बुधाचे कुंभ राशीमध्ये संक्रमण - 11 मार्च 2021
वैदिक ज्योतिष मध्ये बुध ग्रहाला बुद्धी, वाणी, धन, तर्क, संवाद आणि व्यापाराचा कारक मानले जाते. बुध ग्रह आपल्या जीवनात महत्वाची भूमिका निभावते. जर कुणी व्यक्तीच्या कुंडली मध्ये बुध ग्रह उच्च असतो तर, त्या व्यक्तीमध्ये आकर्षण शक्ती खूप अधिक असते. बुध ग्रह बुद्धिमत्ता, ग्रहणशील क्षमता, मजबूत निर्णय घेणे, आठवण ठेवणे, विचार, ज्ञान, व्यवहार कौशल्य, सूचना आणि गहन अध्ययनाचे प्रतीक आहे. कुठल्या व्यक्तीच्या जीवनासाठी या सर्व पैलूंमध्ये यश प्राप्तीसाठी जन्म कुंडली मध्ये बुध स्थित पाहिली जाते.
हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे जाणून घ्या आपली चंद्र राशि
कुंभ राशीमध्ये बुधाचे संक्रमण - वेळ आणि महत्व
बुध 11 मार्च 2021 ला दुपारी 12 वाजून 25 मिनिटांवर मकर राशीमधून निघून कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल. या नंतर 31 मार्च 2021 पर्यंत हा कुंभ राशीमध्ये स्थित राहील आणि नंतर 1 एप्रिल ला दुपारी 12 वाजून 33 मिनिटांनी मीन राशीमध्ये प्रवेश करेल.
बुध च्या कुंभ राशीमध्ये संक्रमणासोबत, व्यक्तीचे विचार अधिक प्रगतिशील असतात. हे संकेत मानसिक गोष्टींना पुढे नेण्यासाठी आणि या काळात आपली कार्य क्षमतेचा विस्तार केला तर, तुम्ही या विषयावर अधिक चिंतन करतात सोबतच, तुमचे मन सामान्य वेळेच्या तुलनेत अधिक तेज गती सोबत चालायला लागते आणि डोक्यात उत्तम विचारांचा भंडार बनून जाते.
जेव्हा बुध ग्रह कुंभ राशीतून जाऊन संक्रमण करते, तेव्हा व्यक्ती भावनात्मक रूपात जोडलेल्या गोष्टींना अधिक व्यावहारिक होऊन समजायला आणि पाहायला लागतो. यामुळे ह्या स्थितीचे योग्य आकलन करण्यात ही मदत मिळते. काही परिस्थितींमध्ये कुंभ राशीमध्ये बुधचे संक्रमण तुमच्या भावानांवर हावी ही होऊ शकते. या काळात तुम्ही थोडे असंवेदशील
होऊ शकतात म्हणून, तुम्हाला या वेळेत लोकांसोबत बोलण्याच्या वेळी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे.
चला आता जाणून घेऊया की, बुध चे कुंभ राशीमध्ये हे संक्रमण तुमच्या जीवनात काय बदल आणेल.
मेष राशि
बुध तुमच्या तिसऱ्या आणि सहाव्या भावाचा स्वामी आहे आणि हे तुमच्या अकराव्या घरात संक्रमण करेल. बुधाचे हे संक्रमण तुमच्यासाठी खूप लाभदायक सिद्ध होणार आहे. या काळात तुम्हाला बऱ्याच ठिकाणहून लाभ होईल आणि तुमच्या कठीण मेहनतीचे तुम्हाला फळ मिळाले. हे संक्रमण प्रेम संबंधात पडलेल्या लोकांसाठी खूप शुभ राहणार आहे. या राशीतील सिंगल जातकांच्या जीवनात कुणी खास व्यक्तीचे आगमन होऊ शकते. जर तुम्ही आधीपासून प्रेम संबंधात आहे आणि आपल्या साथी सोबत बंधनात येण्याचा विचार करत आहेत तर, ही वेळ तुमच्यासाठी अति-उत्तम आहे. बुधाचे हे संक्रमण तुमच्या लक्षण शक्तीला बरेच चांगले करेल आणि या काळात तुम्ही कामाच्या बाबतीत लहान दूरची यात्रा ही करू शकतात. स्पर्धा परीक्षेत हिस्सा घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही वेळ चांगली राहील. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, या काळात तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि शारीरिक व्यायाम इत्यादी तुम्हाला स्वस्थ्य ठेवण्यात मदत करेल.
उपाय - बुधवारी शिवलिंगाचे मधाने अभिषेक करा.
वृषभ राशि
बुध तुमच्या दुसऱ्या आणि पाचव्या भावाचा स्वामी आहे आणि या संक्रमणाच्या वेळी हे तुमच्या दहाव्या घरात प्रवेश करेल. दहावे घर करिअर, नाव आणि प्रसिद्धी दर्शवते. या काळात तुम्हाला आपल्या करिअर मध्ये वृद्धी आणि यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्य क्षेत्रात बदल तुमच्यासाठी चांगला लाभ घेऊन येईल. आर्थिक रूपात, हा काळ धन संबंधित गोष्टींसाठी आणि गुंतवणुकीसाठी खूप अनुकूल राहील. या काळात केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर राहील. कौटुंबिक व्यवसायात शामिल लोकांसाठी, बुधाचे हे संक्रमण तुमच्या व्यवसायाच्या विस्तारासाठी खूप उत्तम वेळ असू शकते. तसेच तुमच्या व्यक्तिगत जीवनाची गोष्ट केली असता, तुमचे नाते सुखद असतील कारण, तुम्ही सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतांना दिसाल. तुमच्या वडिलांसोबतच्या संबंधात मजबुती येईल आणि या काळात तुम्हाला आपलूया आई-वडिलांकडून आर्थिक मदत मिळू शकते. तुमची मुले या काळात तुमच्या आनंदाचा स्रोत बनतील.
उपाय - बुधच्या होरा मध्ये बुध मंत्राचा जप करा.
मिथुन राशि
बुध तुमच्या लग्न आणि चौथ्या भावाचा स्वामी आहे आणि या संक्रमणाच्या वेळी हे तुमच्या नवव्या घरात प्रवेश करेल. नवम भाव भाग्य आणि समृद्धी दर्शवते. तुम्ही या संक्रमणाच्या वेंकी बरेच सकारात्मक आणि आशावादी राहाल. या वेळी तुमचा कल अध्यात्मिकतेकडे असेल आणि याच्या तुम्हाला आनंद आणि शांततेची प्राप्ती होईल. व्यावसायिक रूपात हा काळ खूप शुभ राहील आणि तुम्ही सर्व बाधांना नियंत्रित करण्यात ही सक्षम असाल. कामाच्या संबंधित यात्रा फायदेशीर असेल आणि या काळात तुम्ही लांब दूरच्या तीर्थ यात्रेवर ही जाऊ शकतात. या संक्रमणाच्या वेळी तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही आपल्या कार्यस्थळी आपल्या विचार आणि सल्ल्याला उत्तम रित्या व्यक्त करण्यात दुसऱ्यांना प्रभावित करू शकाल. व्यवसायाच्या दृष्टीने, ही वेळ आपल्या कार्यशैलीत सुधार आणण्यात आणि नवीन नीतीला दाखवण्यासाठी अनुकूल असेल. आयात आणि निर्यात आणि विदेशी योजनांनी जोडलेल्या लोकांना या काळात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यक्तिगतरित्या, बुधाचे हे संक्रमण तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल. या काळात तुम्ही घरात सर्वांसोबत नवीन आणि मजबूत संबंध विकसित कराल.
उपाय - दरोरोज सकाळी घरात कपूर लावा.
कर्क राशि
बुध तुमच्या तिसऱ्या आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे आणि या संक्रमणाच्या वेळी हे तुमच्या आठव्या घरात प्रवेश करेल. आठवा भाव जादू-टोणा आणि अचानक होणारी हानी/लाभ दर्शवतो. या काळात तुमच्या कामात तुम्हाला बऱ्याच चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. ही स्थिती तुम्हाला बरेच प्रोत्साहित ही करू शकते. यामुळे तुम्हाला वाटेल की, तुमच्या कठीण मेहनतीचे फळ तुम्हाला मिळत नाहीये. या काळात, तुम्हाला विचार करून बोलण्याची आवश्यकता आहे. आरोग्याच्या बाबतीत, तुम्हाला त्वचा संबंधित काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला सल्ला दिला जातो की, या काळात आपल्या आरोग्याची काळजी घ्या. या संक्रमण काळात यात्रा करू नका कारण यात्रा करणे तुमच्यासाठी अधिक लाभदायक नसेल. हा काळ त्या लोकांसाठी उपयुक्त आहे जी अनुसंधान किंवा चौकशीने जोडलेले आहे. व्यक्तिगत रूपात, तुमच्या संचार कौशल्यात आणि कूटनीती व्यवहाराने तुम्हाला आपल्या कुटुंबातील सदस्य, समुदाय आणि सामाजिक मंडळाचे मन जिंकण्यात मदत मिळेल. तुम्हाला या काळात तुमच्या सासरकडून काही भेट आणि समर्थन मिळण्याची शक्यता आहे.
उपाय - बुधवारी हिरवे कपडे किंवा खाद्य पदार्थांचे दान करा.
सिंह राशि
बुध तुमच्या दुसऱ्या आणि अकराव्या भावाचा स्वामी आहे आणि या संक्रमणाच्या वेळी हे तुमच्या सातव्या घरात प्रवेश करेल. सातवा भाव विवाह आणि भागीदारीला दर्शवते. हे संक्रमण तुमच्यासाठी अनुकूल परिणाम देणारे आहे. या संक्रमण काळात, तुमची कमाई चांगली होईल आणि बरेच व्यापारिक सौदे ही तुम्ही कराल. या काळात व्यावसायिक भागीदारी फळदायी राहील आणि व्यापाराचा विस्तार ही होईल तथापि, तुम्हाला सल्ला दिला जातो की, भागीदारी मध्ये कुठल्या नवीन कामाला सुरु करणे टाळा. या संक्रमण काळात योग्य दिशेत तुमच्या निरंतर प्रयत्नांच्या कारणाने तुमचा व्यवसाय वाढेल आणि समृद्ध होईल. जर तुम्ही या काळात आपला काही नवीन व्यवसाय सुरु करण्याची इच्छा ठेवतात तर, ही वेळ त्यांच्यासाठी एकदम योग्य आहे कारण, तुम्ही या काळात जे सुरु कराल त्यात तुम्हाला यश मिळेल कारण, भाग्य या काळात तुमच्या सोबत आहे. बुधाचे हे संक्रमण विवाहित जातकांसाठी थोडे आव्हानात्मक असू शकते. तुम्हाला आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याची अतिरिक्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला सल्ला दिला जातो की, तुम्हाला या संक्रमण काळात आपल्या भावनांना चांगल्या प्रकारे व्यक्त केले पाहिजे आणि आपल्या नात्यामध्ये अहंकार दाखवणे टाळले पाहिजे.
उपाय - नियमित सकाळी गजेंद्र मोक्ष स्तोत्र वाचा.
कन्या राशि
बुध तुमच्या लग्न आणि दहाव्या भावाचा स्वामी आहे आणि या संक्रमणाच्या वेळी हे तुमच्या सहाव्या घरात प्रवेश करेल. सहावा भाव ऋण, रोग आणि शत्रूंना दर्शवते. या काळात आरोग्याच्या कारणाने किंवा परत पेशावर प्रतिबद्धतेच्या कारणाने तुमच्या आणि तुमच्या जीवनसाथी मध्ये दुरी वाढू शकते. आरोग्याची गोष्ट केली असता तुम्हाला संतुलित आहार घेण्याचा आणि तणाव चिंता दूर करण्यासाठी नियमित ध्यान अभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो. या काळात तुमचे खर्च वाढू शकतात यामुळे तुम्हाला तणाव आणि चिंता होण्याची शक्यता आहे. थोडी असावधानी संभवतः तुम्हाला चिंतेत टाकू शकते म्हणून, सावधान राहा. करिअरच्या दृष्टीने तुम्ही आपल्या नोकरीमध्ये अनुकूल परिणाम प्राप्त करण्यात समक्ष व्हाल आणि आपले प्रयत्न आणि दीर्घकालीन लक्ष्याना प्राप्त करण्यासाठी मदत करेल. या संक्रमण काळात तुमचे प्रमोशन ही होऊ शकते. सोबतच, तुम्हाला कार्य क्षेत्रात वरिष्ठांकडून आणि सहकर्मींकडून कौतुक ही मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे दुश्मन तुम्हाला काही समस्येत टाकू शकतात म्हणून, तुम्हाला सल्ला दिला जातो की, कुठल्या ही तर्क मध्ये शामिल होऊ नका आणि सोबतवाचं वाद करू नका एकूणच, हा काळ तुमच्यासाठी उत्तम सिद्ध होईल.
उपाय - शुभ फळ मिळवण्यासाठी एक मुखी रुद्राक्ष परिधान करा.
तुळ राशि
बुध तुमच्या नवव्या आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे आणि या संक्रमणाच्या वेळी हे तुमच्या पाचव्या घरात प्रवेश करेल. पाचवा भाव प्रेम, रोमांस, शिक्षण आणि मुलांना दर्शवते. हा काळ तुमच्यासाठी उत्तम सिद्ध होईल कारण, तुमच्या कमाई मध्ये तेजीने वाढ होईल आणि तुमच्या योजना विना काही बाधांनी पुढे जाईल. तुम्ही या काळात सर्व प्रतिस्पर्धीला पार कराल आणि आपल्या प्रतिद्वंद्वीना कठीण आव्हाने देण्यात आणि मेहनतीचा लाभ प्राप्त करण्यात सक्षम असाल. व्यक्तिगतरित्या, हा काळ प्रेमींसाठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे. जे लोक विवाहित आहेत ते यात्रेवर जाऊ शकतात यामुळे तुमचे संबंध मजबुत होतील सोबतच, हा काळ विवाहाच्या बंधनात येण्यासाठी अनुकूल राहणार आहे. आर्थिक रूपात हा संक्रमणकाळ तुमच्यासाठी शुभ राहील आणि भाग्य तुमच्या पक्षात असेल. हा काळ त्या जातकांसाठी उपयुक्त आहे जो रचनात्मक क्षेत्राने जोडलेला आहे. तुम्ही आपल्या वरिष्ठांना प्रभावित करण्यात सक्षम असाल. आरोग्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी एक अनुकूल काळ असेल परंतु, तुम्हाला नियमित रूपात व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो एकूणच, तुळ राशीतील जातकांसाठी हे संक्रमण शुभ सिद्ध होईल.
उपाय - नियमित तुळशीला पाणी घाला आणि पूजा करा.
वृश्चिक राशि
बुध तुमच्या आठव्या आणि अकराव्या भावाचा स्वामी आहे आणि या संक्रमणाच्या वेळी हे तुमच्या चौथ्या घरात प्रेवश करेल. चौथा भाव विकसिता, आराम, भूमी आणि माता ला दर्शवतो. या काळात तुम्हाला अश्या संधी मिळू शकतात ज्या खूप आकर्षक वाटतील जसे की, लॉटरी आणि सट्टा! संपत्तीच्या विक्रीच्या संबंधित उत्तम लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण अनुकूल असेल आणि कौटुंबिक जीवनात मेळसाठी एक चांगली वेळ असू शकते. आर्थिक रूपात हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होईल कारण, कमाई मध्ये वृद्धी होऊ शकते आणि तुम्हाला भविष्यात वृद्धी आणि विकासाची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ चांगली आहे कारण, या काळात त्यांना आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात आणि परीक्षेत उत्तम प्रदर्शन करण्यात मदत मिळेल. आरोग्याची गोष्ट केली असता या संक्रमण काळात आपल्या आरोग्याची काळजी घ्या कारण, अचानक चढ-उताराच्या कारणाने काही मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो.
उपाय - " ऊँ भ्रां भ्रीं ब्रौं बुधाय नमः" मंत्राचा 108 वेळा जप करा.
धनु राशि
बुध तुमच्या सातव्या आणि दहाव्या भावाचा स्वामी आहे आणि या संक्रमणाच्या वेळी हे तुमच्या तिसऱ्या घरात प्रवेश करेल. तिसरा भाव लहान भाऊ बहिण, शौर्य आणि पराक्रमाला दर्शवतो. या काळात तुमच्या द्वारे भागीदारी मध्ये केल्या जाणाऱ्या व्यवसायात वृद्धी होईल आणि ही वेळ पैश्याच्या देवाण-घेवाणीत साठी एकदम योग्य आहे. तुम्ही आपल्या भाऊ बहिणींसोबत आनंदी वेळ घालवाल. या संक्रमण काळात तुम्ही कुठल्या यात्रेवर जाऊ शकतात जे तुम्हाला आनंद आणि धन प्राप्ती करवू शकतात. तथापि, तुम्हाला आपल्या यात्रेच्या वेळी सतर्क राण्याचा सल्ला दिला जातो. ही वेळ तुमच्या संचाराचा उपयोग करण्यात आणि नातेवाईकांसोबत आपले संबंध वाढवण्यासाठी उत्तम आहे. तुम्हाला प्रसिद्धी आणि भाग्याची साथ मिळू शकते. आरोग्याची गोष्ट केली असता ही वेळ उत्तम स्वास्थ्याचे आनंद घेणारे आहे परंतु, तुम्ही तरी ही आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
उपाय - बुधवारी आपल्या क्षमतेच्या अनुसार दान करा.
मकर राशि
बुध तुमच्या सहाव्या आणि नवव्या भावाचा स्वामी आहे आणि या संक्रमणाच्या वेळी हे तुमच्या दुसऱ्या घरात प्रवेश करेल. दुसरा भाव कुटुंब, धन आणि वाणी ला दर्शवतो. या काळात तुम्ही आपल्या बुद्धीने सर्वांना प्रभावित कराल. तुमचे भाग्य तुम्हाला या काळात अधिकतर लाभ प्राप्त करण्यात मदत करेल. ही वेळ तुम्हाला आपल्या वित्त मध्ये वाढ करण्यात मदत करेल. तुम्ही घरात आणि बाहेर उत्तम भोजनाचा आनंद घ्याल परंतु, कुठल्या ही गोष्टीचे अत्याधिक सेवन तुमच्या आरोग्यासाठी समस्या उत्पन्न करू शकतो म्हणून, थोडे सांभाळून राहा. या संक्रमण काळात आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या काळजी घेणे तुमची प्राथमिकता असली पाहिजे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की, ते या संक्रमणाची कुठली ही चिंता किंवा तणाव हावी होऊ देऊ नका.
उपाय - रविवारी गरिबांना आणि गरजू लोकांना गहू दान करा.
कुम्भ राशि
बुध तुमच्या पाचव्या आणि दहाव्या भावाचा स्वामी आहे आणि या संक्रमणाच्या वेळी हे तुमच्या लग्न भाव म्हणजे पहिल्या घरात प्रवेश करेल. बुध ग्रहाचे हे संक्रमण तुमच्यासाठी शुभ राहणार आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत तुमचे नाते आधीपेक्षा अधिक मजबूत होतील. या काळात आपल्या आरोग्याची योग्य काळजी करणे तुमच्यासाठी आवश्यक आहे कारण, तुम्हाला काही आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला या काळात काही चांगले लाभ प्राप्त होतील. तथापि, खर्चांवर नियंत्रण ठेवण्याने तुम्हाला या काळात आपल्या धैयपर्यंत पोहचण्यात मदत मिळेल. ज्या लोकांचा व्यवसाय भागीदारी मध्ये आहे त्यांचे नाते आधीपेक्षा जास्त मजबूत होतील. तुम्हाला सल्ला दिला जातो की, आपल्या व्यस्त जीवनात आणि अत्याधिक कार्याच्या बोझ असल्याने, आपल्या आरोग्याची उपेक्षा करू नका आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या एकूणच, हा काळ तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होईल.
उपाय - "ओम नमो भगवते वासुदेवाय नमः" चा जप करा.
मीन राशि
बुध तुमच्या चौथ्या आणि सातव्या भावाचा स्वामी आहे आणि या संक्रमणाच्या वेळी तुमच्या बाराव्या भावात घरात प्रवेश करेल. बारावा भाव हॉस्पिटल मध्ये भरती होण्याचा, खर्च आणि विदेशी लाभाला दर्शवतो. या काळात तुमचा कल विलासिता कडे अधिक असेल आणि तुम्ही जीवनात फॅन्सी गोष्टी शामिल करण्याची इच्छा ठेवलं. या काळात तुम्ही यात्रेवर ही जाऊ शकतात आणि तुम्ही उच्च पदांवर बसलेल्या लोकांसोबत संपर्क स्थापित कराल जे लांब काळासाठी फायदेशीर आहे. या संक्रमण काळात जीवनसाथी सोबत काही गैरसमज होण्याची शक्यता आहे म्हणून, आपल्या साथी सोबत शांती आणि विनम्रता ठेवा. संपत्ती संबंधित गोष्टींपासून दूर राहा आणि आपल्या कुटुंबासोबत चांगली वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. या काळात धार्मिक कार्य तुमच्या जीवनात मानसिक शांती आणू शकतात. जे लोक निर्यात आणि आयात संबंधित आहे, त्यांच्यासाठी वेळ अनुकूल आहे आणि तसेच जे व्यावसायिक क्षेत्रात आहे त्यांना सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो एकूणच, हे संक्रमण तुमच्यासाठी चांगले राहणार आहे.
उपाय - विवाहित महिलांना हिरव्या बांगड्या भेट द्या.
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2026
- राशिफल 2026
- Calendar 2026
- Holidays 2026
- Shubh Muhurat 2026
- Saturn Transit 2026
- Ketu Transit 2026
- Jupiter Transit In Cancer
- Education Horoscope 2026
- Rahu Transit 2026
- ராசி பலன் 2026
- राशि भविष्य 2026
- રાશિફળ 2026
- রাশিফল 2026 (Rashifol 2026)
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2026
- రాశిఫలాలు 2026
- രാശിഫലം 2026
- Astrology 2026






