बुध ग्रह, ज्याला सर्व ग्रहांचा युवराज दर्जा प्राप्त आहे 24 मे 2020, 23:57 वाजता आपली राशी मिथुन मध्ये संक्रमण करेल. बुध संचार, तार्किक क्षमता, अवलोकन इत्यादींचा कारक ग्रह आहे. हा जातकांना व्यावसायिक गुण ही देतो. कुंडली मध्ये ज्याची मजबूत स्थिती होण्याच्या उपरोक्त सर्व गुण जातक मध्ये पाहिले जातात.
काही समस्यांनी आहे चिंतीत, समाधान मिळवण्यासाठी ज्योतिषांना प्रश्न विचारा
जसे आम्ही सांगिलते आहे की, ग्रहांचे संक्रमण तुमची स्वराशी मिथुन मध्ये होत आहे, चला आता जाणून घेऊया की, या संक्रमणाचा तुमच्या जीवनावर काय प्रभाव पडेल.
हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे जाणून घ्या आपली चंद्र राशि
तिसर्या भावात आपल्या भावंडांचा देखील विचार केला जातो, म्हणून मेष राशीचे लोक त्यांच्या भाऊ-बहिणींबरोबर वेळ घालवतील, जे कौटुंबिक वातावरणात सकारात्मकता आणेल. बुधच्या या संक्रमण काळात, मेष राशीच्या लोकांना इंटरनेट, सोशल मीडियाच्या माध्यमातून काही चांगली बातमी मिळू शकेल. या व्यतिरिक्त, जे लोक लेखन किंवा प्रकाशनाच्या व्यवसायात आहेत त्यांना त्यांच्या कारकीर्दीच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी चांगल्या संधी मिळू शकतात.
आपण यावेळी आपले कर्जाची परतफेड देखील करू शकता. बुध तुमच्या नवव्या भावात पडत आहे आणि हा भाव वडिलांच्या संबंधात आहे, म्हणून वडिलांची तब्येत बिघडू नये, हा तुमच्यासाठी चिंतेचा विषय बनू शकेल, तसेच वडिलांसह मेष राशीतील काही लोकांमध्ये मतभेद होऊ शकतात.
या संक्रमण दरम्यान आपल्या प्रेम जीवनामध्ये खूप रोमांस बघायला भेटेल, आपण आपल्या प्रियकर किंवा प्रेयसी समवेत आपल्या भावना व्यक्त कराल. त्याच बरोबर या काळात विवाहित लोकांना आपल्या जोडीदाराचा संपूर्ण पाठिंबा मिळेल. आरोग्याच्या बाबतीत ही हा संक्रमण काळ चांगला आहे.
उपाय- बुधवारी गणपतीची पूजा केल्यास शुभ फळ मिळतील.
दुसर्या भावामध्ये पैशाचा देखील विचार केला जातो. बुधच्या या संक्रमणात आपली जमा संपत्ती वाढू शकते. नवीन बँक खाती उघडण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी हा चांगला काळ आहे.आर्थिक प्रगती आपली प्राथमिकता असेल जेणेकरून आपण आपले आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करू शकाल. या राशीच्या विद्यार्थ्यांविषयी विचार केला, तर हळूहळू तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती कराल.
या राशीचे लोक जे अद्याप अविवाहित आहेत त्यांना या संक्रमणा दरम्यान आपल्या भावना व्यक्त करण्यास सक्षम केले जाईल, ज्यामुळे नवीन संबंध येऊ शकतात. त्याच वेळी, या राशीच्या विवाहित लोकांच्या कुटुंबात एक नवीन सदस्य येऊ शकतो, तरीपण आपण आपल्या जोडीदाराच्या आरोग्याबद्दल थोडी काळजीत असाल.
या संक्रमण काळात आपल्या भोवती स्वच्छता ठेवणे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे, अन्यथा आपल्याला तोंड आणि दात यांच्याशी संबंधित कोणतीही समस्या होऊ शकते. या राशीच्या ज्या लोकांना थायरॉईड सारख्या हार्मोन्सशी संबंधित कोणतीही समस्या आहे, त्यांना आवश्यक काळजी घ्यावी लागेल.
उपाय- तुळशीच्या झाडाची रोज पूजा करा आणि झाडाला पाणी घाला.
बुधाच्या या संक्रमणाच्या वेळी दिगबली अवस्थेत असेल यामुळे तुम्ही रचनात्मक विचारांनी भरलेले असाल आणि तुमची बौद्धिक क्षमता चांगली होईल. बुधाची ही अवस्था मिथुन राशीतील लोकांचे काही ही निर्णय घेण्यासाठी चांगली समज देईल यामुळे तुम्ही संधीचा फायदा उचलू शकाल यामुळे यश आणि संतृष्टी तुम्हाला मिळेल परंतु, बुधाच्या या संक्रमणाच्या वेळी तुम्ही एक सोबत बरेच काम करण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणून, तुम्ही लवकरच एका कामाने बोर होऊन जातात म्हणून, अन्य कामांकडे तुमचे लक्ष जाते. असे करणे तुमच्यासाठी ठीक नाही कारण, यामुळे तुमच्या कामात असंगती येऊ शकते म्हणून, जे काम करत आहे त्याला आधी पूर्ण करा आणि त्यानंतर पुढील काम हातात घ्या.
बुधाचे हे संक्रमण या राशीतील प्रेमी प्रेमिकांसाठी सुखद राहील. जे लोक आतापर्यंत सिंगल होते ते या संक्रमणाच्या वेळी कुणाला भेटू शकतात. विवाहित लोकांच्या जीवनात सुख आणि संतोष कायम राहील.
उपाय- बुध ग्रहाच्या बीज मंत्राचा विधिवत पाठ करा.
कर्क राशीतील जातकांना या काळात आरोग्याने जोडलेली समस्या होऊ शकते म्हणून, योग-ध्यान करणे फायदेशीर ठरेल. तणाव जितके शक्य असेल तितके दूर ठेवा, कारण बुधाची दृष्टी तुमच्या षष्ठम भाव ज्याला स्पर्धा, शत्रू, व्यत्यय च्या बाबतीत विचार यावर ही पडत आहे म्हणून, वाद-विवाद स्थितीच्या काळात तुम्हाला सांभाळून राहावे लागेल अथवा तुमच्या प्रतिमेवर वाईट प्रभाव पडू शकतो. सोबतच, असे काही काम करू नका ज्यामुळे कोर्ट कचेरी मध्ये फसाल जर असे झाले तर तुमचे खर्च वाढू शकतात.
या काळात लोन किंवा उधार घेण्यापासून बचाव करण्याची आवश्यकता आहे. तथापि, या काळात कर्क राशीतील जातकाचे कौटुंबिक वातावरण सुखद राहील. तुमच्या भाऊ-बहिणींमुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. द्वादश भावात विदेशाच्या बाबतीत विचार केला जातो, बुधाच्या या संक्रमणाच्या वेळी आपल्या स्वराशी मध्ये स्थित आहे म्हणून, हे या गोष्टीकडे इशारा करते की, कर्क राशीतील काही जातक भविष्यात बसण्यासाठी परदेशी संधींच्या शोधात असू शकतात.
उपाय- बुधवारच्या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घातल्याने तुम्हाला शुभ फळ मिळतील.
तुमच्या द्वितीय भावाचा स्वामी तुमच्या एकादश भावात विराजमान होण्याने सिंह राशीतील जातकांसाठी खूप सुंदर धन योग निर्माण होत आहे. या योगाच्या कारणाने तुम्ही धन आणि नाव कमावू शकतात आणि बऱ्याच क्षेत्रात यश मिळवू शकतात. व्यवसायात ही तुम्हाला लाभ प्राप्ती होईल. हेच नाही तर, आपल्या मित्र आणि संपर्कांनी ही तुम्हाला लाभ होऊ शकतो. या काळात तुम्ही जितक्या लोकांना भेटाल, सोशल मीडियाच्या तितकाच तुम्हाला होईल.
प्रेम आणि रोमान्स साठी ही वेळ चांगली आहे परंतु आपल्या जीवनसाथी किंवा लव्हमेट सोबत वेळ नक्कीच घालवा यामुळे तुमचे नाते अधिक मजबूत होईल.
उपाय- देवघरात कपूर लावल्याने तुम्हाला बुध ग्रहांचे चांगले फळ प्राप्त होतील.
या संक्रमण काळात तुम्हाला जास्त सक्रिय होण्याची आवश्यकता आहे आणि आपल्या कामांना लगेच पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. या संक्रमण काळात कन्या राशीतील जातक करिअर ओरिएंटेड राहतील यामुळे ते आपल्या पारिजात आणि जीवनसाथीला कमी वेळ देतील. या कारणाने तुमच्या नात्यामध्ये चढ-उतार दिसतील म्हणून, तुम्हाला सल्ला दिला जातो की, आपल्या निजी आणि पेशावर जीवनात संतुलन ठेवा यामुळे तुमच्या निजी जीवनात आनंद येईल.
उपाय- नियमित सूर्योदयाच्या वेळी विष्णू सहस्त्रनाम जप करा.
नवम भावात गुरुजनांवर विचार केला जातो म्हणून, गुरु सोबत झालेली भेट आणि बोलणे तुम्हाला बऱ्याच काळापर्यंत कामी येऊ शकते. देशभरात चालत आलेल्या कोरोना महामारीमुळे मिटिंग किंवा भेट ऑनलाइन होऊ शकते. तुमच्या प्रोफेशनल जीवनात नजर टाकली असता तुम्हाला प्रोमोशन मिळू शकतो कारण, या काळात तुमच्या नजीबाचे ही सहयोग मिळेल. तुमचे सहकर्मी तुमच्या सोबत चांगला व्यवहार करतील आणि आपल्या सिनिअर्स सोबत तुम्ही बराच चांगला वेळ व्यतीत करू शकतात. बुधाची ही स्थिती एक शुभ धन योगाचे ही निर्माण करत आहे यामुळे तुळ राशीतील बऱ्याच जातकाची इनकम वाढू शकते. बुध ग्रह तुळ राशीतील द्वादश भावाचा ही स्वामी आहे म्हणून, या संक्रमणाच्या वेळी विदेशातील जोडलेल्या व्यापाराने जातकांना फायदा होऊ शकतो.
कौटुंबिक जीवनावर नजर टाकली असता बुधच्या या संक्रमण काळात वडिलांसोबत तुमचे काही मतभेद होऊ शकतात. हे मतभेद तेव्हा अधिक जास्त होईल जेव्हा तुम्ही एकाच व्यवसायात आहे. वडिलांसोबत बोलण्याच्या वेळात आपल्या सीमा ओलांडू नका. तुमच्या प्रेम जीवनावर नजर टाकली असता विवाहित जातकांना या काळात आनंद आणि उत्साह प्राप्ती होईल. तसेच जे जातक प्रेम संबंधात आहे ते आपल्या नात्याला उच्चता देऊ शकतात.
या संक्रमण काळात विद्यार्थ्यांची समजण्याची क्षमता वाढेल, या राशीतील जे जातक उच्च शिक्षण घेत आहे त्यांना या काळात चांगल्या फळांची प्राप्ती होईल.
उपाय- गरजू मुलांना आणि विद्यार्थ्यांना पुस्तके दान करा. हे दान कोरोना महामारीच्या वेळात बनवलेल्या मापदंडांच्या अनुसारच करा.
या संक्रमण काळात तुम्हाला आरोग्याची ही विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे खासकरून, त्या लोकांना ज्यांना त्वचा संबंधित एलर्जी लवकर होते. जर तुम्हाला काही आरोग्य समस्या आहे तर, लगेचच डॉक्टरांकडे जा. योग, ध्यान आणि शारीरिक काम केल्याने तुमच्यामध्ये नकारात्मकता आणि तणाव दूर होईल या सोबतच आरोग्यात चांगले बदल होतील.
हे संक्रमण त्या विद्यार्थ्यांसाठी शुभ राहील जे काही नवीन कोर्स करण्याची इच्छा ठेवतात, बुधाची स्थिती नवीन विषयांना समजण्यात तुमची मदत करेल.
प्रेम जीवन आणि नात्यांची गोष्ट केली असता बोलण्याची वेळी सावध राहा. खोटे बोलण्यापासून बचाव करा अथवा नात्यामध्ये चढ-उतार येऊ शकतात.
