करिअर राशि भविष्य 2020 - Career Horoscope 2020 in Marathi
करिअर राशि भविष्य 2020 च्या मदतीने जाणून घ्या तुमचे करिअर क्षेत्र या वर्षी कसे राहील. प्रत्येक मनुष्याची इच्छा असते की, आपले करिअर संतुलित राहावे कारण, जर तुमचे कार्यक्षेत्र संतुलित असेल तर, बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात म्हणून, वैदिक ज्योतिषाच्या आधारित हे राशि भविष्य 2020 आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. याला वाचून तुम्ही जाणून घेऊ शकतात की, वर्ष 2020 मध्ये तुम्हाला करिअर क्षेत्रात कसे फळ मिळतील आणि तुम्हाला कुठल्या गोष्टींची या वर्षी काळजी घ्यावी लागेल.
तसेच जे नोकरी करतात त्यांच्यासाठी या वर्षात कुठले निर्णय घेणे योग्य असेल व त्यांच्या नोकरी विषयी ही काय निर्णय त्यांनी घ्यायला हवेत मगच त्यांचे करिअर उत्तम होईल हे ही मार्गदर्शन केले जाईल. जे लोक व्यावसायिक आहेत किंवा ज्यांना व्यवसाय करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे वर्ष कसे असेल आणि त्यांनी कुठल्या क्षेत्रात व्यवसाय केला तर उत्तम असेल किंवा त्यांनी भागीदारीत व्यवसाय करणे योग्य असेल की, स्वतंत्र. नवीन व्यवसायाला आत्ता सुरवात करावी की, नाही हे ही तुम्हाला आपल्या राशीच्या अनुसार समजेल. चला तर मग, जाणून घेऊया सर्व 12 राशींसाठी कसे राहील हे वर्ष करिअरच्या दृष्टीने.
मेष राशीतील लोकांचे करिअर उच्चतेवर जाण्याची चांगलीच शक्यता दिसत आहे. या वर्षी जर तुम्हाला नोकरी बदलण्याची इच्छा असेल तर, तुम्हाला त्यात यश मिळेल आणि नवीन नोकरी प्राप्त होईल. वृषभ राशीतील लोकांची मार्च पासून जून पर्यंतची वेळ काही समस्यांनी भरलेली राहू शकते आणि या वेळी शक्यता आहे की, तुमचे मन आपल्या कामाने थकून जाईल परंतु, जर तुम्ही हिम्मत ठेवली आणि धैर्याने काम करत राहिले तर, तुम्ही जून नंतर खूप चांगले सकारात्मक बदल आपल्या करिअर मध्ये पहायला मिळेल. मिथुन राशीतील लोकांसाठी गुरु बृहस्पतीच्या सातव्या भावाचे संक्रमण तुमच्या भागीदारीच्या व्यवसायात यश देईल. जर तुम्ही भागीदारीमध्ये काही व्यापार करतात तर, जुलैच्या मध्य नोव्हेंबर पर्यंत ही वेळ तुमच्यासाठी उत्तम राहील कारण, या वेळी तुमचा पार्टनर तुम्हाला खूप मदत ही करेल आणि प्रत्येक कामात तुमच्या सोबत राहून काम करेल. कर्क राशीतील लोकांसाठी जानेवारी पासून एप्रिल तसेच जुलै पासून मध्य नोव्हेंबर मध्ये तुमच्या व्यवसायाला घेऊन बऱ्याच विदेश यात्रा होऊ शकतात ज्याचा तुम्हाला सकारात्मक परिणाम प्राप्त होईल. तसेच सिंह राशीतील लोक करिअर मध्ये मे पासून सप्टेंबर महिन्यामध्ये लहान-मोठी समस्या राहू शकते परंतु, त्यानंतर स्थिती अधिक उत्तम होईल.
कन्या राशीतील लोक आपल्या कार्य क्षेत्रात प्रगती करतील तसेच त्यांना मनासारखी नोकरी ही मिळू शकते आणि जे लोक नोकरी बदलण्याच्या विचारात आहे त्यांना यश मिळेल. तुळ राशीतील व्यक्तींना सल्ला दिला जातो की, या वर्षी तुम्ही कुठला ही व्यवसाय सुरु करू नका कारण, त्यात यश मिळण्यात संदिग्ध आहे परंतु, जर व्यवसाय सुरु करण्याची इच्छा आहे तर, त्या व्यापार संबंधित पेशेवर आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. वृश्चिक राशीतील व्यक्तींसाठी या वर्षी त्यांचा आत्मविश्वास यशाने प्रेरित करेल. जे लोक प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्ट करण्याची इच्छा ठेवतात त्यांना या वर्षी उत्तम फायदा होऊ शकतो. धनु राशीतील जे लोक नोकरी करतात त्यांच्या कामाच्या ठिकाणी कौतुक होईल आणि त्यांना मान-सन्मान मिळेल. मकर राशीतील लोकांना या वर्षी खूप मेहनत करावी लागेल. तसेच कुंभ राशीतील व्यक्तींसाठी व्यावसायिक जीवनासाठी सामान्य स्वरूपात शुभ राहू शकतो. मीन राशीतील व्यक्तींसाठी त्यांचे करिअर या वर्षी उत्तम असेल.
हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे. चंद्र राशि कॅल्कुलेटरने जाणून घ्या आपली चंद्र राशि
मेष राशि भविष्य 2020 च्या अनुसार करियर
मेष राशि भविष्य 2020 च्या अनुसार मेष राशीतील लोकांचे करिअर उच्चतेवर
जाण्याची चांगलीच शक्यता दिसत आहे. या वर्षी जर तुम्हाला नोकरी बदलण्याची इच्छा असेल
तर, तुम्हाला त्यात यश मिळेल आणि नवीन नोकरी प्राप्त होईल, त्यात सुरवातीमध्ये काही
अधिक परिश्रम करावे लागतील परंतु, त्यानंतर टिकाऊ नोकरीमध्ये परिवर्तित होईल आणि तुम्ही
एक चांगल्या कार्यस्थळी काम करण्यात यशस्वी व्हाल. यासाठी मध्य जानेवारी पासून घेऊन
मध्य मे पर्यंतचा वेळ बराच उत्तम राहू शकतो आणि या वेळेत तुम्ही आपल्या कामात यश मिळवाल
आणि तुमच्या वरिष्ठ अधिकार्यांद्वारे तुमच्या कामाचे कौतुक होईल.
तुम्ही आत्तापर्यंत जे परिश्रम केले आहे त्याचे फळ मिळण्याची वेळ आत्ता आली आहे. मे पासून सप्टेंबर पर्यंतची वेळ तुम्हाला आपल्या वर्तमान स्थितीवर विचार करण्याची संधी देईल आणि या वेळी तुम्ही हे विचार करू शकतात की, जे कार्य तुम्ही करत आहे वास्तवात खरंच तुम्हाला तेच करायचे आहे? किंवा काही वेगळे! जानेवारी महिन्यात कार्य क्षेत्राच्या संबंधित काही मोठा निर्णय घेऊ नका अन्यथा समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
या पूर्ण वर्षात तुमच्या करिअर मध्ये उन्नती येईल आणि जर तुम्ही मनापासून मेहनत करतात तर, यश मिळवण्यात आणि पद-उन्नती मिळवण्यात तुम्हाला कुणीच थांबवू शकत नाही स्वयं शनिदेव याचा पाया रचत आहे. जर तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्री, ऑटोमोबाइल, प्रिंटिंग प्रेस, गैस तसेच पेट्रोल आणि तेल, जमिनीने जोडलेले कार्य, भाजी काम इत्यादी. करतात तर, या वर्षी तुम्हाला उन्नती मिळण्याची अधिक शक्यता आहे. मल्टीनेशनल कंपनी मध्ये कार्य करणाऱ्यांसाठी वेळ चांगली राहील.
बस आपको इस बात का अवश्य ध्यान रखना चाहिए कि अत्यधिक आत्मविश्वास में पड़कर कोई भी गलत निर्णय ना लें और अपने अधीनस्थ कर्मचारियों को किसी भी प्रकार कष्ट ना दें अन्यथा स्थित इसके विपरीत हो सकती है। कुल मिलाकर इस वर्ष आपके कैरियर के लिए काफी अच्छी संभावनाएं बन रही हैं। तो तैयार हो जाइए और संभावनाओं को सच में तब्दील करने के लिए।
तुम्हाला या गोष्टीची नेहमी काळजी घ्यावी लागेल की, अत्याधिक आत्मविश्वासात राहून कुठला ही चुकीचा निर्णय घेऊ नका आणि आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांना कुठल्या ही प्रकारचे कष्ट देऊ नका अन्यथा स्थिती याच्या विपरीत होऊ शकते. एकूणच, या वर्षी तुमच्या करिअर साठी बरेच उत्तम राहण्याची शक्यता बनत आहे.
वर्ष 2020 चे मेष राशि भविष्य विस्तृत वाचा - मेष राशि भविष्य 2020
वृषभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार करियर
वृषभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार वृषभ राशीतील लोक करिअर साठी बरेच
महत्वाचे राहणारे आहे कारण, कर्म भावाचा स्वामी शनी जानेवारी महिन्यात अष्टम भावातून
निघून नवम भावात प्रवेश करेल. यामुळे तुमच्या करिअर मध्ये प्रगती होण्याचे मार्ग मोकळे
होतील. तुमचे दुसऱ्या स्थानावर स्थानांतरण होऊ शकते परंतु, तुम्हाला चिंता करण्याची
अजिबात आवश्यकता नाही कारण, हे स्थानांतरण ही तुमच्या हित मध्ये असेल आणि तुम्हाला
आपल्या कार्य क्षेत्रात उन्नती प्राप्त होईल. परंतु ज्या लोकांना आत्तापर्यंत कुठल्या
ही नोकरीसाठी नियुक्त केलेले नाही त्यांना काही वेळ वाट पाहावी लागेल.
मार्च पासून जून पर्यंतची वेळ काही समस्यांनी भरलेली राहू शकते आणि या वेळी शक्यता आहे की, तुमचे मन आपल्या कामाने थकून जाईल परंतु, जर तुम्ही हिम्मत ठेवली आणि धैर्याने काम करत राहिले तर, तुम्ही जून नंतर खूप चांगले सकारात्मक बदल आपल्या करिअर मध्ये पहायला मिळेल. तथापि, शनी एक मंद ग्रह आहे म्हणून, मुख्य रूपात मार्च पासून सप्टेंबर पर्यंतची वेळ तुमच्या कडून मेहनत करवून घेईल. परंतु, त्यानंतर तुम्ही उन्नतीच्या मार्गावर अग्रेसर व्हाल आणि ही उन्नती लांब वेळेपर्यंत सोबत राहील म्हणून, तुम्ही प्रसन्न राहाल आणि आपले प्रयत्न कायम ठेवाल. तुम्ही या वर्षी अनेक असे कार्य कायम ठेवण्यात यशस्वी व्हाल जे तुम्ही मागील वर्षांपासून चालू ठेवलेले आहे. तुम्हाला बऱ्याच प्रकारे प्रेरणा मिळेल ज्या कारणाने तुम्ही कार्पोरेट जगात उंच शिड्या चढू शकाल. नवीन परियोजनेला सुरु करण्यात आणि आपल्या कार्य स्थळी नवीन कार्य सुरु करण्यासाठी हा एक खूप अनुकूल काळ आहे. वर्षाचा मध्य भाग तुम्हाला आज पर्यंत केलेल्या कार्यासाठी पर्याप्त प्रतिफळ देईल.
जानेवारी, मे आणि जून या महिन्यांच्या वेळी तुम्हाला विदेशी संपर्कांनी लाभ होईल. जर तुम्ही कुठल्या मल्टीनेशनल कंपनी मध्ये काम करतात तर, यावेळी तुमच्यासाठी शक्यता उत्पन्न होईल आणि तुम्ही आपल्या प्रदर्शनाने आपल्या उच्च अधिकाऱ्यांना प्रसन्न करण्यात सक्षम व्हाल. याच्या परिणाम स्वरूप, तुम्हाला पद उन्नती प्राप्त होऊ शकते म्हणून, तुम्हाला यावेळी वेळेचा सदुपयोग केला पाहिजे आणि कुठले ही असे कार्य करू नये ज्यामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्याशी नाराज होतील आणि तुम्हाला मिळणारी पद उन्नती थांबून जाईल किंवा पुढे ढकलली जाईल.
