गणेश चतुर्थी - Ganesh Chaturthi Shubh Yoga’s 2022 In Marathi

Author: योगिता पलोड | Updated Tue, 30 August 2022 02:00 PM IST

देशात गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे. हीच वेळ आहे जेव्हा बाप्पा आपल्या घरी येतो आणि 10 दिवस आपल्या सोबत असतो. बाप्पाचे भक्त विघ्नहर्ताला घरी आणण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सज्ज आणि उत्सुक असणे स्वाभाविक आहे. हा सण अनेक ठिकाणी विनायक चतुर्थी आणि काही ठिकाणी विनायक चौथ म्हणून ही ओळखला जातो आणि या वर्षी गणेश चतुर्थीचा हा पवित्र सण 31 ऑगस्ट 2022 रोजी साजरा केला जाणार आहे.


हिंदू कॅलेंडरबद्दल बोलायचे झाले तर, गणेश चतुर्थीचा हा पवित्र सण 10 दिवस साजरा केला जातो. तो भाद्रपद महिन्यात येतो. हे 10 दिवस पूर्णपणे विघ्नकारी भगवान गणेशाला समर्पित आहेत. पुराणानुसार हा गणपतीचा जन्मदिवस आहे. या दिवशी बाप्पाला आपल्या घरी आणता यावे यासाठी देशभरात आणि जगभर पसरलेले गणेश भक्त वर्षभर या वेळेची वाट पाहत असतात. या सणाची खरी मज्जा बघायची असेल तर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, तेलंगणा किंवा कर्नाटकात जावे येथे हा सण खूप धुमधाम मध्ये साजरा केला जातो.

गणेश चतुर्थी ला आपल्या जीवनात कसा मिळवावा बाप्पा चा आशीर्वाद? जगभरातील विद्वान ज्योतिषींसोबत बोला फोनवर आणि जाणून घ्या उत्तर

गणेश चतुर्थीचा हा पवित्र सण स्वतःमध्ये खूप खास असला तरी 2022 मध्ये येणार्‍या गणेश चतुर्थीचे महत्त्व 10 पटीने जास्त सांगितले जात आहे. कारण या काळात अनेक अद्भुत आणि दुर्मिळ योगायोग घडत असतात. यातील एक योगायोग 10 वर्षांनंतर घडत आहे आणि 300 वर्षांनंतर एक अत्यंत दुर्मिळ योगायोग घडणार आहे.

स्वाभाविक गोष्ट आहे तुमच्या मनात या योगांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली असावी. तर यासाठी निश्चिन्त राहा कारण, अ‍ॅस्ट्रोसेजच्या या खास ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती देत ​​आहोत. तर हा खास ब्लॉग शेवट पर्यंत वाचा आणि जाणून घ्या या आश्चर्यकारक आणि अत्यंत दुर्मिळ योगायोगांचे महत्त्व काय आहे.

सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्ताबद्दल बोलूया,

गणेश पूजनासाठी मध्याह्न मुहूर्त : 11:04:43 पासून 13:37:56 पर्यंत

अवधी: 2 तास 33 मिनिटे

लक्षात ठेवा, वरती दिला गेला मुहूर्त फक्त नवीन दिल्ली साठी मान्य आहे. जर तुम्ही आपल्या शहर अनुसार या दिवसाचा शुभ मुहूर्त जाणून घेण्याची इच्छा आहे तर, येथे क्लिक करा.

मात्र, गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनास काही काळ मनाई आहे. असे मानले जाते की, या काळात जर एखाद्या व्यक्तीला चंद्र दिसला तर त्याची मानहानी होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत खाली आम्ही तुम्हाला त्यावेळ ची माहिती देत ​​आहोत. या दरम्यान तुम्हाला चंद्राचे दर्शन चुकून ही नाही केले पाहिजे.

