अंक ज्योतिष - Numerology In Marathi (16 जुलै - 22 जुलै, 2023)
अंक ज्योतिष साप्ताहिक राशिभविष्य जाणून घेण्यासाठी अंक ज्योतिष मूलांकाचे अधिक महत्व आहे. मूलांक जातकाच्या जीवनाचे महत्वपूर्ण अंक मानले गेले आहे. तुमचा जन्म महिन्याच्या कुठल्या ही तारखेला झालेला आहे, त्याची बेरीज करून जो एक अंक प्राप्त होतो तो तुमचा मूलांक असतो. मूलांक 1 ते 9 अंकांच्या मधील कुठला ही अंक असू शकतो. उदाहरणार्थ- तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 10 तारखेला झालेला आहे तर, तुमचा मूलांक 1+0 म्हणजे 1 असेल.
अश्या प्रकारे कुठल्या ही महिन्याच्या 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत जन्म घेतलेल्या लोकांसाठी 1 ते 9 पर्यंतच्या मूलांकाची गणना केली जाते. अश्या प्रकारे सर्व जातक आपले मूलांक जाणून त्याच्या आधारावर साप्ताहिक राशिभविष्य जाणून घेऊ शकतात.
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
आपल्या जन्म तिथीने जाणून घ्या साप्ताहिक अंक राशि भविष्य (16 जुलै - 22 जुलै, 2023)
अंक ज्योतिषाचा आपल्या जीवनावर सरळ प्रभाव पडतो कारण, सर्व अंकांचा आपल्या जन्म तारखेसोबत संबंध असतो. खाली दिल्या गेलेल्या लेखात आम्ही सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जन्म तिथीच्या हिशोबाने त्याचा एक मूलांक निर्धारित असतो आणि हे सर्व अंक वेगवेगळ्या ग्रहांच्या द्वारे शासित असतात.
जसे की, मूलांक 1 वर सूर्य देवाचे अधिपत्य असते. चंद्रमा मूलांक 2 चा स्वामी आहे. अंक 3 ला देव गुरु बृहस्पतीचे स्वामित्व प्राप्त आहे, राहू अंक 4 चा राजा आहे. अंक 5 बुध ग्रहाच्या अधीन आहे. 6 अंकाचा राजा शुक्र देव आहेआणि 7 अंक केतू ग्रहाचा आहे. शनिदेवाला अंक 8 चा स्वामी मानले गेले आहे. अंक 9 मंगळ देवाचा अंक आहे आणि याच ग्रहाच्या परिवर्तनाने जातकाच्या जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन होतात.
250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!
मूलांक 1
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झालेला आहे)
या सप्ताहात मूलांक 1 च्या जातकांना वेगवेगळ्या कामांमध्ये व्यत्यय आणि कठीण समस्यांचा सामना करावा लागेल. या सप्ताहात काही उत्तम परिणाम मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करण्याची आवश्यकता करावी लागेल.
मूलांक 1 च्या लोकांसाठी या सप्ताहात नियमित कामे पूर्ण करण्यात समस्या होईल. महत्वपूर्ण निर्णय घेतांना तुम्हाला समस्या वाटेल किंवा तुमच्या मनात असुरक्षा भावना राहील. राजकारणाच्या क्षेत्राने जोडलेल्या लोकांसाठी ही वेळ उत्तम नाही, यश मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक धैर्य ठेवण्याची आवश्यकता आहे. तुमचे मन नियमित च्या कामात लागणार नाही आणि मन विचल राहील.
प्रेम जीवन: या सप्ताहात जीवनसाथी सोबत गैरसमज निर्माण होण्याची आणि परस्पर सामंजस्याचा कमीमुळे नात्यात कटुता येऊ शकते. या कारणाने तुम्हाला घरात सुख आणि शांतीचा अनुभव होणार नाही. प्रेम जीवनात शांतता कायम ठेवण्याला तुम्ही काही अधिक विचार करायला लागाल. जीवनसाथी सोबत नात्याला सुधारण्याचा प्रयत्न करा.
