बुधाचे मकर राशीमध्ये गोचर (Budhache Makar Rashimadhe Gochar)
बुधाचे मकर राशीमध्ये गोचर (7 फेब्रुवारी 2023) होणार आहे. बुध ग्रह देव गुरु बृहस्पती च्या अधिपत्याच्या धनु राशीमधून निघून प्रातःकाळी 7:11 वाजता श्री शनिदेवाच्या अधिपत्याच्या मकर राशीमध्ये प्रवेश करेल. हे येथे 27 फेब्रुवारी 2023 च्या संध्याकाळी 4:33 वाजेपर्यंत राहील आणि त्या नंतर शनीच्या अधिपत्याची कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल, जिथे आधी शनिदेव विराजमान असतील. आम्ही तुम्हाला या गोचर संबंधित महत्वाची माहिती देत आहोत की, याचा तुमच्या राशीवर कसा परिणाम होईल. बुध हा महत्त्वाचा ग्रह आहे. तो क्षणार्धात कोणता ही रंग दाखवू शकतो. जर आपण कुंडली आधारित बोलायचे झाले तर, वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला युवराजाचा दर्जा प्राप्त झाला आहे. कुंडलीतील भाव अनुसार आणि ग्रहाच्या प्रभावाखाली ते त्यांचे परिणाम देतात. ज्याप्रमाणे लहान मूल चांगल्या लोकांच्या सहवासात चांगली कर्म शिकतो आणि वाईट लोकांच्या सहवासात वाईट कर्म शिकतो. त्याचप्रमाणे बुध ग्रह देखील शुभ ग्रहांसह शुभ आणि अशुभ ग्रहांचे अशुभ प्रभाव देतो. शनी ग्रह आणि बुध ग्रह समतेत आहेत म्हणून, असे म्हणता येईल की बुधाचे मकर राशीमध्ये गोचर चांगले परिणाम देऊ शकते.
हे संक्रमण आपल्या जीवनावर प्रभाव जाणून घेण्यासाठी अॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!
शनीच्या अधिपत्याची पृथ्वी तत्वाच्या मकर राशीमध्ये बुध ग्रहाचे गोचर होणार आहे. बुधाचे मकर राशीमध्ये गोचर, विभिन्न रूपात जगातील विभिन्न प्राण्यांना वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम देईल. बुधाला वाणीचा कारक म्हणतात. हे आपल्याला तार्किक क्षमता प्रदान करते. हा बुध आपल्या बुद्धीचा कारक आहे आणि आपल्याला तार्किक क्षमता देतो. आपण एखाद्या गोष्टीचे किती चांगले विश्लेषण करू शकतो हे सर्व बुध ग्रहावर आधारित आहे. जर बुध ग्रह अशुभ स्थितीत असेल तर, माणूस आपल्या वाणीने कोणाला ही शत्रू बनवू शकतो आणि भाल्यासारखे अस्त्र मारू शकतो. दुसरीकडे, बुध चांगल्या स्थितीत असेल तर, माणूस आपल्या गोड बोलण्याने इतरांना आपले बनवू शकतो. बुध ग्रहाची ही खास ओळख आहे.
बुध हा वात, पित्त आणि कफ त्रिदोषांचा कारक मानला जातो. हे दोन राशींवर राज्य करते, त्यापैकी पहिली मिथुन आणि दुसरी कन्या आहे. हे कन्या राशीमध्ये उच्च मानले जाते आणि ही त्यांची मूळ त्रिकोण राशी ही आहे तर, मीन राशीतील बुध नीच चा मानला जातो. हा एकमेव ग्रह आहे जो त्याच्या राशीच्या काही अंशांवर उच्च मानला जातो. आपल्या जीवनात बुध ग्रहाचे ही खूप महत्त्व आहे, जे आपल्याला वेळोवेळी ओळखण्याची संधी मिळते.
हे राशिभविष्य चंद्र राशीवर आधारित आहे जाणून घ्या आपली चंद्र राशि
मेष राशि
मेष राशीच्या जातकांसाठी बुध तिसऱ्या आणि सहाव्या भावाचा स्वामी आहे आणि या गोचर काळात हे तुमच्या दहाव्या भावात गोचर करतील जे की, तुमच्या आजीविका आणि तुमच्या मान सन्मानाचा भाव आहे.
