सूर्य ग्रहण 2022 - Surya Grahan 2022 In Marathi
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणांना विशेष मान्यता देण्यात आली आहे. जर हे सूर्यग्रहण असेल तर त्याचे महत्त्व आणखी वाढते कारण, सूर्य हा जगाचा कारक, जगाचा पिता आणि जगाचा आत्मा ही मानला जातो. अशा प्रकारे, सूर्यावरील ग्रहण हे जगाच्या प्रकाश जगाच्या उर्जेवर ग्रहण असल्यासारखे आहे आणि त्याचा परिणाम सर्व सजीवांवर होणे स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, 2022 मध्ये पहिले सूर्य ग्रहण कधी होणार आहे, त्याची वेळ काय असेल, कुठे दिसेल आणि त्या ग्रहणाचा तुमच्या राशीवर काय परिणाम होईल, ही सर्व माहिती प्राप्त करण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा.

2022 चे पहिले सूर्य ग्रहण
जर पंचांग च्या अनुसार, सूर्य ग्रहणाची गोष्ट केली तर, वर्ष 2022 चे पहिले सूर्य ग्रहण भारतीय वेळेनुसार, 30 एप्रिल, 2022 च्या रात्री (1 मे 2022 ला प्रातः) 00:15:19 पासून सुरु होऊन प्रातः काळी 04:07:56 वाजेपर्यंत राहील. एप्रिल महिन्यात लागणारे सूर्य ग्रहण 2022 आंशिक सूर्य ग्रहण असेल.
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
ज्योतिषशास्त्रानुसार, हे सूर्यग्रहण मेष राशी आणि भरणी नक्षत्रात घडेल. याच्या परिणामी, मेष आणि भरणी नक्षत्राच्या संबंधित जातकांसाठी विशेषतः प्रभावशाली राहील आणि अशा जातकांना अधिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हे वर्ष 2022 चे पहिले सूर्य ग्रहण असेल.
30 एप्रिल ला घडणारे सूर्य ग्रहण कुठे कुठे दिसेल
सूर्य ग्रहणाचे सूतक
30 एप्रिल 2022 रोजी पडणाऱ्या सूर्य ग्रहणाचे सुतक ग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधीपासून एक दिवस आधी सुरू होईल आणि ग्रहणाच्या समाप्तीसोबत संपेल. त्यामुळे या वेळेपासून सुतकाशी संबंधित सर्व नियम प्रभावी होतील आणि जर तुम्ही लहान मूल, वृद्ध किंवा आजारी नसाल तर सुतक दरम्यान खाणे, झोपणे इत्यादी करू नये आणि हा काळ देवाच्या भक्तीमध्ये घालवावा.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
ग्रहण आणि गर्भवती महिला
ज्या-ज्या क्षेत्रात सूर्य ग्रहण दिसेल तिथे गर्भवती महिलांना ग्रहण वेळी विशेषतः लक्षात ठेवले पाहिजे आणि ग्रहण काळात घेतली जाणारी काळजी घेतली पाहिजे शक्यतोवर, या सर्व खबरदारीकडे लक्ष देऊनच जगले पाहिजे.
असे मानले जाते की, या काळात सावधगिरी बाळगली नाही तर, त्याचे दुष्परिणाम गर्भवतीच्या मुलावर पडतात, त्यामुळे काही विशेष कामे आहेत, जी सूर्य ग्रहणाच्या काळात करू नयेत. या विशेष कामांमध्ये शिवणकाम, भरतकाम, कटिंग, विणकाम इत्यादी करू नयेत आणि या काळात घराबाहेर ही पडू नये. या काळात शक्यतो धार्मिक पुस्तके वाचावीत आणि झोपणे ही टाळावे.
सूर्य ग्रहणाच्या वेळी काय करावे आणि काय करू नये
सूर्यग्रहण काळात अशी काही कामे आहेत जी करू नयेत तर, काही शुभ कार्यासाठी हा काळ खूप चांगला आहे. आता जाणून घेऊया सूर्य ग्रहणाशी संबंधित काही खास गोष्टी:
अन्नं पक्वमिह त्याज्यं स्नानं सवसनं ग्रहे।
वारितक्रारनालादि तिलैदम्भौर्न दुष्यते।।
---(मन्वर्थ मुक्तावली)
सूर्य ग्रहणाच्या वेळी विविध भगवान सूर्याची आराधना विविध सूर्य स्रोतांद्वारे करावी आणि आदित्य हृदय स्तोत्र इत्यादींचे पठण केल्यास खूप चांगले फळ मिळते. शिजवलेले अन्न आणि चिरलेल्या भाज्या दूषित झाल्यामुळे त्या टाकून द्याव्यात. मात्र, तूप, तेल, दही, दूध, दही, लोणी, चीज, लोणची, चटणी, मुरंबा अशा वस्तूंमध्ये कुश ठेवल्यास ग्रहण काळात दूषित होत नाही. जर कोरडे अन्न असेल तर, त्यात कुशा ठेवण्याची गरज नाही.
स्पर्शे स्नानं जपं कुर्यान्मध्ये होमं सुरार्चनम।
मुच्यमाने सदा दानं विमुक्तौ स्नानमाचरेत।।
--- (ज्ये. नि.)
अर्थात, स्नान आणि जप ग्रहण काळाच्या सुरुवातीला आणि ग्रहणाच्या मध्यभागी होम म्हणजे यज्ञ आणि देवपूजा करणे चांगले असते. ग्रहण मोक्षाच्या वेळी दान करावे आणि ग्रहण मुक्तीनंतर स्नान करून पवित्र व्हावे.
नवीन वर्षात करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअॅस्ट्रो रिपोर्ट ने करा दूर!
चन्द्रग्रहे तथा रात्रौ स्नानं दानं प्रशस्यते।
मग चंद्र ग्रहण असो किंवा सूर्य ग्रहण रात्रीच्या वेळी स्नान करणे प्रशस्त मानले गेले आहे.
सूर्य ग्रहणाचे राशि भविष्य
हे सूर्यग्रहण भरणी नक्षत्रात मेष राशीत होत असल्याने ते विशेषतः मेष राशीच्या लोकांसाठी अधिक प्रभावी ठरेल आणि त्यांना मेष राशीच्या लोकांची विशेष काळजी घ्यावी लागेल. सूर्य ग्रहणाची कुंडली वेगवेगळ्या राशींसाठी हे सूर्यग्रहण कसे असेल हे जाणून घेण्यास मदत करेल:
मेष राशि
मेष राशीच्या जातकांसाठी हे ग्रहण पहिल्या भावात होणार आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा कारण, काही प्रकारचे शारीरिक अपघात होऊ शकतात. मानसिक तणाव तुमच्यावर वर्चस्व गाजवेल. हे टाळण्यासाठी दररोज ध्यान किंवा प्राणायाम आणि व्यायाम केला पाहिजे. तुमच्या शरीराकडे विशेष लक्ष द्या कारण, शारीरिक समस्या येण्याची शक्यता जास्तीत जास्त असेल.
वृषभ राशि
तुमच्या राशीच्या बाराव्या भावात सूर्य ग्रहण आकार घेईल, त्यामुळे हा काळ आर्थिक दृष्ट्या चढ-उतारांचा असेल. तुम्हाला धार्मिक कार्यात खर्च करण्याची संधी मिळेल आणि त्यांवर ही खर्च करावासा वाटेल. याद्वारे चांगल्या गोष्टींवर पैसे नक्कीच खर्च होतील. अवांछित प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रवासाला जाण्यापूर्वी, आपण चांगली तयारी करावी जेणेकरून कोणत्या ही प्रकारची गैरसोय टाळता येईल. शारीरिक समस्या टाळण्यासाठी दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे.
मिथुन राशि
तुमच्या राशीच्या एकादश भावात या ग्रहणाचा प्रभाव असल्याने हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. खूप दिवसांपासून अडकलेल्या इच्छा पूर्ण होतील ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल आणि तुम्ही तुमच्या मित्रांसोबत या वेळेचा पुरेपूर आनंद घ्याल. आर्थिकदृष्ट्या, हा काळ तुम्हाला यश देईल. तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण होतील. या सोबतच पैशाची गुंतवणूक ही फायदेशीर ठरेल. वैयक्तिक संबंधांमध्ये घनिष्टता येईल.
कर्क राशि
तुमच्या राशीच्या दहाव्या भावात सूर्य ग्रहणाचा प्रभाव राहील, त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे. व्यावसायिक करारांमध्ये तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला काही नवीन लोक भेटतील ज्यामुळे तुमचे व्यावसायिक संबंध मजबूत होतील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुमच्या कामगिरीमुळे यश मिळेल.
सिंह राशि
तुमच्या राशीपासून नवम भावात ग्रहणाचा प्रभाव असल्याने वडिलांच्या आरोग्यावर परिणाम होईल. त्यांच्याशी तुमचे संबंध बिघडू शकतात, त्यामुळे तुम्ही थोडी काळजी घ्यावी. बदनामी होण्याची ही शक्यता आहे, त्यामुळे कुठे ही गेले तरी विचारपूर्वक बोला आणि वर्तन संतुलित ठेवा. नशिबात काही कमतरता राहील, त्यामुळे केलेले काम बिघडू शकते. मुलांशी संबंधित समस्या देखील तुम्हाला चिंता करू शकतात. अनावश्यक चिंतांपासून दूर राहणे हितकारक ठरेल.
कन्या राशि
सूर्य ग्रहण तुमच्या राशीपासून आठव्या भावात असेल, त्यामुळे तुम्हाला शारीरिक समस्यांबाबत खूप काळजी घ्यावी लागेल कारण, या काळात शारीरिक समस्या येऊ शकतात. मानसिक तणावासोबत काही प्रकारचे अपघात ही घडू शकतात, त्यामुळे काळजी घ्या. या काळात आरोग्याची काळजी घ्या. जर तुम्ही अध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढवत असाल तर, हा काळ तुम्हाला खूप लाभ देईल. तुमच्या भौतिक सुखांमध्ये थोडीशी घट होईल आणि कुटुंबातील सदस्यांची चिंता तुम्हाला सतावू शकते.
तुळ राशि
तुमच्या राशीतून सप्तम भावात सूर्य ग्रहणाचा प्रभाव राहील, त्यामुळे वैवाहिक जीवनात चढ-उतारांची परिस्थिती वाढेल. जोडीदाराची तब्येत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जावे लागेल. व्यवसाय भागीदारीसाठी हा काळ थोडा कमजोर असेल. तुमच्या जोडीदार सोबतचे संबंध खराब होऊ शकतात. या काळात वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. कोणती ही नवीन गुंतवणूक विचारपूर्वक करणे चांगले राहील अन्यथा, फायद्याऐवजी तोटा होऊ शकतो. आपल्या भावंडांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि जीवनसाथीचे मन वळवण्याचा प्रयत्न करा कारण, जर ते रागावले असतील तर, या काळात तुमचे काम देखील लांबेल.
वृश्चिक राशि
तुमच्या राशीच्या सहाव्या भावात सूर्य ग्रहणाचा प्रभाव राहील, ज्यामुळे तुम्हाला या काळात चांगले परिणाम मिळतील. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि सध्या बेरोजगार असाल तर, तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते. जर तुम्ही आधीच नोकरी करत असाल आणि तुमची नोकरी बदलायची असेल तर, तुम्हाला नोकरी बदलण्यात यश मिळू शकते. या काळात तुमचे काम कमी होईल. तुम्ही कर्जाची परतफेड करू शकाल. तुमचे विरोधक शांत होतील आणि तुम्ही त्यांच्यावर विजय मिळवाल. यामुळे वेळेचा खर्च वाढेल आणि थोडा मानसिक ताण येईल पण असे असले तरी जीवनातील अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात तुम्हाला फायदा होईल.
धनु राशि
हे ग्रहण तुमच्या राशीतून पाचव्या भावात आकार घेईल, त्यामुळे तुम्ही मुलांबद्दल खूप चिंतेत असाल. त्यांचे आरोग्य आणि त्यांची कंपनी तुमच्यासाठी विशेष चिंतेचे कारण असेल. पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. खूप प्रयत्न केल्यावरच यश मिळेल. तब्येतीची काळजी घ्या आणि पोटाच्या आजारांपासून सावध राहा. या काळात सन्मानासाठी वाद करू नका अन्यथा, ते तुमच्या बदनामीचे कारण बनू शकते.
मकर राशि
तुमच्या राशीतून चतुर्थ भावात सूर्य ग्रहणाचा प्रभाव असल्याने कौटुंबिक सुखाचा अभाव वाढण्याची शक्यता आहे. या काळात, तुमचे तुमच्या आई सोबतचे नाते बिघडू शकते किंवा आरोग्याच्या कोणत्या ही समस्या तुमच्या सासूला त्रास देऊ शकतात. कौटुंबिक सुखाची कमतरता जाणवेल. घरगुती खर्चात वाढ होईल. तुम्हाला मानसिक अस्थिरता जाणवेल. मालमत्तेबद्दल काही तणाव असू शकतो आणि घरात शांतता आणि आनंदाचा अभाव असेल.
कुंभ राशि
हे सूर्य ग्रहण तुमच्या राशीतून तिसऱ्या भावात आकार घेईल, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांना, विशेषत: तुमच्या भावंडांना काही समस्या येण्याची शक्यता आहे. त्यांना त्यांच्या कामात विलंब आणि अडथळे देखील येऊ शकतात. त्यांच्या आरोग्यावर ही परिणाम होऊ शकतो. तुमची जोखीम घेण्याची प्रवृत्ती देखील कमी होईल. मित्रांसोबतचे संबंध बिघडू शकतात. तथापि, दुसरीकडे, तुम्हाला धन मिळण्याची शक्यता असेल. सरकारी क्षेत्राला ही फायदा होऊ शकतो. परदेशातून उत्पन्न मिळाल्याने तुमचा आनंद वाढेल. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांवर ग्रहणाचा प्रभाव चांगला राहील आणि त्यांना प्रमोशन मिळेल.
मीन राशि
तुमच्या राशीच्या दुसऱ्या भावात सूर्य ग्रहण होणार आहे, त्यामुळे तुमच्या कुटुंबात काही समस्या निर्माण होतील. कौटुंबिक सदस्यांमधील वाद वाढू शकतात. ज्यामुळे तुमच्या समोर समस्या देखील उद्भवू शकतात. आर्थिकदृष्ट्या, हा काळ थोडा कमजोर राहील. किरकोळ नुकसान होण्याची शक्यता आहे. धन बचत करण्यात अडचण येईल. बोलण्यात तिखटपणामुळे काम बिघडू शकते आणि स्वतःवर राग येऊ शकतो. या सर्वांकडे लक्ष द्या आणि खाण्यावर विशेष नियंत्रण ठेवा.
सूर्य ग्रहणाचे उपाय
साधारणपणे सूर्य ग्रहणाचा प्रभाव सुमारे सहा महिने प्रभावी राहतो. असे काही उपाय आहेत, ज्याचा अवलंब करून ते उपाय पूर्ण निष्ठेने केले तर सूर्य ग्रहणामुळे होणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. हे उपाय पुढीलप्रमाणे आहेत:
- मेष किंवा भरणी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांनी विशेषतः सूर्य आणि मंगळ ग्रहांच्या मंत्रांचा जप करावा.
- श्वेतार्कचे झाड लावा आणि त्याला नियमित पाणी द्यावे.
- या शिवाय ग्रहण काळात दान केले तर, त्याचा प्रभाव तुम्हाला नक्कीच मिळेल.
- जर तुमच्या कुंडलीत सूर्य ग्रह शुभ असेल तर, तुम्ही सूर्य अष्टक स्तोत्राचे पठण करावे.
- स्मृती निर्णयानुसार सूर्यग्रहण काळात सूर्य देवाच्या मंत्राचा जप करणे सर्वात फलदायी मानले जाते.
- वडिलांची नियमित सेवा करा आणि त्यांचा मनापासून आदर करा.
- ग्रहणाचा प्रभाव टाळण्यासाठी आदित्य हृदय स्तोत्राचा नियमित पाठ करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems

AstroSage on MobileAll Mobile Apps
- Janmashtami 2025: Date, Story, Puja Vidhi, & More!
- 79 Years of Independence: Reflecting On India’s Journey & Dreams Ahead!
- Sun Transit In Leo Blesses Some Zodiacs; Yours Made It To The List?
- Venus Nakshatra Transit Aug 2025: 3 Zodiacs Destined For Luck & Prosperity!
- Janmashtami 2025: Read & Check Out Date, Auspicious Yoga & More!
- Sun Transit Aug 2025: Golden Luck For Natives Of 3 Lucky Zodiac Signs!
- From Moon to Mars Mahadasha: India’s Astrological Shift in 2025
- Vish Yoga Explained: When Trail Of Free Thinking Is Held Captive!
- Kajari Teej 2025: Check Out The Remedies, Puja Vidhi, & More!
- Weekly Horoscope From 11 August To 17 August, 2025
- जन्माष्टमी 2025 कब है? जानें भगवान कृष्ण के जन्म का पावन समय और पूजन विधि
- भारत का 79वां स्वतंत्रता दिवस, जानें आने वाले समय में क्या होगी देश की तस्वीर!
- सूर्य का सिंह राशि में गोचर, इन राशि वालों की होगी चांदी ही चांदी!
- जन्माष्टमी 2025 पर बना दुर्लभ संयोग, इन राशियों पर बरसेगी श्रीकृष्ण की विशेष कृपा!
- अगस्त में इस दिन बन रहा है विष योग, ये राशि वाले रहें सावधान!
- कजरी तीज 2025 पर करें ये विशेष उपाय, मिलेगा अखंड सौभाग्य का वरदान
- अगस्त के इस सप्ताह मचेगी श्रीकृष्ण जन्माष्टमी की धूम, देखें व्रत-त्योहारों की संपूर्ण जानकारी!
- बुध कर्क राशि में मार्गी: इन राशियों को रहना होगा सावधान, तुरंत कर लें ये उपाय
- भाद्रपद माह 2025: त्योहारों के बीच खुलेंगे भाग्य के द्वार, जानें किस राशि के जातक का चमकेगा भाग्य!
- अंक ज्योतिष साप्ताहिक राशिफल: 10 से 16 अगस्त, 2025
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025