वेळ जेव्हा चंद्र दर्शन नाही केले पाहिजे: 15:35:21 पासून 20:38:59 पर्यंत 30, ऑगस्ट ला

वेळ जेव्हा चंद्र दर्शन नाही केले पाहिजे: 09:26:59 पासून 21:10:00 पर्यंत 31, ऑगस्ट ला

जर तुम्ही गणेश चतुर्थी ला चंद्राचे दर्शन वर्जित का असते या बाबतीत विस्तृत लेख वाचण्याची इच्छा ठेवतात तर, आमचा हा ब्लॉग वाचू शकतात.

ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा

गणेश चतुर्थीला बाप्पा ला घरी आणण्याचे आणि त्यांची पूजा करण्याचे महत्व

समृद्धि: हिंदू धर्मातील प्रथम पूज्य भगवान गणेशाची उपासना केल्याने व्यक्तीला आपले ध्येय साध्य करण्याचा दृढ निश्चय होतो आणि त्यांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येते.

ज्ञान: गणपतीचे हत्तीचे डोके हे बुद्धीचे प्रतीक आहे हे तुम्हाला माहीत आहे का? होय, हे अगदी खरे आहे आणि म्हणूनच श्री गणेशाची आराधना केल्याने जीवनात ज्ञान प्राप्त होण्यास मदत होते.

धैर्य: याशिवाय भगवान शिव आणि माता पार्वतीचे पुत्र भगवान गणेश हे धैर्यवान श्रोत्याचे प्रतीक मानले जातात म्हणून, जो कोणी प्रामाणिकपणे आणि खऱ्या भक्तीने श्री गणेशाची पूजा करतो, त्याच्या जीवनात आंतरिक शक्ती प्राप्त होते. त्याच वेळी, अशा व्यक्तीचे लक्ष वाढते आणि हे लोक त्यांच्या आयुष्यात अधिक शांत आणि सहनशील बनतात.

सौभाग्य: असे मानले जाते की ,जो कोणी बाप्पाला योग्य पद्धतीने आणून त्याची भक्तिभावाने पूजा करतो, अशा व्यक्तींना श्रीगणेश सौभाग्याचे वरदान देतात. असो, श्री गणेशाबद्दल एक प्रचलित समज आहे की, गणपती आपल्या भक्तांना कधी ही रिकाम्या हाताने परत जाऊ देत नाही.

सर्व बाधांपासून मिळेल निवारण: गणपतीचे एक नाव विघ्नहर्ता देखील आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. म्हणजेच सर्व अडथळ्यांचा नाश करणारा म्हणून, जो कोणी त्याची खरी भक्ती आणि श्रद्धेने पूजा करतो, त्याच्या जीवनातील सर्व अडथळे नक्कीच दूर करतात.

आत्मेची शुद्धी: तुमच्या पूजेने बाप्पा प्रसन्न झाला तर, तो तुम्हाला शुद्ध आत्म्याचे वरदान नक्कीच देतो. या सोबतच ते तुमच्या आजूबाजूला असलेली सर्व प्रकारची नकारात्मक उर्जा काढून टाकून हे शांतीपूर्ण जीवन प्राप्त करण्यात मदत करतात.

बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा

गणेश चतुर्थीला दुर्लभ संयोग

अ‍ॅस्ट्रोसेज च्या विद्वान ज्योतिषींकडून गणेश चतुर्थी 2022 हा असा दुर्मिळ योगायोग ठरत आहे जो गणेशाच्या जन्माच्या वेळी घडला होता. 2022 पूर्वी हा योगायोग 2012 मध्ये म्हणजेच 10 वर्षांपूर्वी घडला होता. गणेश पुराणानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला बाप्पाचा जन्म झाला आणि तो दिवस बुधवार होता आणि नक्षत्र चित्र होते. यंदा गणेश चतुर्थी त्याच योगायोगाने साजरी होणार आहे.