फेब्रुवारी ते मार्चच्या मध्ये तुम्हाला एक गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की, कार्यस्थळावर तुम्ही कुणासोबत ही वाद करू नका आणि कुठल्या ही षड्यंत्राचा हिस्सा बनू नका अन्यथा तुम्हाला मोठी किंमत चुकवावी लागू शकते. तुमचे राजनायिक कौशल्य तुम्हाला आपल्या कामाच्या क्षेत्रात सर्वात कठीण लोकांपासून निपटण्यात मदत करेल. भाग्य तुमचा पूर्णतः साथ देईल आणि तुम्ही आपल्या हिम्मतीच्या बळावर आपल्या स्वप्नांना खरे करण्यात यशस्वी व्हाल. मेहनत करणे कायम ठेवा यामुळे वर्षाच्या शेवट पर्यंत तुम्ही आपल्या शक्तीचा सदुपयोग करू शकाल आणि याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला वर्षाच्या शेवट पर्यंत आनंद मिळेल. या वर्षाच्या शेवटी काही कायद्याच्या गोष्टींमुळे समस्यांचा सामना करावा लागू शकतो तथापि, तुम्ही सहजरित्या समाधान शोधाल तरी ही तुम्हाला सावधान राहणे आवश्यक असेल. या वेळी तुमच्यावर काही आरोप लागू शकतात किंवा मानहानी होण्याची शक्यता ही आहे.
तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध स्थापित करावे लागतील कारण, त्यांचे पूर्ण लक्ष तुमच्यावर राहू शकते. अश्यात तुमची थोडी ही चूक तुम्हाला समस्येत टाकू शकते. तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की, या वर्षी तुम्हाला कठीण मेहनत करून सन्मान आणि प्रतिष्ठेची प्राप्ती होईल. काही लपलेले दुश्मन तुमच्या ऑफिस मध्ये समस्या आणि बाधा उत्पन्न करू शकतात म्हणून, तुम्हाला विशेष रूपात कुणावर अधिक निर्भरता ठेवली नाही पाहिजे आणि आपल्या क्षमतेच्या अनुसारच काम केले पाहिजे. सप्टेंबर नंतर वेळ बराच शुभ असेल. वृषभ राशी 2020 (Vrishabh Rashi 2020) च्या अनुसार वृषभ राशीतील लोक आपल्या मेहनतीच्या बळावर आपले वर्चस्व बनवण्यात सक्षम होतील आणि याच्या परिणाम स्वरूप, वर्ष 2020 तुमच्या करिअरमध्ये मागील वर्षापेक्षा अधिक प्रगती आणि उन्नती घेऊन येईल. तुम्ही रागतीच्या नवीन शिखरावर पोहचाल आणि आपल्या जीवनात विशेष करून आपल्या करिअर मध्ये स्वयं दृढ रूपात स्थित मिळवाल. वर्षाच्या शेवटी तुम्ही आपल्या करिअरला घेऊन आश्वस्थ व्हाल आणि तुमची प्रसन्नतेचे कारण हे असेल की, तुम्हाला वाटेल की आत्तापर्यंत जे आपल्या करिअर मध्ये मिळवले आहे त्याचे वास्तवात तुम्ही खरे अधिकारी आहे.
वर्ष 2020 चे वृषभ राशि भविष्य विस्तृत वाचा - वृषभ राशि भविष्य
मिथुन राशि भविष्य 2020 च्या अनुसार करियर
वर्ष 2020 मिथुन राशिच्या लोकांच्या करिअरसाठी सामान्य राहण्याची
शक्यता दिसत आहे. या वर्षी जानेवारी मध्ये शनीचे संक्रमण तुमच्या अष्टम भावात होईल
ज्या कारणाने तुम्हाला व्यावसायिक रूपात काही सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही नोकरी
करतात तर, या वेळेत तुम्हाला हे वाटू शकते की, तुम्ही जो प्रयत्न करत आहे त्याचे तुम्हाला
योग्य फळ मिळत नाही म्हणून, ही वेळ खूप मेहनत करण्याची आहे.
गुरु बृहस्पतीच्या सातव्या भावाच्या संक्रमण तुमच्या भागीदारीच्या व्यवसायात यश देईल. जर तुम्ही भागीदारीमध्ये काही व्यापार करतात तर, जुलैच्या मध्य नोव्हेंबर पर्यंत ही वेळ तुमच्यासाठी उत्तम राहील कारण, या वेळी तुमचा पार्टनर तुम्हाला खूप मदत ही करेल आणि प्रत्येक कामात तुमच्या सोबत राहून काम करेल. तुम्ही दोघे सोबत काम करण्याने दोघांना ही चांगला लाभ मिळेल परंतु, एक गोष्टीची काळजी घ्या की, जानेवारी पासून मार्च तसेच मध्य नोव्हेंबर पासून डिसेंबर पर्यंतची वेळ अधिक चांगली नसेल कारण, या प्रकारे तुम्हाला भागीदारीच्या व्यवसायात समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि तुम्हाला धन हानी ही होऊ शकते.या वेळी तुम्हाला आपल्या भागीदारांवर लक्ष द्यावे लागेल.
मिथुन राशि भविष्य 2020 च्या अनुसार या वर्षी तुम्हाला काही नवीन व्यवसाय सुरु करण्यापासून सावध राहावे लागेल कारण, अशी शक्यता आहे की, जर तुम्ही काही कार्य सुरु कराल तर, तुम्हाला त्यात यश कदाचित कमी मिळू शकते. यासाठी तुम्हाला आपल्या क्षेत्राच्या अनुभवी आणि मुख्य लोकांच्या सहयोग प्राप्ती हेतू प्रयत्न करावे लागतील आणि ते तुमची मदत करतील. या सर्वांच्या व्यतिरिक्त ही परिस्थिती अशी बनू शकते की, तुम्ही इच्छा असतांना ही त्यांच्या सल्ल्याचा उपयोग करण्यात सक्षम राहणार नाही आणि तुम्हाला काही नुकसान उचलावे लागू शकते. विशेषतः एप्रिल, मे आणि जूनचा कालावधी या गोष्टीमध्ये सतर्कता ठेवणारा असेल.
