मकर संक्रांत 2023- Makar sankranti In Marathi (15 जानेवारी, 2023)
हिंदू धर्मात मकर संक्रांत 2023 चे विशेष महत्व आहे. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथी ला मकर संक्रांतीचे पर्व साजरे केले जाते. तथापि, मकर संक्रांतीला देशातील वेगवेगळ्या हिश्यात वेगवेगळ्या नावाने जसे- लोहडी, उत्तरायण, खिचडी, टिहरी, पोंगल इत्यादी नावांनी ही जाणले जाते. प्रत्येक वर्षी जेव्हा सूर्य देव मकर राशीमध्ये प्रवेश करते तेव्हा त्याला सूर्याची मकर संक्रांत म्हणतात.
या दिवशी गुरु आणि सूर्याच्या प्रभावात तेजी येईल लागते. मान्यता आहे की, मकर संक्रांतीच्या दिवशी देव ही धर्तीवर अवतरित होतात आणि आत्मा ला मोक्ष प्राप्त होते. या दिवशी खरमास चे समापन होते आणि शुभ आणि मांगलिक कार्य जसे की, विवाह, साखरपुडा, मुंडन, गृह प्रवेश इत्यादींसाठी मुहूर्त पाहिले जाते.
काही समस्यांनी आहे चिंतीत, समाधान मिळवण्यासाठी ज्योतिषांना प्रश्न विचारा
धार्मिक मान्यतेनुसार, मकर संक्रांती च्या दिवशी सूर्य देव आपल्या रथाने खर (गाढव) ला काढून सात घोढ्यांना घेऊन सवार होतात आणि आणि त्यांच्या मदतीने चार ही दिशेत भ्रमण करतात आणि सूर्याची चमक तेज होते. मकर संक्रांतीचा सण सूर्याला समर्पित असतो. या दिवशी स्नान, दान आणि तीळ खाण्याची परंपरा आहे. चला जाणून घेऊया अॅस्ट्रोसेज च्या या विशेष ब्लॉग मध्ये मकर संक्रांत 2023 ची पूजा विधी, महत्व, कोणत्या राशीतील जातकांचे चमकेल नशीब आणि याने जोडलेली अन्य महत्वपूर्ण माहिती.
मकर संक्रांत 2023: तिथी व मुहूर्त
वर्ष 2023 मध्ये मकर संक्रांत आणि लोहडी च्या तारखेला घेऊन लोक असमंजस मध्ये आहे. तर चला आपण जाणून घेऊया कोणती आहे सटीक तारीख:
मकर संक्रांत तिथी: 15 जानेवारी 2023, रविवार
पुण्य काळ मुहूर्त: सकाळी 07 वाजून 15 मिनिटांपासून 12 वाजून 30 मिनिटांपर्यंत.
अवधी: 05 तास, 14 मिनिटे
महा पुण्य काळ: सकाळी 07 वाजून 15 मिनिटांपासून ते सकाळी 09 वाजून 15 मिनिटांपर्यंत.
अवधी: 02 तास
लोहडी 2023: तिथी व मुहूर्तलोहडी 2023 तिथी: 14 जानेवारी 2023, दिवस शनिवार
लोहडी संक्रांत मुहूर्त: 14 जानेवारी रात्री 08 वाजून 57 मिनिटांनी.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा.
मकर संक्रांत 2023 महत्व
मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य स्वतः आपल्या पुत्र शनिदेवाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी जातात. माहिती देतो की, शनिदेव मकर राशीचा स्वामी आहे. सूर्याच्या भावात प्रवेश केल्याने शनीचा प्रभाव संपतो. सूर्यप्रकाशापुढे कोणती ही नकारात्मकता टिकू शकत नाही. असे मानले जाते की, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची उपासना केल्याने आणि संबंधित दान केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते. या सोबतच या दिवशी खिचडीचा नैवेद्य दाखवावा. यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात आणि सर्व ग्रह दोष दूर होतात.
ज्योतिष शास्त्र मध्ये उडद दाळीला शनिदेवाने जोडले गेले आहे अश्यात, या दिवशी उडद दाळीची खिचडी खाणे आणि दान करण्यासाठी जातकांवर सूर्य देव आणि शनी देवाची विशेष कृपा कायम राहते. सोबतच, तांदळाला चंद्रमा, मिठाला शुक्र, हळदीला बृहस्पती, हिरव्या भाज्यांना बुध साठी शुभ मानले जाते तसेच, मंगळाचा संबंध गर्मीने आहे म्हणून, मकर संक्रांतीला खिचडी खाल्याने कुंडली मधील सर्व ग्रहांच्या स्थितीमध्ये सुधार होतो.
कसे प्रसन्न होतील भगवान सूर्य नारायण?
- मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला.
- आता उगवत्या सूर्यदेवाकडे तोंड करून कुशाच्या आसनावर बसा. नंतर त्या आसनावर उभे राहून तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या. पाण्यात खडी साखर घाला. यामुळे सूर्यनारायण प्रसन्न होतील.
- याशिवाय तांब्याच्या भांड्यात रोळी, चंदन, लाल फुले, तांदूळ, गूळ इत्यादी मिसळून सूर्यदेवाला जल अर्पण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने सूर्यदेवाची विशेष कृपा प्राप्त होते.
- सूर्याची पहिली किरणे दिसू लागल्यावर दोन्ही हातांनी तांब्याचे भांडे धरून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. पाणी अर्पण करताना पायावर पाणी पडू नये याची काळजी घ्या.
- पाणी देताना या मंत्रांचा जप करा :-
- ऊँ ऐही सूर्यदेव सहस्त्रांशो तेजो राशि जगत्पते।
- अनुकम्पय मां भक्त्या गृहणार्ध्य दिवाकर:।।
- ऊँ सूर्याय नम:, ऊँ आदित्याय नम:, ऊँ नमो भास्कराय नम:। अर्घ्य समर्पयामि।
- सूर्याला जल दिल्यानंतर आपल्या स्थानावरच 3 वेळा परिक्रमा करा.
- आता आसन उचलून त्या स्थानाला प्रणाम करा.
या वस्तूंचे करा दान, शनिदेव आणि सूर्य देवाची होईल कृपा
- मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ दान करणे अत्यंत शुभ मानले जाते म्हणून, याला तीळ संक्रांत असे ही म्हणतात. या दिवशी काळे तीळ दान केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात.
- या दिवशी खिचडी दान केल्याने पुण्य प्राप्त होते. या दिवशी तांदूळ आणि काळ्या उडीद डाळापासून बनवलेली खिचडी दान करावी. काळ्या उडदाने शनिदेव प्रसन्न होतात आणि सर्व दोष दूर होतात.
- मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाच्या दानाला ही विशेष महत्त्व आहे. गुळापासून बनवलेल्या वस्तू खाल्ल्याने आणि दान केल्याने विशेष लाभ होतो. याच्या दानाने शनि, गुरु आणि सूर्य यांची कृपा प्राप्त होते.
- आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी गरीब आणि गरजूंना उबदार कपडे आणि ब्लँकेट दान करा.
- या दिवशी गावठी तुपाचे दान करणे खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे तुमचा मान-सन्मान वाढतो.
देशातील विभिन्न राज्यांमध्ये कशी साजरी केली जाते मकर संक्रांत
मकर संक्रांतीचा सण नवीन ऋतू आणि नवीन पिकाचे आगमन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी पंजाब, उत्तर प्रदेश, बिहारसह तामिळनाडूमध्ये नवीन पिके घेतली जातात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये मकर संक्रांतीचा सण वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो.
लोहडी: मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी, लोहडी हा सण उत्तर भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. लोहडीच्या दिवशी मित्र आणि नातेवाईकांना शुभेच्छा आणि मिठाई पाठविली जाते. हा सण साजरा करण्यासाठी मोकळ्या जागेवर शेकोटी पेटवली जाते आणि लोकनृत्ये गायली जातात. नंतर शेंगदाणे, गजक, तीळ इत्यादी पवित्र अग्नीत टाकून परिक्रमा केली जाते.
पोंगल: पोंगल हा दक्षिण भारतातील लोकांचा मुख्य सण आहे. हा मुख्यतः केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये साजरा केला जातो. हा सण खास शेतकऱ्यांसाठी आहे. तो तीन दिवस साजरा केला जातो. यामध्ये सूर्यदेव आणि इंद्र देवाची पूजा केली जाते. पोंगल साजरी करताना सर्व शेतकरी चांगले पीक आल्याबद्दल देवाचे आभार मानतात.
उत्तरायण: विशेषतः गुजरातमध्ये उत्तरायण सण साजरा केला जातो. गुजरातमध्ये मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवण्याची परंपरा आहे. लोक हा सण पतंगोत्सव म्हणून ही साजरा करतात. अनेकजण उत्तरायणाच्या दिवशी उपवास ही ठेवतात आणि घरी तीळ आणि शेंगदाण्याची चिक्की बनवून नातेवाईकांना वाटतात.
बिहू: बिहू हा सण माघ महिन्यातील संक्रांतीच्या पहिल्या दिवसापासून साजरा केला जातो. हा सण प्रामुख्याने कापणीचा सण आहे. जो आसाममध्ये प्रसिद्ध आहे. बिहूच्या निमित्ताने घरोघरी अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. बिहूच्या दिवशी शेकोटी पेटवली जाते आणि तीळ आणि नारळापासून बनवलेले पदार्थ अग्निदेवाला अर्पण केले जातात.
या राशींवर होईल धनवर्षा
मिथुन राशि
मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे सूर्याचे मकर राशीमध्ये गोचर, मिथुन राशीच्या लोकांसाठी हे खूप शुभ सिद्ध होऊ शकते. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांना यश मिळू शकते. त्याचबरोबर, आरोग्याच्या दृष्टीने ही हा काळ फलदायी ठरू शकतो. एखाद्या जुन्या शारीरिक समस्येपासून मुक्ती मिळू शकते. गुंतवणुकीत चांगला परतावा मिळण्याची ही शक्यता आहे.
तुळ राशिहा काळ तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फलदायी ठरू शकतो. तुम्हाला भौतिक सुख मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. दुसरीकडे, जे लोक रिअल इस्टेट, प्रॉपर्टी डीलरमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला आहे. या काळात तुम्ही एखादे वाहन किंवा इतर चैनीच्या वस्तू खरेदी करू शकतात.
मीन राशिसूर्याचे गोचर तुमच्यासाठी अनुकूल ठरेल. धनलाभ व लाभाचे योग आहेत. त्याच वेळी, नशीब तुमच्या बाजूने असल्याचे दिसते. तुमचे रखडलेले काम पूर्ण होऊ शकते. यावेळी तुम्हाला व्यवसायात अडकलेले कोणते ही जुने पेमेंट मिळू शकते. तुम्हाला कुठेतरी गुंतवणूक करायची असेल तर, हा काळ अनुकूल आहे. यावेळी तुम्ही बचत करण्यात ही यशस्वी होऊ शकतात.
कर्क राशिसूर्यदेवाचे गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या राशीचे लोक, जे आयात-निर्यात संबंधित काम करतात, त्यांना या काळात भरपूर नफा मिळू शकतो. तर दुसरीकडे लग्नाचे बेत आखणाऱ्यांना ही विवाहाची शक्यता दिसत आहे.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!