तसेच हा तोच योग आहे ज्यामध्ये देवी पार्वतीने मातीपासून गणेशाची निर्मिती केली होती आणि भगवान शिवाने त्यात प्राण घातला होता. या शिवाय, येथे हे जाणून घेणे देखील मनोरंजक असेल की गणेश चतुर्थी उत्सवाच्या प्रत्येक 10 दिवसांमध्ये काही शुभ योग तयार होत आहेत, त्यामुळे हे सर्व 10 दिवस वाहन खरेदी, मालमत्ता खरेदी अशा सर्व प्रकारच्या शुभ कार्यांसाठी अतिशय योग्य आहेत. इत्यादींचा विचार केला जात आहे.

एवढेच नाही तर, गणेश चतुर्थीला 300 वर्षांनंतर असा अनोखा अत्यंत दुर्मिळ योगायोग ही घडत आहे ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढेल. वास्तविक गणेश चतुर्थीच्या 10 दिवसांमध्ये सूर्य, बुध, गुरू आणि शनी हे ग्रह आपापल्या राशीत असणार आहेत. अशा स्थितीत या योगात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वाहन, मालमत्ता, फ्लॅट, दागिने इत्यादी खरेदी करू शकतात.

याशिवाय या वर्षी बृहस्पती ग्रह देह स्तूप योग करत आहे, ज्याला लंबोदर योग असे ही म्हणतात. त्यामुळेच यंदा गणेश चतुर्थी सणाचे महत्त्व अनेक पटींनी वाढत आहे. अशा वेळी जर तुम्ही योग्य पद्धतीने श्री गणेशाची आराधना केली, त्यांना तुमच्या घरी आणले तर, तुम्हाला त्यांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल.

गणपती पूजेत या वस्तू नक्की करा शामिल

गणेश चतुर्थी निमित्त लोक बाप्पाला आपल्या घरी आणतात, त्यांची मूर्ती बसवतात आणि सकाळ संध्याकाळ यथासांग पूजा करतात. याशिवाय अनेकजण आपल्या घरी एकापेक्षा जास्त गणेशमूर्ती बसवतात. पण घरात गणपतीच्या किती मूर्ती शुभ मानल्या जातात? जाणून घेण्यासाठी आमचा हा खास ब्लॉग वाचा. सावधान: गणपतीची मूर्ती स्थापना करतांना होऊ शकतात या चुका.

आता आपण अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया की, यावेळी आपण गणपतीच्या पूजेमध्ये समाविष्ट केले पाहिजे कारण, त्याशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण मानली जाते.

गणेश उत्सवाच्या वेळी 10 दिवसांचे कॅलेंडर

तारीख आणि दिवस कोणत्या वस्तूची करावी खरेदी
31 ऑगस्ट 2022 बुधवार गणेश स्थापना, कोणत्या ही प्रकारची खरेदी आणि नवीन सुरवातीसाठी हा मुहूर्त खूप शुभ आहे.
1 सप्टेंबर, 2022 गुरुवार प्रॉपर्टी, वाहन, ज्वेलरी, खरेदीसाठी हा दिवस आहे खूप शुभ.
2 सप्टेंबर, 2022 शुक्रवार घर बुक करण्यासाठी आणि कोणत्या ही प्रकारची खरेदी करण्यासाठी हा मुहूर्त अतिशय शुभ आहे.
3 सप्टेंबर, 2022 शनिवार या दिवशी अमृत योग होईल. अशा परिस्थितीत कोणती ही नवीन सुरुवात करण्यासाठी हा दिवस अतिशय योग्य असणार आहे.
4 सप्टेंबर, 2022 रविवार प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.
5 सप्टेंबर, 2022 सोमवार कोणती ही जमीन किंवा घर खरेदी करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ आहे.
6 सप्टेंबर, 2022 मंगळवार सर्व प्रकारच्या खरेदीसाठी हा दिवस अतिशय शुभ आहे.
7 सप्टेंबर, 2022 बुधवार प्रॉपर्टी खरेदी, बांधकाम, नोकरी आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवस शुभ राहील.
8 सप्टेंबर, 2022 गुरुवार वाहन खरेदीसाठी खूप शुभ आहे.
9 सप्टेंबर, 2022 शुक्रवार वाहन खरेदीसाठी खूप शुभ आहे.

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer