कसा जाणून घ्याल आपला मुख्य अंक (मूलांक) ?
अंक ज्योतिष साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेण्यासाठी अंक ज्योतिष मध्ये मूलांकाचे मोठे महत्व आहे. मूलांक जातकाच्या जीवनाचा महत्वाचा अंक मानला गेला आहे. तुमचा जन्म महिन्याच्या कुठल्या ही तारखेला होतो, तो युनिट च्या अंकात बदलल्यानंतर जो अंक प्राप्त होतो, तो आपला मूलांक मानला जातो. मूलांक 1 ते 9 अंकांच्या मध्ये कुठला ही असू शकतो उदाहरणार्थ- तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 10 तारखेला झाला असेल तर, मूलांक 1+0 म्हणजे 1 असेल.
त्याच प्रमाणे, कोणत्या ही महिन्याच्या 1 ते 31 तारखेपर्यंत जन्मलेल्या लोकांसाठी, 1 ते 9 पर्यंतच्या मूलांकांची गणना केली जाते. अशा प्रकारे सर्व स्थानिक रहिवासी त्यांचा मूलांक जाणून घेऊन त्यांचे साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेऊ शकतात.
अश्या प्रकारे कुठल्या ही महिन्याच्या 1 तारखे पासून 31 तारखेत जन्म घेतलेल्या लोकांसाठी 1 ते 9
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
आपल्या जन्म तिथीने जाणून घ्या साप्ताहिक अंक राशि भविष्य (27 फेब्रुवारी ते 5 मार्च, 2022)
अंकशास्त्राचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो कारण, सर्व संख्या आपल्या जन्मतारखेशी संबंधित असतात. खाली दिलेल्या लेखात आम्ही सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा मूलांक ठरतो आणि या सर्व संख्या वेगवेगळ्या ग्रहांद्वारे शासित असतात.
जसे की, मूलांक 1 वर असुरी देवाचे अधिपत्य आहे. चंद्र देव मूलांक 2 चा स्वामी आहे. अंक 3 ला देव गुरु बृहस्पतीचे स्वामित्व प्राप्त आहे, राहू अंक 4 चा राजा आहे. अंक 5 बुध ग्रहाच्या अधीन आहे. 6 अंकाचा राजा शुक्र देव आहे आणि 7 चा अंक केतू ग्रह आहे. शनिदेवाला अंक 8 चा स्वामी मानले गेले आहे. अंक 9 मंगळ देवाचा अंक आहे आणि याच ग्रहांच्या परिवर्तनाने जातकाच्या जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन होतात.
250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात तुम्हाला आर्थिक समस्यांमधून जावे लागेल. जास्त आर्थिक दबावामुळे तुम्ही थोडे चिंतेत दिसू शकता. काही अनावश्यक खर्चांना सामोरे जावे लागू शकते म्हणून, तुमचे खर्च ही वाढण्याची शक्यता आहे.
व्यावसायिक दृष्ट्या पाहिल्यास, तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकार्यांशी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण, ते तुम्हाला त्यांच्या कामाशी कठीण स्पर्धा देण्याचा प्रयत्न करू शकतात आणि तुमच्या विरुद्ध कट रचण्याचा प्रयत्न करू शकतात. अगदी त्यांच्या गुप्त गोष्टी देखील लीक होऊ शकतात. कामानिमित्त प्रवासासाठी वेळ अनुकूल आहे. यामध्ये तुम्हाला यश मिळेल.
जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर, चांगल्या फरकाने नफा मिळण्याचे संकेत आहेत कारण, तुम्हाला या आठवड्यात काही फायदेशीर ऑर्डर मिळू शकतात.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर तुम्ही तुमच्या प्रेयसी सोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करू शकतात दुसरीकडे, जर तुम्ही विवाहित असाल तर, तुमचे नाते तुमच्या जोडीदारासोबत फारसे चांगले नसेल. तुमच्या मध्ये काही मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे कौटुंबिक वातावरण ही प्रभावित होईल.
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल राहील. आरोग्याच्या दृष्टीने ही आठवडा अनुकूल आहे. तुमचे आरोग्य चांगले राहील.
उपाय: सूर्याला अर्घ्य द्या आणि तुमच्या घरातील सर्व पिता समान लोकांचा आदर करा.
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झालेला आहे)
करिअरच्या दृष्टीने या आठवड्यात तुमच्या कार्य क्षेत्रात बदल होण्याची शक्यता जास्त आहे. तुमच्या प्रोफाइल किंवा विभागामध्ये बदल होऊ शकतो.
जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर, तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित अपयशाची कारणे आणि उणिवा शोधता येतील. ज्याच्या मदतीने तुम्ही आळशी किंवा निष्काळजी कर्मचाऱ्यांना काढून टाकणे आणि उत्पादक बदल करणे या सारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यास सक्षम असाल. तुम्ही या आठवड्यात कोणाला ही उधार देऊ नका किंवा पैसे घेऊ नका, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता.
मूलांक 2 असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे. ते त्यांचे विषय चांगल्या प्रकारे समजू शकतील आणि लक्षात ठेवू शकतील. त्यामुळे त्यांची कामगिरी सुधारेल आणि परिणाम ही चांगला होईल.
जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर, तुम्हाला काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता जास्त आहे कारण, तुमचा जोडीदार तुम्हाला त्याच्या कुटुंबाशी ओळख करून देण्याचा प्रयत्न करू शकतो. दुसरीकडे, जर तुम्ही वैवाहिक जीवन जगत असाल तर, काही गैरसमजामुळे तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
आरोग्याच्या बाबतीत, तुम्हाला डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या असू शकते. त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि काही समस्या असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि ताबडतोब उपचार करा. तुम्हाला इजा होण्याची शक्यता असल्याने रस्त्यावर चालताना किंवा वाहन चालवताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: शिवलिंगाला जल अर्पण करून कपाळावर चंदनाचा तिलक लावावा.
आपल्या कुंडली मध्ये ही आहे राजयोग? जाणून घ्या आपला राजयोग रिपोर्ट
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झालेला आहे)
व्यावसायिक दृष्ट्या तुम्ही या आठवड्यात अतिशय काळजी पूर्वक काम करताना दिसतील. काही जण नवीन जबाबदाऱ्या घेण्याचा प्रयत्न करतील आणि नवीन जबाबदाऱ्यांसह येणाऱ्या नवीन नियमांचे पालन करतील. जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे मिळेल कारण, या आठवड्यात तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी देखील मिळतील.
जर तुम्ही व्यापारी असाल तर, तुम्ही काही उच्च अधिकारी आणि शक्तिशाली लोकांशी संपर्क प्रस्थापित कराल. जे बाजारात तुमची विश्वासार्हता वाढवेल आणि फायदेशीर सिद्ध होईल.
विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात एकाग्रतेच्या अभावाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांना त्यांच्या अभ्यासात भरकटलेली वाटू शकते.
कुटुंब समवेत तीर्थस्थळी जाण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणती ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, दीर्घकालीन गुंतवणुकीवर अधिक लक्ष केंद्रित करा कारण, यामुळे तुम्हाला भविष्यात चांगला परतावा मिळेल.
प्रेमात असाल तर, आठवडा अनुकूल आहे. तुमच्यातील जवळीक वाढेल. दुसरीकडे, जर तुम्ही विवाहित असाल तर, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. ज्यामुळे तुमच्यातील प्रेम आणि परस्पर समंजसपणा वाढेल.
आरोग्याच्या दृष्टिकोनातून, बदलत्या हवामानामुळे तुम्हाला ताप, सर्दी, खोकला होऊ शकतो. तुम्ही संध्याकाळी बाहेर गेल्यास सावधगिरी बाळगा आणि स्वतःची काळजी घ्या.
उपाय: गुरुवारी कपाळावर कुंकू लावा आणि काही स्टेशनरी वस्तू गरजू मुलांना दान करा.
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झालेला आहे)
नोकरदारांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण करू शकाल आणि तुमची सध्याची कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. अशा परिस्थितीत, तुम्हाला प्रोत्साहन आणि इतर फायदे मिळण्याची शक्यता असेल.
जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर, या आठवड्यात तुम्हाला नवीन व्यवसाय रणनीतींद्वारे नफ्यात वाढ दिसून येईल. त्याच वेळी, विद्यमान उत्पादने आणि सेवांमधून चांगली कमाई होईल. या शिवाय व्यवसायात ही विस्तार होण्याची दाट शक्यता आहे.
समवयस्कांच्या दबावामुळे आणि उच्च कौटुंबिक अपेक्षांमुळे, विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो परंतु, तरी ही ते अनेक अपयशी असून ही त्यांच्या परीक्षेचा निकाल सुधारण्यासाठी कठोर प्रयत्न करताना दिसतील.
जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर, तुम्हाला तुमच्या प्रियकराच्या नात्यात काही गैरसमजांना सामोरे जावे लागू शकते. अशा स्थितीत तुमच्यात जोरदार वाद-विवाद होऊ शकतो. दुसरीकडे, विवाहित लोक त्यांच्या जोडीदारासोबत आनंददायी क्षणांचा आनंद घेतील, तसेच ड्राईव्ह आणि डिनरसाठी जाण्याची योजना बनवू शकतात. यामुळे तुमच्यातील प्रेम आणि परस्पर समंजसपणा वाढेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या कुटुंबाच्या विस्तारासाठी भविष्यातील योजना बनवाल आणि घरातील सदस्यांच्या गरजांबद्दल चर्चा करताना दिसाल.
आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूल राहील. तुमचे आरोग्य चांगले राहिल्याने तुम्हाला आराम वाटेल.
उपाय: शनिवारी देवी कालीची पूजा करून तिला मिठाई अर्पण करा.
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात तुमचे संवाद कौशल्य वाढेल. परिणामी तुमच्या करिअर मध्ये प्रगती शक्य होईल. तुम्ही मार्केटिंग, जाहिरात आणि कम्युनिकेशन क्षेत्रात नोकरी करत असाल तर, तुम्हाला तुमच्या संबंधित कार्य प्रोफाइल मध्ये वाढ दिसेल. पगारदार लोकांची त्यांच्या कामात चांगली पकड असेल, ज्यामुळे वरिष्ठ आणि बॉसच्या नजरेत त्यांची प्रतिमा चांगली असेल.
तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर, तुम्ही काही प्रभावशाली लोकांच्या संपर्कात याल, त्यांच्याशी संवाद साधाल. तसेच, नवीन मार्केटिंग तंत्रांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या व्यवसायातून चांगला नफा कमवू शकाल.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळावे, असा योग निर्माण होत आहे. तसेच तुम्हाला तुमच्या आवडत्या विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज करण्याची संधी मिळेल.
जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर तुम्ही तुमच्या प्रेयसी सोबत काही आनंदाचे क्षण जपून ठेवाल आणि छोट्या सहलीला ही जाऊ शकता. दुसरीकडे, विवाहित लोकांना त्यांच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो कारण, तुमचे काही शब्द जोडीदाराला आवडणार नाहीत, ज्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.
आरोग्याच्या दृष्टीकोनातून, अन्नातून विष बाधा आणि पचनाशी संबंधित समस्या असू शकतात, त्यामुळे तुमच्या अन्नाची विशेष काळजी घ्या. संतुलित आहार घ्या आणि बाहेरील गोष्टी खाणे टाळा.
उपाय: बुधवारी हिरवे वस्त्र परिधान करून गायीला चारा खाऊ घाला.
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात तुमचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. यामुळे तुमचे उत्पन्न आणि खर्च यांच्यातील संतुलन बिघडू शकते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमची बचत देखील खर्च करू शकता, जी आर्थिक चिंतेची बाब असेल.
या आठवड्यात नोकरदारांच्या मेहनतीचे फळ पदोन्नती, प्रोत्साहन आणि इतर लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल किंवा नवीन नोकरी शोधत असाल तर तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळतील. तुमच्यापैकी काहीजण अर्धवेळ नोकरीच्या शोधात असतील तर तुम्हाला काही चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे.
तुम्ही कोणता ही व्यवसाय करत असाल तर, या आठवड्यात तुमचे भागीदार काही मुद्द्यावर असहमत होऊ शकतात. ज्यामुळे एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावर परिणाम होईल. अशा परिस्थितीत व्यवसाय सुरळीतपणे चालवण्यासाठी आणखी गुंतवणूक करावी लागेल.
27 फेब्रुवारी ते 5 मार्च हा काळ विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. तुमच्या काही कामगिरीचे कौतुक केले जाईल. या सोबतच शिक्षकांच्या नजरेत ही तुमची वेगळी प्रतिमा असेल.
जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर, तुम्ही तुमच्या प्रियकराबद्दल अधिक भावनिक व्हाल कारण, तुमच्यापैकी एकाच्या प्रवासाच्या योजनांमुळे दुसरा जोडीदार त्याच्या/तिच्या जोडीदाराला चुकवू शकतो. दुसरीकडे, जर तुम्ही वैवाहिक जीवन जगत असाल तर, तुमच्या जीवनसाथी सोबत तुमचे नाते सौहार्दपूर्ण असेल. तुमच्या मध्ये प्रेम आणि जवळीक वाढेल.
आरोग्याच्या दृष्टीने पाय आणि पाठदुखीचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे स्वत:ची थोडी काळजी घ्या आणि योगा, व्यायाम इत्यादी करा.
उपाय: शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि गुलाबी रंगाची फुले (शक्य असल्यास कमळाचे फूल) अर्पण करा.
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला झालेला आहे)
तुमच्या वैयक्तिक विकासासाठी आठवडा अनुकूल राहील. तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ अध्यात्मिक ज्ञानाच्या प्राप्तीसाठी घालवण्याचा प्रयत्न कराल.
व्यावसायिक दृष्ट्या ही हा आठवडा तुम्हाला चांगला परिणाम देईल. तुम्ही तुमच्या कामात समाधानी असाल तसेच, तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची क्षमता आणि कौशल्ये सिद्ध करण्याची संधी मिळेल.
जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर, या आठवड्यात तुमची वाढ मंद दिसू शकते. अशा परिस्थितीत, कोणती ही नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी, तुम्हाला बाजाराच्या योग्य स्थिती बद्दल चांगले ज्ञान घेणे उचित ठरेल. दुसरीकडे, तुमच्या पूर्वीच्या गुंतवणुकीचे परिणाम मिळण्यासाठी तुम्हाला आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागेल.
या सप्ताहात मूलांक 7 असलेले विद्यार्थी थोडे विचलित होऊ शकतात, त्यांच्या कामगिरीमुळे निराश देखील होऊ शकतात. अशा स्थितीत त्यांच्यावरील समवयस्कांचा दबाव वाढण्याची शक्यता अधिक आहे.
जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर, या आठवड्यात तुमचे नाते प्रेम, आदर, काळजी, परस्पर समंजसपणा असलेले दिसेल. दुसरीकडे, विवाहित लोक त्यांच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवून आणि कौटुंबिक जीवनावर चर्चा करून त्यांच्या नात्यात जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करतील.
आरोग्याच्या दृष्टीने, या आठवड्यात तुम्हाला हंगामी फ्लू, सर्दी इत्यादी होण्याचा धोका असू शकतो, त्यामुळे तुमच्या आरोग्याची थोडी काळजी घ्या.
उपाय: संध्याकाळी कुत्र्यांना दूध आणि पोळी खायला द्या.
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झालेला आहे)
हा आठवडा तुमच्या व्यावसायिक जीवनात स्थिरता आणेल. नोकरीच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे वरिष्ठ आणि व्यवस्थापकांकडून कौतुक होईल. सहकाऱ्यांशी संबंध सुधारतील.
जर तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल तर, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे चांगले संचालन पाहायला मिळेल. कर्मचारी आणि कामगार चांगले काम करताना दिसतील ज्यामुळे, सर्व कामे चांगल्या प्रकारे पार पाडण्यास मदत होईल. अशा प्रकारे, तुम्ही नवीन बाजारपेठांना लक्ष्य करण्यात आणि आगाऊ योजनांवर काम करण्यास सक्षम असाल.
विद्यार्थी त्यांच्या गोष्टी व्यवस्थित करून अभ्यासाप्रती गांभीर्य दाखवतील. यामुळे त्यांच्या कामगिरीत सुधारणा दिसून येईल.
जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर, हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुम्ही तुमच्या प्रेयसीशी सर्व प्रकारच्या गोष्टींबद्दल बोलताना दिसाल. आपण एकमेकांसाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी देखील पैसे खर्च करू शकता. दुसरीकडे, विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदारासोबतच्या नात्यात तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या मध्ये काही गैरसमज ही असू शकतात, जे नंतर भांडणात बदलू शकतात.
आरोग्याच्या दृष्टीने पाठ आणि सांधेदुखीचा त्रास तुम्हाला होऊ शकतो, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि व्यायाम करा.
उपाय: शनिवारी मुंग्यांना पीठ खाऊ घाला आणि शनि देवाच्या समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.
मिळवा आपल्या कुंडलीच्या आधारित सटीक शनि रिपोर्ट
(जर आपला जन्म कुठल्या ही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झालेला आहे)
जर तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या पहात असाल तर, हा आठवडा तुमच्यासाठी थोडासा निराशा जनक असेल. तुम्ही तुमच्या कर्तव्या पासून दूर पळण्याचा प्रयत्न कराल आणि काही चांगल्या आणि गतिमान संधी शोधण्याचा प्रयत्न कराल अशी शक्यता आहे.
मूलांक 9 असलेल्या व्यावसायिकांना या आठवड्यात, नुकसान होऊ शकते. मात्र, काही नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी सहकाऱ्यांना प्रेरणा मिळेल तसेच, काही नवीन ग्राहकांना भेटणे शक्य होईल परंतु त्या ग्राहकांचे समाधान करणे किंवा त्यांना पटवणे तुमच्यासाठी थोडे कठीण होऊ शकते.
विद्यार्थी अभ्यासात गंभीर राहतील. त्यामुळे त्यांना चांगला अभ्यास करता येईल आणि परीक्षेतील कामगिरी ही सुधारताना दिसेल.
प्रेमी युगुलांनी या आठवड्यात त्यांच्या नात्याबद्दल थोडे सावध राहण्याचा सल्ला दिला आहे कारण, तिसरी व्यक्ती तुमच्या नात्यात काही दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, ज्यामुळे एकमेकांवरील विश्वास कमी होऊ शकतो. दुसरीकडे, वैवाहिक जीवन जगणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, जोडीदारासोबतच्या नात्यातील प्रेम आणि जवळीक दिवसेंदिवस वाढतांना दिसेल. एकमेकांसोबत काही मौल्यवान क्षण घालवण्यासाठी तुम्ही ट्रीपची योजना देखील करू शकतात.
आरोग्याबद्दल बोलायचे झाल्यास, जर तुम्ही मधुमेह किंवा रक्तदाबाचे रुग्ण असाल तर, तुम्हाला या आठवड्यात अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण, ते वाढण्याची शक्यता जास्त आहे. नियमितपणे तपासणे आणि स्वतःची विशेष काळजी घेणे चांगले असेल.
उपाय: मंगळवारी हनुमानजी ची पूजा करून मंदिरात दर्शनाला जा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!