तुमच्यासाठी बुधाचे मकर राशीमध्ये गोचर अनुकूल सिद्ध होईल. बुध ग्रहाच्या कृपेने, धैर्य आणि पराक्रमाच्या बळावर तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी करू शकाल. उपजीविकेच्या क्षेत्रात तुम्हाला फायदा होईल. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर, या काळात तुम्हाला नोकरी मिळू शकते. वैयक्तिक प्रयत्नांमुळे कार्यक्षेत्रात निश्चित यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांसाठी हा काळ खूप फायदेशीर असेल. तुम्हाला प्रमोशन देखील मिळू शकते. तुम्ही कोणता ही व्यवसाय करत असाल त,र व्यवसायात ही नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमचे विरोधक पराभूत होतील आणि तुम्ही यशस्वी व्हाल. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान राहील आणि मालमत्ता खरेदीच्या दिशेने यश मिळू शकेल.
उपाय: नियमित तुळशीला पाणी घाला आणि तुळशीच्या पानाचे सेवन करा.
वृषभ राशि
वृषभ राशीतील जातकांसाठी बुध दुसऱ्या तसेच पाचव्या भावाचा स्वामी आहे आणि हे गोचर काळात तुमच्या नवव्या भावात म्हणजे भाग्य भावात गोचर करतील. हे भाव तुमच्या मान-सन्मान, दूरची यात्रा आणि आपल्या गुरु समान लोकांच्या बाबतीत तसेचज आपल्या धर्माच्या बाबतीत सांगतात.
बुधाचे मकर राशीमध्ये गोचर होण्याने तुम्हाला मध्यम फळांची प्राप्ती होण्याची शक्यता आहे. या काळात नशिबाची कृपा कमी असू शकते आणि तुमचे नियोजित काम अडकू शकते ज्यामुळे धनहानी होऊ शकते. नशीब आणि पैशाच्या कमतरतेमुळे तुम्ही थोडे त्रासलेले दिसाल आणि तुम्हाला असे वाटेल की, तुमचे नशीब आणि पैसा तुमच्या सोबत असता तर तुम्ही खूप मोठे काम करू शकलो असतो पण, हे सर्व ईश्वराच्या कृपेने झाले आहे. की तुमचे आयुष्य पुढे जाईल. तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. वडिलांसोबतच्या नातेसंबंधावर ही परिणाम होऊ शकतो. या गोचर काळात तुम्हाला लांबचा प्रवास करण्याची संधी मिळेल, ज्यामध्ये तुम्ही थोडी काळजी घेऊन आणि पूर्ण तयारी करूनच यश मिळवू शकता. या दरम्यान, निश्चितपणे आर्थिक लाभ होण्याची शक्यता असेल आणि तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून ही चांगली मदत मिळेल. जर तुम्ही कोणते ही काम करत असाल ज्यामध्ये तुम्हाला त्यांची गरज असेल तर ते तुम्हाला मदत करताना दिसतील.
उपाय: तुम्ही बुधवारी ट्रांसजेंडर्स चा आशीर्वाद घेतला पाहिजे आणि त्यांना हिरव्या रंगाची कुठली ही भेटवस्तू द्या.
मिथुन राशि
मिथुन राशीतील जातकांसाठी बुध पहिल्या आणि चौथ्या भावाचा स्वामी आहे आणि या गोचर काळात हे तुमच्या आठव्या भावात म्हणजे आकस्मिक घटना, पैतृक संपत्ती, जीवनात येणारे मोठे बदल आणि तुमच्या सासरच्या पक्षाला दर्शवणारा भाव आहे.
बुध गोचर च्या प्रभावामुळे मिथुन राशीच्या जातकांना चांगले परिणाम मिळू शकतील. तुमच्या आयुष्यात अचानक काही चांगल्या घटना घडू लागतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. अचानक आर्थिक लाभ तुम्हाला खूप आनंद देईल. अशा काही क्षेत्रातून तुमच्याकडे पैसे येण्याची शक्यता आहे जिथून तुम्ही अपेक्षा ही केली नव्हती. यामुळे तुमचे सर्व काम पूर्ण होऊन तुम्हाला समाधान मिळेल. कामात यश आणि विजय मिळू लागेल. तुमच्या मनात आनंदाची भावना देखील असेल. तुमच्या सामाजिक स्थितीत चांगली सुधारणा होईल. मित्रमंडळ विस्तृत होईल. सासरच्या लोकांशी तुमचे संबंध मधुर होतील आणि सासरचे लोक तुमच्या कामात तुम्हाला मदत करताना आणि तुमच्या कामात तुमचे मत घेताना दिसतील. तथापि, बुधाचे मकर राशीमध्ये गोचर तुम्हाला आरोग्याच्या किरकोळ समस्या देखील देऊ शकते.
उपाय: प्रकृती सोबत आत्मसात होऊन काही वेळ प्रकृती सोबत घालवा आणि आपल्या घरात लहान लहान रोपे नक्की लावा.
कर्क राशि
कर्क राशीतील जातकांसाठी बुध तिसऱ्या आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे आणि ह्या गोचर काळात हे तुमच्या सातव्या भावात म्हणजे विवाह, भागीदारी, व्यापार आणि जाणते मध्ये तुमची प्रतिमा भाव मध्ये गोचर करतील.
बुधाचे मकर राशीमध्ये गोचर होण्याने तुमच्यासाठी मध्यम फळ मिळण्याचे योग बनतील. या काळात महिला पक्षच्या काही प्रकारचा वाद-विवाद किंवा कलहाच्या स्थितीपासून बचाव करणे हितकारी राहील. दांपत्य जीवनात तणाव वाढू शकतो आणि जीवनसाथी किंवा जीवनसाथीसोबत वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ते शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा कारण, ते तुमच्यासाठी फायदेशीर असणार नाही. या काळात शारीरिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुम्हाला तुमच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी किंवा सरकारी क्षेत्रातील लोकांकडून विनाकारण भीती वाटेल आणि जर तुम्ही काही चुकीचे केले असेल तर, या काळात ते सत्यात बदलू शकते. या काळात प्रवास करणे शक्यतो टाळावे कारण, या कालावधीत प्रवास केल्यास नफ्याऐवजी तोटा होऊ शकतो. व्यवसायासाठी ही हा काळ मध्यम राहील.
उपाय: तुम्ही नियमित गाईला हिरवा चारा खाऊ घाला.
सिंह राशि
सिंह राशीतील जातकांसाठी बुध दुसऱ्या तसेच अकराव्या भावाचा स्वामी आहे आणि या गोचर काळात हे तुमच्या सहाव्या भावात म्हणजे रोग, शत्रू, विरोधी, कर्ज, लोन, नोकरी भावात गोचर करतील.
बुधाचे मकर राशीमध्ये गोचर त्या जातकांसाठी अनुकूल सिद्ध होईल ज्यांचा जन्म सिंह राशीमध्ये झालेला आहे. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक गोष्टींचा फायदा होईल. तुम्ही केलेल्या मेहनतीच्या प्रमाणात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. विरोधक शांत होतील आणि तुम्हाला त्रास देणे थांबवतील. प्रत्येक क्षेत्रात प्रगती कराल. तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीच्या क्षेत्रात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आणि कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा वाढेल. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. खर्चात नक्कीच वाढ होईल, ज्यावर तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. व्यवसाय करणाऱ्या जातकांना भांडवली गुंतवणुकीनंतर चांगला नफा मिळविण्याची संधी मिळेल. तुमचे शत्रू आणि विरोधक पराभूत होतील. जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेतले असेल तर, तुम्ही ते देखील या कालावधीत फेडण्यास सक्षम असाल. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळू लागेल ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद वाटेल. या सोबतच वैयक्तिक जीवनात ही समाधानाची भावना जाणवेल.
उपाय: बुधवारी सरस्वती माता आणि राधेच्या मूर्तीला किंवा फोटोला सफेद रंगाचे फुल अर्पण करा आणि त्यांची विधिवत पूजा करा.
कन्या राशि
कन्या राशीतील जातकांसाठी बुध पहिल्या तसेच दहाव्या भावाचा स्वामी आहे आणि या गोचर काळात हे तुमच्या पाचव्या म्हणजे तुमच्या बुद्धी, शिक्षण, संतान आणि प्रेम भावात गोचर करतील.
पाचव्या भावात बुधाचे मकर राशीमध्ये गोचर तुमच्यासाठी मिश्रित परिणाम घेऊन येणार आहे. या काळात तुमच्या मनात विनाकारण अस्वस्थता वाढेल. तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्हाल. एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्या मनात अज्ञात भीती निर्माण होईल. या काळात तुम्ही तुमच्या मुलांशी वाद घालणे टाळावे कारण, यामुळे तुमचा तणाव वाढू शकतो आणि वाद होऊ शकतात. तुमच्या स्वभावात अहंकार वाढू शकतो आणि लोभ वाढण्याची ही शक्यता असते. हे तुमच्यासाठी अनुकूल असणार नाही आणि यामुळे तुम्हाला स्वतःवर राग येऊ शकतो आणि तुम्हाला त्यांचे मन वळवण्यासाठी पापड लाटावे लागू शकतात. जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर, तुमच्या प्रिय सोबत चांगले संभाषण ठेवा कारण, तुमच्या अनेक गोष्टींमुळे त्यांना वाईट वाटू शकते, जे तुमच्या नात्यासाठी हानिकारक ठरू शकते. या काळात तुम्हाला उत्पन्नात चांगली वाढ दिसेल, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा पण अतिआत्मविश्वासाला बळी पडू नका.
उपाय: शुक्ल पक्षाच्या वेळी बुधवारी तुमच्या कनिष्ठिका बोटात सोन्याच्या मुद्रिकेत पन्ना रत्न धारण करा ज्याचे वजन 4 ते 5 कॅरेट मध्ये असले पाहिजे.
तुळ राशि
तुळ राशीच्या जातकांसाठी बुध नवव्या तसेच बाराव्या भावाचा स्वामी आहे आणि या गोचर काळात हे तुमच्या चौथ्या म्हणजे सुख, माता, चल व अचल संपत्तीच्या भावात गोचर करतील.
बुधाचे मकर राशीमध्ये गोचर तुळ राशीच्या जातकांसाठी अनुकूल राहणार आहे. तुम्हाला सर्व प्रकारचे सुख मिळेल. बुध ग्रहाची कृपा तुमच्यावर चांगली राहील आणि तुमच्या आईची तब्येत सुधारेल. तसेच, त्यांच्याशी तुमचे संबंध मधुर होतील. ती तुमच्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम दाखवेल. तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. धनप्राप्तीच्या मनोकामना पूर्ण होतील. या काळात तुम्ही कोणत्या ही प्रकारची जंगम मालमत्ता देखील खरेदी करू शकता. त्याचा ही तुम्हाला फायदा होईल. जर तुम्ही परदेशात रहात असाल तर, तुम्ही मायदेशी परत येऊ शकतात. नशिबाची साथ मिळाल्याने रखडलेल्या कामांना गती मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. चांगल्या लोकांचा सहवास मिळेल. या दरम्यान, मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता देखील असू शकते. शारीरिक तंदुरुस्ती वाढेल आणि आरोग्याच्या समस्या कमी होतील. या प्रकारे बुधाचे मकर राशीमध्ये गोचर तुळ राशीतील जातकांना खूप अनुकूल परिणाम देईल. तुम्ही आपल्या कुटुंबासोबत आपल्या व्यावसायिक जीवनात चांगले लक्ष द्याल.
उपाय: नियमित श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्राचा पाठ करा.
वृश्चिक राशि
वृश्चिक राशीतील जातकांसाठी बुध आठव्या तसेच अकराव्या भावाचा स्वामी आहे आणि या गोचर काळात हे तुमच्या तिसऱ्या भावात म्हणजे लघु यात्रा, तुमची रुची, लहान भाऊ-बहीण, शेजारी, नातेवाईक आणि आपल्या पराक्रम भावात गोचर करतील.
या काळात बुधाच्या गोचर मुळे तुम्हाला तुमच्या विरोधकांशी अडचणी येतील. तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. जर तुम्ही सरकारी धोरणाच्या विरोधात कोणते ही काम करत असाल तर, या काळात तुम्हाला अडचणी आणि चिंता निर्माण होतील. सरकारकडून तुमच्यावर कोणता ही नवीन कर लादला जाऊ शकतो किंवा तुम्हाला जुन्या कराबद्दल नोटीस देखील पाठवली जाऊ शकते. तुम्ही अनैतिक कामे टाळावीत कारण, या काळात तुमचा कल या कामांकडे असेल, ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळात खूप त्रास सहन करावा लागू शकतो. मित्रांचे सहकार्य मिळेल. तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. या काळात तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल. मित्र तुम्हाला मदत करताना दिसतील. भावंडांशी असलेल्या संबंधांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तुमची वागणूक आणि त्यांच्याशी असलेले संबंध बिघडू शकतात. या काळात तुमच्या संवाद कौशल्याची स्थिती चांगली राहील. ते अधिक अनुकूल बनवून तुम्ही फायदा मिळवू शकता.
उपाय: तुम्ही नियमित श्री राम रक्षा स्तोत्राचे पाठ केले पाहिजे.
धनु राशि
धनु राशीतील जातकांसाठी बुध सातव्या तसेच दहाव्या भावाचा स्वामी आहे आणि हे गोचर काळात तुमची वाणी, धन, कुटुंब, मुख, नेत्र इत्यादींच्या बाबतीत सांगणारे दुसऱ्या भावात गोचर करतील.
तुमच्यासाठी बुधाचे मकर राशीमध्ये गोचर करणे लाभदायक सिद्ध होऊ शकते. तथापि, काही क्षेत्रांमध्ये आव्हाने उभी राहतील. तुम्हाला पैसे मिळण्याची चांगली संधी असेल आणि तुम्ही पैसे वाचवण्यात ही यशस्वी होऊ शकता. बँक बॅलन्स वाढल्याने तुमचा आत्मविश्वास देखील हळूहळू वाढेल परंतु, तुम्हाला कोणाशी ही बोलताना तुमच्या वागण्याकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल कारण, बदनामीची परिस्थिती देखील उद्भवू शकते. याउलट, जर तुम्ही चांगले वागलात आणि लोकांशी गोड बोललात तर, तुम्ही इतरांना तुमचा दृष्टिकोन मान्य करण्यात यशस्वी व्हाल. यामुळे तुमच्यासाठी अनेक कामे होतील. तुम्हाला चांगले जेवण मिळेल. धन आणि दागिन्यांचा लाभ ही या गोचर काळात प्राप्त होईल. जीवनसाथीकडून ही असेच फायदे मिळू शकतात. मात्र, या काळात त्यांची प्रकृती ढासळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या कार्याने तुमच्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल करू शकतात.
उपाय: श्री गणपतीची उपासना आणि गणपती अथर्वशीर्ष पाठ करा आणि गणपतीला दुर्वा वहा.
मकर राशि
मकर राशीतील जातकांसाठी बुध सहाव्या तसेच नवव्या भावाचा स्वामी आहे आणि या गोचर काळात हे तुमच्या पहिल्या भावात म्हणजे व्यक्तित्व, शरीर आणि सामाजिक प्रतिष्ठा च्या भावात गोचर करतील.
बुधाच्या पहिल्या भावात गोचर करणे तुमच्यासाठी मध्यम रूपात फळदायी सिद्ध होईल. या दरम्यान, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बोलण्याकडे लक्ष द्यावे लागेल. तुम्ही जे काही बोलाल ते विचारपूर्वक बोला कारण, बोलण्यात कटुता वाढणे आणि विचार न करता बोलणे यामुळे तुमच्यासाठी वादाची आणि नुकसानीची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्याचा परिणाम कौटुंबिक संबंधांवर ही होऊ शकतो. अनावश्यक प्रवास होऊ शकतात, ज्यामुळे अडचणीची परिस्थिती आणि पैसा खर्च होऊ शकतो. तथापि, या काळात तुमचे मन आध्यात्मिक कार्यात अधिक व्यस्त असेल. तुम्हाला आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागेल कारण, आरोग्याशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. वडिलांचे सहकार्य लाभेल, त्यामुळे तुमची रखडलेली महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतात. व्यवसायाच्या संदर्भात प्रवास केल्याने तुम्हाला फायदा होईल आणि व्यवसायात वाढ होईल परंतु, तुम्ही थोडे सावध राहावे. मातृपक्षाकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल.
उपाय: नियमित भोजन करण्याच्या आधी गाईचा घास काढा.
कुंभ राशि
कुंभ राशीच्या जातकांसाठी बुध पाचव्या तसेच आठव्या भावाचा स्वामी आहे आणि या गोचर काळात हे तुमच्या बाराव्या म्हणजे तुमच्या व्यय, हानी, विदेश, खर्च, हॉस्पिटल, जेल भावात गोचर करतील.
बुधाचे मकर राशीमध्ये गोचर च्या कारणाने या काळात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काही आरोग्य समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. शारीरिक व्याधी, डोळ्यांच्या समस्या आणि प्रचंड थकवा यासारख्या समस्या तुम्हाला घेरतील. या काळात तुम्ही तुमच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत असाल तर, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल कारण, हा काळ आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनुकूल नाही. चिंतन अधिक कराल म्हणून तुम्हाला मानसिक तणाव ही राहील. तुम्ही विद्यार्थी असाल तर शिक्षणात अडथळे येतील आणि तुमच्या अभ्यासावर परिणाम होईल. विरोधक तुम्हाला त्रास देतील आणि त्यांच्या समोर तुम्ही कमजोर पडू शकतात. कोणत्या ही कोर्टात तुमच्या विरोधात केस चालू असेल तर, त्याकडे ही लक्ष द्यावे लागेल कारण, हा काळ थोडा कमजोर असेल. या काळात, खर्चात अनपेक्षित वाढ झाल्यामुळे, तुमच्या आर्थिक स्थितीवर भार देखील वाढू शकतो, त्यामुळे तुम्हाला तुमचे खर्च नियंत्रणात ठेवावे लागतील. अचानक परदेशात जाण्याची शक्यता आहे.
उपाय: नियमित एक निश्चित संख्येत श्री बुध ग्रह बीज मंत्राचा जप करा.
मीन राशि
मीन राशीच्या जातकांसाठी बुध चौथ्या तसेच सातव्या भावाचा स्वामी आहे आणि हे गोचर काळात तुमच्या अकराव्या भावात म्हणजे कमाई, मोठे भाऊ-बहीण, तुमची महत्वाकांक्षा भावात गोचर करतील.
हा काळ तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. अकराव्या भावात बुधाचे गोचर तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यात मदत करेल. तुम्ही तुमच्या मनात ज्या इच्छा ठेवल्या आहेत, त्या आता हळूहळू पूर्ण होऊ लागतील. तुमच्यापेक्षा मोठ्या असलेल्या तुमच्या भावंडांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल आणि ते तुमच्या कामात आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्यात मदत करतील. तुम्ही कोणता ही व्यवसाय करत असाल तर, व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ दिसेल. तुम्ही नोकरी करत असाल तर, नोकरीत ही तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील आणि तुमच्याकडे आशेच्या नजरेने पाहिले जाईल. या दरम्यान, जमीन किंवा इमारतीचा लाभ ही मिळू शकतो. तुमचे आरोग्य सुधारेल आणि प्रेम प्रकरणांमध्ये तीव्रता येईल. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर या काळात तुम्हाला शिक्षणात चांगले परिणाम मिळतील आणि तुम्ही एक चांगला विद्यार्थी म्हणून स्वतःची ओळख निर्माण करू शकाल.
उपाय: बुधवारी आपल्या बहीण किंवा आत्याला हिरव्या रंगाची साडी भेट द्या.
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems








