान श्रीकृष्णाला मिश्री युक्त लोणी अर्पण करा. हा उपाय केल्याने कुंडलीत उपस्थित चंद्र बलवान होतो आणि त्याच्याशी संबंधित दोष ही दूर होतात.

मिथुन राशि: या राशीतील जातक भगवान वासुकीनाथांना मिश्रीची मिठाई अर्पण करावी. या छोट्याशा उपायाने जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला यश मिळेल.

कर्क राशि: पापमोचिनी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला दुधात हळद मिसळून अर्पण करावे. या छोट्याशा उपायाने जन्म कुंडलीत पितृदोष, गुरु चांडाल दोष इत्यादी पासून मुक्ती मिळते.

सिंह राशि: पापमोचिनी एकादशीच्या दिवशी सिंह राशीच्या जातकांना लड्डू गोपाल ला गूळ अर्पण केल्यास जीवनातील सर्व लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होतो.

कन्या राशि: या दिवशी कन्या जातकांनी भगवान विष्णूला तुळशी नक्कीच अर्पण करणे आवश्यक आहे. हा उपाय केल्याने कुंडलीतील सर्व दोष शांत होऊ लागतील.

तुळ राशि: या दिवशी भगवान विष्णूला मुलतानी माती लावणे आणि त्यांना गंगेच्या पाण्याने स्नान करणे खूप फलदायी ठरू शकते. हा उपाय रोग, शत्रू आणि वेदनांचा नाश करणारा सिद्ध होऊ शकतो.

वृश्चिक राशि: या दिवशी भगवान विष्णूला दही साखर अर्पण करा. हा भोग प्रसाद स्वरूपात घेतल्याने नशीब बलवान होते आणि आपले भाग्य जागे होऊ लागते.

धनु राशि: पापमोचिनी एकादशीच्या दिवशी धनु राशीच्या लोकांना भगवान विष्णूला हरभरा अर्पण करण्याचा सल्ला दिला जातो. या उपायाने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात नक्कीच यश मिळेल.

मकर राशि: या दिवशी सुपारीच्या पानात लवंग आणि वेलची अर्पण करा. या उपायाने रखडलेले काम सुरू होऊन यश मिळेल.

कुंभ राशि: या दिवशी भगवान विष्णूला नारळ आणि साखरेची मिठाई अर्पण करा. या उपायाने तुम्हाला फायदा होईल आणि आगामी काळात यश तुमच्या जवळ येईल.

मीन राशि: पापमोचिनी एकादशीच्या दिवशी मीन राशीच्या व्यक्तीने भगवान श्री हरी ला कुंकू लावल्यास कुंडलीतील दोष दूर होतात आणि लाभ प्राप्त होतात.

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer