शनी त्रयोदशी 2023 - Shani Trayodashi 2023 In Marathi
हिंदू पंचांग नुसार, प्रत्येक महिन्यात 2 प्रदोष व्रत असतात: प्रदोष व्रत (शुक्ल पक्ष) आणि प्रदोष व्रत (कृष्ण पक्ष), ज्याला त्रयोदशी प्रदोष व्रत देखील म्हणतात. जेव्हा ही तारीख शनिवारी येते तेव्हा त्या दिवशी शनी त्रयोदशी साजरी केली जाते. सामान्यतः हा सण दक्षिण भारतात मोठ्या रीतिरिवाजांनी साजरा केला जातो. या दिवशी लोक दान, धर्म, पूजा आणि इतर अनेक धार्मिक विधी करतात.
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
वर्ष 2023 मध्ये एकूण 3 वेळा शनी त्रयोदशी साजरी केली जाईल. पहिली 18 फेब्रुवारी 2023 ला दुसरी 04 मार्च 2023 ला आणि तिसरी 1 जुलै 2023 ला साजरी केली जाईल. याला शनी प्रदोष व्रत किंवा शनी प्रदोषम च्या नावाने ही जाणले जाते. प्रदोष व्रत मुख्यतः देवी पार्वती आणि भगवान शंकराला समर्पित असते परंतु, जेव्हा ही तिथी शनिवारी येते तेव्हा यात कर्म देव शनीची ही अहम भूमिका असते.
18 फेब्रुवारी 2023 रोजी येणारी वर्षातील पहिली शनी त्रयोदशी अधिक विशेष मानली जाते कारण, या दिवशी महाशिवरात्री 2023 देखील साजरी केली जाईल. अनेक वर्षांनी हा शुभ योगायोग घडत आहे. अशा परिस्थितीत या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या सोबत शनी देवाची कृपा ही लोकांवर असेल. धार्मिक मान्यतेनुसार, शनी देव हे भगवान शिवाचे उपासक आहेत, त्यामुळे या दिवशी भगवान शिव आणि शनीदेव यांच्याशी संबंधित काही विशेष उपाय केल्यास भक्तांना सकारात्मक परिणाम प्राप्त होतील. आता आपण शनी त्रयोदशीच्या दिवशी काय करावे हे सविस्तर जाणून घेऊया.
बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा
या दिवशी शनी साडेसाती आणि ढैय्या च्या प्रभावांपासून मिळेल आराम
17 जानेवारी 2023 रोजी शनीचे कुंभ राशीत गोचर झाले होते, त्यानंतर कुंभ, मकर आणि मीन राशीसाठी साडेसाती आणि कर्क आणि वृश्चिक राशीसाठी ढैय्या काळ सुरू झाला आहे. आपल्याला माहित आहे की, शनीच्या साडेसाती आणि आणि ढैय्याच्या काळात जातकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा स्थितीत ज्या लोकांवर शनिदेवाची साडेसाती आणि ढैय्याचा प्रभाव पडतो त्यांना अर्धा तास, शनि त्रयोदशीच्या दिवशी भगवान शिवाला गंगाजलाने अभिषेक करण्याचा उपाय म्हणून त्यांना सुचवले जाते. यानंतर श्री शिव रुद्राष्टकम् पाठ करा. असे केल्याने तुम्हाला साडेसाती आणि ढैय्याच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळेल आणि भगवान शिव आणि शनिदेवाचा विशेष आशीर्वाद ही प्राप्त होईल.
नवीन वर्षात करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअॅस्ट्रो रिपोर्टने करा दूर!
शनी त्रयोदशी व्रताचे लाभ
धार्मिक मान्यतेनुसार, शनी त्रयोदशी व्रत पाळल्याने अनेक शुभ परिणाम मिळतात: नोकरीत बढती, चंद्र दोषापासून मुक्ती, मानसिक अस्वस्थता आणि गोंधळ दूर होणे, दीर्घायुष्याचा आशीर्वाद, शनिदेवाचा आशीर्वाद, भगवान शिव ही प्रसन्न होतात आणि पुत्रप्राप्ती होते.
शनी त्रयोदशी व्रताचे नियम
शनि प्रदोष व्रत करण्याचे काही खास नियम आहेत, ते पुढीलप्रमाणे-
-
शनी त्रयोदशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे.
-
नंतर आंघोळ वगैरे झाल्यावर स्वच्छ कपडे घाला.
-
पूजेचे ठिकाण स्वच्छ आणि शुद्ध करा.
-
यानंतर गाईच्या शेणाने लिंपून एक मंडप तयार करा.
-
मंडपाखाली 5 वेगवेगळ्या प्रकाच्या रंगांनी सुंदर रांगोळी काढा.
-
त्यानंतर बेलपत्र, अक्षत, दीपक, धूप आणि गंगाजल घेऊन भगवान शंकराची विधिवत पूजा करावी.
-
लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी तुमचे तोंड ईशान्य दिशेला असावे.
-
प्रदोष काळात तुम्ही फक्त हिरवा मूग खाऊ शकता कारण, ते पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे.
-
या दिवशी तुम्ही पूर्ण उपवास किंवा फलहार (फळे खाणे) देखील करू शकता.
शनी त्रयोदशी/ शनी प्रदोष व्रताचे अचूक उपाय
-
शनी त्रयोदशीच्या दिवशी छाया दान करणे उत्तम मानले जाते. यासाठी सकाळी एका भांड्यात मोहरीचे तेल भरून त्यात एक नाणे (मुद्रा) टाका. यानंतर त्यामध्ये तुमचा चेहरा पहा नंतर, ते शनी मंदिरात दान करा. असे मानले जाते की, असे केल्याने उत्तम परिणाम प्राप्त होतात.
-
शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनी त्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी काळ्या कुत्र्याला मोहरीच्या तेलाने मळलेली गोड भाकरी खायला द्या.
-
शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी शनी त्रयोदशीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करा कारण, शनी देव हे शिवाचे उपासक आहेत. अशा वेळी तुम्हाला फक्त पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. यानंतर शिव पंचाक्षर मंत्राचा "ओम नमः शिवाय" स्पष्टपणे जप करा.
-
भगवान शंकराची विधिवत पूजा केल्यानंतर शनिदेवाची पूजा करावी. प्रथम शिव चालीसा पाठ करा, नंतर शनी चालिसाचा पाठ करा. असे मानले जाते की, असे केल्याने भगवान शिव आणि कर्मदेव शनी या दोघांची कृपा प्राप्त होते.
-
शनी त्रयोदशीच्या दिवशी व्रत करावे. तसेच शिवलिंगावर 108 बेलपत्र आणि पिंपळाची पाने अर्पण करा. मान्यतेनुसार असे केल्याने खूप फायदा होतो.
-
तुमच्यावर अनेक ग्रहांचा अशुभ प्रभाव असेल तर शनी त्रयोदशीच्या दिवशी उडीद डाळ, काळ्या रंगाचे जोडे, काळे तीळ, उडीद खिचडी, छत्री आणि घोंगडी इत्यादी दान करा कारण, या सर्व गोष्टी शनिदेवाशी संबंधित आहेत. या वस्तूंचे दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात.
-
शनी त्रयोदशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळास पाणी आणि दूध अर्पण करून शनी दुखापासून मुक्ती मिळावी आणि मानसिक शांती मिळावी. नंतर तेथे 5 मिठाई ठेवा. यानंतर आपल्या पितरांचे ध्यान करताना पिंपळाच्या झाडाची पूजा करा. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानंतर त्याखाली बसून सुंदरकांड पठण करून सात वेळा प्रदक्षिणा करावी.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा: अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!