या वर्षी तुम्हाला आपल्या कार्याने अनेक यात्रेवर जावे लागू शकते त्यात अधिकांश यात्रा यशस्वी राहतील आणि तुमच्या करिअरला पुढे वाढवण्यात मदत होईल परंतु, काही यात्रेमध्ये तुम्हाला समस्या ही येतील म्हणून, वेळ राहताच या बाबतीत विचार करा आणि पूर्ण प्लॅनिंग सोबत कुठल्या ही यात्रेवर जा म्हणजे कुठल्या प्रकारच्या असुविधा होणार नाही. एप्रिल पासून जुलै पर्यंतची वेळ यात्रेमध्ये अधिक व्यतीत होईल.
या वर्षी तुम्ही आपल्या करिअर मध्ये बरेच पुढे जाल. वेळोवेळी तुम्हाला हा विचार करावा लागेल की, अशी काय कमतरता आहे जे तुम्हाला करिअर मध्ये तुम्हाला चिंता देत आहे. जर तुम्ही त्यांच्या बाबतीत जाणून घेतले तर तुम्ही या वर्षी अधिक उन्नती करण्यात यशस्वी व्हाल. जर तुम्ही नोकरी करतात तर, जानेवारी पासून मार्च तसेच जुलै पासून मध्य नोव्हेंबर पर्यंतची वेळ तुमच्या जॉब साठी उत्तम वेळेपैकी एक असेल. या वेळी तुमच्या ऑफिस मध्ये तुमचे खूप कौतुक केले जाईल आणि तुमच्या सल्ल्याला सन्मान मिळेल. या वेळी तुम्हाला पद उन्नती ही मिळवू शकतात आणि तुमच्या पगारात ही वाढ होईल.
वर्ष 2020 चे मिथुन राशि भविष्य विस्तृत वाचा - मिथुन राशि भविष्य
कर्क राशि भविष्य 2020 च्या अनुसार करियर
कर्क राशि भविष्य 2020 च्या सुरवातीमध्ये कर्क राशीतील लोक करिअरसाठी
सामान्य रूपात शुभ असू शकतात. या वर्षी तुम्ही कुठल्या नवीन कार्याच्या शोधात असाल
आणि आपल्या स्वयं क्षमतेच्या बळावर काही मोठ्या उद्यमा सोबत तुम्ही जोडू शकतात ज्या
कारणाने तुम्हाला करिअरच्या क्षेत्रात तुमची स्थिती मजबूत असेल. जर तुम्ही कुठल्या
मित्रांसोबत व्यापार करत आहे तर, या वेळी तुम्हाला अधिक लाभ मिळू शकतो आणि व्यवसाय
यात्रेसाठी ही वेळ सामान्य राहणारी आहे. जानेवारी पासून एप्रिल तसेच जुलै पासून मध्य
नोव्हेंबर मध्ये तुमच्या व्यवसायाला घेऊन बऱ्याच विदेश यात्रा होऊ शकतात ज्याचा तुम्हाला
सकारात्मक परिणाम प्राप्त होईल. जर तुम्ही नोकरीपेशाने जोडलेले आहे तर, यावेळी तुमच्या
इच्छे अनुरूप स्थानांतर ही होऊ शकते एकूणच, वर्ष सामान्य राहील परंतु, तुमच्या अनेक
महत्वाकांक्षा पूर्ण होण्याने तुम्ही प्रसन्न राहाल.
वर्ष 2020 चे कर्क राशि भविष्य विस्तृत वाचा - कर्क राशि भविष्य
सिंह राशि भविष्य 2020 च्या अनुसार करियर
वर्ष 2020 सिंह राशीतील लोकांच्या करिअरसाठी उत्तम राहण्याची शक्यता
आहे. या वर्षी तुम्ही आपल्या कामाच्या प्रति अधिक लक्ष केंद्रित राहाल आणि उत्तम प्रदर्शन
करण्यात यशस्वी व्हाल. जर तुम्ही मनापासून प्रयत्न केले तर तुम्ही आपल्या जीवनात सामंजस्य
बसवण्यात यशस्वी व्हाल आणि हे तुमच्यासाठी गरजेचे ही आहे. वर्षाच्या सुरवातीमध्ये 24
जानेवारीला शनी तुमच्या सहाव्या घरात प्रवेश करेल आणि वर्षापर्यंत कुठल्या भावात कायम
राहतील. या संक्रमणाच्या परिणामस्वरूप, नोकरीमध्ये पद उन्नती मिळण्याची शक्यता राहील
तसेच तुमच्या प्रदर्शनाचे कौतुक ही होईल आणि ते तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात
ही येईल. याच्या व्यतिरिक्त काही लोकांचे स्थान परिवर्तन अर्थात ट्रांसफर होण्याची
ही शक्यता आहे. आनंदाची गोष्ट ही आहे की, ही ट्रान्सफर तुमच्या इच्छेनुसार होण्याची
शक्यता आहे.
सिंह राशि भविष्य 2020 च्या अनुसार सिंह राशीतील लोक करिअर मध्ये मे पासून सप्टेंबर महिन्यामध्ये लहान-मोठी समस्या राहू शकते परंतु, त्यानंतर स्थिती अधिक उत्तम होईल. जे लोक नोकरीच्या शोधात आहे त्यांचा शोध यावर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या साहस पराक्रम आणि ऊर्जेत वृद्धी होईल आणि वर्षभर तुम्ही सक्रिय राहून प्रत्येक कार्य कराल यामुळे अनेक क्षेत्रात तुम्हाला यश प्राप्त होईल. तुम्हाला जे काम मिळेल ते तुम्ही चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवाल आणि कठीण मेहनत कराल. लक्षात ठेवा या वर्षी तुमच्या कार्यस्थळी तुम्ही योग्यता पारखली जाईल. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संबंध सामान्य ठेवा आणि कुठल्या ही गोष्टीवर वाद घालू नका अन्यथा ही स्थिती तुमच्या विपक्षात जाऊ शकते. जुलै पासून सप्टेंबर पर्यंतची वेळ अधिक फायदेशीर राहू शकते.
सिंह राशि भविष्य 2020 च्या अनुसार जे लोक व्यापार क्षेत्राने जोडलेले आहे त्यांच्यासाठी वर्ष बरेच शुभ राहणारे आहे. जर तुम्ही काही नवीन कार्याची सुरवात करण्याची इच्छा ठेवतात तर, त्या क्षेत्राच्या अनुभवी लोकांचा सल्ला घेऊन तुम्ही कार्य सुरु करू शकतात या वर्षी न फक्त तुम्ही चांगले धन कमवाल तर, आपल्या करिअर मध्ये एक उद्दिष्ट मिळवाल एकूणच, हे वर्ष सिंह राशीतील जातकांच्या पेशावर जीवनासाठी फायदेशीर सिद्ध होईल.
वर्ष 2020 चे सिंह राशि भविष्य विस्तृत वाचा - सिंह राशि भविष्य
कन्या राशि भविष्य 2020 च्या अनुसार करियर
कन्या राशि 2020 च्या अनुसार या जातकाच्या लोकांच्या करिअरसाठी प्रगतिशील
वर्ष सिद्ध होईल. या वर्षी तुमच्या करिअर मध्ये बदल येतील आणि शक्यता आहे की, तुम्ही
स्थान परिवर्तनाचा अनुभव कराल. अर्थात काही लोकांची ट्रांसफर होईल आणि काही लोकांना
नोकरीमध्ये बदलात यश प्राप्त होईल. जर तुम्ही व्यवसाय करतात तर, प्रगती प्राप्त कराल.
वर्षाच्या सुरवातीमध्ये बरेच मजबूत संकेत देतील. तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे
सहयोग मिळेल. तुम्ही आपल्या कार्य कौशल्याचे परिचय द्याल आणि आपले शत-प्रतिशत योगदान
देण्याचा प्रयत्न वर्षभर कराल. तुम्हाला आपल्या कार्य क्षेत्रात बऱ्याच कामासाठी तुमचे
कौतुक होईल याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही मोठ्या कंपनी सोबत काम करत आहे तर, तुमचे प्रदर्शन
तुम्हाला पुढे घेऊन जाईल.
कन्या राशि भविष्य 2020 च्या अनुसार तुम्ही हळू हळू आपल्या कार्य क्षेत्रात प्रगती कराल. तुम्हाला मनासारखी नोकरी मिळू शकते आणि जे लोक नोकरी बदलण्याच्या विचारात आहे त्यांना यश मिळेल. तुमच्यापैकी काही लोकांना मनासारख्या स्थानावर ट्रांसफर ही मिळू शकते. वर्षाच्या मध्य भागात तुम्हाला अधिक अनुकूलता वाटेल आणि तुम्हाला आपल्या कामाला समजण्याच्या पारख मध्ये वृद्धी होईल ज्याचा लाभ तुम्हाला दूरगामी रूपात प्राप्त होईल.
विशेष रूपात व्यापार क्षेत्रात ते एक प्रमुख वित्तीय यशासाठी आहे. तथापि, कन्या लोकांसाठी स्थानांतरण किंवा नोकरी परिवर्तनासाठी ही एक चांगली वेळ नाही. या वर्षी तुम्ही कठीण मेहनतीच्या बळावर आपली व्यावसायिक महत्वाकांक्षेतला पूर्ण करण्यात यश मिळवाल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर, तुम्हाला यागोष्टीची काळजी घ्यावी लागेल की, कठीण परिश्रम यशाची कुंजी आहे म्हणून, आपले श्रेष्ठ प्रदर्शन कायम ठेवा आणि मेहनत करा म्हणजे तुम्ही अधिक लाभ मिळवू शकाल.
वर्ष 2020 चे कन्या राशि भविष्य विस्तृत वाचा - कन्या राशि भविष्य
तुळ राशि भविष्य 2020 च्या अनुसार करियर
तुळ राशि भविष्य 2020 च्या अनुसार तुळ राशीतील लोकांच्या करिअर साठी
मेहनत करण्याची आवश्यकता आहे. वर्षाच्या सुरवातीमध्ये अर्थात 24 जानेवारीला शनी चतुर्थ
भावात प्रवेश करेल आणि तुमच्या सहाव्या भाव, दहाव्या भाव आणि मेहनतीला प्रभावित करेल
याच्या परिणामस्वरूप, कार्यक्षेत्रात तुम्ही खूप मेहनत कराल. एप्रिल पासून जुलै मध्ये
बृहस्पतीची उपस्थिती ही चतुर्थ भावात होण्याच्या कारणाने तुम्ही आपल्या ज्ञानाचा प्रयोग
कार्यक्षेत्रात उत्तमरीत्या कराल ज्यामुळे कार्यक्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल आणि
तुमच्या करिअर मध्ये उन्नतीला सुरवात होईल. डिसेंबर महिन्यात तुम्हाला मोठ्या पदावर
नियुक्ती मिळू शकते. जानेवारी पासून एप्रिल तसेच नोव्हेंबर मध्य पासून वर्षाच्या शेवट
पर्यंतचा वेळ तुमच्या स्थानांतरण किंवा चांगल्या नोकरीमध्ये बदल याचे संकेत देते.
तुळ राशी 2020 च्या अनुसार शनीच्या स्थिती कारणाने तुम्हाला अत्याधिक मेहनतीमुळे कधी अशी स्थिती येऊ शकते की, मनासारखे परिणाम मिळणार नाही यामुळे तुम्ही मानसिक स्वरूपात चिंतीत होऊ शकतात किंवा तुम्हाला तुमचे काम करण्यास काही समस्या होऊ शकतात परंतु, तुम्हाला या आव्हानांना घाबरण्याची आवश्यकता नाही कारण, तुमची मेहनत तुम्हाला चांगले परिणाम नक्कीच देईल.
तुम्हाला सल्ला दिला जातो की, या वर्षी तुम्ही कुठला ही व्यवसाय सुरु करू नका कारण, त्यात यश मिळण्यात संदिग्ध आहे परंतु, जर व्यवसाय सुरु करण्याची इच्छा आहे तर, त्या व्यापार संबंधित पेशेवर आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या जे तुम्हाला कठीण समस्यांमधून जाऊन पुढे जाण्याचा चांगला सल्ला देऊ शकतील. तथापि, जे लोक आधीपासून व्यवसायाने जोडलेले आहे त्यांच्यासाठी वर्ष 2020 बराच चांगला राहू शकतो. तुम्ही नोकरीमध्ये असो किंवा व्यापारात तुम्ही मेहनत करत राहाल कारण त्याचा परिणाम बराच उत्तम असेल आणि कुठल्या ही कामात भीती किंवा घाई-गर्दी दाखवू नका. जे लोक मिल, खाणकाम, गॅस, पेट्रोलियम, खनिज, अनुसंसाधन, सल्लागार, सी.ए, वकील इत्यादी पेशाने संबंध ठेवतात त्यांच्यासाठी वर्ष 2020 उपलब्धीचावर्ष सिद्ध होऊ शकतो.
वर्ष 2020 चे तुळ राशि भविष्य विस्तृत वाचा - तुळ राशि भविष्य
वृश्चिक राशि भविष्य 2020 च्या अनुसार करियर
वृश्चिक राशि भविष्य 2020 च्या अनुसार वृश्चिक राशीतील लोकांच्या
करिअरसाठी हे वर्ष सामान्य राहू शकते. वर्षाच्या सुरवातीमध्ये तुम्ही कुठल्या नवीन
कार्याची सुरवात करू शकतात आणि या कार्यात तुम्हाला चांगले यश हातात येईल. जसे-जसे
वर्ष व्यतीत होईल तुम्ही प्रगतीच्या शिखराकडे जाल. भाग्य तुमची चांगली साथ देईल आणि
तुम्हाला उल्लेखनीय स्वरूपात यश मिळेल. या वर्षी तुमच्यामध्ये आपल्या कामाला घेऊन काही
संतृष्टी भाव राहू शकतो कारण, जितकी मेहनत तुम्ही कराल तुम्हाला वाटेल की, तुम्हाला
वाटेल की, तितका परिणाम मिळत नाहीये. या कारणाने तुम्हाला काही प्रमाणात स्वतःला बांधलेले
वाटेल. जर तुम्ही नोकरी करतात तर, तुम्हाला अचानक होणाऱ्या ट्रान्सफरचा सामना करावा
लागू शकतो. जे तुम्हाला आधी आवडणार नाही परंतु, तुम्हाला स्वतःला समजावे लागेल की,
परिवर्तन हा प्रकृतीचा आहे आणि यामुळेच जीवनात गती मिळते आणि जर तुम्ही या गोष्टीला
फील केले तर, तुम्ही या निष्कर्षापर्यंत पोहचाल की, स्थानांतरण तुमच्या पक्षातच आहे
आणि यामुळे तुम्हालाच लाभ होईल.
वृश्चिक राशि भविष्य 2020 च्या अनुसार वर्षाच्या पूर्वार्धात तुम्हाला आपल्या करिअरमध्ये प्रगतीच्या महत्वपूर्ण संधी मिळतील ज्यामुळे तुम्ही जीवनात पुढे जाल म्हणून, यावेळी तुम्हाला भरपूर वापर केला पाहिजे आणि समोर येणाऱ्या संधीचा लाभ घेतला पाहिजे. तसेच दुसरीकडे वर्षाच्या उत्तरार्धात तुम्हाला पद उन्नती मिळू शकते. याच्या व्यतिरिक्त तुमची वेतन वृद्धी होऊ शकते आणि काही लोकांच्या नोकरीमध्ये परिवर्तन होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आपल्या क्षमतेचे प्रदर्शन करण्यात यशस्वी झाले तर, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. या वर्षी तुमची रचनात्मक जोर पकडेल आणि तुम्हाला पुढे घेऊन जाईल. व्यापाऱ्यांसाठी वर्ष बरेच चांगले राहू शकते तथापि, तुम्हाला वर्षाच्या शेवटच्या महिन्यात काही जबाबदारीचे काम करावे लागू शकतात त्यांच्या प्रति सावधानी ठेवा. या वर्षी तुमचा आत्मविश्वास तुम्हाला यशाने प्रेरित करेल. जे लोक प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्ट करण्याची इच्छा ठेवतात त्यांना या वर्षी उत्तम फायदा होऊ शकतो. याच्या अतिरिक्त पेट्रोलियम, गॅस आणि तेल संबंधित लोकांना चांगला लाभ मिळू शकतो.
वर्ष 2020 चे वृश्चिक राशि भविष्य विस्तृत वाचा - वृश्चिक राशि भविष्य
धनु राशि भविष्य 2020 च्या अनुसार करियर
धनु राशि भविष्य 2020 च्या अनुसार हे वर्ष तुमच्या करिअर अथवा पेशेवर
जीवनासाठी बरेच चांगले राहील आणि तुम्हाला अनेक प्रकारचे यश मिळेल. एकापेक्षा अधिक
स्त्रोतांनी कमाई कराल. जर कुठले नवीन कार्य सुरु करण्याची इच्छा आहे तर, तुम्ही या
वर्षी करू शकतात. विदेशी स्रोत आणि थोडा परदेशी कंपन्यांसोबत व्यापारात लाभाचे चांगले
संकेत आहे तथापि, तुम्हाला भागीदारीच्या कामात सावधानता ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
जर तुम्ही नोकरी करतात तर, तुमचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल आणि तुम्हाला मान-सन्मान
मिळेल.
धनु राशि 2020 च्या अनुसार या वर्षी तुम्ही काही जुन्या कार्यांना पूर्ण करण्यात आणि काही प्रोजेक्टला या वर्षी सुरवात कराल ज्यामध्ये तुम्ही आपली कार्य कुशलतेने बरेच चांगले प्रदर्शन कायम ठेऊ शकाल. तुम्हाला आपल्या सहकर्मींकडून मदत मिळेल तसेच वरिष्ठ अधिकारी ही तुम्हाला समर्थन देतील यामुळे तुम्ही यशाची शिडीवर चालाल. तुम्ही जे चांगले कार्य केले आहे त्याचे पारितोषिक तुम्हाला पर्याप्त रूपात मिळेल. तुम्ही आपल्या उत्तम बुद्धिमतेने विरोधींवर भारी राहाल आणि त्यांच्या प्रत्येक योजना निष्फळ कराल. तुम्हाला भाग्याची उत्तम साथ मिळेल आणि तुम्ही आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी हिम्मतीने पुढे जाल. तुम्ही फक्त मेहनत कायम ठेवली पाहिजे आणि आपले काम करत राहिले पाहिजे तसेच, लक्षात ठेवा की, लोक तुम्हाला फॉलो करतील तर, चांगल्यात चांगले कार्य करणे तुमच्यासाठी उत्तम राहील. वर्षाच्या शेवटी काही समस्या येऊ शकतात किंवा काही कायद्याच्या गोष्टींमध्ये चिंतीत राहू शकतात यामुळे तुम्हाला सावधान राहिले पाहिजे. सोबतच, ही काळजी घ्या की, असे कुठले ही काम करू नका ज्यामुळे तुम्हाला मानहानीचा सामना करावा लागेल तथापि, अशी शक्यता ही कमीच आहे.
वर्ष 2020 चे धनु राशि भविष्य विस्तृत वाचा - धनु राशि भविष्य
मकर राशि भविष्य 2020 च्या अनुसार करियर
मकर राशि भविष्य 2020 च्या अनुसार तुमच्या करिअरसाठी मिश्रित परिणाम
देणारा असेल. नोकरीच्या शोधात लागलेल्या लोकांना जानेवारी नंतर एक स्थायी किंवा लांब
वेळेपर्यंत चालणारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचे स्थानांतरण
होईल आणि काहींना नोकरीच्या बाबतीत स्थान परिवर्तन करावे लागेल. मग, तुम्ही नोकरी करा
अथवा व्यापार या वर्षी तुम्हाला कामाच्या बाबतीत यात्रा करावी लागेल आणि परदेशात जाण्याची
शक्यता असेल. चांगली गोष्ट ही आहे की, या यात्रांचा परिणाम तुमच्यासाठी सुखद राहील
आणि तुम्हाला जीवनात पुढे जाण्याची संधी मिळेल. मल्टीनेशनल कंपनींमध्ये काम करणाऱ्या
लोकांसाठी वर्ष बऱ्याच संधी घेऊन येईल परंतु, एक गोष्ट लक्षात ठेवा की, या वर्षी तुम्हाला
खूप मेहनत करावी लागेल. 24 जानेवारी नंतर शनिदेव तुमच्या लग्न भावात जाऊन दशम दृष्टीने
दशम भावाला पाहतील या कारणाने तुम्हाला वर्षापर्यंत तुमच्या कामावर फोकस ठेऊन खूप मेहनत
करावी लागेल तथापि, त्या मेहनतीचा तुम्हाला खूप फायदा होईल.
मकर राशि 2020 च्या अनुसार तुम्हाला या वर्षी काही नवीन काम किंवा व्यवसायाची सुरवात करू नये. जर तुम्ही आधीपासून कुठला व्यवसाय करतात तर, उत्तम करण्याचा प्रयत्न करा आणि या संबंधित जे काही कार्य करावे लागेल ते करा ज्यामुळे तुम्हाला व्यापारिक यश प्राप्त होऊ शकेल. 30 मार्च पासून 30 जूनच्या मध्ये गुरु बृहस्पती तुमच्या राशीमध्ये विराजमान होतील आणि तुम्हाला उत्तम निर्णय घेण्यात मदत करेल. पर्यटन, समाजसेवा, मॅकेनिकल इंजीनियरिंग, इनफॉरमेशन टेक्नोलॉजी इत्यादी संबंधित कामात लागलेल्या लोकांना या वर्षी उत्तम यश मिळू शकते. 30 मार्च पासून 30 जून मध्ये तुम्ही आपल्या व्यापारात काही उपलब्धी मिळवू शकतात तसेच, मध्य सप्टेंबर नंतर कुठल्या ही प्रकारची जोखीम घेऊ नका. जर तुम्ही नोकरीमध्ये आहे तर, तुम्हाला धैर्याने काम करण्याचा सल्ला दिला जातो कारण, अशी शक्यता आहे की, तुम्ही कुठल्या ही गोष्टींनी असंतृष्ट होऊन राजीनामा देऊ शकतात आणि जर तुम्ही असे केले तर, तुम्ही समस्येत येऊ शकतात म्हणून, धैर्याने काम करा. जर तुम्ही विचारपूर्वक काम केले तर, तुमचे निर्णय तुम्हाला उत्तम रस्ता दाखवतील आणि तुम्ही मनासारखी नोकरी मिळवण्यात यशस्वी व्हाल.
वर्ष 2020 चे मकर राशि भविष्य विस्तृत वाचा - मकर राशि भविष्य
कुंभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार करियर
कुंभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार हे वर्ष तुमच्या करिअरसाठी चढ-उताराने
भरलेले राहू शकते म्हणून, कुठला ही निर्णय घेण्याच्या आधी चांगल्या प्रकारे विचार करा.
या वर्षी तुमच्या नोकरीमध्ये स्थानांतरण होण्याचे मजबूत योग आहेत आणि कार्यस्थळात काही
तणावपूर्ण स्थिती निर्माण होऊ शकते यामुळे तुम्हाला नोकरी बदलण्याच्या बाबतीत विचार
करावा लागू शकतो. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करतात तर बऱ्याच प्रमाणात तुमच्यासाठी
आरामदायी वर्ष राहण्याची अपेक्षा आहे. विशेष रूपात जानेवारी पासून 30 मार्च आणि 30
जून पासून 20 नोव्हेंबर मध्ये तुमच्या व्यवसायात उत्तरोत्तर वृद्धी होईल आणि तुम्ही
यशासाठी नवीन कीर्तिमान बनवाल.
कुंभ राशि 2020 (Kumbh Rashi 2020) च्या अनुसार हे वर्ष तुमच्या व्यावसायिक जीवनासाठी सामान्य स्वरूपात शुभ राहू शकतो. जर तुम्ही कुठला नवीन व्यवसाय करायची इच्छा ठेवतात तर, या गोष्टीची काळजी घ्या की, तुमच्या त्या व्यवसायात असे लोक नक्की हवे की, त्यांना त्या व्यवसायाचा अनुभव असावा अन्यथा, लाभ स्थानावर हानी होऊ शकते. आपल्या कुटुंबातील लोकांसोबत भागीदारी करू नका आणि आपल्या कार्यक्षेत्रात त्यांचा हस्तक्षेप होऊ देऊ नका. गुंतवणूक करायची इच्छा असेल तर, तुम्हाला सावधान राहावे लागेल कारण, आपल्या व्यवसायात किंवा अश्या गुंतवणुकीमध्ये तुम्हाला नुकसान होऊ शकते. तुम्हाला या वर्षी कार्य-क्षेत्रात कुठल्या ही प्रकारची रिस्क घेण्यापासून वाचले पाहिजे आणि जर तुम्ही नोकरी करतात तर, अश्यात आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यां सोबत चांगला व्यवहार ठेवा म्हणजे कुठल्या आव्हानात्मक समस्यांचा सामना करण्यापासून बचाव होऊ शकतो. जानेवारीचा महिना तुमच्या करिअरसाठी बराच चांगला राहील. तुम्हाला या वर्षी नोकरी अथवा व्यवसायाच्या संधर्बात परदेशातील यात्रेवर जावे लागू शकते विशेषतः मार्च ते मे च्या मध्य काळात शकतात. ही यात्रा तुमच्या कार्यासाठी नवीन ऊर्जेचा संचार करेल आणि तुम्हाला लाभ प्रदान करेल.
वर्ष 2020 चे कुंभ राशि भविष्य विस्तृत वाचा - कुंभ राशि भविष्य
मीन राशि भविष्य 2020 च्या अनुसार करियर
मीन राशि 2020 च्या अनुसार तुमच्यासाठी वर्षाची सुरवात बरीच चांगली
राहील आणि कार्यक्षेत्रात तुमच्या कार्याचे कौतुक होईल. जानेवारी पासून 30 मार्च पर्यंतची
वेळ बऱ्यापैकी अनुकूल राहील आणि तुम्ही जे निर्णय घ्याल ते तुम्हाला पुढे जाण्याचे
कार्य करेल. त्या नंतर 30 जून पर्यंतची वेळ तुमच्या कमाई मध्ये वृद्धी करेल आणि तुम्ही
आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिक निकट याल ज्या कारणाने वेळोवेळी तुम्हाला त्यांच्या
कारणाने लाभ आणि सुविधेची प्राप्ती होईल. तुमच्यापैकी काही लोकांना या वर्षी चांगली
पद उन्नती मिळू शकते.
मीन राशि भविष्य 2020 च्या अनुसार तुम्ही कुठला व्यापार करत असाल तर, वर्ष अधिक चांगले राहण्याची शक्यता आहे. भाग्याचा साथ तुम्हाला मिळेल यामुळे तुमच्या कामात प्रगती होईल. जर तुम्ही आपल्या व्यवसायाला वाढवण्याची इच्छा ठेवतात तर, त्यात विस्तार होऊ शकतो तसेच, त्याच्या विस्ताराच्या कारणाने तुम्हाला अधिक लाभ मिळेल. शेअर बाजार तसेच सट्टा बाजार करणाऱ्या लोकांसाठी चांगले लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता या वर्षी दिसत आहे.
मीन राशि भविष्य 2020 च्या अनुसार या वर्षी विशेष रूपात 30 मार्च पासून 30 जून मध्यचा वेळ तुम्हाला उच्च शिखरावर जाणारा सिद्ध होऊ शकतो. जे लोक आपला व्यापार करतात त्यांना या वर्षी अत्याधिक लाभ मिळण्याची शक्यता राहील आणि व्यापाराच्या कारणाने त्यांच्या समान सन्मानात वृद्धी होईल. या वेळेत तुम्हाला आपल्या विरोधींपासून थोडे सावधान राहावे लागेल तथापि, ते तुमचे अधिक नुकसान करू शकणार नाही तरी ही वेळोवेळी ते तुम्हाला मानसिक रूपात चिंतीत करू शकतात आणि तुमच्या कामामध्ये व्यवधान उत्पन्न करू शकतात. सुरवातीमध्ये व्यापारात लाभ काही प्रमाणात कमी होऊ शकतो परंतु, जसे-जसे वेळ पुढे जाईल तुमचे काम पटापट होईल आणि वर्षाच्या शेवट पर्यंत तुम्ही स्वतःला एक अत्याधिक सुविधाजनक स्थितीत मिळवाल. मीन राशीतील लोकांच्या करिअरसाठी हे वर्ष बरेच चांगले सिद्ध होऊ शकतात.
वर्ष 2020 चे मीन राशि भविष्य विस्तृत वाचा - मीन राशि भविष्य
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems

AstroSage on MobileAll Mobile Apps
- Mars Transit In Cancer: Debilitated Mars; Blessing In Disguise
- Chaitra Navratri 2025 Day 4: Goddess Kushmanda’s Blessings!
- April 2025 Monthly Horoscope: Fasts, Festivals, & More!
- Mercury Rise In Pisces: Bringing Golden Times Ahead For Zodiacs
- Chaitra Navratri 2025 Day 3: Puja Vidhi & More
- Chaitra Navratri Day 2: Worship Maa Brahmacharini!
- Weekly Horoscope From 31 March To 6 April, 2025
- Saturn Rise In Pisces: These Zodiacs Will Hit The Jackpot
- Chaitra Navratri 2025 Begins: Note Ghatasthapna & More!
- Numerology Weekly Horoscope From 30 March To 5 April, 2025
- मंगल का कर्क राशि में गोचर: देश-दुनिया और स्टॉक मार्केट में आएंगे उतार-चढ़ाव!
- चैत्र नवरात्रि 2025 का चौथा दिन: इस पूजन विधि से करें मां कूष्मांडा को प्रसन्न!
- रामनवमी और हनुमान जयंती से सजा अप्रैल का महीना, इन राशियों के सुख-सौभाग्य में करेगा वृद्धि
- बुध का मीन राशि में उदय होने से, सोने की तरह चमक उठेगा इन राशियों का भाग्य!
- चैत्र नवरात्रि 2025 का तीसरा दिन: आज मां चंद्रघंटा की इस विधि से होती है पूजा!
- चैत्र नवरात्रि 2025 के दूसरे दिन मां दुर्गा के इस रूप की होती है पूजा!
- मार्च का आख़िरी सप्ताह रहेगा बेहद शुभ, नवरात्रि और राम नवमी जैसे मनाए जाएंगे त्योहार!
- मीन राशि में उदित होकर शनि इन राशियों के करेंगे वारे-न्यारे!
- चैत्र नवरात्रि 2025 में नोट कर लें घट स्थापना का शुभ मुहूर्त और तिथि!
- अंक ज्योतिष साप्ताहिक राशिफल: 30 मार्च से 05 अप्रैल, 2025
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025