अंक ज्योतिष - Numerology In Marathi (2 एप्रिल - 8 एप्रिल, 2023)
अंक ज्योतिष साप्ताहिक राशिभविष्य जाणून घेण्यासाठी अंक ज्योतिष मूलांकाचे अधिक महत्व आहे. मूलांक जातकाच्या जीवनाचे महत्वपूर्ण अंक मानले गेले आहे. तुमचा जन्म महिन्याच्या कुठल्या ही तारखेला झालेला आहे, त्याची बेरीज करून जो एक अंक प्राप्त होतो तो तुमचा मूलांक असतो. मूलांक 1 ते 9 अंकांच्या मधील कुठला ही अंक असू शकतो. उदाहरणार्थ- तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 10 तारखेला झालेला आहे तर, तुमचा मूलांक 1+0 म्हणजे 1 असेल.
अश्या प्रकारे कुठल्या ही महिन्याच्या 1 तारखेपासून 31तारखेपर्यंत जन्म घेतलेल्या लोकांसाठी 1 ते 9 पर्यंतच्या मूलांकाची गणना केली जाते. अश्या प्रकारे सर्व जातक आपले मूलांक जाणून त्याच्या आधारावर साप्ताहिक राशिभविष्य जाणून घेऊ शकतात.
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
आपल्या जन्म तिथीने जाणून घ्या साप्ताहिक अंक राशि भविष्य (2 एप्रिल - 8 एप्रिल, 2023)
अंक ज्योतिषाचा आपल्या जीवनावर सरळ प्रभाव पडतो कारण, सर्व अंकांचा आपल्या जन्म तारखेसोबत संबंध असतो. खाली दिल्या गेलेल्या लेखात आम्ही सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जन्म तिथीच्या हिशोबाने त्याचा एक मूलांक निर्धारित असतो आणि हे सर्व अंक वेगवेगळ्या ग्रहांच्या द्वारे शासित असतात.
जसे की, मूलांक 1 वर सूर्य देवाचे अधिपत्य असते. चंद्रमा मूलांक 2 चा स्वामी आहे. अंक 3 ला देव गुरु बृहस्पतीचे स्वामित्व प्राप्त आहे, राहू अंक 4 चा राजा आहे. अंक 5 बुध ग्रहाच्या अधीन आहे. 6 अंकाचा राजा शुक्र देव आहेआणि 7 अंक केतू ग्रहाचा आहे. शनिदेवाला अंक 8 चा स्वामी मानले गेले आहे. अंक 9 मंगळ देवाचा अंक आहे आणि याच ग्रहाच्या परिवर्तनाने जातकाच्या जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन होतात.
250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!
मूलांक 1
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झालेला आहे)
या सप्ताहात मूलांक 1 चे जातक आपल्या रागीट स्वभाव आणि आक्रमक व्यवहाराला नियंत्रित करण्यात यशस्वी होतील तथापि, तुम्ही या काळात गरजेपेक्षा जास्त भावनात्मक बनाल ज्याचा वाईट प्रभाव तुमच्या आरोग्यावर ही पडू शकतो. या काळात तुम्हाला जीवनात अनेक अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकतो आणि तुम्हाला लांबच्या प्रवासाला जावे लागेल. हा सप्ताह विशेषत: मूलांक 1 चे जे जातक संशोधक किंवा शास्त्रज्ञ आहेत त्यांच्यासाठी फलदायी परिणाम देईल.
प्रेम जीवन- प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन या आठवड्यात पूर्णपणे संतुलित राहील. तुम्ही तुमच्या नातेसंबंधात अगदी खरे असाल आणि तुमच्या दोघांमध्ये ढोंग काही ही असणार नाही. नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराचे विचार आणि भावनांचा आदर केला पाहिजे आणि ऐकले पाहिजे. परिणामी, तुमचे नाते अधिक चांगले होईल. तथापि, या काळात तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत थोडे चिंतेत राहू शकता.
शिक्षण- एकूणच, मूलांक 1 च्या जातकांना या आठवड्यात शैक्षणिक क्षेत्रात काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. संशोधन करणारे विद्यार्थी आणि टॅरो कार्ड रीडर, वैदिक ज्योतिष यांसारख्या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा सप्ताह चांगला परिणाम देईल.
पेशेवर जीवन- प्रोफेशनल लाइफबद्दल बोलायचे झाले तर, हा सप्ताह मूलांक 1 च्या जातकांसाठी खूप चांगला जाईल. या काळात तुमच्यासाठी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, याशिवाय तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ ही मिळेल. तुमचे वरिष्ठ किंवा बॉस तुमचे कौतुक करतील आणि तुम्हाला प्रोत्साहन देखील देऊ शकतात. तथापि, आपण आपल्या प्रतिस्पर्ध्यांपासून पूर्णपणे सावध राहण्याची विशेष काळजी घ्यावी कारण, ते आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात.
स्वास्थ्य- मूलांक 1 च्या जातकांना या आठवड्यात त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. या काळात तुम्ही पार्टी किंवा सेलिब्रेशनच्या वातावरणात बाहेरचे पदार्थ जास्त खातात, त्यामुळे तुमच्या तब्येतीत चढ-उतार होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घ्या आणि तुमची साखर आणि रक्तदाब नियंत्रित ठेवा.
उपाय- भगवान कृष्णाची पूजा करा आणि त्यांना 5 लाल फूल अर्पित करा.
मूलांक 2
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झालेला आहे)
मूलांक 2 च्या जातकांसाठी हा सप्ताह अतिशय शुभ असणार आहे. या काळात तुम्ही खूप आनंदी असाल आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत चांगला आणि आनंदी वेळ घालवाल. तुमची संवादशैली ही सुधारेल आणि तुम्ही तुमचे शब्द पूर्ण आत्मविश्वासाने आणि अधिकाराने मांडाल. परिणामी, तुम्ही चांगली बँक बॅलन्स तयार करू शकाल.
प्रेम जीवन- जर आपण मूलांक 2 च्या जातकांच्या प्रेम जीवन आणि प्रेम संबंधांबद्दल बोललो तर, या सप्ताहात तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. भौतिक सुख आणि लोभामुळे या सप्ताहात प्रेमींमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. विवाहित जातक त्यांच्या जोडीदाराच्या आरोग्याबद्दल थोडेसे चिंतित असू शकतात आणि परिणामी तुमच्या नात्यात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. मात्र, तुमच्या चांगल्या बोलण्याने तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकाल.
शिक्षण- मूलांक 2 च्या जातकांसाठी हा सप्ताह शिक्षणाच्या दृष्टीने चांगल्या संधी घेऊन येईल. जे विद्यार्थी परदेशात शिकत आहेत किंवा परदेशी विद्यापीठांमध्ये व्यावसायिक शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा कालावधी चांगला परिणाम देईल. त्याच बरोबर शालेय विद्यार्थ्यांना या आठवड्यात आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला तुमच्या भावनांवर पूर्ण नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो कारण, असे न केल्याने तुम्ही अनेक महत्त्वाच्या संधी गमावू शकतात.
पेशावर जीवन- या सप्ताहात मूलांक 2 च्या जातकांना परदेशातून नवीन नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही प्रिंट आणि सोशल मीडियावर काम केले तर तुम्हाला तुमच्या कामांची प्रशंसा आणि ओळख दोन्ही मिळेल. एकूणच हा आठवडा तुमच्या व्यावसायिक जीवनाच्या दृष्टीने फलदायी ठरेल. तसेच, इतरांना मदत करण्याच्या तुमच्या सवयीमुळे तुम्ही लोकांवर छाप सोडण्यास सक्षम असाल.
स्वास्थ्य- या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहील. तुम्ही नेहमी उर्जेने परिपूर्ण असाल, त्यामुळे तुमचे आरोग्य ही चांगले राहील.
उपाय- मोती च्या माळा घाला आणि आपल्यासोबत एक सफेद रुमाल ठेवा.
करिअरचे आहे टेंशन! आत्ताच ऑर्डर करा कॉग्निएस्ट्रो रिपोर्ट
मूलांक 3
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झालेला आहे)
मूलांक 3 च्या जातकांच्या जीवनासाठी हा सप्ताह चांगला राहील. या सप्ताहात तुम्ही नवीन घर किंवा मोठी मालमत्ता खरेदी करू शकता. या सोबतच या सप्ताहात तुम्ही नवीन वाहन देखील खरेदी करू शकता. एकूणच, या सप्ताहात तुम्ही नवीन गोष्टींसाठी भरपूर खरेदी करू शकता.
प्रेम जीवन- जर तुम्ही प्रेम संबंधात असाल आणि तुमचा जोडीदार वेगळ्या सभ्यतेतून आला असेल आणि तुमची तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून देण्यात तुम्हाला संकोच वाटत असेल, तर हा सप्ताह तुमच्यासाठी योग्य ठरेल. या कामात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि तुम्ही परिस्थितीवर सहज नियंत्रण ठेवू शकाल. दुसरीकडे, विवाहित जातकांना कोणत्या ही प्रकारच्या लोभात न पडण्याचा सल्ला दिला जातो, यामुळे तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. सोप्या भाषेत सांगायचे तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर टाळा.
शिक्षण- मूलांक 3 च्या जातकांना या सप्ताहात शैक्षणिक क्षेत्रात पूर्ण यश मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे आणि अनेक दिवसांच्या मेहनतीचे फळ मिळेल. तथापि, तुम्हाला तुमचे पूर्ण लक्ष केवळ अभ्यासातच द्यावे लागेल, काही प्रकारच्या विचलिततेमुळे तुम्हाला स्वतःवर थोडासा दबाव जाणवू शकतो, त्यामुळे तणाव टाळण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.
पेशावर जीवन- या सप्ताहात मूलांक 3 चे जातक त्यांच्या घरगुती कारणांमुळे घरून काम करण्याच्या बाजूने असतील. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर, हा सप्ताह तुम्हाला अनुकूल परिणाम देईल. तुमचा कोणता ही प्रकल्प बराच काळ रखडला असेल तर, तो या आठवड्यात सुरू होऊ शकतो. याशिवाय, घरून काम करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल कारण, तुम्ही चांगल्या आणि आरामदायी स्थितीत असाल.
आरोग्य- या आठवड्यात आरोग्याच्या बाबतीत तुमच्यासाठी कोणती ही मोठी समस्या येण्याची शक्यता नाही. परंतु, ही शक्यता आहे की, तुम्ही अधिक भावनिक होऊ शकता परिणामी, तुमची उर्जा कमी होऊ शकते. तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवा आणि विशेषतः वाहन चालवताना काळजी घ्या.
उपाय- भगवान शंकराची पूजा अर्चना करा आणि सोमवारी शिवलिंगावर दूध चढवा.
मूलांक 4
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झालेला आहे)
मूलांक 4 च्या जातकांसाठी हा सप्ताह संमिश्र परिणाम आणू शकतो. भौतिक आणि भावनिक बाबींमध्ये तुम्हाला थोडासा गोंधळ वाटू शकतो. या सप्ताहात तुम्ही अधिक भावनिक होऊन प्रतिक्रिया देऊ शकता. त्याच वेळी, अनेक वेळा तुम्ही विषयांबाबत व्यावहारिक विचार करून पुढे जाल. या काळात तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
प्रेम जीवन- या सप्ताहात मूलांक 4 चे जातक त्यांच्या जोडीदारासोबत वर्चस्वपूर्ण वागू शकतात आणि याचा तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होईल. विवाहित जोडप्यांमध्ये जास्त भावनिक असण्याने वाद होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल.
शिक्षण- मूलांक 4 च्या जातकांसाठी या आठवड्यात अभ्यासाच्या क्षेत्रात काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. या आठवड्यात तुम्हाला स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते आणि तुम्ही विचार केला होता तशी कामगिरी तुम्ही करू शकत नाही. तसेच, जसजशी तुमची परीक्षा जवळ येत आहे तसतसे तुम्ही तणावग्रस्त आहात म्हणून, सावधगिरी बाळगा.
पेशावर जीवन- हा सप्ताह तुमच्या व्यावसायिक जीवनाच्या दृष्टीने शुभ राहील. तुमच्या व्यावसायिक जीवनात अनेक दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे कौतुक आणि प्रोत्साहन ही मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर, चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, या सप्ताहात जातकांना कोणत्या ही जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मिळू शकतो.
स्वास्थ्य- मूलांक 4 च्या जातकांसाठी या आठवड्यात त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमचा जास्त वेळ पार्ट्यांमध्ये घालवू नका कारण, बाहेरचे अन्न आणि अल्कोहोल सेवन करणे तुमच्यासाठी हानिकारक असू शकते. याशिवाय महिलांना या आठवड्यात हार्मोन्सशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
उपाय- आपल्या पायाला खोबऱ्याच्या तेलाने मालिश करा.
आता घर बसल्या विशेषज्ञ पुरोहितांकडून इच्छेनुसार ऑनलाइन पूजा करा आणि मिळवा उत्तम परिणाम!
मूलांक 5
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झालेला आहे)
मूलांक 5 च्या जातकांसाठी हा सप्ताह काही अडचणी आणू शकतो. या काळात तुम्हाला जीवनात काही अनिश्चित घटनांना सामोरे जावे लागू शकते. आरोग्य, आर्थिक बाजू आणि प्रेम संबंध या सारख्या तुमच्या जीवनातील विविध क्षेत्रांवर त्याचा परिणाम होण्याची ही अपेक्षा आहे. मूलांक 5 च्या जातकांना या आठवड्यात शांत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, या काळात कोणता ही मोठा निर्णय घेणे टाळण्याचा प्रयत्न करावा.
प्रेम जीवन- या आठवड्यात तुमची वागणूक अधिक भावनिक आहे आणि त्यामुळे तुम्ही अनेक गोष्टींवर अतिरेक करू शकता. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि तो/ती सर्वकाही समजून घेण्याचा प्रयत्न करेल, तरी ही तुम्हाला सल्ला दिला जातो की, तुम्ही तुमच्या समस्यांबद्दल उघडपणे बोला आणि तुमच्या जोडीदाराच्या संयमाची परीक्षा घेऊ नका.
शिक्षण- स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह अनुकूल परिणाम देईल. या सोबतच गुप्त विज्ञान, संशोधक आणि उच्च शिक्षण घेणार्या लोकांसाठी ही हा काळ अनुकूल राहण्याची शक्यता आहे.
पेशावर जीवन- जर तुम्ही प्रिंट मीडियामध्ये किंवा शिक्षक म्हणून काम करत असाल (जो लहान मुलांना किंवा अपंग मुलांना शिकवतो किंवा त्यांची काळजी घेतो) किंवा तुम्ही बँकिंग क्षेत्रात, विशेषत: रोख व्यवहारांमध्ये असाल तर, हा आठवडा त्यांच्यासाठी चांगले परिणाम आणेल. तुमच्या कामाबद्दल अधिकारी आणि वरिष्ठांकडून तुम्हाला पूर्ण कौतुक मिळेल.
आरोग्य- आरोग्याच्या दृष्टीने, हा सप्ताह तुमच्यासाठी अनुकूल नसण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला UTI, त्वचेशी संबंधित समस्या, ऍलर्जी यांसारख्या समस्यांनी घेरले जाऊ शकते, त्यामुळे तुम्हाला स्वच्छ राहण्याचा आणि तुमचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
उपाय- घरात सफेद फूल लावा आणि त्याची काळजी घ्या.
मूलांक 6
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे)
या सप्ताहात मूलांक 6 चे जातक अधिक उत्साही वाटतील आणि इतरांना मदत करण्यात तुम्ही पुढे असाल. या सोबतच, तुमचे प्रेम जीवन देखील अधिक आनंददायक असेल, जरी इतर कामांमध्ये आणि लोकांमध्ये अडकून तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष कराल अशी शक्यता आहे.
प्रेम जीवन- मूलांक 6 चे जातक जे गंभीर नात्यात आहेत त्यांना या आठवड्यात त्यांच्या जोडीदारासोबत अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागेल आणि परिणामी तुमचे नाते अधिक घट्ट होईल. जर तुम्ही तुमच्या नात्याबद्दल गंभीर नसाल तर, या आठवड्यात तुमच्या प्रेमात खंड पडण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा आठवडा प्रेमी युगुलांसाठी आव्हानात्मक असेल.
शिक्षण- या आठवड्यात मूलांक 6 च्या जातकांनी अभ्यासात जास्तीत जास्त लक्ष देणे आवश्यक आहे कारण, तुम्हाला अधिक दबाव जाणवण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला काही विषय समजून घेण्यात अडचण येऊ शकते परंतु, या काळात तुम्हाला तुमच्या गुरू आणि आईचे पूर्ण सहकार्य मिळेल.
पेशावर जीवन- मूलांक 6 च्या जातकांसाठी व्यावसायिक जीवनाच्या दृष्टीने हा आठवडा खूप चांगला जाणार आहे. भूतकाळातील तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला आर्थिक बाबतीत मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही महिलांच्या उत्पादनांचा व्यवसाय करत असाल तर, हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी ठरण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, या काळात, एनजीओमध्ये काम करणा-या लोकांना त्यांच्या कामासाठी खूप सन्मान आणि मान्यता मिळेल.
आरोग्य- या आठवड्यात तुमच्यासाठी आरोग्याशी संबंधित कोणत्या ही मोठ्या समस्यांचे संकेत नाहीत, जरी भावनिक बदलांमुळे तुमची ऊर्जा पातळी कमी होऊ शकते. या कारणास्तव, तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय- नकारात्मकता कमी करण्यासाठी नियमित संध्याकाळी घरात कपूर लावा.
मूलांक 7
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला झालेला आहे)
या सप्ताहात, मूलांक 7 च्या जातकांना भावनिक पातळीवर काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. एखाद्या व्यक्ती समोर तुमचे शब्द उघडे ठेवण्यात तुम्हाला अडचण येऊ शकते कारण, तुम्ही स्वतः काही गोष्टींबद्दल गोंधळलेले असाल म्हणूनच, तुम्हाला ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे विचार स्पष्ट करू शकतात.
प्रेम जीवन- तुमच्या प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास हा सप्ताह तुमच्यासाठी सामान्य असेल. तुमच्या प्रेम जीवनात कोणता ही मोठा बदल होणार नाही तथापि, तुम्हाला तुमच्या बोलण्यावर संयम ठेवण्याचा आणि अहंकारावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
शिक्षण- मूलांक 7 च्या जातकांसाठी हा सप्ताह शैक्षणिक दृष्टीने चांगला जाण्याची शक्यता आहे. अभ्यासात तुमची एकाग्रता वाढेल आणि तुम्हाला तुमच्या शिक्षकांचे ही पूर्ण सहकार्य मिळेल.
व्यावसायिक जीवन- मूलांक 7 च्या जातकांच्या व्यावसायिक जीवनाबद्दल, गृहविज्ञान, मानवाधिकार कार्यकर्ते, होमिओपॅथी, नर्सिंग, आहारतज्ञ यासारख्या क्षेत्रांबद्दल बोलणे ज्यामध्ये तुम्ही लोकांना मदत करता आणि त्यांची काळजी घेता. अशा लोकांसाठी हा सप्ताह चांगला परिणाम देईल.
आरोग्य- या सप्ताहात मूलांक 7 च्या जातकांच्या तब्येतीत कोणता ही मोठा बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल.
उपाय- नियमित 10 मिनिटे चंद्राच्या प्रकाशात ध्यान करा.
मूलांक 8
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झालेला आहे)
मूलांक 8 च्या जातकांसाठी हा सप्ताह आनंदाने भरलेला असेल. तुमचे कौटुंबिक जीवन अद्भुत असेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या घराचे नूतनीकरण किंवा चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च करू शकता. मूलांक 8 चे जातक यावेळी पार्टीची योजना आखू शकतात किंवा बरेच पाहुणे तुमच्या घरी येऊ शकतात.
प्रेम जीवन- प्रेम जीवनाच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी योग्य ठरेल. तुमच्या नात्यात रोमांस वाढेल आणि तुम्ही दोघे ही मनमोकळेपणाने व्यक्त होऊ शकाल. या सोबतच तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला ही प्रपोज करू शकता. तथापि, विवाहित जातकांना त्यांच्या जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
शिक्षण- मूलांक 8 च्या जातकांना या आठवड्यात शिक्षणाच्या बाबतीत आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला तुमच्या अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील कारण, काही कारणांमुळे तुमची एकाग्रता बिघडण्याची शक्यता आहे.
व्यावसायिक जीवन- मूलांक 8 च्या जातकांना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण मिळेल आणि तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून मदत आणि समर्थन मिळत राहील. जर तुम्ही व्यावसायिक क्षेत्रात असाल तर, हा कालावधी तुम्हाला उत्कृष्ट परिणाम देईल कारण तुम्हाला फायदेशीर सौदे सहज मिळू शकतील.
आरोग्य- मूलांक 8 च्या जातकांना या आठवड्यात आरोग्य क्षेत्रात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या काळात तुम्हाला तणाव किंवा पॅनीक अटॅक येण्याची शक्यता असते. त्याच बरोबर महिलांना हार्मोन्सशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
उपाय- घरातून निघण्याच्या आधी आपल्या आईचा आशीर्वाद घ्या आणि त्यानंतरच घरातून बाहेर जा.
मिळवा आपल्या कुंडलीच्या आधारित सटीक शनि रिपोर्ट
मूलांक 9
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झालेला आहे)
या आठवड्यात सर्व लोकांचे लक्ष मूलांक 9 च्या जातकांवर असेल. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुमच्या सभोवतालचे प्रत्येकजण तुमच्याकडे अधिक लक्ष देईल. या कारणास्तव, तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो कारण, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज होऊ शकता. परिणामी, तुमची प्रतिमा कलंकित होण्याची शक्यता आहे आणि त्याचा तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनावर परिणाम होईल.
प्रेम जीवन- मूलांक 9 च्या प्रेमींसाठी हा सप्ताह फारसा अनुकूल असेल अशी अपेक्षा नाही. तुमच्या दोघांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल किंवा विचारसरणीच्या फरकावरून वाद होऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा दृष्टिकोन समजून घेण्याचा सल्ला देण्यात येतो जेणेकरून, तुमचे नाते सुरळीत चालेल.
शिक्षण- जर तुम्ही कला, मानवता, भाषा, कविता, कथा या क्षेत्रात असाल तर, हा आठवडा तुमच्यासाठी चांगले परिणाम देईल. एकंदरीत, सर्जनशील आणि लेखन करणार्यांसाठी हा काळ चांगला राहील आणि तुम्ही तुमचे विचार मोकळेपणाने लोकांसमोर मांडू शकाल.
व्यावसायिक जीवन- तुमच्या व्यावसायिक जीवनात गोष्टी सुधारतील आणि तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण करू शकाल. तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर, तुम्हाला चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जर तुम्ही प्रॉपर्टीच्या व्यवसायाशी संबंधित असाल तर, तुम्ही नक्कीच पैसे कमवू शकाल.
आरोग्य- आरोग्याच्या दृष्टीने, हा आठवडा तुमच्यासाठी सामान्य राहण्याची अपेक्षा आहे, तुम्हाला कोणत्या ही मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार नाही असे संकेत आहेत. तथापि, भावनिक कारणांमुळे तुमच्या उर्जेमध्ये चढ-उतार होण्याची शक्यता आहे म्हणून, तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय- लहान कन्यांना सफेद रंगाची मिठाई खाऊ घाला.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!