शिक्षण: या सप्ताहात एकाग्रतेच्या कामाच्या कारणाने शिक्षणात समस्या येतील. ते आपल्या साथींच्या थोडे मागे राहतील. याच्या व्यतिरिक्त, आता पर्यंत जे काही शिक्षण घेतले आहे ते लक्षात ठेवण्यात समस्या येतील. सध्या तुम्ही आपल्या शिक्षणाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जर तुम्ही कायदा, भौतिक किंवा रसायन शास्त्राचे शिक्षण घेत आहे तर, तुम्हाला अधिकात लक्ष देऊन शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे.
व्यावसायिक जीवन: या सप्ताहात कार्यक्षेत्रात सहकर्मी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तुमचे संबंध बिघडू शकतात. यामुळे तुमचे व्यावसायिक जीवन प्रभावित होईल. या व्यतिरिक्त, तुमच्या जवळ काही कठीण काम ही येऊ शकते ज्याला तुम्ही वेळेत पूर्ण करू शकणार नाही. व्यापाऱ्यांसाठी नुकसानाचे योग बनलेले आहे. तुम्हाला या वेळी सांभाळून चालण्याची आवश्यकता आहे.
स्वास्थ्य: या सप्ताहात तुम्हाला ऊर्जा आणि उत्साहात कमी वाटू शकते. या कारणाने आरोग्य खराब होतांना दिसेल. तुम्हाला डोकेदुखी होण्याची ही शक्यता आहे. यामुळे तुम्ही आपली कामे वेळेत पूर्ण करू शकणार नाही.
उपाय: नियमित 108 वेळा 'ॐ भास्कराय नम:' चा जप करा.
मूलांक 2
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झालेला आहे)
मूलांक 2 च्या लोकांना निर्णय घेण्यात समस्यांचा सामना करावा लागेल आणि हे तुमच्या पुढच्या मार्गात ही बाधा उत्पन्न करेल. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला या सप्ताहात काही योजना बनवण्याची आवश्यकता आहे. तुम्ही या सप्ताहात मित्रांपासून दूर राहिलेलेच चांगले असेल अथवा तुमच्या पुढे समस्या उत्पन्न होऊ शकतात. या व्यतिरिक्त, दूरच्या यात्रा करणे टाळा.
प्रेम जीवन: तुमच्या जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी कोणत्या ही प्रकारे मतभेद टाळावे लागतील. या सप्ताहात तुमच्या प्रेम जीवनात रोमांस, प्रेम आणि शांतता आणण्यासाठी तुम्हाला काही तडजोड करावी लागेल. नाते सुधारण्यासाठी तुम्ही दोघे ही आरामात बसून एकमेकांशी बोलू शकता.
शिक्षण: या सप्ताहात मूलांक 2 चे विद्यार्थी विचलित होऊ शकतात. एकाग्रतेने अभ्यास करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी पूर्ण मेहनत आणि झोकून देऊन अभ्यास करावा. यावेळी विद्यार्थ्यांनी तर्काचा वापर करणे आवश्यक आहे. तुमचा अभ्यास आणि विषयांचे नियोजन केल्यास तुम्हाला फायदा होईल.
व्यावसायिक जीवन: नोकरदार जातकांना कामात काही उणिवा किंवा विसंगती असू शकतात. यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी पुढे जाणे कठीण होईल. तुमच्या सहकाऱ्यांच्या पुढे जाण्यासाठी तुम्हाला या सप्ताहात अधिक मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील. प्रतिस्पर्ध्यांच्या दबावामुळे व्यावसायिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
स्वास्थ्य: जर आपणास आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर, मूलांक 2 च्या जातकांना खोकल्याची भीती असेल. तुमचे शारीरिक आरोग्य गांभीर्याने घेणे सुरू करा. तुम्हाला चांगली झोप घेण्यास देखील त्रास होऊ शकतो.
उपाय: सोमवारी चंद्रासाठी यज्ञ हवन करा.
करिअरचे आहे टेंशन! आत्ताच ऑर्डर करा कॉग्निएस्ट्रो रिपोर्ट
मूलांक 3
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झालेला आहे)
मूलांक 3 चे जातक या सप्ताहात दृढनिश्चयी दिसतील आणि यामुळे ते कठीण आव्हानांवर मात करण्यात यशस्वी होतील. मोठी गुंतवणूक आणि व्यवहार यासारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा सप्ताह चांगला राहील. या सप्ताहात तुम्ही तुमचे कार्यक्षेत्र देखील वाढवू शकता. धार्मिक कारणास्तव दूरचे प्रवास होण्याची शक्यता आहे.
प्रेम जीवन: जीवनसाथी सोबतच्या नात्यात आनंद आणि प्रेम मिळेल. तुमच्या दोघांमधील नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल आणि तुम्ही आनंदी प्रेम जीवनाचे उदाहरण ठेवाल. या सप्ताहात तुम्ही धार्मिक प्रवासाला जाऊ शकता आणि या प्रवासातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल आणि तुमच्या जीवनशैलीत महत्त्वपूर्ण बदल घडतील. तुमच्या जोडीदारासोबत परस्पर समंजसपणा आणि समन्वयाने तुम्ही प्रेम जीवनात रोमान्सचा आनंद घ्याल.
शिक्षण: विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह चांगला राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली कामगिरी करता येईल. आर्थिक लेखा आणि व्यवसाय व्यवस्थापन यांसारख्या अभ्यासक्रमांमध्ये रस वाढू शकतो. यावेळी तुम्ही या विषयांमध्ये चांगले गुण मिळवू शकाल. तुम्ही तुमची क्षमता ओळखू शकाल.
व्यावसायिक जीवन: या सप्ताहात तुम्ही तुमचे काम अधिक चांगल्या पद्धतीने करू शकाल. पगार वाढल्याने तुमची प्रगती ही होऊ शकते. एकंदरीत तुमच्यासाठी लाभाची वेळ आहे. या सप्ताहात तुमच्या मेहनतीची आणि कौशल्याची ओळख होईल. त्याच बरोबर व्यापाऱ्यांना ही नफा मिळण्याची शक्यता आहे. अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्ध्यांशी टक्कर देऊ शकाल.
स्वास्थ्य: या सप्ताहात तुमची ऊर्जा वाढेल. तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त सकारात्मक वाटेल आणि यामुळे तुमचा उत्साह द्विगुणित होईल. यामुळे तुमचे आरोग्य ही चांगले राहील.
उपाय : नियमित 108 वेळा ॐ गुरुवे नम:' चा जप करा.
मूलांक 4
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झालेला आहे)
मूलांक 4 च्या जातकांसाठी या सप्ताहात योजना आखणे आवश्यक आहे. या सप्ताहात तुम्ही थोडे तणावात रहाल. महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्हाला संभ्रम वाटेल. यामुळे, तुम्ही तुमचे काम एकाग्रतेने करणे आवश्यक आहे जेणेकरून, तुमच्याकडून कोणती ही चूक होणार नाही. या सप्ताहात लांबचा प्रवास टाळा अन्यथा, तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
प्रेम जीवन: या सप्ताहात तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी संबंध दृढ करण्यात अडचणी येतील. तुमच्या जोडीदारासोबतचे नाते सुधारणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत हँग आऊट करण्याचा किंवा सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर, ते काही काळासाठी पुढे ढकला.
शिक्षण: विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह फारसा चांगला जाणार नाही. तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील. व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि वेब डिझायनिंगचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही अधिक मेहनत आणि लक्ष देण्याची गरज आहे. यावेळी विद्यार्थ्यांना नियोजनाचा फायदा होण्याची शक्यता आहे. अभ्यास करताना तुमचे लक्ष विचलित होऊ शकते परंतु, तुम्हाला तुमची ही सवय नियंत्रणात ठेवावी लागेल.
व्यावसायिक जीवन: या सप्ताहात तुम्हाला नोकरीबाबत दबाव जाणवेल. तुमच्या कामाची कार्यक्षमता प्रभावित होत आहे किंवा कमी होत आहे असे तुम्हाला वाटेल. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे काम नियोजनबद्ध पद्धतीने केले पाहिजे. व्यावसायिकांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागेल आणि त्यात तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
स्वास्थ्य: आरोग्य राखण्यासाठी वेळेवर खाणे आवश्यक आहे अन्यथा, पचनाच्या समस्या होण्याची भीती आहे. यामुळे तुमची ऊर्जा ही कमी होईल. जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळा. निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी प्या.
उपाय: नियमित दुर्गा चालिसाचा पाठ करा.
मूलांक 5
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झालेला आहे)
मूलांक 5 असलेल्या जातकांसाठी या सप्ताहात जवळ-जवळ प्रत्येक बाबतीत नकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास डळमळू लागेल आणि यामुळे तुमच्या विकासाचा मार्ग ही अडेल. महत्त्वाचा किंवा मोठा निर्णय घेण्यासाठी ही वेळ अजिबात नाही.
प्रेम जीवन: प्रेम जीवनात उणीव जाणवेल. कौटुंबिक समस्या आणि परस्पर समंजसपणाचा अभाव यामुळे जोडीदारासोबतचे नाते बिघडेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी कमी संबंध जाणवेल, ज्यामुळे तुमच्या वैवाहिक नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होईल. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी, आपण काही समायोजन करणे आवश्यक आहे. या उपायाने तुमच्या प्रेम जीवनात पुन्हा आनंद येईल.
शिक्षण: अभियांत्रिकी आणि सॉफ्टवेअरचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कार्यक्षमतेत आणि कौशल्य क्षमतेत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. यावेळी, तुमची कामगिरी सुधारणे आणि पुढे जाणे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.
व्यावसायिक जीवन: सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरे जावे लागेल. यामुळे, तुम्ही तुमची क्षमता आणि कौशल्ये दाखवण्यात अक्षम असाल. व्यावसायिकांची कामगिरी ही कमजोर राहील आणि तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे नफा मिळू शकणार नाही.
आरोग्य: या सप्ताहात तणावामुळे तुम्हाला पाठ आणि पाय दुखतील. अशा वेळी तणाव आणि चिंता यापासून स्वतःला दूर ठेवणे चांगले. निरोगी राहण्यासाठी ध्यान आणि योगाची मदत घ्या.
उपाय : दिवसात 41 वेळा 'ॐ नमो नारायण' चा जप करा.
मूलांक 6
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे)
यावेळी, मूलांक 6 च्या जातकांची अंतर्गत शक्ती आणि क्षमता त्याच्या शिखरावर असेल. यामुळे तुमची सर्जनशीलता देखील वाढेल आणि तुम्हाला पुढे जाण्यास मदत होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या बुद्धिमत्तेचे तुम्हाला प्रतिफळ मिळेल. या सप्ताहात तुमच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत. यामुळे तुम्हाला उर्जेने परिपूर्ण वाटेल.
प्रेम जीवन: प्रियकर किंवा जोडीदारासोबत परस्पर समंजसपणा आणि प्रेम वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्हा दोघांचा विचार एका दिशेने असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी जाण्याचा प्लॅन कराल. हा प्रवास तुम्हा दोघांसाठी आनंददायी असेल.
शिक्षण: या सप्ताहात तुम्ही उच्च शिक्षणासाठी स्वतःला तयार कराल आणि कोणत्या ही स्पर्धात्मक परीक्षेत बसण्याची अपेक्षा आहे. यावेळी तुम्ही तुमची क्षमता आणि वेगळी ओळख घेऊन पुढे जाऊ शकाल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याची ही संधी तुमच्यासाठी शुभ सिद्ध होईल.
व्यावसायिक जीवन: या सप्ताहात तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला परदेशात जाण्याची संधी देखील मिळेल, जी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. व्यापारी ही आपले काम पुढे नेतील. त्यांना अधिक नफा कमावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी व्यापाऱ्यांची ही स्थिती चांगली असेल.
आरोग्य: यावेळी आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही उर्जेने परिपूर्ण वाटाल. त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर ही होईल. तुमचे धैर्य वाढेल आणि तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक उत्साही दिसाल.
उपाय : दिवसातून 33 वेळा 'ॐ भैरवाय नम:' चा जप करा.
मूलांक 7
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला झालेला आहे)
या सप्ताहात मूलांक 7 च्या जातकांना त्यांच्या कामात अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. तुमचे काम तुमचे लक्ष विचलित करू शकते, ज्याचा परिणाम तुमच्यासाठी अजिबात चांगला होणार नाही. अध्यात्मिक कार्यात तुमची आवड या आठवड्यात वाढेल. यावेळी तुम्हाला नियोजन करून काम करावे लागेल. आव्हाने आणि अडचणींना तोंड देण्यासाठी तुम्ही अध्यात्माची मदत घेऊ शकता.
प्रेम जीवन: तुम्हाला तुमच्या जीवनसाथी सोबत सामंजस्य करणे आवश्यक आहे. नात्यातील प्रेम टिकवण्यासाठी तुम्ही हे प्रयत्न केले पाहिजेत. या सप्ताहात तुमच्या दोघांमध्ये अनावश्यक तेढ आणि वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. यामुळे तुमच्या नात्यातील प्रेम आणि आनंद कमी होऊ शकतो. प्रेमाच्या नात्यात आनंद आणि प्रेम टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला शांतता आणि संयमाने काम करावे लागेल.
शिक्षण: विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता कमी होईल आणि त्यामुळे ते शिक्षणात चांगली कामगिरी करू शकणार नाहीत. स्पर्धात्मक परीक्षांसाठी ही हा सप्ताह चांगला नाही.
व्यावसायिक जीवन: वरिष्ठ अधिकार्यांशी बोलताना अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे, नाहीतर तुमचा त्यांच्याशी वाद होऊ शकतो. तुमच्या कामाच्या गुणवत्तेवर तुमचे वरिष्ठ प्रश्न करतील. यामुळे तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते परंतु, तुम्हाला ही बाब गांभीर्याने घ्यावी लागेल. तुमच्या चुका आणि उणिवा सुधारण्याचा प्रयत्न करा. व्यापार्यांनी नफ्याचा विचार करताना थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे कारण कधी-कधी परिस्थिती त्यांच्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.
आरोग्य: वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल. मूलांक 7 च्या जातकाचा रस्ता अपघात होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत बेफिकीर राहणे टाळावे लागेल. पोटदुखीमुळे रोगप्रतिकारशक्ती कमजोर राहील.
उपाय : नियमित 41 वेळा 'ॐ गणेशाय नम:' चा जप करा.
मूलांक 8
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झालेला आहे)
मूलांक 8 च्या जातकांसाठी हा सप्ताह आपले धैर्य हरवू शकते आणि यशाच्या मार्गात ही तुम्ही मागे जाण्याची शक्यता आहे. या सप्ताहात यात्रेवेळी तुम्ही महाग गोष्ट हरवण्याची शक्यता आहे आणि यामुळे तुम्हाला चिंता राहील. चांगले असेल की, या काळात तुम्ही यात्रा करतांना सावधान राहा आणि योजना बनवून काम करा. तुमच्या अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल आणि तुम्ही धार्मिक यात्रेवर जाण्याची योजना बनवण्यावर काम कराल.
प्रेम जीवन: कौटुंबिक समस्यांचा कारणाने जीवनसाथी आणि त्यांच्या मध्ये दुरी वाढतांना दिसेल. या कारणाने तुमच्या नात्यात कमी होईल आणि तुम्हाला वाटेल जसे तुम्ही सर्व हरवून दिले आहे. यासाठी उत्तम असेल की, तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत नात्यात प्रेम वाढवा आणि सर्व काही ठीक करण्यावर काम करा.
शिक्षण: या काळात तुम्ही आशावादी राहाल आणि हीच अपेक्षा तुमची ताकद बनेल. या सप्ताहात तुम्ही स्पर्धा परीक्षेत भाग घ्याल परंतु, तुम्हाला काही कठीण समस्यांचा सामना करावा लागेल. उत्तम गुण मिळवण्यासाठी तुम्हाला आधीपासून कठीण मेहनत करावी लागेल आणि उत्तम तयारी करावी लागेल.
व्यावसायिक जीवन: असंतृष्टीच्या कारणाने तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार कराल आणि हा विचार तुमच्या चिंतेचे कारण राहणार आहे. कधी-कधी तुम्ही कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन करण्यात विफल व्हाल आणि याचा प्रभाव तुमच्या कामाच्या गुणवत्तेवर ही पडेल. व्यापाऱ्यांकडून नफा कमावण्यात ही समस्यांचा सामना करावा लागेल. खूप कमी गुंतवणुकीमध्ये व्यापार करण्यात नुकसान होण्याची ही शक्यता आहे.
स्वास्थ्य: या सप्ताहात तुम्हाला तणावाच्या कारणाने पायदुखी होऊ शकते. स्वस्थ राहण्यासाठी योग आणि व्यायाम करा.
उपाय : नियमित 11 वेळा 'ॐ हनुमते नम:' चा जप करा.
मूलांक 9
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झालेला आहे)
या सप्ताहात मूलांक 9 चे जातक असंतुलित स्थितीमध्ये आहेत आणि परिस्थिती तुमच्या पक्षात राहील. तुमच्या जीवनात आनंदाचा बहर होईल. मूलांक 9 चे जातक आपल्या जीवनासाठी काही नवीन निर्णय घेऊ शकतात. या बदलला घेऊन तुमच्या मनात काही भीती राहणार नाही. तुम्हाला या सप्ताहात यात्रेवर जाण्याची संधी मिळेल जे तुमच्यासाठी फलदायी सिद्ध होईल.
प्रेम जीवन: जीवनसाथी सोबत तुमचे संबंध शांतीपूर्ण आणि प्रेमपूर्ण राहतील. प्रेम संबंधात ही प्रेम आणि आनंद वाढेल. आपल्या प्रेम ला मिळवून तुम्ही नशीबवान समजाल. विवाहित लोकांना ही आपल्या जीवनसाथी सोबत काही आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल.
शिक्षण: हा सप्ताह विद्यर्थ्यांसाठी उत्तम राहणार आहे. तुम्ही परीक्षेत उत्तम गुण मिळवाल. इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, रसायन विज्ञान सारख्या क्षेत्रात तुम्हाला पुढे जाण्यात यश मिळेल. या वेळी विद्यार्थी आपली उत्तम ओळख बनवतील.
व्यासायिक जीवन : 9 मूलांक लोकांसाठी हा सप्ताह नोकरीसाठी नवीन संधी घेऊन येईल. जर तुम्ही सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत तर, तुम्हाला या वेळी उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे.
स्वास्थ्य: या सप्ताहात तुम्हाला आपल्या आरोग्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही,. तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल आणि तुमच्या आत्मविश्वासात ही वृद्धी होईल. या सप्ताहात तुम्हाला कुठली ही स्वास्थ्य समस्या त्रास देणार नाही.
उपाय: नियमित 27 वेळा 'ॐ भौमाय नम:' चा जप करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!