ऑक्टोबर ओवरव्यू ब्लॉग - October Overview Blog In Marathi
येणाऱ्या नवीन महिन्याबद्दल आणि त्याबद्दल आधीच जाणून घेण्याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात नक्कीच असते. शेवटी येणारा नवा महिना आपल्यासाठी काही नवीन भेटवस्तू घेऊन येणार आहे का? या महिन्यात आपले आरोग्य चांगले राहील का? नोकरीत यश मिळेल का? व्यवसाय वाढेल का? कौटुंबिक जीवन कसे असेल? प्रेम जीवनात आपल्याला कोणते परिणाम मिळतील? वगैरे. असे अनेक प्रश्न आपल्या मनात सतत राहतात.

अशा परिस्थितीत, जर तुमचे हृदय आणि मन अशा प्रश्नांनी पछाडले असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात कारण, अॅस्ट्रोसेजच्या या खास ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला ऑक्टोबर महिन्याची खास झलक देत आहोत.
भविष्य से जुड़ी किसी भी समस्या का समाधान मिलेगा विद्वान ज्योतिषियों से बात करके
सर्वात पहिली गोष्ट की या ब्लॉग मध्ये काय आहे खास?
- ऑक्टोबर मध्ये कोणते महत्त्वाचे व्रत आणि सण होणार आहेत, याची माहिती आम्ही तुम्हाला या खास ब्लॉगच्या माध्यमातून देत आहोत.
- या सोबतच आम्ही तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत.
- या महिन्याच्या बँक सुट्टीचा संपूर्ण तपशील,
- ऑक्टोबर महिन्यातील ग्रहण आणि संक्रमणाची माहिती,
- आणि ऑक्टोबर महिना सर्व 12 राशींसाठी किती खास आणि अद्भूत असणार आहे याची झलक ही या ब्लॉगद्वारे तुम्हाला दिली जात आहे.
चला तर, मग विलंब न करता ऑक्टोबर महिन्यावर आधारित हा विशेष ब्लॉग सुरू करूया. सर्व प्रथम, ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काही खास गोष्टी जाणून घ्या.
ऑक्टोबर महिन्यात जन्म घेतलेल्या लोकांचे व्यक्तित्व
सर्वप्रथम ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलले असता, या महिन्यात जन्मलेले लोक अतिशय विचारपूर्वक बोलण्यासाठी ओळखले जातात, कोणत्या ही परिस्थितीत हुशारीने वागणे हा देखील त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग असतो. या सोबतच हे लोक जस-जसे वय वाढते तसतसे त्यांचे सौंदर्य खुलू लागते. यामुळेच त्यांची लोकप्रियता ही काळाबरोबर वाढत जाते. या शिवाय बुद्धिमत्ता आणि समंजसपणा हा देखील त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग आहे.
करिअर विषयी बोलायचे झाले तर, साधारणपणे असे दिसून येते की ऑक्टोबर मध्ये जन्मलेले लोक लेखक, फॅशन डिझायनिंग किंवा कला या क्षेत्रांशी संबंधित क्षेत्रात उत्तम करिअर करण्यात यशस्वी होतात.
शिस्तबद्ध जीवन जगणाऱ्या या महिन्यात जन्मलेल्या लोकांना त्यांच्या जीवनात सर्व सुखसोयी मिळतात, तुम्ही गर्दीत तुमची वेगळी ओळख निर्माण करता आणि त्याच बरोबर एक परिपूर्ण जीवनसाथी असल्याचे सिद्ध करतात.
गुणांनंतर अवगुणांविषयी बोलायचे झाल्यास, ऑक्टोबर मध्ये जन्मलेले लोक खूप व्यर्थ खर्च करतात आणि खर्च करण्यापूर्वी विचार करत नाहीत असे अनेकदा दिसून आले आहे. या सोबतच छोट्या-छोट्या गोष्टींवर नाखूष राहणे हा ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा दोष मानला जातो.
ऑक्टोबर मध्ये जन्म घेतलेल्या लोकांसाठी भाग्यशाली अंक: 6, 7, 8 आहे.
ऑक्टोबर मध्ये जन्म घेतलेल्या लोकांसाठी भाग्यशाली रंग: क्रीम, रोज पिंक, सिल्वर आहे.
ऑक्टोबर मध्ये जन्म घेतलेल्या लोकांसाठी भाग्यशाली दिवस: बुधवार, शुक्रवार, शनिवार आहे.
ऑक्टोबर मध्ये जन्म घेतलेल्या लोकांसाठी भाग्यशाली रत्न: सफेद नीलम, गुलाब क्वार्ट्ज आहे.
उपाय:
- आपल्या बेडरूम मध्ये चंदनाची अगरबत्ती लावा.
ऑक्टोबर महिन्यातील बँक सुट्ट्या
जर आपण वेगवेगळ्या राज्यांना जोडून बोललो तर, ऑक्टोबर महिन्यात एकूण 18 दिवस बँक सुट्ट्या असतील. तथापि, वेगवेगळ्या राज्यांनुसार, त्यांचे पालन त्या प्रदेशातील श्रद्धा आणि संस्कृतीवर अवलंबून असते. खाली आम्ही तुम्हाला महिन्यातील सर्व बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी देत आहोत.
दिवस | बँक सुट्या | कुठे केले जाईल पालन |
2 ऑक्टोबर 2022 | रविवार (साप्ताहिक सुट्टी) | |
3 ऑक्टोबर 2022 | दुर्गा पूजा (महा अष्टमी) | अगरतळा, भुवनेश्वर, गुवाहाटी, इंफाल, कलकत्ता, पटना, रांची मध्ये बँक बंद |
4 ऑक्टोबर 2022 | दुर्गा पूजा / दसरा (महा नवमी) / आयुध पूजा/ श्रीमांता शंकरदेवाचा जन्मोत्सव | अगरतळा, बेंगलोर, भुबनेश्वर, चेन्नई, गुवाहाटी, कानपुर,कोच्चि, कोलकाता, लखनऊ, पटना, रांची, शिलांग आणि तिरुवनंतपुरम मध्ये बँक बंद |
5 ऑक्टोबर 2022 | दुर्गा पूजा / दसरा (महा नवमी) / आयुध पूजा/ श्रीमांता शंकरदेवाचा जन्मोत्सव | इंफाल ला सोडून अन्य ठिकाणी बँक बंद |
6 ऑक्टोबर 2022 | दुर्गा पूजा (दशैन) | गंगटोक मध्ये बँक बंद |
7 ऑक्टोबर 2022 | दुर्गा पूजा (दशैन) | गंगटोक मध्ये बँक बंद |
8 ऑक्टोबर 2022 | शनिवार (महिन्याचा दूसरा शनिवार), मिलाद-ए-शेरिफ/ईद-ए-मिलाद-उल-नबी | |
9 ऑक्टोबर 2022 | रविवार (साप्ताहिक अवकाश) | |
13 ऑक्टोबर 2022 | करवा चौथ | शिमला मध्ये बँक बंद |
14 ऑक्टोबर 2022 | ईद-ए-मिलाद-उल-नबी के बाद का शुक्रवार | श्रीनगर मध्ये बँक बंद |
16 ऑक्टोबर 2022 | रविवार (साप्ताहिक सुट्टी) | |
18 ऑक्टोबर 2022 | काटी बिहू | गुवाहाटी मध्ये बँक बंद |
22 ऑक्टोबर 2022 | शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार) | |
23 ऑक्टोबर 2022 | रविवार (साप्ताहिक सुट्टी) | |
24 ऑक्टोबर 2022 | लक्ष्मी पूजा/ दिवाळी/ गोवर्धन पूजा | गंगटोक, हैदराबाद आणि इंफाल ला सोडून इतर ठिकाणी बँक बंद |
25 ऑक्टोबर 2022 | काली पूजा/दीपावली/दीवाली (लक्ष्मी पूजन)/नरक चतुर्दशी) | गंगटोक, डेहराडून, जम्मू, कानपुर, लखनऊ, मुंबई, नागपुर, शिमला आणि श्रीनगर मध्ये बँक बंद |
26 ऑक्टोबर 2022 | गोवर्धन पूजा/विक्रम सम्वत् नववर्ष/ भाई बिज/ भाई दूज/दीवाली (बलि प्रतिपदा)/लक्ष्मी पूजा/विजय दिवस | अहमदाबाद, बेलापुर, बेंगलोर, देहरादून, गंगटोक, जम्मू, कानपुर, लखनऊ, मुंबई, नागपुर, शिमला आणि श्रीनगर मध्ये बँक बंद |
27 ऑक्टोबर 2022 | भाऊबीज/चित्रगुप्त जयंती/लक्ष्मी पूजा/दिवाळी/निंगोल चक्कौबा | गंगटोक, इंफाल, कानपुर आणि लखनऊ मध्ये बँक बंद |
30 ऑक्टोबर 2022 | रविवार (साप्ताहिक सुट्टी) | |
31 ऑक्टोबर 2022 | सरदार बल्लभ भाई पटेल जन्मदिवस/छठ पूजा | अहमदाबाद, पटना आणि रांची मध्ये बँक बंद |
करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअॅस्ट्रो रिपोर्ट ने करा दूर!
ऑक्टोबर महिन्याचे महत्वपूर्ण व्रत आणि सण
01 ऑक्टोबर 2022 शनिवार
षष्टी
02 ऑक्टोबर 2022 रविवार
गांधी जयंती , सरस्वती आवाहन , दुर्गा पूजा
03 ऑक्टोबर 2022 सोमवार
सरस्वती पूजा , दुर्गाष्टमी व्रत , दुर्गाष्टमी
04 ऑक्टोबर 2022 मंगळवार
सरस्वती बलिदान , महा नवमी , विश्व पशु दिवस , सरस्वती विसर्जन
05 ऑक्टोबर 2022 बुधवार
विजया दशमी
06 ऑक्टोबर 2022 गुरुवार
भारत मिलाप , पापांकुशा एकादशी
07 ऑक्टोबर 2022 शुक्रवार
प्रदोष व्रत
09 ऑक्टोबर 2022 रविवार
मीलाद उन-नबी , सत्य व्रत , कार्तिक स्नान , कोजागिरी पौर्णिमा, वाल्मीकि जयंती , पूर्णिमा , सत्य व्रत , शरद पौर्णिमा, पौर्णिमा व्रत
13 ऑक्टोबर 2022 गुरुवार
करवा चौथ , संकष्टी गणेश चतुर्थी
14 ऑक्टोबर 2022 शुक्रवार
रोहिणी व्रत
17 ऑक्टोबर 2022 सोमवार
तुळ संक्रांत, कालाष्टमी, अहोई अष्टमी
21 ऑक्टोबर 2022 शुक्रवार
वैष्णव रमा एकादशी , रमा एकादशी , गोवत्स द्वादशी
23 ऑक्टोबर 2022 रविवार
धनतेरस , प्रदोष व्रत , काली चौदस , मास शिवरात्र
24 ऑक्टोबर 2022 सोमवार
नरक चतुर्दशी , दिवाळी
25 ऑक्टोबर 2022 मंगळवार
भौमवती अमावस्या , अमावस्या , गोवर्धन पूजा
26 ऑक्टोबर 2022 बुधवार
अन्नकूट , चंद्र दर्शन , भाऊबीज
28 ऑक्टोबर 2022 शुक्रवार
वरद चतुर्थी
29 ऑक्टोबर 2022 शनिवार
लाभ पंचमी
30 ऑक्टोबर 2022 रविवार
षष्टी , छठ पूजा
31 ऑक्टोबर 2022 सोमवार
सोमवार व्रत
ऑक्टोबर महिन्याचे संक्रमण आणि अस्त ग्रहांची माहिती
पुढे जाऊन ग्रहण आणि संक्रमणाबद्दल बोलायचे झाले तर, ऑक्टोबर महिन्यात 4 ग्रह संक्रमण करणार आहेत आणि 3 ग्रह त्यांची स्थिती बदलणार आहेत, ज्याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला खाली देत आहोत:
- बुध कन्या राशीमध्ये मार्गी: 02 ऑक्टोबर 2022: बुध कन्या राशीमध्ये मार्गी 2 ऑक्टोबर 2022, रविवारी दुपारी 2 वाजून 03 मिनिटांनी होईल.
- मंगळाचे मिथुन राशीमध्ये संक्रमण - 16 ऑक्टोबर, 2022: मंगळाचे एकवेळी पुनः आपले राशिपरिवर्तन करून 16 ऑक्टोबर 2022, रविवारी दुपारी 12:04 वाजता वृषभ मधून निघून मिथुन राशीमध्ये संक्रमण करेल.
- सूर्याचे तुळ राशीमध्ये संक्रमण - 17 ऑक्टोबर 2022: सूर्य आपल्या या संक्रमण वेळी सोमवारी संध्याकाळी 7 वाजून 09 मिनिटांनी बुधाच्या कन्या राशीतून निघून तुळ मध्ये संक्रमण करेल.
- शुक्राचे तुळ राशीमध्ये संक्रमण 18 ऑक्टोबर 2022: शुक्राचे तुळ राशीमध्ये संक्रमण 18 ऑक्टोबर 2022, मंगळवारी रात्री 9 वाजून 24 मिनिटांनी होईल जेव्हा शुक्र ग्रह आपल्या नीच राशी कन्या राशीमधून निघून स्वराशी तुळ मध्ये संक्रमण करेल.
- शनी मकर राशीमध्ये मार्गी: 23 ऑक्टोबर 2022: शनी मकर राशीमध्ये मार्गी 23 ऑक्टोबर 2022, रविवारी प्रातः 04:19 वाजता होत आहे.
- बुधाचे तुळ राशीमध्ये संक्रमण - 26 ऑक्टोबर 2022: बुधाचे तुळ राशीमध्ये संक्रमण 26 ऑक्टोबर 2022, बुधवारी दुपारी 01 वाजून 38 मिनिटांनी होईल. जेव्हा बुध ग्रह आपल्या स्वराशी कन्या मधून निघून आपला मित्र ग्रह शुक्राच्या तुळ राशीमध्ये प्रवेश करेल.
- मंगळ मिथुन मध्ये वक्री - 30 ऑक्टोबर 2022: मंगळ मिथुन मध्ये वक्री 30 ऑक्टोबर 2022, रविवारी संध्याकाळी 6 वाजून 19 मिनिटांनी होत आहे.
संक्रमणानंतर ग्रहण विषयी बोलायचे झाले तर, 2022 च्या ऑक्टोबर महिन्यात कुठले ही ग्रहण लागणार नाही.
सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिन्याची महत्वपूर्ण भविष्यवाणी
करिअर: ऑक्टोबर महिना करिअरच्या दृष्टीने अतिशय शुभ राहील. या काळात तुमची सर्व जुनी कामे पूर्ण होतील आणि बढतीची ही शक्यता असेल.
कौटुंबिक जीवन: कौटुंबिक जीवनात संमिश्र परिणाम असतील. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा एकच सल्ला दिला जातो.
आर्थिक जीवन: आर्थिक दृष्ट्या, संमिश्र परिणाम देईल. या काळात एकीकडे तुमचे उत्पन्न चांगले राहणार आहे तर, दुसरीकडे उधळपट्टी होण्याची शक्यता आहे.
प्रेम जीवन: तुमचे प्रेम जीवन या महिन्यात आनंददायी असेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराला दर्जेदार वेळ द्याल आणि त्यांच्या सोबत कुठेतरी जाण्याचा विचार ही कराल.
शिक्षण: शिक्षणातही चांगले परिणाम मिळतील. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेत बसण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम मिळतील.
स्वास्थ्य: आरोग्य उत्तम राहील. किरकोळ आजार त्रास देऊ शकतात.
वृषभ राशिकरिअर: करिअरच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी चांगला राहील. तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर, त्यासाठी वेळ अनुकूल आहे.
कौटुंबिक जीवन: कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर, या महिन्यात तुम्हाला संमिश्र परिणाम मिळतील. या महिन्यात तुमच्या घरी नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे.
आर्थिक जीवन: आर्थिक दृष्टया संमिश्र परिणाम मिळतील. अवाजवी खर्च टाळा हा एकच सल्ला दिला जातो.
प्रेम जीवन: लव्ह लाईफबद्दल बोलायचे झाले तर, ऑक्टोबर महिन्यात लव्ह लाईफ खूप छान असणार आहे. या दरम्यान, तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये चांगले संबंध निर्माण होतील. तुम्ही एखाद्या अविस्मरणीय सहलीला जाण्याचा विचार ही करू शकतात.
शिक्षण: शिक्षणाच्या बाबतीत ही या महिन्यात तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर, त्यात यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.
स्वास्थ्य: आर्थिक दृष्ट्या, हा महिना चढ-उतारांचा असणार आहे. अशा परिस्थितीत काही आरोग्य समस्या तुम्हाला अडचणीत आणू शकतात.
मिथुन राशिकरिअर: करिअरच्या दृष्टीने ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. व्यवसायाच्या क्षेत्राशी संबंधित लोकांना ही फायदा होईल आणि नोकरदारांना पगार वाढण्याची दाट शक्यता आहे.
कौटुंबिक जीवन: कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास या महिन्यात काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. हे शक्यता आहे की, या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबात काही मोठे नुकसान पहायला मिळेल.
आर्थिक जीवन: आर्थिक जीवन संकटांनी भरलेले असेल. या काळात तुम्हाला स्वतःच्या किंवा घरातील कोणत्या ही सदस्याच्या आरोग्यावर किंवा घराच्या बांधकामावर खर्च करावा लागू शकतो.
प्रेम जीवन: प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने तुम्हाला संमिश्र परिणाम मिळतील. या काळात तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये मतभेद होण्याची दाट भीती आहे.
शिक्षण: शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला संमिश्र परिणाम मिळू शकतात. तुमचे लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला अभ्यासाशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
स्वास्थ्य: आरोग्याच्या दृष्टीने, तुम्हाला संमिश्र परिणाम मिळतील. दीर्घकाळ चालणाऱ्या आजारापासून मुक्ती मिळू शकते. जरी किरकोळ आजार तुमच्या आयुष्यात राहतील.
कर्क राशिकरिअर: ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला करिअरच्या दृष्टीने संमिश्र परिणाम मिळतील. या दरम्यान, नकारात्मक विचार तुमच्या मनावर वर्चस्व गाजवू शकतात, ज्याचा थेट परिणाम तुमच्या करिअरवर होतो.
कौटुंबिक जीवन: ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला कौटुंबिक जीवनात चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. एकीकडे कुटुंबातील सदस्य तुमचा पाठिंबा आणि समर्थन करताना दिसतील तर, जमिनीच्या संदर्भात मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
आर्थिक जीवन: आर्थिक दृष्ट्या, संमिश्र परिणाम मिळतील. या दरम्यान तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून आर्थिक मदतीची रक्कम मिळत आहे. मात्र, दुसरीकडे तुमच्या खर्चात ही वाढ होण्याची चिन्हे आहेत.
प्रेम जीवन: ऑक्टोबर महिना प्रेम जीवनाच्या बाबतीत संमिश्र परिणाम देईल. या दरम्यान, तुमचा तुमच्या जोडीदाराशी छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
शिक्षण: शिक्षणाच्या बाबतीत ही संमिश्र परिणाम मिळतील. जरी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल परंतु, तुम्हाला शक्य तितक्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जातो.
स्वास्थ्य: तुम्हाला आरोग्य दृष्ट्या, सकारात्मक परिणाम मिळतील. या काळात तुम्ही काही मोठ्या आजारापासून मुक्ती मिळवू शकता. मात्र, जेवणाची विशेष काळजी घ्या.
सिंह राशिकरिअर: या महिन्यात संमिश्र परिणाम दिसून येतील. काही जातकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते तर, काही जातकांना करिअर क्षेत्रात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते.
कौटुंबिक जीवन: ऑक्टोबर महिन्यात तुमचे कौटुंबिक जीवन देखील अनुकूल असेल. या काळात तुमचे कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत कुठेतरी जाण्याची योजना करू शकतात.
आर्थिक जीवन: या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती मजबूत दिसेल. या काळात तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो, त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढण्याची पूर्ण शक्यता आहे.
प्रेम जीवन: तुमचे प्रेम आणि वैवाहिक जीवन देखील या महिन्यात अनुकूल असेल. प्रियकर त्यांच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवतील आणि विवाहित लोक त्यांच्या जीवनसाथी सोबत दर्जेदार वेळ व्यतीत करतील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.
शिक्षण: शैक्षणिक बाबतीत, ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. विशेषत: त्या विद्यार्थ्यांसाठी जे संशोधन किंवा वैद्यकीय संबंधित अभ्यास करत आहेत.
स्वास्थ्य: आरोग्याच्या दृष्टीने, तुम्हाला थोडे अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. या काळात तुम्हाला दुखापत होण्याची ही शक्यता असते तसेच, तुमची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी होण्याची शक्यता असते.
कन्या राशिकरिअर: करिअरच्या दृष्टीने या महिन्यात तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. विशेषतः ते लोक जे सरकारी क्षेत्राशी संबंधित आहेत. तसेच तुमच्या करिअरशी संबंधित समस्या ही या महिन्यात संपतील.
कौटुंबिक जीवन: ऑक्टोबर महिन्यात कन्या राशीच्या जातकांचे कौटुंबिक जीवन प्रतिकूल राहण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. तसेच, कुटुंबातील सदस्यांमधील समन्वयाचा अभाव देखील तुम्हाला त्रास देऊ शकतो.
आर्थिक जीवन: या महिन्यात तुम्हाला आर्थिक बाजूने संमिश्र परिणाम मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही असा चुकीचा निर्णय घेऊ शकता, त्यामुळे तुम्हाला व्यवसायात मोठे नुकसान सोसावे लागू शकते, अशी दाट भीती आहे. अशा परिस्थितीत कोणता ही मोठा आर्थिक निर्णय अत्यंत सावधगिरीने घ्यावा असा सल्ला दिला जातो.
प्रेम जीवन: कन्या राशीच्या जातकांना या महिन्यात लव्ह लाईफच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील. अशा परिस्थितीत, आपल्या जोडीदारामध्ये लहान समस्या किंवा समस्यांमुळे भांडण होण्याची शक्यता असते. बोलण्यावर संयम ठेवा आणि नात्यात विश्वास ठेवा.
शिक्षण: शिक्षणाच्या दृष्टीने ही हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. या काळात तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील परंतु, तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण आणि शुभ फळ नक्कीच मिळेल.
स्वास्थ्य: आरोग्याच्या दृष्टीने, या महिन्यात तुम्हाला थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला कोणत्या ही जुनाट आजारापासून मुक्ती मिळेल. या सोबतच तुमच्या कुटुंबातील लोकांचे आरोग्य ही सुधारेल.
तुळ राशिकरिअर: करिअरच्या दृष्टीने चांगले परिणाम मिळतील. नोकरी शोधणाऱ्यांना बढती मिळू शकते. तसेच या रकमेच्या आयात-निर्यातीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी हा काळ अतिशय शुभ सिद्ध होईल.
कौटुंबिक जीवन: कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, या महिन्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबात काही उलथापालथीचा सामना करावा लागू शकतो. आनंदाने जगा आणि तुमच्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा असा एकच सल्ला दिला जातो.
आर्थिक जीवन: आर्थिक जीवनात ही संमिश्र परिणाम मिळतील. या काळात, एकीकडे तुमचे खर्च जास्त असण्याची शक्यता असताना, गुप्तपणे पैसे मिळण्याची शक्यता आहे.
प्रेम जीवन: प्रेम आणि वैवाहिक जीवन अनुकूल राहील. या काळात प्रेमी विवाह करू शकतात. या सोबतच विवाहित लोक ही काही त्रासांसह आपल्या जोडीदारासोबत आनंदाचे क्षण एन्जॉय करताना दिसतील.
शिक्षण: या राशीच्या शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित जातकांसाठी ऑक्टोबर महिना देखील सकारात्मक परिणाम आणणारा आहे. ज्यांना परदेशात शिक्षणासाठी जायचे आहे. या काळात त्यांना काही चांगली बातमी मिळू शकते.
स्वास्थ्य: या महिन्यात आरोग्याच्या बाबतीत ही तुम्हाला संमिश्र परिणाम मिळतील. काही जुनाट आजार त्यांच्यापासून मुक्त होतील परंतु, किरकोळ आजार तुम्हाला दररोज त्रास देऊ शकतात.
वृश्चिक राशिकरिअर: वृश्चिक राशीच्या जातकांसाठी ऑक्टोबर महिना करिअरच्या दृष्टीने अनुकूल राहील. या दरम्यान नोकरदार जातकांना पदोन्नती आणि यश मिळेल तर, व्यावसायिक लोकांना देखील मोठा करार मिळू शकेल.
कौटुंबिक जीवन: या महिन्यात तुमचे कौटुंबिक जीवन खूप अनुकूल असेल. घरातील लोकांमध्ये प्रेम, सौहार्द आणि समर्थन दिसून येईल. या सोबतच तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक सहलीला जाण्याचा विचार ही करू शकतात.
आर्थिक जीवन: आर्थिक बाजूने तुम्हाला संमिश्र परिणाम मिळतील. या काळात एकीकडे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे तर, दुसरीकडे तुम्हाला पैसे जमा करण्यात त्रास होण्याची दाट शक्यता आहे तसेच तुमची उधळपट्टी ही वाढणार आहे.
प्रेम जीवन: लव्ह लाईफ आनंददायी असणार आहे. या वेळी तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा विश्वास वाढेल. तुम्ही त्यांच्या सोबत कुठेतरी जाण्याचा बेत करू शकता. या सोबतच विवाहित लोकांचे जीवन ही सुखकर होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल ज्यामुळे तुमचे नाते ही मजबूत होईल.
शिक्षण: शिक्षणाबद्दल बोलायचे तर, या काळात या राशीचे विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात चमकदार कामगिरी करतील. तसेच ज्यांना शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे त्यांना या काळात काही चांगली बातमी मिळू शकते.
स्वास्थ्य: आरोग्याच्या दृष्टीने काही त्रास होऊ शकतो. या दरम्यान तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत किरकोळ त्रास झाला तरी लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
धनु राशिकरिअर: करिअरच्या दृष्टीने या महिन्यात तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. नोकरी-व्यावसायिक जातकांना प्रमोशन मिळू शकते आणि व्यावसायिक लोक सर्व उंची गाठू शकतील.
कौटुंबिक जीवन: कौटुंबिक जीवन अनुकूल राहील. या दरम्यान, तुमच्या कुटुंबात अनेक दिवसांपासून सुरू असलेला कोणता ही वाद दूर होईल. या सोबतच तुम्हाला तुमच्या भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
आर्थिक जीवन: आर्थिक बाजू उत्तम राहील. या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. जे लोक जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा काळ विशेषतः शुभ राहील.
प्रेम जीवन: प्रेम आणि वैवाहिक जीवनात काही चढ-उतार येऊ शकतात. या काळात तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये काही मुद्द्यावरून गैरसमज होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवा आणि संयमाने काम करा.
शिक्षण: शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर, या महिन्यात तुम्हाला संमिश्र परिणाम मिळू शकतात. या काळात तुमचे लक्ष अभ्यासातून विचलित होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
स्वास्थ्य: ऑक्टोबर महिना आरोग्याच्या बाबतीत काहीसा नाजूक असणार आहे. या दरम्यान तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, कुटुंबातील मोठ्या व्यक्तीचे आरोग्य तुम्हाला त्रास देऊ शकते.
मकर राशिकरिअर: ऑक्टोबर महिन्यात मकर राशीच्या जातकांना करिअरच्या बाबतीत अडचणींना सामोरे जावे लागू शकते. ही शक्यता आहे की, तुमच्या कठोर परिश्रमानंतर ही तुम्हाला योग्य फळ मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत, आपला आत्मविश्वास टिकवून ठेवा आणि कठोर परिश्रम करत राहण्याचा सल्ला दिला जातो.
कौटुंबिक जीवन: कौटुंबिक जीवन ही अनुकूल राहील. या काळात तुमच्या कुटुंबातील सदस्य तुम्हाला पूर्ण पाठिंबा देताना दिसतील. या सोबतच तुमच्या घरातील जुना वाद सोडवण्यात ही तुम्ही यशस्वी व्हाल.
आर्थिक जीवन: आर्थिक बाबतीत या महिन्यात तुम्हाला संमिश्र परिणाम मिळतील. एकीकडे तुमचे उत्पन्न वाढेल तर, दुसरीकडे तुमचा खर्च ही वाढणार आहे. अशा परिस्थितीत उत्पन्न आणि खर्च यांच्यात योग्य नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
प्रेम जीवन: प्रेम आणि वैवाहिक जीवन या महिन्यात मिश्रित असणार आहे. क्षुल्लक कारणांमुळे तुमचा आणि तुमच्या जीवनसाथी किंवा जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. अशा वेळी परिस्थिती बिघडू देऊ नका आणि संयमाने काम करून ती हाताळण्याचा प्रयत्न करा. या राशीच्या जातकांसाठी वेळ अनुकूल आहे जे लग्न करण्याचा विचार करत आहेत.
शिक्षण: जर ते शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असेल तर, ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी अनुकूल आहे. विशेषत: त्या लोकांसाठी जे वैद्यकीय संशोधन क्षेत्राशी संबंधित आहेत. या काळात तुम्हाला तुमचे नशीब पूर्ण लाभेल आणि तुम्हाला शुभ परिणाम मिळतील.
स्वास्थ्य: या महिन्यात आरोग्य तुमच्या अनुकूल राहील. एकीकडे जुनाट आजारांपासून तुमची सुटका होईल तर, दुसरीकडे तुमचा मानसिक ताण ही दूर होईल. जेवणाची विशेष काळजी घ्या.
कुंभ राशिकरिअर: कुंभ राशीच्या जातकांसाठी ऑक्टोबर महिना करिअरच्या दृष्टीने उत्तम राहील. या काळात तुम्हाला क्षेत्राशी संबंधित अनेक आकर्षक संधी मिळतील. या सोबतच या महिन्यात व्यापाऱ्यांना जोरदार नफा ही मिळू शकेल.
कौटुंबिक जीवन: कौटुंबिक जीवन अनुकूल राहील. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. या महिन्यात तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक सहलीला जाण्याची योजना देखील बनवू शकतात.
आर्थिक जीवन: या महिन्यात आर्थिक बाजू मजबूत राहील. व्यवसायातून अनपेक्षित नफा मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. या सोबतच तुम्ही पैसे जमा करण्यात ही यशस्वी व्हाल. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर, त्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे.
प्रेम जीवन: प्रेम आणि वैवाहिक जीवनाविषयी बोलायचे झाल्यास, तुम्हाला येथे ही अनुकूल परिणाम मिळतील. प्रेमळ जातक त्यांच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवू शकतील तर, वैवाहिक जीवन जगणाऱ्या लोकांना त्यांच्या नात्यातील प्रेमाची ताकद आणि वाढ जाणवेल.
शिक्षण: कुंभ राशीच्या शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित जातकांसाठी ऑक्टोबर महिना शुभ राहील. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. तसेच या महिन्यात नशीब ही तुमच्या बाजूने दिसेल.
स्वास्थ्य: तुम्हाला आरोग्याच्या आघाडीवर अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या महिन्यात नैराश्य, डोकेदुखी, डोळा, श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता आहेत.
मीन राशिकरिअर: मीन राशीच्या जातकांना ऑक्टोबर महिन्यात करिअरच्या दृष्टीने शुभ संधी मिळतील. व्यावसायिक लोकांना ही खूप फायदा होईल आणि तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार ही करू शकाल.
कौटुंबिक जीवन: कौटुंबिक जीवनात ही काही उलथापालथ होऊ शकते. या दरम्यान कुटुंबात किरकोळ कारणावरून वाद होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि संयम आणि शांततेने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा.
आर्थिक जीवन: ऑक्टोबर महिन्यात तुमची आर्थिक बाजू उत्तम राहील. या काळात तुमचा खर्च वाढू शकतो परंतु, गुप्त स्त्रोतांकडून पैसे मिळाल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची दाट शक्यता आहे.
प्रेम जीवन: प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत ही तुम्हाला या महिन्यात संमिश्र परिणाम मिळतील. छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवला तर, तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि अधिक प्रेमळ होण्याची शक्यता आहे.
शिक्षण: शिक्षणाच्या संदर्भात, तुम्हाला अधिक सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण, या काळात तुमचे लक्ष अभ्यासातून विचलित होण्याची आणि तुमच्या मनात नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे. तथापि, या राशीचे लोक जे औषध, बँकिंग आणि मार्केटिंग क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना ऑक्टोबर महिन्यात उत्कृष्ट परिणाम मिळतील.
स्वास्थ्य: या महिन्यात आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. अन्यथा, सांधेदुखीसारख्या समस्या तुम्हाला अडचणीत आणू शकतात. तसेच, या महिन्यात, तुमच्या कुटुंबातील एखाद्या वृद्ध सदस्याचे आरोग्य देखील तुमच्या समस्यांचे कारण बनू शकते.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा: अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems

AstroSage on MobileAll Mobile Apps
- Mars Transit In Virgo: Mayhem & Troubles Across These Zodiac Signs!
- Sun Transit In Cancer: Setbacks & Turbulence For These 3 Zodiac Signs!
- Jupiter Rise July 2025: Fortunes Awakens For These Zodiac Signs!
- Jupiter Rise In Gemini: Wedding Bells Rings Again
- Saturn-Mercury Retrograde July 2025: Storm Looms Over These 3 Zodiacs!
- Sun Transit In Cancer: What to Expect During This Period
- Jupiter Transit October 2025: Rise Of Golden Period For 3 Lucky Zodiac Signs!
- Weekly Horoscope From 7 July To 13 July, 2025
- Devshayani Ekadashi 2025: Know About Fast, Puja And Rituals
- Tarot Weekly Horoscope From 6 July To 12 July, 2025
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025