उपाय- सूर्योदयाच्या वेळी प्रतिदिन ऊँ नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा 108 वेळा जप करा.
प्रेम संबंधात चांगले बदल येतील कारण, तुमच्यामध्ये रोमान्सची अधिकता या काळात पाहायला मिळू शकते. जे लोक प्रेम संबंधांना विवाहाच्या अतूट बंधनात येण्याच्या विचारात आहे त्यांच्यासाठी हे संक्रमण चांगले राहील. विवाहित जातकांच्या जीवनात ही आनंद कायम राहील. या राशीतील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रति या काळात अधिक खंबीर राहतील यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात शुभ परिणाम प्राप्त होतील.
उपाय- प्रतिदिन बुधाच्या होराच्या वेळी बुध मंत्राचा जप करा.
या राशीतील जे जातक व्यवसाय करतात त्यांना ही बुधाच्या या संक्रमणाच्या वेळी नफा होईल आणि जर तुम्ही व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी लोन घेण्याची इच्छा ठेवतात तर, ते ही या काळात मंजूर होऊ शकते.
तुमच्या निजी जीवनाची गोष्ट केली असता आईच्या पक्षातील लोकांकडून या काळात तुम्हाला भेट प्राप्त होऊ शकते. कोर्ट-कचेरीच्या मुद्यात तुम्हाला या काळात विजय होऊ शकतो तथापि, प्रेम जीवनात हे संक्रमण तुम्हाला खूप गंभीर बनवू शकते यामुळे नात्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून, तुम्हाला आपल्या लव्हमेट सोबत या काळात चांगली वेळ घालवली पाहिजे यामुळे तुम्ही त्यांच्या भावनांना समजू शकाल आणि तुमच्या मधील नाते मजबूत होईल.
या राशीतील विद्यार्थ्यांची गोष्ट केली असता या काळात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे या राशीतील विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. या काळात तुमच्या ऊर्जेचा स्तर वाढेल म्हणून, शारीरिक गोष्टी जसे रनींग. जिमिंग किंवा योग इत्यादी केल्याने तुम्ही स्वतःला फीट बनवू शकतात आणि आपल्या आरोग्यात सकारात्मक परिवर्तन आणू शकतात.
उपाय- गाईला हिरवा चार खाऊ घाला.
आपल्या निजी जीवनाची गोष्ट केली असता या राशीतील विवाहित जातकांसाठी ही वेळ खुप शुभ आहे. या संक्रमण काळात तुम्हाला आपल्या जीवनसाथीचे पूर्ण सहयोग प्राप्त होईल. प्रेम जीवनात ही या राशीतील लोकांना चांगले फळ मिळतील तुमचा व्यवहार चांगला राहील आणि विनाकारण गोष्टीवर तुमचे लक्ष जाणार नाही, यामुळे प्रेमाच्या नात्यामध्ये प्रगाढता येईल. या राशीतील ज्या जातकांचे मुले आहेत ते आपल्या मुलांच्या प्रगतीला पाहून आनंदी होतील. या राशीतील विद्यार्थी त्या जटिल विषयांना ही या काळात सहज समजतील ज्यामध्ये त्यांना मागील काळात परेशानी येत होती. यासोबतच, विद्यार्थी शिक्षणाच्या क्षेत्रात चांगले प्रदर्शन करू शकतील.
आपल्या आरोग्याबद्दल समस्या येऊ शकतात म्हणून, आपल्या आरोग्याची काळजी घ्या योग आणि व्यायाम करणे फार गरजेचे आहे.
उपाय- देवी सरस्वतीची पूजा करा.
निजी जीवनाची गोष्ट केली असता आई सोबत या काळात तुमचे संबंध सुधारतील. मीन राशीतील काही जातक या काळात भूमी किंवा वाहन खरेदी करू शकतात तथापि, तुम्हाला कुठली ही वस्तू खरेदी करण्याच्या आधी आपल्या खर्चांवर ही लक्ष दिले पाहिजे आणि त्यानंतर काही निर्णय घेतला पाहिजे.
या संक्रमण काळात आपल्या जीवनसाथीला त्यांच्या कार्य क्षेत्रात सन्मान, प्रशंसा प्राप्ती होईल. यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
उपाय- नियमित तुळशीची पूजा करा.