राम नवमी 2022 - Ram Navami 2022 In Marathi
चैत्र नवमी हा सनातन धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण आहे, ज्याला राम नवमी असे ही म्हणतात. हा दिवस भगवान विष्णूचा सातवा अवतार भगवान श्री राम यांचा जन्मदिवस म्हणून ही साजरा केला जातो. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांचा जन्म अयोध्येत चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथी ला राजा दशरथ आणि रघुकुल राणी कौशल्या यांच्या घरी झाला होता.
रामनवमी हा सण मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा केला जातो. या वेळी लोक उपवास करतात. भक्तिगीते गातात आणि भगवान रामासह नऊ कन्यांना हलवा, पुरी, खीर आणि फळ मिठाई इत्यादी अर्पण करतात. नऊ कन्यांना किंवा लहान कन्यांना देवी दुर्गेचे रूप मानले जाते. या दिवशी आपण देवी सिद्धिदात्री ची ही पूजा करतो.
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
राम नवमी 2022: मुहूर्त
भारतात दिनांक: रविवार, 10 एप्रिल, 2022
नवमी तिथी सुरु - 10 एप्रिल, 2022 ला दुपारी 01 वाजून 25 मिनिटांपासून
नवमी तिथी समाप्त- 11 एप्रिल, 2022 ला सकाळी 03 वाजून 17 मिनिटांपर्यंत
भगवान राम जन्म मुहूर्त- सकाळी 11:06 वाजेपासून दुपारी 01:39 वाजेपर्यंत
अवधी - 02 तास 33 मिनिटे
राम नवमी 2022: लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
- या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून गंगा नदीत स्नान करावे तथापि, जर हे शक्य नसेल तर आपल्या आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाका आणि त्या पाण्याने स्नान करा.
- या नंतर भगवान राम आणि देवी दुर्गेची पूजा करा. दुर्गा देवीची उपासना यासाठी कारण, भगवान रामाने देखील रणांगणात विजय मिळवण्यासाठी दुर्गा देवीची उपासना केली होती.
- इस दिन कन्याओं को भोजन कराएं और उन्हें फल और उपहार देकर विदा करें।
- या दिवशी कन्यांना भोजन द्या आणि त्यांना फळे आणि भेटवस्तू देऊन निरोप द्या.
- राम रक्षा स्त्रोत, राम मंत्र, आणि रामायण च्या बालकांडचा पाठ करा.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
राम नवमी 2022: धार्मिक कथा
रामायणातील धर्मग्रंथानुसार सांगितले जाते की, अयोध्येचा राजा दशरथ त्रेतायुगात कौसल्या, कैकयी आणि सुमित्रा या तीन पत्नींसोबत राहत होता. त्यांच्या शासन काळात अयोध्या अत्यंत समृद्धीच्या काळात पोहोचली होती. तथापि, सर्व समृद्धी असून ही, राजा दशरथाच्या जीवनात एक मोठे दुःख कायम होते. हे दुःख निपुत्रिक असण्याचे होते. राजा दशरथ यांना मूलबाळ नव्हते त्यामुळे रघुकुलात सिंहासनाचा कोणी ही उत्तराधिकारी नव्हता.
एके दिवशी त्यांनी वशिष्ठ ऋषींच्या सांगण्यावरून पुत्रकामेष्टी यज्ञ केला. हा यज्ञ परमपवित्र संत ऋषी ऋषिशृंग यांनी केला होता. या यज्ञाच्या परिणामी, अग्निदेव राजा दशरथासमोर प्रकट झाले आणि त्यांना दिव्य खीर/पायसमची एक वाटी दिली.
त्यांनी दशरथ राजाला खीर आपल्या तीन बायकांमध्ये वाटायला सांगितली. अशा स्थितीत राजा दशरथाने आदेशाचे पालन केले आणि अर्धी खीर आपली मोठी पत्नी कौशल्या हिला आणि अर्धी खीर दुसरी पत्नी कैकयी ला दिली. या दोन्ही राण्यांनी त्यांच्या खीरचा काही भाग राणी सुमित्रा ला ही दिला.
सांगितले जाते की, या नंतर हिंदू कॅलेंडर च्या चैत्र महिन्यात नवव्या दिवशी म्हणजे नवमी तिथी ला कौशल्याने रामाला, कैकयीने भरत आणि सुमित्राने लक्ष्मण आणि शत्रुघ्न का जन्म दिला. तेव्हापासून हा दिवस राम नवमी म्हणून साजरा करण्याची परंपरा जगभर मोठ्या उत्साहात सुरू झाली.
नवीन वर्षात करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअॅस्ट्रो रिपोर्ट ने करा दूर!
राम नवमी 2022: काय करावे आणि काय करू नये
- सूर्योदयाच्या आधी उठून गंगा नदीमध्ये स्नान करा. जर असे शक्य नसेल तर, अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकू शकतात. यामुळे तुमचे मागील जन्मातील सर्व पाप नक्कीच धुतले जातील.
- भगवान राम चा जन्म संस्कार करा.
- या दिवशी कन्यांना भोजन द्या आणि फळ आणि भेटवस्तू द्या.
- देवीला लाल ओढणी, लाल कपडे, श्रृंगाराचे साहित्य आणि हलवा पूरी सारख्या गोष्टी चढवा. यामुळे सौभाग्य प्राप्ती होते.
- घरातील मुख्य दरवाज्यावर आंब्याची पाने लावा.
- या दिवशी क्रोध आणि क्रूरतेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.
- दारू किंवा कुठल्या ही प्रकारचे तामसिक भोजन सेवन करू नका.
- घरात शांततेचे वातावरण ठेवा.
- या काळात ब्रह्मचर्य कायम ठेवणे खूप शुभ मानले जाते.
राम नवमी 2022 भगवान राम ला राशी अनुसार अर्पण करा प्रसाद
मेष राशि- भगवान राम आणि देवी दुर्गेला डाळिंब किंवा गुळाची मिठाई चा भोग लावा.
वृषभ राशि- सफेद रंगाचा रसगुल्ला भगवान राम आणि देवी दुर्गा ला अर्पण करा.
मिथुन राशि- भगवान राम आणि देवी दुर्गेला गोड पान अर्पित करा.
कर्क राशि- भगवान राम आणि देवी दुर्गा ला खीर चा भोग लावा.
सिंह राशि- भगवान राम आणि देवी दुर्गा ला मोती चूर चे लाडू किंवा बेल फळाचा भोग लावा.
कन्या राशि- भगवान राम आणि देवी दुर्गा ला हिरव्या रंगाचे फळ चढवा.
तुळ राशि- भगवान राम आणि देवी दुर्गेला काजू कतली मिठाई चा भोग लावा.
वृश्चिक राशि- भगवान राम आणि देवी दुर्गेला हलवा-पूरी चा भोग लावा.
धनु राशि- भगवान राम आणि देवी दुर्गेला बेसनचा हलवा किंवा मिठाई चा भोग लावा.
मकर राशि- भगवान राम आणि देवी दुर्गा ला सुक्या मेव्याचा भोग लावा.
कुंभ राशि- काळे द्राक्ष आणि चना-हलवा भगवान राम आणि देवी दुर्गा ला अर्पित करा.
मीन राशि- भगवान राम आणि देवी दुर्गा ला बेसनच्या लाडू चा भोग लावा.
चैत्र राम नवमी 2022: नवरात्र 2022 पारणाचैत्र नवरात्र पारणा तेव्हा केला जातो जेव्हा नवमी तिथी समाप्त होते आणि दशमी तिथी प्रबळ होते. जसे की, आपल्या शास्त्रात उल्लेखित आहे प्रतिपदा पासून नवमी तिथी पर्यंत चैत्र नवरात्रीचा उपवास केला गेला आहे आणि या दिशा निर्देशाचे पालन करण्यासाठी चैत्र नवरात्र उपवास पूर्ण नवमी तिथी पर्यंत केले जाणे अनिवार्य असते.
आता पारणा विषयी बोलायचे झाल्यास, चैत्र नवरात्र पारणा ची वेळ या वर्षी 11 एप्रिल, 2022 सकाळी 6:00 वाजेनंतर राहील.
अॅस्ट्रोसेज कडून आपणा सर्वांना राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा!
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2026
- राशिफल 2026
- Calendar 2026
- Holidays 2026
- Shubh Muhurat 2026
- Saturn Transit 2026
- Ketu Transit 2026
- Jupiter Transit In Cancer
- Education Horoscope 2026
- Rahu Transit 2026
- ராசி பலன் 2026
- राशि भविष्य 2026
- રાશિફળ 2026
- রাশিফল 2026 (Rashifol 2026)
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2026
- రాశిఫలాలు 2026
- രാശിഫലം 2026
- Astrology 2026






